नाती

रोहित जाधव's picture
रोहित जाधव in जनातलं, मनातलं
6 Jan 2017 - 5:18 pm

नाती म्हंटल की आठवतात ती रक्ताची नाती. पण काही नाती ही रक्ताचा नात्यानं पेक्षा थोडी वेगळी असतात. काही प्रसंगी तर ती रक्ताचा नात्यानं पेक्षा जास्त घट्ट वाटतात. आपण आपल्या मित्राला खूप वर्षा नंतर भेटतो. बराच वेळ गप्पा केल्या नंतर आपण जायला निघतो त्याला आपले प्रॉब्लेम न सांगताच आणि मित्र बोलतो अरे जे बोलायला आला होतास ते तर बोललाचस नाहीस. इथे आपल्याला जाणीव होते की आपण न बोलताच आपल्या भावना त्याचा पर्यंत पोहोचलेल्या असतात. घरी टिव्ही वर कधी तरी एखादी क्रिकेट मैच एकदम रंगात आलेली असते. आपल्याला वाटते आपला भाऊ आपल्या बरोबर घरी असता तर अजुन मजा आली असती आणि क्षणात दारा वरची बेल वाजते आणि पाहतो तर काय आपल्या कडे फार क्वचित येणारा आपला भाऊ दारातच उभा असतो. त्याला येण्याचे कारण विचारावे तर त्याचाकडे ते नसते. इथेही आपल्याला अटूट नात्याचा प्रत्यय येतो. अशा ह्या नात्यानं प्रमाणेच काही रक्ताची नातीही गोंडस असतात. कितीही दूर असलो तरीही फक्त आपल्या फोन वरील हैलो वरुनच आपल्या तब्येतीचा, खराब मूडचा अंदाज घेणारी आपली बहीण. बऱ्याचदा आई ची आठवण येत असते तिचाशी बोलायचे असते. फोन करू की नको हा विचार आपण करतच असतो की समोरून आईचाच फोन येतो. त्यां क्षणी होणारा आनंद हा वेगळाच असतो. अशीच एक ना अनेक नाती आपण आयुष्यभर जपलेली असतात अशा ह्या सुंदर नात्यानं साठी वरील चार ओळी....

मुक्तकविचार

प्रतिक्रिया

मराठी कथालेखक's picture

11 Jan 2017 - 11:23 am | मराठी कथालेखक

तुम्ही पाच सहा प्रसंग अगदी संक्षिप्तपणे लिहले आहेत त्यापेक्षा एखादाच प्रसंग (खास मनात घर करुन राहिलेला) जास्त खुलवला असता तर वाचकाच्या मनाला अधिक भिडला असता.

मिपावरील तुमचे हे पहिलेच लेखन आहे ...

पुढील लेखनास शुभेच्छा.