काही ओळखीच्या स्त्रिया

मिडास's picture
मिडास in जनातलं, मनातलं
9 Jan 2017 - 2:19 pm

"वाट पंढरीची बाई कशी झाली ओली ? नाहत होती रुख्मीणी केस वाळवीत गेली ." दोनच ओळी पण एक नविन जग डोळ्यासमोर उलगडणारी . आपल्या लोकगीतांची पण कामालाच आहे. किती सामर्थ्य आहे यांच्यात? एक मोहक क्षण आपल्याला स्पर्शुन जातो. त्या पंढरपूरच्या विठ्ठला मागे हि रुख्मिणी धावत गेली खरी, पण त्या विठोबाला तिची खबर होती कि नाही कोण जाणे. आपला इतिहास पण अश्याच रुख्मिणींच्या जिवावर जगू पाह्तोय. आत्ताच नाही पण शेकडो हजारो वर्षा पासून.
मागे एकदा मी माझ्या मैत्रिणीला विचारला होतं "का करतात माणसं लग्न?"
" Because we need a witness in our life. " ती म्हणाली होति.
अरे किती माणसं आहेत जगात. कुणाकडे लक्ष द्यायला वेळ तरी आहे का आपल्या कडे ? आणि लग्न म्हणजे तरी नक्की काय तर आपण दुसरया व्यक्तीला सांगायचं कि मी लक्ष देईन तुझ्या कडे . Your life wont go unnoticed because I will be your witness.
तेव्हा का माहित नाही पण पटलं होतं मला ते. पण परवा अजिंठ्याच्या लेण्यामध्ये यशोधरेच शिल्पं पाहिला आणि मला स्वतः लाच भरून आलं एकदम. दारात बुद्ध उभ. हो बुद्धच. तिचा सिद्धार्थ तर कधीच गेला होता तिला सोडून. तिच्या डोळ्यात म्हटलं तर ओळख आहे म्हटलं तर नाही असे भाव. तो चिमुरडा राहुल तर भांबावूनच पाहतोय या माणसाकडे. आणि तो सर्वज्ञानी गौतम बुद्ध अलिप्त नजरेने पाहतोय त्यांच्याकडे. मला नाही आवडलं. असेल तो ज्ञानी. मिळवलाहि असेल त्याने त्याच्या मोहावर विजय पण म्हणून डोळ्यात जराही अपराधीपण दिसू नये? जी मुलगी त्याच्या आयुष्यात आपले मागचे सर्व बंध तोडून आलेली, तिच्याकडे पाठ फिरवताना जराही हललं नसेल का त्याच्या हृदयात ? आणि आता परत येउन काय मिळवला त्याने ? हे सगळा मनात आलं आणि मग उडूनच गेला माझं मन त्या अजिंठ्यामधून. मग हळूहळू लक्षात आलं कि यशोधरा एकटीच नाही. अजून बऱ्याच सोबतिणी आहेत तिच्या. ती राधा,ती सीता झालच तर म्हाळसा द्रौपदी आणि अश्या बऱ्याच जणी. आपण मार मजेत म्हणतो कि प्रेमात कसली अपेक्षा करू नये. अरे मान्य आहे न मलापण. मग ज्या व्यक्तीवर आपण प्रेम केलं तिने असा स्वार्थीपणा का करावा ? रामाने सीतेवर प्रेम केलं आणि मग जंगलात नेउन सोडून दिलं. द्रौपदीचे तर पाच पाच नवरे पण एकालाही तिची कदर असू नये? कदाचित हीच काहीशी अपराधी जाणीव आपल्या लोककलाकारांना आणि संतांना झाली असेल. त्यातून जे जन्माला आलं ते अभिजात वाङ्मय . एक प्रकारचा काव्यगत न्याय दिला गेला या बाईंना . त्यांच्या भाव भावना उघड्यावर आल्या . घराघरात पोहोचल्या आणि मग लोक म्हणू लागले "कर्णाला पाहुन द्रौपदिच मन पाकुळल." कुणीतरी जनाबाई विठ्ठलाला धरून कामं करून घेते. तर कुणी त्या सावळ्याला बांधून ठेवते. या माझ्या मैत्रिणींच्या जखमेवर फुंकर मारतात हि लोकगीतं. म्हणून आज मी त्यांना म्हणू शकतो, Your life won't go unnoticed.Never ever again.

मांडणीविचार

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

9 Jan 2017 - 3:40 pm | आनन्दा

एक मुक्तक म्हणून आवडले.. त्यातला इतिहास बाजूला ठेवला तर. लिहीत रहा.

सूड's picture

9 Jan 2017 - 3:45 pm | सूड

लिहीत राहा,

आदूबाळ's picture

9 Jan 2017 - 3:47 pm | आदूबाळ

राम म्हणू नई राम | नाही सीतेच्या तोलाचा || सीता माझी हिरकणी | राम हलक्या दिलाचा ||

हे ऐकलं तेव्हा फाड्कन एक बसल्यासारखं वाटलं होतं.

पिलीयन रायडर's picture

10 Jan 2017 - 12:13 am | पिलीयन रायडर

अगदी..

आणि शेवंतीचं बन मध्ये ज्या आर्ततेने माधुरी पुरंदरे ही ओळ म्हणतात ना... तोड नाही..

असेच म्हणतो. राम हा आदर्श पुरुष कसा हे मला आजवर समजलेलं नाही.

ज्योति अळवणी's picture

9 Jan 2017 - 7:43 pm | ज्योति अळवणी

पटलं अगदी. माझ्याही मनात अनेकदा असे विचार येतात. जर सीतेने रामाला म्हंटल असत की मी अग्नी परीक्षा द्यायला तयार आहे; पण तू देखील माझ्यापासून लांब होतासच की. मग तू देखील अग्नी परीक्षा दे... तर कदाचित रामायणाचा शेवट वेगळा असता का?

मनिमौ's picture

9 Jan 2017 - 8:31 pm | मनिमौ

अगदी अलीकडे पर्यंत ही एकटेपणाची परंपरा चालत आलीये. मग ती माधवाची रमा असो किवा दुसरी कोणी

रुक्मिणीमागे कृष्ण द्वारकेहून दिंडीरवनात आला ना?

मुक्तक आवडलं.

रातराणी's picture

10 Jan 2017 - 10:22 am | रातराणी

मुक्तक आवडले, लोकगीतातल्या काही ओळी, त्यांचा परिचय करून दिलात तर वाचायला आवडेल.

जेपी's picture

10 Jan 2017 - 12:41 pm | जेपी

आवडल.