Random Act ऑफ kindness

डिस्कोपोन्या's picture
डिस्कोपोन्या in काथ्याकूट
9 Dec 2016 - 1:44 pm
गाभा: 

वेळ- मावळतीची
स्थळ- पुण्यातील एक गर्दीचा रस्ता (कोणता ते महत्वाचा नाही)

मुंगीच्या पावलांनी दुचाकी पुढे पुढे रेटत असताना आपला नेहमीचा छंद सुरु होता, हो अशा गर्दीत सुद्धा पुणेकरांची छंद जोपासण्याची हातोटी जगावेगळी आहे, गाडीचा वेग जरी मंद असला तरी नजरेचा वेग काही मंद झालेला नसतो,बाजूची कार कोणती आहे त्यामध्ये कितीजण आहेत, आजूबाजूच्या दुचाकी कोणत्या मोडेल ची आहे,त्या दुचाकीवरील व्यक्ती च्या चेहऱ्यावरचे हावभाव कसे आहेत(हे निरीक्षण अतिशय जिकीरीचे असते कारण पुण्यात दुचाकीवरचे चेहरे नव्व्याण्णव टक्के वेळा दिसतच नाहीत, स्कार्फ, रुमाल , मास्क आणि गॉगल ने शंभर टक्के झाकलेले असतात) इत्यादी निरीक्षणाचा छंद सतत सुरु असतो..

अशातच माझ्या शेजारी एक नवी कोरी KTM ड्युक थांबली , सिग्नल नुकताच लाल झाला होता, KTM वर अर्थातच कपल आणि मागे चक्क चेहरा न झाकलेली ललना (खरच सुंदर होती )... काय झाल कुणास ठाऊक एक गिरकी घेऊन KTM वरून ती उतरली (अशा प्रकारे KTM वरुन सफाईदारपणे उतरण ही एक कलाच आहे), चालवणारा बॉयफ्रेंड पण गोंधळून गेला आणि काहीतरी बडबडला (मला काहीच समजल नाही भाषा तमिळ किंवा तेलगु असावी, म्हणजे पोरगी पुण्यातली नव्हती आणि म्हणून चेहरा दिसला होता, परत सांगायला हरकत नाही खरच सुंदर होती ती). त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून पुढच्या क्षणात ती बाजूच्या फूटपाथ वर गेली.... खाली वाकली !!

तिच्या समोर एक जक्ख म्हातारी पुढ्यात कोणत्यातरी पालेभाजीच्या गड्ड्या घेऊन बसली होती..तिने हातवारे करून त्या म्हातारीला काहीतरी विचारलं...त्या म्हातारीन त्या हातवार्यांना बोटाने पाच अस उत्तर दिलेलं दिसलं! त्या पोरीन म्हतारीच्या पुढ्यातल्या सगळ्या गड्ड्या उचलल्या आणि म्हातारीच्या मुठीमध्ये जबरदस्तीने एक नोट दाबली (पाचशेपेक्षा कमी नसणार तेव्हा त्या नोटेला किंमत होती). या सगळ्या प्रकारान म्हातारीला पण काहीच झेपल नाही...एव्हाना ती पोरगी ज्या सफाईन KTM वरून उतरली त्याहीपेक्षा सफाईन KTM वर जाऊन बसली... आणि सिग्नल हिरवा झाला होता, KTM रेस करून माझ्यापुढे निघाली होती ... मी माझ्या गाडीचा Starter दाबत गाडी सुरु करता करता स्ट्रीट लाईट च्या प्रकाशात त्या म्हातारीचे डोळ्यात एक चमक पाहिली, आनंदाशृ !! माझी गाडी सुरु झाली पण KTM काही नजरेच्या टप्प्यात नव्हती! आणि म्हातारी पुढ्यातल सर्व आवरून बहुधा घरी निघायच्या बेतात होती!!

आणि हे सगळ बघून मलाच उगीच आनंद झाला होता ! अशी घटना नुसती बघून सुद्धा आनंद होतो !!

तर मित्रांनो share करा तुम्ही अनुभवलेला किंवा केलेला Random Act ऑफ kindness!!

प्रतिक्रिया

पाटीलभाऊ's picture

9 Dec 2016 - 2:23 pm | पाटीलभाऊ

तुमचा आयडी...हाहाहा...!
पण चांगला अनुभव..!
(अवांतर: खरंच पोरगी इतकी सुंदर होती का ? :P)

डिस्कोपोन्या's picture

9 Dec 2016 - 3:26 pm | डिस्कोपोन्या

धन्यवाद पाटीलभाऊ

अवांतर: खरंच पोरगी इतकी सुंदर होती का ?

खरच सुंदर होती, आणि तेच महत्वाच आहे, ज्या पद्धतीने सहज सगळा प्रकार घडला त्याच कौतुक आहे..आणि सुंदर मुली इतक्या सहज वागत नसतात generally :P

टवाळ कार्टा's picture

10 Dec 2016 - 5:28 pm | टवाळ कार्टा

जब्रा
लेख आणि काडी दोन्ही ;)

nanaba's picture

11 Dec 2016 - 9:43 am | nanaba

Kaaheehee Han Di!

माझ्यासकट ३ वर्षेहुन अधिक झालेल्या सर्व जुन्या आयडींना लेखनबंदी करावी.
म्हणजे असे फ्रेश शैलीत लिहेलेलं वाचायला मिळत जाईल.
छोटासा पण फार आश्वासक असा अनुभव तुम्ही अगदी सहजतेने मांडला.
फक्त एक मत नोंदवावसं वाटतय
बघा म्हणजे कस झालयं आपलं सर्वांचच ह आपल्या सर्वांचच तुम्ही मी आपण काइंडनेस किंवा सह्रदयता किती मुलभुत आवश्यक बाब आहे की नाही ?
मात्र तिचं प्रमाण इतक कमी झालय की आपण तुम्ही मी कसे एक्स्पेक्ट करतो की किमान थोडी तरी कुठे तरी तरी ती सह्र्दयता दिसावी आपल्यात यावी.
बघा म्हणजे किती अत्यावश्यक बाब संपत संपत आता कोणत्या स्तरावर आपण आलोय की
रॅन्डम अ‍ॅक्ट आपण एक्स्पेक्ट करतोय जो खर म्हणजे रेग्युलर नॅचरल अ‍ॅक्ट असायला हवा तो आपला नेचर असायला हवा.
व खर म्हणजे रॅन्डम अ‍ॅक्ट ऑफ अनकाइंडनेस काय आहे कुठे होता ही बाब फोकस करण्याचा विषय व्हायला हवी होती.
पण आपण काय शोधतोय किमान अ‍ॅटलीस्ट रॅन्डम अ‍ॅक्ट ऑफ काइंडनेस.
जणु अस समजा सर्व झरे नैसर्गिक झरे आटुन गेलेत व आपण एखाद दुसरे एन्डेजर्ड स्पेसीज एखाद दोन शिल्लक राहीलेत तसे निर्मळ पाण्याचे झरे आहेत का ? ते शोधतोय.
लेख आवडला त्यासाठी धन्यवाद !

जयंत कुलकर्णी's picture

10 Dec 2016 - 4:16 pm | जयंत कुलकर्णी

मारवाजी,
आमचे जे काही थोडेफार दिवस उरलेत तेवढे दिवस तरी लिहुद्या हो ! प्लिज.........
:-)

जयंत कुलकर्णी's picture

10 Dec 2016 - 4:42 pm | जयंत कुलकर्णी

मारवाजी,
आमचे जे काही थोडेफार दिवस उरलेत तेवढे दिवस तरी लिहुद्या हो ! प्लिज.........
:-)

गणामास्तर's picture

10 Dec 2016 - 11:36 pm | गणामास्तर

माझ्यासकट ३ वर्षेहुन अधिक झालेल्या सर्व जुन्या आयडींना लेखनबंदी करावी.

बाकीच्या आयडींचे जाउद्या पण तुम्हाला प्रतिसादबंदी केली पाहिजे याच्याशी सहमत.

डिस्कोपोन्या's picture

11 Dec 2016 - 8:13 am | डिस्कोपोन्या
डिस्कोपोन्या's picture

11 Dec 2016 - 8:13 am | डिस्कोपोन्या
डिस्कोपोन्या's picture

11 Dec 2016 - 8:16 am | डिस्कोपोन्या
डिस्कोपोन्या's picture

11 Dec 2016 - 8:19 am | डिस्कोपोन्या
डिस्कोपोन्या's picture

11 Dec 2016 - 8:20 am | डिस्कोपोन्या
डिस्कोपोन्या's picture

11 Dec 2016 - 8:23 am | डिस्कोपोन्या

माझ्यासकट ३ वर्षेहुन अधिक झालेल्या सर्व जुन्या आयडींना लेखनबंदी करावी

मारवाजी, अहो तुमच्या सारख्या अनेक दिग्गज ID न्ना वाचून वाचून अत्ता कुठतरी लिहायची उर्मी आलिये आणि तुम्ही लिहणे बंद करायचा प्रस्ताव मांडताय , हे काय बरं नव्ह..
गंमत सोडा, पण आलेल्या प्रतिसादाने माझा दिल गार्डन गार्डन नक्की झालाय...दिलेल्या प्रतिसादाबद्दल खुप खुप धन्यवाद !!

निओ१'s picture

10 Dec 2016 - 3:45 pm | निओ१

वाव!

डिस्कोपोन्या's picture

11 Dec 2016 - 8:27 am | डिस्कोपोन्या

धन्यवाद

धर्मराजमुटके's picture

10 Dec 2016 - 5:34 pm | धर्मराजमुटके

वॉव ! एकाच लेखात सुंदर ललना, भारीवाली बाईक, रँडम अ‍ॅक्ट ऑफ काईंडनेस आणि पुणे ! जबराच ! आवडले !

अवांतर : डिस्को सन्या चित्रपट पाहून हा आयडी घेतला काय ?

डिस्कोपोन्या's picture

11 Dec 2016 - 8:26 am | डिस्कोपोन्या
डिस्कोपोन्या's picture

11 Dec 2016 - 8:26 am | डिस्कोपोन्या

नाही ओ धर्मराजG नाही, पाहिला मी डिस्कोसन्या सिनेमा! आणि मी हां iD का घेतला याला काहीही लॉजिक नाहिये...अमच्याकड़े सगळच illogical आहे

जव्हेरगंज's picture

10 Dec 2016 - 7:22 pm | जव्हेरगंज

भारी आहे हे!!

मदनबाण's picture

11 Dec 2016 - 9:10 am | मदनबाण

मस्त... :)

प्रचंड अवांतर :-

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Kiiara - Gold (Official Video)

तुषार काळभोर's picture

11 Dec 2016 - 11:02 am | तुषार काळभोर

व्हिडिओ आवडले बाणराव

डिस्कोपोन्या's picture

14 Dec 2016 - 12:30 pm | डिस्कोपोन्या

आजची स्वाक्षरी : हा प्रकार आवडला....बानराव !