हे राजा आम्ही असे चुकत तर नाहीयोत नं

अत्रन्गि पाउस's picture
अत्रन्गि पाउस in काथ्याकूट
10 Jan 2017 - 3:37 pm
गाभा: 

हे राजन

अत्यंत गांजलेले आम्ही मोठ्या विश्वासाने तुझ्याकडे बघतोय ...सतत आणि नेहेमीच
तुझ्या प्रत्येक कृती कडे मोठ्या कौतुकाने बघतोय त्याचा काहीतरी सकारात्मक अर्थ लावतोय ....प्रामाणिकपणे ..
तुझ्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवतोय ...डोळे झाकून
तू सज्जनांच रक्षण करशील त्याचं दु:ख नाहीसे नाही तरी निदान कमी करशील अशी आशा लावलीये आम्ही ...ती वेडी आशा तर नाहीयेना राजन ?
वेगवेगळ्या सुख, सुविधा सवलतीनचा त्याग म्हणजे काहीतरी उदात्त अशी स्वातंत्र्य पूर्व काळातील मानसिकता आम्ही पण मोठ्या उत्साहाने अंगिकारली ...सगळ्यांनी नाही पण बऱ्याच जणांनी

वेगवेगळे तज्ञ उलट सुलट बोलतात तुझ्या प्रत्येक गोष्टींवर ...आम्ही खूप दुर्लक्ष करतो त्यांच्याकडे ...वाटत कि अस्सल देशप्रेम असच असत, निस्वार्थ राज्यकर्ता असाच असतो हे कदाचित आमच्या सारखे त्यांना हि ठाऊक नाही ...आम्हाला ठाऊक आहे कि ज्या गुरुकुलातून तू आलास तिथे एकापेक्षा एक थोर लोकांनी ह्या देशासाठी खूप काही केले ...सर्वस्व अर्पून, पिढ्यान पिढ्या आणि निरलसपणे

पण तरीही ...हे बोलवत नाही रे ...पण काय कोण जाणे, अलीकडे तुझे हितशत्रू, जे आम्हालाही आमचे शत्रूच वाटतात नव्हे ते तसे आहेतच, ते जे बोलतात ते ऐकावस वाटू लागलंय

खरंच तू भ्रष्टाचारी लोकांना शिक्षा करणार आहेस नं ? गुन्हेगारांना धडा शिकवणार आहेस नं ? देशाच्या शत्रूला अद्दल घडवणार आहेस नं ? आमच्याकडून घेतलेल्या जास्तीच्या करांचा सत्कारणी उपयोग होणारे नं ?

हे राजन कारण वर म्हटल्या प्रमाणे

अत्यंत गांजलेले आम्ही मोठ्या विश्वासाने तुझ्याकडे बघतोय ...सतत आणि नेहेमीच
तुझ्या प्रत्येक कृती कडे मोठ्या कौतुकाने बघतोय त्याचा काहीतरी सकारात्मक अर्थ लावतोय ....प्रामाणिकपणे ..

हे राजा आम्ही असे करून चुकत तर नाहीयोत नं

कारण जर तुही तुझ्या पूर्वसुरींच्या दिशेने गेलास तर मात्र आम्हाला आणि ह्या देशाला पुढची ५०० वर्षे कुणीही त्राता नाही हे नक्की ...

प्रतिक्रिया

मनिमौ's picture

10 Jan 2017 - 7:37 pm | मनिमौ

आवडेश