भक्ष (भयकविता)

अॅस्ट्रोनाट विनय's picture
अॅस्ट्रोनाट विनय in जे न देखे रवी...
7 Jan 2017 - 1:14 pm

अंधारात चालले, चार तरुण मित्र
रस्त्यावर नव्हतं, कुणी काळं कुत्रं.
त्यांना नाही दिसलं, एकजण फसलं

अंधारात चालले, तिन तरुण मित्र
चालले होते मस्तीत,आपल्याच बेफिकर
एकजण नव्हता, त्यांना नव्हती खबर

दोनजण उरले, दोघेही घाबरले
"कोण आहे तिकडे?"
भेदरून ओरडले

अंधारात कोलमडला, एक तरुण मित्र
उरलं नाही भान पुटपुटायचं स्तोत्र
काय होणार आता,त्याने लगेच ताडलं,
चावलं
फाडलं

अंधारात चालले, चार तरुण मित्र,
शोधत होते भक्ष,
आठ लाल नेत्र
--------------------

आता मला वाटते भितीकविता

प्रतिक्रिया

जव्हेरगंज's picture

7 Jan 2017 - 1:36 pm | जव्हेरगंज

वाहवा!!

भारी लिहिताय!!

अॅस्ट्रोनाट विनय's picture

7 Jan 2017 - 7:42 pm | अॅस्ट्रोनाट विनय

धन्यवाद जव्हेरगंज

जव्हेरगंज's picture

7 Jan 2017 - 8:09 pm | जव्हेरगंज

शेवटचं कडवं,

अंधारात चालले, चार तरुण मित्र,
शोधत होते भक्ष,
आठ लाल नेत्र

हे समजलं नाही. थोडं सांगता काय? बाकीची कविता सगळी समजलीच आहे.

सुरुवातीची "माणसं" आता स्वतः भक्ष्य शोधाताहेत असं असेल.

चांदणे संदीप's picture

7 Jan 2017 - 9:28 pm | चांदणे संदीप

ये आदमी लगता है टक्करका! होऊन जाऊद्या जुगलबंदी!

कविता अर्थातच भारी!

Sandy

अॅस्ट्रोनाट विनय's picture

7 Jan 2017 - 11:23 pm | अॅस्ट्रोनाट विनय

साहित्यिक जुगलबंदी आवश्यकच असते. त्यामुळे प्रतिभेची घुसळण होते, लेखकांना लिहायला अन वाचकांना वाचायला मजा येते. चौकटींमध्ये अडकलेल्या लेखनाला मोकळा श्वास घेता येतो.

अॅस्ट्रोनाट विनय's picture

7 Jan 2017 - 11:17 pm | अॅस्ट्रोनाट विनय

शेवटच्या कडव्याचा अर्थ असा की चार मित्र आता स्वतः भूत बनून भक्ष शोधत आहेत.

एस's picture

7 Jan 2017 - 9:43 pm | एस

And then there were none...

अत्रुप्त आत्मा's picture

10 Jan 2017 - 11:13 am | अत्रुप्त आत्मा

ह्हू हूहूहूहूहूहूहू! http://www.easyfreesmileys.com/smileys/free-scared-smileys-1044.gif

ज्योति अळवणी's picture

10 Jan 2017 - 12:43 pm | ज्योति अळवणी

अप्रतिम भिती