बस झालं की राव आता…

वामन देशमुख's picture
वामन देशमुख in काथ्याकूट
8 Dec 2016 - 4:33 pm
गाभा: 

नोटा, नोटाबंदी, कॅश, कॅशलेस, मोदी, डिमॉनिटाइझेशन, एटीएम, पेटीएम, १०००, २०००, ५०० १०० चिल्लर, रोख, ठोक, ब्ला, ब्ला, ब्ला…

बस झालं की राव आता, किती तो काथ्याकूट, चर्चा, उप-चर्चा, प्रतिसाद, प्रति -प्रतिसाद, धागे-दोरे, चऱ्हाटं, गुंता, गुंतवळ…

सर्वांनाच या नोटाबंदीत रस आहे असं नाही; रस नाहीच असंही नाही पण कुठल्याही गोष्टीची एक हद्द असते राव! मागच्या पंधरा दिवसांपासून मिपा उघडलं की सारखे तेच तेच विषय पुढे येताहेत. इतक्या धाग्यांमधून आता सर्वांचं सर्वकाही सांगून झालंय असं वाटत असताना नवीनच एक धागा तोच विषय घेऊन येतो आणि जुन्या धाग्यांबरोबर फेर धरून बोर्डावर नाचत राहतो.

पुरे झालं आता हे सगळं!

चला, नवीन काही लिहूया, वाचूया, बघूया, भटकूया, व्यायामूया, शिजवूया, खाऊया, पिऊया…

- एक त्रस्त मिपाकर

प्रतिक्रिया

पगला गजोधर's picture

8 Dec 2016 - 4:42 pm | पगला गजोधर

तुम्ही आराम करा बरं

:)

नितिन थत्ते's picture

8 Dec 2016 - 4:42 pm | नितिन थत्ते

अहो तिकडे मोदी एवढी क्रांती करतायत आणि तुम्ही खायच्या प्यायच्या गोष्टी करताय !!!

गणामास्तर's picture

8 Dec 2016 - 4:51 pm | गणामास्तर

क्रांती करणारे/ न करणारे खात पित नसतेत काय :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Dec 2016 - 5:25 pm | डॉ सुहास म्हात्रे

खातेत, पितेत आनी आरामबी करतेत ! ;) वर, अन्न सोडून इतर कायबी खातेत तेना लै तकलीफ देतेत =))

तुम्ही एवढे त्रासलात आणि परवा आशु जोग तक्रार करत होते की या विषयावर मिपावर चर्चा झाली नाही म्हणून...

गणामास्तर's picture

8 Dec 2016 - 4:43 pm | गणामास्तर

लाख वेळा सहमत. घरी दारी, हापिसात, कँटीनमध्ये सगळीकडे तेचं तेचं आणि तेचं.
काही हलकंफुलकं वाचू म्हणून मिपा उघडले तर इथे सुद्धा परत तेचं.
धागा बदलतो तरी विषय तोचं आणि प्रतिसाद, प्रतिसाद्क सुद्धा तेचं.
काही तरी खाण्या गाण्याचं काढा राव काय तर.

प्रसाद गोडबोले's picture

8 Dec 2016 - 5:03 pm | प्रसाद गोडबोले

एकदम सहमत

परवा जेवताना चर्चा झाली त्या विषयावर प्रस्ताव धागा टाकतो आज संध्याकाळी :)

छान लिहीलंय. कवितेसारखंच तर वाटतंय.

विशेषतः ''लिहूया, वाचूया, बघूया, भटकूया, व्यायामूया, शिजवूया, खाऊया, पिऊया…'' नंतर शांताबाय, फिट्ट बसतंय.

चांदणे संदीप's picture

8 Dec 2016 - 6:23 pm | चांदणे संदीप

=)) lol

चांदणे संदीप's picture

8 Dec 2016 - 6:47 pm | चांदणे संदीप

रच्याकने,

धागालेखकाच्या भावनांशी सहमत!

Sandy

मारवा's picture

8 Dec 2016 - 7:04 pm | मारवा

विशेषतः ''लिहूया, वाचूया, बघूया, भटकूया, व्यायामूया, शिजवूया, खाऊया, पिऊया…'' नंतर शांताबाय, फिट्ट बसतंय.

मी एक ठेका घेऊनही बघितला परफेक्ट जमतयं,
फक्त शेवटी शांताबाई ऐवजी मोदीभाई अमितभाई इतकाच बदल करायचा.

बाजीप्रभू's picture

9 Dec 2016 - 6:36 am | बाजीप्रभू

अगदी अगदी.

इरसाल कार्टं's picture

9 Dec 2016 - 12:06 pm | इरसाल कार्टं

:)

समाधान राऊत's picture

11 Dec 2016 - 10:56 am | समाधान राऊत

ठ्ठो

यशोधरा's picture

8 Dec 2016 - 4:50 pm | यशोधरा

बाडीस हो! अगदीच बाडीस!

एक मार्ग आहे नुसते कार्टुन टाका नोटाबंदीचे किमान दोन घटका मनोरंजन तरी होइल.
की नाही ? तापच होइल ?

विवेकपटाईत's picture

8 Dec 2016 - 7:07 pm | विवेकपटाईत

त्रासला मग कशाला धागा काढला, PMS साठीच न .

श्रीगुरुजी's picture

8 Dec 2016 - 8:54 pm | श्रीगुरुजी

सैराट चित्रपट प्रदर्शित होण्याच्या काही दिवस आधी आणि नंतर अनेक आठवडे मिपा सैराटमय झाले होते. आता तसंच झालंय. भविष्यातही एखाद्या विषयावरून तसे होईलच.

ह्या देशद्रोही पोस्टाचा धिक्कार असो. तिकडे सैनिकांनी "आमहाला कंटाळा आला बुवा पाकिस्तान कडे तोंड करून उभे राहण्याचा" असे म्हटले तर चालेल का ?

पूजनीय मोदी साहेबानी अन्न पाणी त्याग करून हा महान यद्न्य चालवलाय त्यांत थोडी आहुती टाकायला काय जाते ?

एस's picture

9 Dec 2016 - 12:42 am | एस

खरंच बास झालं! :-|

सुज्ञ's picture

9 Dec 2016 - 12:50 am | सुज्ञ

यानिमित्ताने लोक "किमान" अर्थसाक्षर होऊदेत .. लोकांना अर्थसाक्षर दृष्ट्या जग कोठे आहे हे कळूदे . लोक स्वतःहून भ्रष्टाचार करणे ( पैसे देणे घेणे ) थाम्बवूदेत अशी लोकांनाच प्रार्थना करतो . लोक स्वतः प्रामाणिक होवोत .. अर्थात आता झाले हा हंटर आहे इतके जरी झाले की पुढील काम सोपे होईल

हो हो, मलाही कंटाळा आलाय या विषयांचा.

फेसबुकमुळे लोक लेखक झाले।
नोटाबंदीमुळे अर्थ शास्त्रज्ञ।।

पगला गजोधर's picture

9 Dec 2016 - 12:25 pm | पगला गजोधर

कंकाका

बोले तो तुमने एकैच मारा, लेकिन सोल्लिड्ड मारा बावा ......

प्रान्जल केलकर's picture

9 Dec 2016 - 6:06 pm | प्रान्जल केलकर

हमारे मण कि बात बोली आपणे. च्यामारी जो उठतो तो पोष्टी डकवतोय यत्र तत्र सर्वत्र मुदी शेट आणि नोटबंदी.
इथे कमी कि काय म्हणून बातम्यांमध्ये पण तेच. चार दिवस झाले बातम्या बघितल्याचं नाहीयेत चॅनेल वर.
विरोध असू दे किंवा सहमती पण चावायची काहीतरी लिमिट असावी.

खटपट्या's picture

9 Dec 2016 - 6:24 am | खटपट्या

धागाकर्त्याशी सहमत.
रांगा कमी झाल्यायत. काही ठीकाणी रांगाच नाहीत. आता नोटा सहजासहजी मिळतायत तरीही बोंबाबोंब सुरुच आहे.
प्रत्यक्षात जीतके दीवस त्रास होइल असे वाटले होते तेवढे दीवस त्रास झालाच नाही.
आता नोटा मिळायला लागल्यावर "काळा पैसा निघाला ला बाहेर?" अशी विचारणा सुरु होइल.
काही होवो, नोटा मिळोत न मिळोत, कोणाला त्रास होवो अगर न होवो फक्त "मोदी कसे चुकलेत" हे सीद्ध झालं पाहीजे बास...
असो.

वामन देशमुख's picture

9 Dec 2016 - 10:08 am | वामन देशमुख

सिरीयसनेस अपार्ट, एक खरोखर घडलेला किस्सा सांगतो.

संता आणि कोलकात्याच्या रिक्षावाला हा जोक प्रत्येकाला माहीतच असेल.

आम्ही चार मित्र मिळून, पाचव्या एका मित्राच्या लग्नाला जात होतो, चार-पाच तासांच्या त्या प्रवासात एकमेकांची मस्त खेचाखेची सुरु होती. तेंव्हा एकाने संता आणि कोलकात्याच्या रिक्षावाला हा जोक सांगितला. तेंव्हा हा जोक नवीनच होता आणि सर्वजण खूप हसले.

त्यावर अजून एक जोक मारावा म्हणून मी गंमतीने म्हणालो, “अरे यार, मला दोन भाऊ आहेत, पण माझ्या बहिणींना मात्र तीन भाऊ आहेत, हे कसं काय?”

एक मित्र लगेच म्हणाला, “ये साला वामन कुछ भी बोलता है, उसका कोई कझिन होगा!”

हे दिव्य लॉजिक ऐकून सर्वजण हास्यकल्लोळात इतके बुडाले की कार चालवणाऱ्या मित्राचं नियंत्रण क्षणभर सुटलं आणि मग कार थोडावेळ बाजूला थांबवावी लागली!

योगायोगाने तो मित्र कोलकात्याचाच आहे!

चला कट्टा करुया ३१ डिसेंबरला

गॅरी ट्रुमन's picture

9 Dec 2016 - 4:37 pm | गॅरी ट्रुमन

मिपावर काश्मीर, सैराट, आस्तिक-नास्तिक या विषयांबरोबरच मोठ्या प्रमाणावर धाग्यांचा पाऊस पडलेला हा एक विषय असेल.आपण सगळेच आंधळे आणि हत्ती या गोष्टीप्रमाणे या निर्णयाचे आपल्याला वाटत आहेत त्या आयामांवर भाष्य करत आहोत असे वाटते.हत्तीचे कान मोठे आहेत हे म्हणणार्‍याला हत्तीला लांब सुळे आहेत याचा पत्ता नव्हता त्याचप्रमाणे या महत्वाच्या निर्णयाशी निगडीत असलेल्या आपल्याला माहित नसलेल्याही अनेक गोष्टी असतीलच. तसेच या निर्णयाच्या सर्व पैलूंचा अभ्यास करून त्यावर सामाजिक/अर्थशास्त्रीय इत्यादी अनेक बाजूंनी भाष्य करण्याइतकी माहिती असली-नसली तरीही आपण आपल्या राजकीय समर्थनाच्या चष्म्यातून (मोदीसमर्थक/विरोधक) या गोष्टीकडे बघत आहोत असे वाटायला लागले आहे. एकूणच ८ नोव्हेंबरपासून फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि इतर अनेक ठिकाणी एकाएकी अर्थशास्त्रातील तज्ञांची भर पडली आहे.

चौथा कोनाडा's picture

11 Dec 2016 - 10:34 am | चौथा कोनाडा

लेखाच्या शेवटी आलेले " खाऊया, पिऊया " हे शब्द खूपच भावले.

मग, कधी बोलावता मिपाकट्टा ?

मित्रहो's picture

11 Dec 2016 - 2:35 pm | मित्रहो

भारतातले अर्थशास्त्रीय टॅलेंट बाहेर आलेय. लोक म्हणत होते भारताने फक्त माहीती तंत्रज्ञानातच प्रगती केलीय. गेली कित्येक वर्षे भारतातत्ल्या गलोगल्लीत जे अर्थशास्त्राचे धडे गिरवले जात होते त्याचे फळ या निमित्ताने बाहेर आले. कितीतरी विद्वान तयार झालेत. ट्रंपला म्हणाव बघ आता तुला हवे असेल तर घेउन जा काही. आजवर समाजशास्त्र आणि अध्यात्म याचेच अभ्यासक दिसत होते आता अर्थशास्त्राचे सुद्धा झाले. शेवटी जे होत ते भल्यासाठीच होत.