तू बोले तो बन जाऊं मैं, बुल्लेशा सौदाई

संजय क्षीरसागर's picture
संजय क्षीरसागर in जनातलं, मनातलं
8 Dec 2016 - 1:36 am

सूफ़ीज़म एक अनोखा धर्म आहे. अस्तित्त्वाकडे काव्यात्मकतेनं पाहाण्याचा असा दृष्टीकोन दुर्लभ. आपण पुरुष आहोत आणि सर्व प्रकटजग स्त्री आहे. तस्मात, प्रसंग कोणताही असो, जगणं म्हणजे आपण आणि अस्तित्त्वात चाललेली, इष्काची जुगलबंदी आहे. मग प्रत्यक्षात ती, पत्नीशी झालेली ताटातूट असो, आर्थिक आपत्ती असो, शारीरिक दुर्घटना असो की कडेलोटाला नेणारी मानसिक दुरावस्था असो.... अस्तित्त्वानं, किंवा स्त्रीनं, ती आपल्याशी केलेली इष्कबाजी आहे. हा सूफ़ी जगण्याचा अंदाज़ आहे.

सूफ़ीजमचा नज़रिया कळला तर इर्शाद क़ामिलचा हा कलाम, हृदयाला स्पर्शून गेल्याशिवाय राहाणार नाही. जबरदस्त शायरीतून व्यक्त होणारी विरहाची व्यथा आणि मृत्यूसुद्धा हिरावून घेणार नाही अशी दुर्दम्य लगन.

पपॉनच्या आवाजात हा शेर गाण्याची सुरुवात करतो....

कुछ रिश्तोंका नमकही, दूरी होता है
ना मिलनाभी बहुत, जरूरी होता है ।

मग या, सूफ़ीसंगीताला साजेशल्या ओळी, खास क़व्वालांनी गायल्या आहेत.

दम-दम, दम-दम, तू मेरा
दम-दम, दम-दम.
मेरा हर-दम, दम-दम,
दम-दम....

दम म्हणजे प्राण (किंवा श्वास) आणि दम म्हणजे क्षण! तू माझा प्राण आहेस. तूच माझा प्रत्येक क्षण आहेस (हर-दम). तू माझा प्रत्येक श्वास आहेस. तुझा आणि माझा प्राण एकच आहे (हम-दम) !

तू बात करेया, ना मुझसे
चाहे आँखोंका पैगामना ले,
पर ये मत केहना, अरे ओ पगले..
मुझे देख ना तू, मेरा नाम न ले

तुझसे मेरा दीन धरम है ,
मुझसे तेरी खुदायी (2)

तू माझ्याशी अबोला धरला आहेस आणि माझ्या नजरेतून बोलण्याचा प्रयत्नाला सुद्धा तुझा प्रतिसाद नाही. पण निदान असं तरी म्हणू नकोस की ‘तू माझ्याकडे पाहू नकोस. माझं नांव सुद्धा घेऊ नकोस’ कारण तूच माझी प्रार्थना आहेस...आणि माझ्या प्रेमामुळे तुला देवत्त्व प्राप्त झालंय. तूच माझा देव आहेस !

तू बोले तो बन जाउं मैं
बुल्लेशा सौदाई,

मैं भी नाचूं ...
मैं भी नाचूं मनाऊ सोहने यार को
चलूं मैं तेरी राह बुल्लेया,
मैं भी नाचूं रिझांउं सोहने यार को
करूं ना परवाह बुल्लेया

तू फक्त राजी व्हायचा आवकाश की, मी बुल्लेशाचा भक्त होईन,
आणि आनंदानं नाचून, माझ्या सोन्यासारख्या सखीची मिन्नत करीन.
आनंदानं नाचून, माझ्या सोन्यासारख्या सखीला रिझवीन,
मला कुणाचीही पर्वा राहाणार नाही.
मग खरं तर.... तूच माझी बुल्ले-शहा होशिल!

इथे सूफ़ी क़व्वाल पुन्हा दम-दमचा नवा माहौल तयार करतात ....

मेरा हरदम, दम, हरदम तू
मेरा मरहम तू, मरहम तू ,
मेरा हरदम, दम, हरदम तू

इथे `मेरा मरहम तू, मरहम तू' अशा अनोख्या ओळी आल्या आहेत. तू माझ्या वेदनांची मुक्ती आहेस...तुझा सहवासच माझा सुकून आहे.

माना अपना इश्क अधूरा
दिल ना इसपे शरमिंदा है,
पूरा होके ख़तम हुआ सब
जो है आधा वो ही जिंदा है ।

आपली प्रेमकहाणी अर्ध्यातच संपली असली तरी, मी नाऊमेद नाही. कारण माझ्याबाजूनं प्रेम कायम आहे. ते अर्ध असलं तरी अजून जीवंत आहे.

याला दुसराही एक आयाम आहे. पूर्ण होणारी प्रत्येक गोष्ट लयाला जाते. आणि अपूर्ण गोष्ट कायम जीवंत राहाते. तसं आपलं प्रेम आहे ! त्यात दुरावा आहे म्हणून तर, त्याची मजा आहे.

हो, बैठी रहेती है उम्मीदे
तेरे घर की देहलीजोंपे
जिसकी ना परवाझ ख़तम हो
दिल ये मेरा वही परिंदा है ।

अत्यंत मोहक क़लाम आहे.... माझ्या आशा अजून तुझ्या उंबर्‍याशी बसून आहेत. आणि माझ्या हृदयाची, तुला गवसणी घालण्याची जिद्द तर, कधीही न संपणारी आहे. परवाझ आणि परिंदा या शब्दात इर्शादनं कमाल केली आहे. जसा एखादा जिद्दी पक्षी, आपल्या पंखांनी, आभाळ कवेत घेण्याची जिगर ठेवतो, तसं माझं हृदय आहे. तू कितीही नाराज असलीस तरी, माझ्या उमेदीची भरारी, न संपणारी आहे.

बख्शे तू जो प्यारसे मुझको,
तो हो मेरी रिहाई....

तू फक्त प्रेमानं, मला माफ कर. आणि या विरह वेदनेतून मी मुक्त होईन......

तू बोले तो बन जाउं मैं
बुल्लेशा सौदाई,

मैं भी नाचूं ...
मैं भी नाचूं मनाऊ सोहने यार को
चलूं मैं तेरी राह बुल्लेया,
मैं भी नाचूं रिझांउं सोहने यार को
करूं ना परवाह बुल्लेया

मेरा हरदम, दम, हरदम तू..
.........

तू याद करेया, ना मुझको
मेरे जीनेमें, अंदाज़ तेरा
सर-आँखोंपर है, तेरी नाराज़ी
मेरी हार में है, कोई राज़ तेरा ।

शायद मेरी जान का सदका
माँगे तेरी जुदाई (2)

या ओळी गाण्याचा क्लायमॅक्स आहेत.

तू मला विसरुन गेलीस तरी बेहत्तर.
माझ्या जगण्यात.... तू कायम माझ्याबरोबर आहेस, असंच मी जगतो.
तुझी नाराजी तर,
मला कायम मंजूर आहे.
आणि मी संपूर्ण पराभूत झालो तरी,
त्यात तुझं (म्हणजे नियतीचं), काही तरी न उलगडणारं रहस्य असेलच !

तुझ्यापासूनची ही ताटातूट,
आता बहुदा,
माझ्या प्राणांचा सौदा मागते आहे....
(पण हा सौदा सुद्धा, तुझ्याप्रती असलेली माझी लगन, संपवू शकणार नाही.)

तू बोले तो बन जाउं मैं
बुल्लेशा सौदाई,

मैं भी नाचूं ...
मैं भी नाचूं मनाऊ सोहने यार को
चलूं मैं तेरी राह बुल्लेया,
मैं भी नाचूं रिझांउं सोहने यार को
करूं ना परवाह बुल्लेया

मेरा हरदम दम, हर दम तू
मेरा हरदम दम, हर दम तू
मेरा हरदम दम, हर दम तू
मेरा हरदम तू.....

कुछ रिश्तोंका नमक ही, दूरी होता है
ना मिलना भी बहुत, ज़रूरी होता है ।

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

चित्रगुप्त's picture

8 Dec 2016 - 5:09 am | चित्रगुप्त

सूफी'जम' यातील इन्ग्रजी 'जम' वगळता मूळ अरबी, फारसी वा जो कोणता असेल, तो मूळ शब्द काय आहे ? आणि त्याचा अर्थ काय आहे?

पदकि's picture

14 Dec 2016 - 7:37 am | पदकि

Taṣawwuf (Arabic: التصوف ) : तसव्वुफ़

संजय क्षीरसागर's picture

8 Dec 2016 - 7:26 am | संजय क्षीरसागर
बाजीप्रभू's picture

8 Dec 2016 - 8:11 am | बाजीप्रभू

खरंतर "सुलतान" सिनेमा पहिला होता तेव्हा मस्तकात कळ गेली होती. पण आमच्या सौदामिनी मियाँ साहेबांचे डायहार्ड फॅन असल्याकारणाने पुढले चार दिवस "ऊपर आस्मा, नीचे मिट्टी, बीचमे तेरा जुनून" हे पालुपद सतत कानावर पडत होतं. त्या सगळ्या अत्याचारात फक्त या "बुल्लेशा सौदाई" गाण्याचंच कर्णसुख मिळत होतं. "उर्दूत" आपला पाय तसाही लंगडा आहे पण तुम्ही गाण्याची फोड करून सांगितल्याने गाणं अजून आवडायला लागलंय. धन्यवाद! कष्ट घेतल्याबद्दल.

संजय क्षीरसागर's picture

8 Dec 2016 - 10:58 pm | संजय क्षीरसागर

कहर केला आहे !

रातराणी's picture

8 Dec 2016 - 11:18 am | रातराणी

सलमान खानचे पिक्चर पाहणे सोडून दिल्यामुळे हे गाणंदेखील पहिल्यांदाच ऐकलं. गाण्याची ओळख आवडली.

संजय क्षीरसागर's picture

8 Dec 2016 - 12:05 pm | संजय क्षीरसागर

सलमान आवडत नसेल त्यांचासाठी प्रतिसादात लिंक दिली आहे.

सुरुवातीला वाजवलेली हार्मोनियम खास कव्वाली स्टाईलची आहे. आणि संपूर्ण बाज सूफी आहे. त्यात विशाल-शेखरनं फ्युजन करुन, मधे एक सुरेख सरगम दिली आहे. ती ही तितकीच मोहक आहे.

आणि गाणं तर जबरी आहे ! त्यातल्या भावना फक्त तुम्हाला भिडायला हव्या.

नीलमोहर's picture

8 Dec 2016 - 3:35 pm | नीलमोहर

इर्शाद कमिल यांचे अर्थपूर्ण शब्द, पपॉनचा soulful आवाज, विशाल शेखरचे सुमधूर संगीत,
सगळंच जुळून आलंय या गाण्यात. सूफी प्रकारातील गाणी तशीही मनाला भिडतातच.

मात्र वरील रसग्रहण बरेचसे कोरडे, केवळ भाषांतरासारखे झालेय असे वाटले,
या अप्रतिम गाण्याचे तेवढेच सुंदर विवेचन अपेक्षित होते ते दिसले नाही, जे जग घूमेयाच्या वेळेस दिसले होते,
त्यात प्रेम, प्रेमिक, त्यांच्या भावभावना याबद्दल आपण खूपच सुरेख लिहिले होतेत.
हे गाणेही तेवढेच किंबहुना जास्त deserving आहे.

किसन शिंदे's picture

8 Dec 2016 - 3:38 pm | किसन शिंदे

होवून जाऊद्या एक सुंदर विवेचन तुमच्याकडूनही. :)

संजय क्षीरसागर's picture

8 Dec 2016 - 3:46 pm | संजय क्षीरसागर

.

नीलमोहर's picture

8 Dec 2016 - 4:16 pm | नीलमोहर

तुम्हां लोकांसारखे तज्ञ विशेषज्ञ असतांना यावर आम्ही काही लिहिणं म्हणजे सूर्याला काजव्याने वगैरे वगैरे सारखं होईल,

विखि's picture

9 Dec 2016 - 12:13 am | विखि

माझ आवडत गाण..
सुफी अवघड वाटायच पण तुम्ही लै सोप्या प्रकारे समजुन सान्गीतलय.

सुरेख! सूफ़ी काव्याला कुठला ईझम जोडणे गरजेचेच नाही.
मी तसेही चित्रपट पहात नाही, पण अनेक प्रकारची गाणी आजकाल युटुबवर मिळतात व त्यात अनेक सुंदर रचना देखील भेटतात व म्हणतात ना, आस्वादसाठी भाषेच्या पुर्ण माहितीची गरज तशीही नसते. भाव महत्त्वाचे.

चित्रगुप्त's picture

9 Dec 2016 - 4:10 am | चित्रगुप्त

सांप्रत सूफी, झेन वगैरे शब्द वापरून काहीतरी अत्युच्य, सर्वसामान्यांच्या आकलनाच्या पलिकडलं, लई भारी काही सांगत असल्याचा आभास निर्माण करता येतो. "मेरा इश्क सूफियाना"... म्हणजे लईच भारी वाटतं. .... एकादी गोष्ट 'झेन बोधकथा' आहे म्हटलं तर त्यात काहीतरी गहन तत्व असणार, याची काहीही कळत नसलं, तरी खात्री पटवून देता येते.

संजय क्षीरसागर's picture

9 Dec 2016 - 1:13 pm | संजय क्षीरसागर

जगातला प्रत्येक धर्म हा जगण्याचा एक अंदाज आहे. उदा. हिंदू धर्म बहुशः भक्तीमार्गी आहे. क्रिस्टीयन धर्म, सेवाभाव हा जगण्याचा अंदाज अंगीकारतो. तसा सूफ़ी धर्म, इष्कबाजी हा आयाम अनुसरतो. त्यामुळे पोस्टवर सुरुवातीला म्हटलंय :

सूफ़ीज़म एक अनोखा धर्म आहे. अस्तित्त्वाकडे काव्यात्मकतेनं पाहाण्याचा असा दृष्टीकोन दुर्लभ. आपण पुरुष आहोत आणि सर्व प्रकटजग स्त्री आहे. तस्मात, प्रसंग कोणताही असो, जगणं म्हणजे आपण आणि अस्तित्त्वात चाललेली, इष्काची जुगलबंदी आहे. मग प्रत्यक्षात ती, पत्नीशी झालेली ताटातूट असो, आर्थिक आपत्ती असो, शारीरिक दुर्घटना असो की कडेलोटाला नेणारी मानसिक दुरावस्था असो.... अस्तित्त्वानं, किंवा स्त्रीनं, ती आपल्याशी केलेली इष्कबाजी आहे. हा सूफ़ी जगण्याचा अंदाज़ आहे.

सूफ़ीजमचा नज़रिया कळला तर इर्शाद क़ामिलचा हा कलाम, हृदयाला स्पर्शून गेल्याशिवाय राहाणार नाही. जबरदस्त शायरीतून व्यक्त होणारी विरहाची व्यथा आणि मृत्यूसुद्धा हिरावून घेणार नाही अशी दुर्दम्य लगन.

आता स्टोरीकडे वळू. आरीफ़ा ड्यू आहे आणि सुल्तान ऑलिंपीकसाठी निघालायं. ती म्हणते की माझी इच्छा आहे की तू जाऊ नयेस. सुल्तान म्हणतो की रेसलींग हीच आपल्या प्रेमाची सुरुवात आहे आणि रेसलींगशिवाय माझी किंमत शून्य आहे. तू सुद्धा रेसलर आहेस आणि तुझंही ऑलींपिकच स्वप्न होतं. आता तू मला का रोखतेस? यावर आरीफ़ा म्हणते की अपत्यप्राप्तीसाठी मी माझ्या स्वप्नावर पाणी सोडलं. माझं मन सांगतंय की माझ्या डिलीवरीच्या वेळी तू जवळ हवास... तू जाऊ नकोस. स्त्री मन कायम मिस्टीकल आहे. आरीफ़ाला तिच्या म्हणण्याचं कोणतंही लॉजिक देता येत नाही. पण एक रेसलर असून ही, ती भावूक झाली आहे.

तिची इच्छा डावलून सुल्तान ऑलींपिक्सला जातो. आणि मित्राला सांगतो की तिची डिलीवरी झाली तू मला लगेच कळव. तिकडे ऑलींपीक्समधे सुल्तान गोल्ड मिळवतो आणि इकडे आरीफ़ाला मुलगा होतो. दोन्ही क्लायमॅक्स घटना एकाच वेळी घडतात आणि जल्लोष होतो.

सुल्तान परत येतो तर वातावरण सुन्न असतं. आरीफ़ाचं मूल हवा असलेला रक्त गट, योग्य वेळी न मिळाल्यानं जातं आणि नेमका सुल्तानचा तो रक्त गट असतो. आरीफ़ा कमालीची दु:खी असते आणि तिला मनोमन वाटतं की सुल्ताननी ऐकलं असतं तर हा प्रसंग ओढवला नसता. आपल्या मुलाच्या मृत्यूचं कारण सुल्तान आहे. ती सुल्तानला म्हणते की ही आपल्या प्रेमाची इंतहा आहे...आता पुन्हा तू कधीही माझ्या आयुष्यात येऊ नकोस.

सुल्तानचं आयुष्य, जिंकूनही उध्वस्त होतं. सुल्तान रेसलींग सोडून देतो. दोघात प्रदीर्घ दुरावा निर्माण होतो.

दुसरीकडे प्रो-टेक-डाऊन फाईटसमधे पैसे गुंतवलेली भारतीय कंपनी, लो टिआरपीमुळे डबघाईला आलेली आहे. एका इनवेस्टरचे (आकाश), वडील म्हणतात की या फाईटसचं भारतीयांना आकर्षण नाही कारण त्यात भारतीय फायटर नाही. आता इतक्या कमी वेळात, ते ही प्रो-टेक-डाऊनसारख्या नव्या फाईट इवेंटला भारतीय प्रतीस्पर्धी शोधणं अशक्य असतं. तरी एक शेवटचा प्रयत्न म्हणून, वडीलांच्या सांगण्यावरुन, आकाश सुल्तानकडे येतो. सुल्तान एक तर रेसलर, त्यात त्यानी रेसलींग सोडलेलं आणि मनानं पुरता उध्वस्त. पण आयुष्यात पुन्हा एकवार सावरायची ही शेवटची संधी, म्हणून तयार होतो..... आणि आयुष्यातल्या या संपूर्ण नव्या पर्वाला सुरुवात करण्यापूर्वी, आरीफ़ाला भेटायला येतो. आरीफ़ाची नाराजी जराही कमी झालेली नाही. ती त्याच्याकडे पाहात सुद्धा नाही....

आता गाण्याचा रंग बघा. प्रतिसादातली लिंक क्लीक करुन गाणं ऐका.

कमालीची प्रभावी शायरी. अंतरंगाला स्पर्श करणारं स्वरसंयोजन आणि पपॉनचा रॉ आवाज!

आता जगण्याचा सूफ़ी नज़रीया काय असतो ते पाहा.

इर्शाद म्हणतो :

तुझसे मेरा दीन धरम है ,
मुझसे तेरी खुदायी |

आरीफ़ा ही प्रकृती आहे आणि तिची नाराजी हे पुरुषाचं प्राक्तन आहे. विरह ही पुरुष आणि प्रकृती यामधली इष्कबाजी आहे. आरीफ़ा नाराज आहे म्हणून काय, तीच माझा धर्म आहे आणि माझ्याप्रेमामुळे तिला दैवत्त्व प्राप्त आहे.

मेरा हरदम, दम, हरदम तू
मेरा मरहम तू, मरहम तू ,
मेरा हरदम, दम, हरदम तू

तू माझा प्राण आहेस. श्वास आहेस. प्रत्येक क्षण आहेस.
अव्यक्ताला, व्यक्ताशिवाय काय अर्थ आहे ?

तुझ्याशिवाय माझ्या जगण्यात काय आहे ?

तू याद करेया, ना मुझको
मेरे जीनेमें, अंदाज़ तेरा
सर-आँखोंपर है, तेरी नाराज़ी
मेरी हार में है, कोई राज़ तेरा |

तू मला विसरलीस तरी, तू सदैव माझ्याबरोबर आहेस, असाच मी जगतो.
तू नाराज असलीस तरी माझ्यासाठी तो तुझा एक नवा रंग आहे.
आणि मी पराभूत झालो तरी त्या पराभवात सुद्धा मला आयुष्याला काही तरी द्यायचं असेल. सकृद्दर्शनी तो माझा पराभव दिसतोयं तरी त्यात तुझं काही तरी रहस्य सामावलं आहे.

शायद मेरी जान का सदका
माँगे तेरी जुदाई |

आता या विरहात माझा प्राण गेला तरी ती आपल्या इष्कबाजीची किंमत असेल. मला त्याची पर्वा नाही!

पैसा's picture

10 Dec 2016 - 1:26 pm | पैसा

जगातला प्रत्येक धर्म हा जगण्याचा एक अंदाज आहे. उदा. हिंदू धर्म बहुशः भक्तीमार्गी आहे. क्रिस्टीयन धर्म, सेवाभाव हा जगण्याचा अंदाज अंगीकारतो. तसा सूफ़ी धर्म, इष्कबाजी हा आयाम अनुसरतो.

इथेच ठेचकाळले.

अदर वाईज, नुसतं प्रतिसादातलं गाणं सुद्धा ऐकण्यासरखं आहे. अर्थाचा उलगडा पोस्टमधे आहेच.

प्रसाद गोडबोले's picture

9 Dec 2016 - 1:20 pm | प्रसाद गोडबोले

खुप सुंदर लेखन संक्षी सर !

तुमच्या लेखनातुन दर वेळी साध्या साध्या गोष्टींकडे निव्वळ ट्रिव्हियल दृष्टीकोनाच्या पलिकडे जाऊन पहाण्याचा वेगळा पर्स्पेक्टीव्ह , नजरिया मिळतो :)

धन्यवाद :)

आपला विनम्र
सीझर मार्कस ऑरेलियस अ‍ॅन्टोनियस ऑगस्टस्
Vi Veri Veniversum Vivus Vici

संजय क्षीरसागर's picture

9 Dec 2016 - 1:27 pm | संजय क्षीरसागर

तुमच्या लेखनातुन दर वेळी साध्या साध्या गोष्टींकडे निव्वळ ट्रिव्हियल दृष्टीकोनाच्या पलिकडे जाऊन पहाण्याचा वेगळा पर्स्पेक्टीव्ह , नजरिया मिळतो

असा एखाद्याला जरी नवा आयाम मिळाला तरी सगळ्या लिहीण्याचं सार्थक होतं.

मात्र याची गाणी एकुण सुंदर दिसतात.
मैं भी नाचूं मनाऊ सोहने यार को
चलूं मैं तेरी राह बुल्लेया,

यातला हा भाग की मी बुल्ले शाह च्या मार्गावरुन जाईल त्याच्याप्रमाणेच प्रेम करेल, त्याच्यासारखचं प्रियेला, मनवेल
हा भाग आवडला.
कारण बुल्ले शाह च्या पंजाबी काफिया या वाकई सुंदर आहेत. त्यातील आध्यात्मिक भाग फारसा रुचत नसला तरी
त्यातील लॉन्जींग व इन्टेसीटी मनाला भावते. या बहुत करुन आबिदा परवीन व नुसरत फतेह अली खान यांच्या कॅसेट मधुन ऐकावयास मिळाल्या त्यानंतर बुल्ले शाह विषयी माहीती मिळाली.
व हा मीर तकी मीर ( रेख्ते के तुम्ही उस्ताद नही हो गालिब... नाजुकी उनके लब की क्या कहीए.. वाला ) चा समकालीन होता ही नविन माहीती मिळाली. दोघांमध्ये बंडखोरी भिनलेली आहे. बुल्ले शाह तर काही ठिकाणी फारच उग्र व बंडखोर होत जातो विशेषतः त्याच्या काळाच्या मानाने ( शिवाजी महाराजांचे निधन वर्ष बुल्ले शाहचे जन्म वर्ष ) फारच जास्त बोचेल असे लिहीतो. मीर ही याच्याच प्रभावात " दैर मे बैठा, कश्का खीचा, कबका तर्क इस्लाम किया असे म्हणतो की काय असे वाटते.
बाकी नुसरत फतेह अली खान ने बुल्ले शाहच्या ओरीजनल कविते शी कुठे कुठे थोडी छेडखानी केलेली दिसते कधी कधी सोपे हिन्दी शब्द घेण्याकडे कल दिसतो.
बाबा बुल्ले शाह ची अप्रतिम पंजाबी "काफिया" इथे. ही साईट फारच सुंदर आहे एकदा अवश्य बघावी.
http://www.hindi-kavita.com/HindiBaba-Bullhe-Bulleh-Shah.php

बाकी गाणे आवडले हे वाचले नसते तर सुटले असते.

संजय क्षीरसागर's picture

10 Dec 2016 - 12:40 pm | संजय क्षीरसागर

.