कॅशलेससाठी कोणता स्मार्टफोन विकत घेऊ ?

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
6 Dec 2016 - 8:03 pm
गाभा: 

घरी इतर मेंबर्सकडे स्मार्टफोन आहेत, मी स्वत:तरी टचस्क्रीन नको म्हणून आत्तापर्यंत अभिमानाने २जीच वापरत आलो. मोदी साहेबांच्या कॅशलेस लेसकॅश पॉलीसीने मोबाईल बँकींग आवश्यक केल्यामुळे नवा स्मार्टफोन घेण्याचा मानस आहे. -मुख्यत्वे नॅशनलाइज्ड बँकांच्या अ‍ॅप्स वापराव्यात असा मानस आहे. अगदीच अडल्यास पेटीएम वापरता आले पाहिजे. कृपया मला स्मार्ट फोन सुचवून हवा आहे.

१) मोबाईल बँकींगसाठी -हॅकींग आणि व्हायरस टाळण्याच्या दृष्टीने सुरक्षीत असावा.
२) २ सिम वापरता आल्यास बरे
३) सर्वप्रकारच्या स्पॅम कंट्रोलसाठी -नको असलेली छायाचित्रे आणि व्हीडिओ टाळण्यास- सुलभ असल्यास बरे
४) प्रॉडक्ट डेमोच्या देण्याच्या दृष्टीने फोटो आणि युट्यूब स्टोअर करून दाखवणे सुलभ असल्यास बरे
सोबतच गूगल डॉक्सचे आणि जमल्यास मासॉचे पॉवरपाँइटही वापरता आल्यास बरे
५) जुन्या गाण्यांचे २-४ युट्यूब स्टोअर करणे पुरेसे मनोरंजन आणि गाणी या उद्देशाचा वापर फारसा नाही.
६) फोन नंबर्स सेव्ह करण्याची सुविधा चांगली आणि भरपूर हवी.
७) मी गुगल डॉक्स /गूगल ड्राईव्ह बर्‍यापैकी वापरतो
८) सोशल नेटवर्कींग मध्ये व्हॉट्स अप व्यावसायिक उद्देशाने वापरेन, इतर सोशल नेटवर्कींग मोबाईल वरून वापरले जाण्याची
शक्यता कमी
९) मराठी वाचन आणि युनिकोड टंकन (मुख्यत्वे मिपा आणि मराठी विकिपीडिया) नीट जमावयास हवे.
१०) फाँट साईज वाढवता आल्यास बरे
११) २ जी मोबाईलात असते तसे सायलेंट /मिटींग इत्यादी प्रोफाईल निवडता आल्यास किंवा अ‍ॅडजस्ट करता आल्यास बरे कारण घरी सध्या असलेल्या स्मार्ट फोनात ती सुविधा दिसत नाहीए.
१२) छायाचित्र रिझोल्यूशन खूप महत्वाचे नाही पण बरे असल्यास बरे
१३) डाटा वापर जास्त वेळ पण टेक्स्ट अधिक, तेव्हा टेक्स्ट शिवाय इतर डाऊनलोड बंद करुन ठेवण्याची सुविधा असल्यास बरे- ३जी मुळे डाटा युसेज कमी रहात असेल आणि सेव्हींग होत असेल तर ३जी पण चालेल.
१४) आवश्यक नाही पण पेन ड्राईव्ह लावता आल्यास बरे
१५) बजेट प्रिफरेबली रु ८००० /- च्या आत १०,००० /- पेक्षा अधिक नको
१६) कुठून विकत घ्यावा ऑनलाईन की दुकानातून तसेच मेंटेनन्स-वॉरंटीसाठी कोणता फोन चांगला इत्यादी माहिती सुद्धा मिळाळ्यास बरे.

सुचवण्यांसाठी धन्यवाद

प्रतिक्रिया

कंजूस's picture

6 Dec 2016 - 8:35 pm | कंजूस

७)मी गुगल डॉक्स /गूगल ड्राईव्ह बर्यापैकी वापरतो
१५) बजेट प्रिफरेबली रु ८००० /- च्या आत १०,००० /- पेक्षा अधिक नक

- मोटो G4 Play.(9000/-)

१) मोबाईल बँकींगसाठी -हॅकींग आणि व्हायरस टाळण्याच्या दृष्टीने सुरक्षीत असावा.,
गुगल प्रॅाडक्टस सोडून सर्वासाठी-
कुठे microsoft Lumia 540 मिळत असेल(!) तर
security full.

जव्हेरगंज's picture

6 Dec 2016 - 8:43 pm | जव्हेरगंज

हे घ्या.

यातला कुठलाही निवडा.

लालगरूड's picture

7 Dec 2016 - 1:47 am | लालगरूड

redmi note 3

संजय क्षीरसागर's picture

7 Dec 2016 - 12:27 pm | संजय क्षीरसागर

७,००० मधे जालीम काम !

संजय क्षीरसागर's picture

7 Dec 2016 - 12:29 pm | संजय क्षीरसागर

नोट-३, ९,००० ला आहे.

कुंदन's picture

7 Dec 2016 - 1:11 pm | कुंदन

तुम्ही पण घेतला की काय स्मार्टफोन?

संजय क्षीरसागर's picture

7 Dec 2016 - 1:17 pm | संजय क्षीरसागर

बाहेर कॅरी करत नाही. ऑलवेज हँडस फ्री !!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

7 Dec 2016 - 6:45 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

विंडोज फोन घ्या. कळकट मळकट कामाला बळकट. हुच्चं बॅटरी लाईफ. वैताग येईल अशी हुच्चं सिक्युरिटी. वापरायला सोपा.

७-८.५ हजारामधे उत्तम फोन येईल. मायक्रोसॉफ्ट लुमिया ५३० आणि ५३५ असे दोन्ही पर्याय लक्षात घ्या. फिचर्स च्या मानानी थोडा महाग केलाय फोन हा पण टिकाउपणामुळे किमान ५ वर्षं पहायची आवश्यकता नाही हे ही तेवढचं खरं.

कॅप्टन जॅक स्पॅरो
(लुमिया ७२० धारक, सद्ध्याचं फोन वय ४ वर्ष २ महिने ० मेंटेनन्स)

*लुमिआ ५३०* - गोरिला ग्रास असली तरी रेझलुशन 800x480 आहे. स्टेट ब्यान्क,IRCTC,wikimedia full साइट्स उघडायला अडचण येईल.surfy browser वापरावा लागतो.
*लुमिआ ५४०* HD 1200x720 आहे. या साइट्स लगेच उघडतात.गोरिला ग्लास नाहीये पण त्यावर गार्ड वापरता येतो.
*android phoneला सिक्युअरटी नसते.
* वन प्लस, साइनोजन मॅाड या ओएस android सारख्या असल्या तरी गुगल android नव्हे.
*Quora वर आन्सर आहेत.

माहितगार's picture

7 Dec 2016 - 11:05 am | माहितगार

आता अभ्यास आरंभतो, Quora वर पण बघतो, प्रतिसादांसाठी सर्वांना आभार .

वेल्लाभट's picture

7 Dec 2016 - 11:15 am | वेल्लाभट

विंडोज इज द वे.

पण हाय रे दैवा! विंडोज फोन्स चं उत्पादन मायक्रोसॉफ्ट कडून थांबवण्यात आलंय आणि आता नोकियाही २०१७ मधे अँड्रॉइड फोन आणणार म्हणते. आम्ही कुठे जायचं? सरफेस फोन परवडेल का माहित नाही.

नितिन थत्ते's picture

7 Dec 2016 - 11:43 am | नितिन थत्ते

अँड्रॉईड फोन्स सिक्युरिटीला वैट म्हणतात. त्यामुळे विंडोज फोन घेतलेला बरा. मी स्वतः कोणतीही ट्रान्झॅक्शन मोबाईलवरून करत नाही. लॅपटॉपवरूनच करतो.

कंजूस's picture

7 Dec 2016 - 1:10 pm | कंजूस

होय।
नोकियाचे फोन android चे आहेत,एक आला आहे. ते तीस हजारच्या खालचे बनवणार नाहीत.
# "आम्हाला योग्य वाटतील तसेच सर्फेस फोन बनवू, { घ्यायचे तर घ्या} - इति सत्या नाडेल्ला.
# शाओमि आणि वन प्लसपुढे गुगलचे पिक्सेल,अॅपलचे आइफोनसुद्धा मार खात आहेत.
# मागच्या महिन्यातच सर्व lumia 640 , 950 कमी केलेल्या किंमततीत विकले गेलेत.

पैसा's picture

7 Dec 2016 - 1:19 pm | पैसा

भारतातल्या मायक्रोमॅक्स आणि कार्बन ने पण विंडोज फोन बंद केले वाटतं. त्यांचे विंडोज फोन्स खूप स्वस्त आणि बरे होते. म्हणजे आता अँड्रॉईड व्यतिरिक्त फक्त सॅमसुंगची टिझेन ओएस तग धरून राहिलेली दिसते.

वेल्लाभट's picture

7 Dec 2016 - 1:54 pm | वेल्लाभट

दावा करत नाही, पण विंडोज नाही मिळाला तर पुढचा फोन बटणवाला घेण्याचा स्ट्राँगली विचार करत आहे मी.

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Dec 2016 - 9:18 pm | डॉ सुहास म्हात्रे

पहिल्यांदा "इति सत्या नाडलेला", नंतर "इति सत्या नडलेला" असं वाचलं... तिसर्‍यांदा लक्ष देऊन वाचलं तेव्हा तसं कायबी नाय हे कळलं ;) :)

लुमिया मराठी सपोर्ट करत का?

पैसा's picture

7 Dec 2016 - 2:06 pm | पैसा

माझ्याकडे कार्बनचा विन४ आहे. त्याला मायक्रोसॉफ्टचा देवनागरी कीबोर्ड आहे. पण तो अँड्रॉईडसारखा सुटसुटीत नाही.

वेल्लाभट's picture

7 Dec 2016 - 2:35 pm | वेल्लाभट

विंडोजचाच देवनागरी कीबोर्ड घेणे. सोपा आहे माझ्यामते.

टीपीके's picture

7 Dec 2016 - 2:28 pm | टीपीके

विंडोज फोन मुळीच घेऊ नका. अनेक बँकांचे अँप्स विंडोज वर नाहीत , UPI अँप्स अजून iOS वर पण नाहीत त्या मुळे विंडोज वर कधी येतील, येतील कि नाही ते हि माहित नाही. अँड्रॉइड घ्या. अँड्रॉइड मध्ये कोणता हे काही जणांनी सुचवले आहेच.

खरं सांगायचं तर लुमियात नेटिव - अंगचाच कीबोर्ड इंग्रजी / हिंदी_ देवनागरी आहे.मराठी_ देवनागरी नाही.
सञ्चय, ऑफिस, वाङमय लिहिता येत नाही ञ्च, ऑ, ङ ही अक्षरे नाहीत. इथे कॅापी करून लिहिलीत.

सुरक्षितता या गुणाच्या पांघरुणाखाली बरेच दोष झाकले गेलेत.

नेटब्यान्किंग या फोनातूनच करतो .

एक प्रिंटिंग सोडलं तर ९९.९९% कंम्प्युटरचं काम होतं.

भारतात कुठेही फिरलात तर स्टेट ब्यान्केचेच एटिएम मदतीला येतात. इतरांचे नाही आणि स्टेट बॅन्केचे अॅप विंडोजवर आहे ते वापरतो.थोडक्यात एटिएम कार्ड आणि अॅप - काम टकाटक.
कॅशलेसचे state bank buddy आलेले नसले तरी काय मोठा फरक पडतो? एटिम कार्ड पेट्रोल पंप ,मॅालमध्ये चालतेच॥ शिवाय इतर दुकानदार क्याशलेस डबडी लावणार नाहीत हे आता निश्चित झालय. सर्व चर्चा पाण्यात गेलीय.

मी मोटो जी २ रूट करून वापरतो आहे (अँड्रॉइड ७.१).रूट केलेल्या किंवा रूट न केलेल्या मोबाईल मध्ये बँकिंग अँप्स किंवा वैयक्तिक माहिती स्टोअर करणे कितपत सुरक्षित आहे?

नितिन थत्ते's picture

7 Dec 2016 - 4:47 pm | नितिन थत्ते

कुठलेही बँकिंग अ‍ॅप अ‍ॅण्ड्रॉईडवर वापरूच नये.

लालगरूड's picture

7 Dec 2016 - 7:07 pm | लालगरूड

म्हणजे android अॅप देणारे bank चु** आहेत ? काय त्रुटी आहेत ते लिहा ना .

मी मोटो जी २ रूट करून वापरतो आहे (अँड्रॉइड ७.१).रूट केलेल्या किंवा रूट न केलेल्या मोबाईल मध्ये बँकिंग अँप्स किंवा वैयक्तिक माहिती स्टोअर करणे कितपत सुरक्षित आहे?

श्रीरंग_जोशी's picture

7 Dec 2016 - 5:54 pm | श्रीरंग_जोशी

या धाग्यावरिल प्रतिसादांत अ‍ॅन्ड्रॉइड ओएस वर चालणार्‍या फोन्सवर डेटा सिक्युरिटीबाबत बर्‍याच जणांनी काळजी व्यक्त केली आहे. अशी काळजी वाटणार्‍यांनी ब्लॅकबेरीच्या सिक्युअर्ड अ‍ॅन्ड्रॉइड फोन्सचा पर्याय तपासून बघावा असे सुचवतो. गेल्या एक वर्षात त्यांनी तीन अ‍ॅन्ड्रॉइड फोन्स बाजारात आणले आहेत.

मी गेल्या अनेक वर्षांपासून ब्लॅकबेरी १० फोन वापरत आहे. प्रसिद्ध अ‍ॅप्सची अनुपलब्धता असली तरी डेटा सिक्युरिटीबाबत नेहमीच आश्वस्त वाटले आहे. बादवे ब्लॅकबेरी १० च्या अ‍ॅपवर्ल्डमध्ये पेटिएम अ‍ॅप उपलब्ध आहे.

डिस्कोपोन्या's picture

7 Dec 2016 - 6:02 pm | डिस्कोपोन्या

कोणताही android फोन सुरक्षित नसतो. data theft ची शक्यता नेहमीच असते, त्यासाठी user ने स्वतः काळजी घेणे अपेक्षित असते . पण user फ्रेंडली म्हणून अन्ड्रोइड इतक चांगल Device कोणतही नाही. REDMI NOTE 3 हा perfect आहे तूमच्यासाठी.

लालगरूड's picture

7 Dec 2016 - 7:09 pm | लालगरूड

redmi note 3, moto e3 power,redmi 3s prime 5".

इतके सगळे मुद्दे घेतले आहेत की
अशी आखुडशिंगी भरपुर दुध देणारी स्वस्त म्हस अॅमझोनवरही नसेल.

बजेट पहिलं धरलं त्यामुळे बरेच फोन्स बाद झाले.

माहितगार's picture

7 Dec 2016 - 8:05 pm | माहितगार

अशी आखुडशिंगी भरपुर दुध देणारी स्वस्त म्हैस अॅमझोनवरही नसेल.

मंजिल दूर असेल हे अपेक्षीत होते पण तंत्रज्ञान ज्या वेगाने पुढे गेल्याचे (?) ऐकुन होतो मंजील एवढीही दूर असेल असे वाटले नव्हते.

DeepakMali's picture

8 Dec 2016 - 3:17 am | DeepakMali
DeepakMali's picture

8 Dec 2016 - 3:17 am | DeepakMali
DeepakMali's picture

8 Dec 2016 - 3:17 am | DeepakMali

मस्त डिस्प्ले, उत्तम मोठी बॅटरी पावर, लेटेस्ट अँड्रॉइड, शिवाय 3जीबी रॅम ...९५०० रु दोन्ही कॅमरा क्लीअर फोटो देतात..

लालगरूड's picture

8 Dec 2016 - 7:45 am | लालगरूड

720 p snapdragon 430 .10000 मध्ये note 3 1080p कोणताही घ्या

रेडमी नोट३, ३एस प्राइम यात ब्लोटवेर किती? काढता येते का रूट न करता? android किती प्युअर?

कलंत्री's picture

9 Dec 2016 - 4:12 pm | कलंत्री

जाने नंतर सरकार मोबाईल संच सवलतीच्या दरात देणार आहे असे माझ्या मित्राने मला सांगितले.

थोडे थांबा. सरकार मदत मिळेलच.

माहितगार's picture

9 Dec 2016 - 4:35 pm | माहितगार

हम्म कदाचित ! बायोमेट्रीक + आधारकार्ड इत्यादीने नवे फोनची गरज आहे असे आत्ताच कुठेसे वाचले त्यात पहील्या जनरेशन मध्ये सुरक्षेचे प्रश्न शिल्लक राहतीलच त्याची दुसरी जनरेशन म्हणजे स्थैर्य प्राप्त होई पर्यंत दोन वर्षे जातील असे धरून चालू.

म्हणजे दोनएकवर्षे जाईल या हिशेबाने स्मार्टफोन वर खर्च करावा लागेल आणि युएसएसडी प्रणाली सुरक्षित असल्यास तुर्तास सध्याच्या फोनवरून युएसएसडी भागवण्याचा प्रयत्न करावा असा विचार करतो आहे.

माझ्या सध्याच्या फोनवर नॉन-स्मार्टफोनवर युएसएसडी चालू शकेल असे वाटते. युएसएसडी कितपत सुरक्षीत असते कुणी सांगू शकेल का ?

मराठी_माणूस's picture

9 Dec 2016 - 4:50 pm | मराठी_माणूस

oneplus 3 कसा आहे ?

कुठलाही फोन घ्या, Wifi वापरुन banking व्यवहार करा नेहमी.

Coolpad Note 5 अमॅझोन किंमत १०९९९ दाखवते आहे. फिचर रीच वाटते पण त्यांच्या आधीच्या फोन्सचे कस्टमर सर्वीस रिव्ह्यू मनात साशंकता निर्माण करत आहेत . Coolpad फोन्सचा कुणाला अनुभव आहे का ?