व्देष, तिरस्कार, घृणा, सामाजिक वर्चस्ववाद की आणखी काही?

Primary tabs

जानु's picture
जानु in काथ्याकूट
10 Jan 2017 - 1:02 pm
गाभा: 

सध्या बहुजन समाज मोर्चा पासुन महाराष्ट्रात एक वेगळीच घुसळण सुरु आहे. जातीच्या संवेदना तशा गेल्या १० वर्षात हळुहळु टोकदार होत होत्या. ओबीसी आंदोलनाने त्यास चांगलीच हवा दिली. भाजपा केंद्रात आणि राज्यात सत्तेत आल्यापासुन या प्रकाराला धार चढली. भुजबळ अटकेत गेल्यावर कोणाचा नंबर येतो याकडे जनतेचे आणि दोन्ही काँग्रेसींचे लक्ष होते. कोपर्डी हे तत्कालीन कारण ठरले.
या मोर्चापासुन सामाजिक प्रगटीकरणाच्या साधनांवर समाजातील दोन्ही बाजुंकडुन आपाआपली मते जोरदारपणे मांडली जात आहेत. या मुद्द्यांचा विचार केला असता, त्यात खालील बाबी जाणवतात,
१ - मागील घटनांचा उल्लेख करुन त्यावर भाष्य होतांना दिसते.
२ - या मोर्चात दृश्यपणे आरक्षण आणि जातीविषयक कायदा बदल या मुख्य मागण्या समोर आल्या.
३ - दलित आणि ईतर समाजानेही आपले शक्ती प्रर्दशन करुन आपण लढण्यास तयार आहोत हे दाखवले.
४ - त्या नंतरच्या स्थानिक निवडणुकीत या सगळ्यांचा भाजपाला फटका बसेल असे वाटत होते तो अंदाज चुकला.
५ - यानंतर ब्राम्हणांना दोन्ही बाजुंकडुन भुतकाळातील घटनांवरुन लक्ष करण्यात आले.
रोज या मुद्द्यावर आम्ही चेपु, काय अप्पा वर अत्यंत टोकाचे विचार ऐकतो, वाचतो. हे वाचतांना काही बाबी फार खटकल्या,
१ - फार कमी लोक यावर संयमित प्रतिक्रिया देतात.
२ - आजची स्थिती काय? आजचे आपले सामाजिक, आर्थिक, राजकीय संबंध पणाला लावण्याची तयारी धरावी इतकी गरज
आहे का? याचा विचार केला जात नाही.
३ - आपल्या दैवताबाबत अवास्तव कल्पना आणि भ्रामक समजुती, संदर्भहीन अणि बिनबुडाच्या कथा बिनदिक्कतपणे सांगितल्या जातात.
४ - यात २० वर्ष प्राथमिक शिक्षक आणि डॉक्टर म्हणुन सेवा केलेले लोकही मनापासुन भाग घेतांना दिसतात हे फार निराशाजनक.
५ - भाषा वापरण्याचे संकेत, सामाजिक प्रतिष्ठा यांचा विचार न करता असभ्य आणि समोरच्याचा अत्याधिक अपमान कसा होईल याचा
प्रकर्षाने विचार करुन पोस्ट टाकल्या जातात? याची खरच गरज आहे का?
६ - बहुजन समाजाला मुस्लीम आपले मित्र ही मांडणी भविष्यात काही कामात येईल का?
हे प्रथम मान्य करतो की वरील विचारांमध्ये मुख्यतः मराठा समाजाने अधिक जबाबदारीने वागावे ही अपेक्षा आहे. मी ना ब्राम्हण, ना मराठा, ना अल्पसंख्यांक, ना माझ्या जातीत कोणी महापुरुष आला. (याचा मला आज आनंद वाटतो.) सामाजिक उतरंडीत आम्ही अधे मधे, राजकीय बाबीत शुन्य, आणि आर्थिक आहे त्यात सुखी.

आमच्या सारख्यांची मोठी गोची होते, ब्राम्हण, मराठा आणि दलित या सगळ्यांत मित्र असल्याने या मित्राच्या विचारांमधील बदल, जुने मित्र जेव्हा मराठा, दलित, मुस्लीम म्हणुन भेटतात तेव्हा फार वाईट वाटते. या सगळ्या घडामोडींचा आपल्या समाजावर आणि विकासावर फार परिणाम होतील असे मला वाटते. ही एकमेकांविषयीची मते म्हणजे नेमके काय आहे याचा विचार आपण करावा. परिणाम काय होतील याचाही विचार करा. चुका असतील तर दुरुस्त करायच्या की त्याच्या आधारावर अधिक मोठ्या चुका तर आपण करत नाही ना? याचा उहापोह आपण करावा.

कृपया मागील घटनांचा / ईतिहासाचा उल्लेख न करता यावर मते मांडावीत ही अपेक्षा.

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

10 Jan 2017 - 3:36 pm | श्रीगुरुजी

आजूबाजूला काय होतंय यावर जास्त विचार न करता फक्त स्वप्रगतीवरच भर द्या. आपला इतिहास किती गौरवशाली होता, आपल्या जातीत/धर्मात कोण महान व्यक्ती होऊन गेल्या, कोणत्या जातीच्या लोकांनी भूतकाळात आपल्या पूर्वजांवर अन्याय केला, आपल्या पूर्वजांनी भूतकाळात किती महान कार्य केले इ. अभिनिवेश चघळायला ठीक आहे. परंतु निव्वळ चघळण्यातून प्रगती होणार नाही. भूतकाळ/इतिहास पूर्ण विसरू नका, पण त्यात पूर्ण रमून जाऊ नका. तो फक्त एवढ्यासाठी विसरू नका की त्या काळातील चुकांची पुनरावृत्ती वर्तमानात व भविष्यात होऊ नये. वर्तमान व भविष्य हेच भूतकाळापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे याची जाणीव असू द्या.

किती साळसुद प्रतिक्रिया दिलीय गुर्जींनी वा.

आत्मबंध's picture

10 Jan 2017 - 7:22 pm | आत्मबंध

=))

श्रीगुरुजी's picture

11 Jan 2017 - 3:14 pm | श्रीगुरुजी

हहपुवा

साळसुद नाही, निरागस म्हणा हवं तर!

मनिमौ's picture

10 Jan 2017 - 7:50 pm | मनिमौ

प्रतिक्रियेत काय साळसूद पणा सापडला हे जरा ईस्कटून सांगा

वेगळी जात ही जगण्याची वेगळी पद्धती एवढेच मला वाटायचे.
पण जात ही आता हिन्स्त्र रानटी टोळी झाली आहे.

हे सगळ लवकर थाम्बायला हवे....

देवेन भोसले's picture

11 Jan 2017 - 9:19 am | देवेन भोसले

खरच सगल्या जाति पुसुन टा़कल्य पाहिजे फक्त मानव हि एकच ओळख पाहिजे
वीट आलाय आता जातिजातित अडकुन, कुनाचि प्रगाति तर होनर नहि पन अधोगति नक्कि होते जातित अड्कल्यने

nanaba's picture

11 Jan 2017 - 9:21 am | nanaba

आवडला

असेच जातिआधारीच राजकारण करत राहिलो तर आपला देश कधीच प्रगत होणार नाही.