चोरले जाणार नाही 'ते'

भारी समर्थ's picture
भारी समर्थ in जे न देखे रवी...
5 Dec 2016 - 10:48 pm

टागोरांचे नोबल आणि
बिस्मिल्लांची चंदेरी सनई
साहित्य, सुर नी अनुभुतीची
सुरेख सुंदर उबदार दुलई

ही दोन्ही प्रतिकं चोरली गेली!
दोन दिवसांतच विसरतात सगळे
वर्षानुवर्षांची मेहनत, श्रम, अन्
झिजवलेले कैक उन्हाळ-पावसाळे

चोराकडून ही चिन्हं विकत घेणारे,
असणारच पूज्य संस्कृती त्यांना
पण त्या चिजांमधून निर्मितीचा आत्मा
गवसणारच नाही कधी त्यांना

मुक्त कवितामुक्तक

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

5 Dec 2016 - 11:40 pm | चांदणे संदीप

सुंदर!!

गुलजार यांची "क्या बीता, क्या रख्खा?" आठवली!

Sandy

फारच छान आणि समयोचित.

बाजीप्रभू's picture

7 Dec 2016 - 10:50 am | बाजीप्रभू

हेच लिहायला आलो होतो मी.

विवेकपटाईत's picture

6 Dec 2016 - 7:20 pm | विवेकपटाईत

चोर लोक लक्ष्मीची भक्ती करतात. सरस्वती,कला याचाशी त्यांचे घेणे देणे नाही. बाजारात जाऊन विकतील.

प्रसाद गोडबोले's picture

6 Dec 2016 - 7:45 pm | प्रसाद गोडबोले

बरेच दिवसांनी सुंदर कविता वाचायला मिळाली !

:)

शार्दुल_हातोळकर's picture

6 Dec 2016 - 10:02 pm | शार्दुल_हातोळकर

खरोखर कलाकाराचा आत्मा हा त्याच्या वाद्य-साधनांमधे नसुन त्याच्या कलेमधे असतो. पण स्वार्थी लोकांना हे कळत नाही.

अत्रुप्त आत्मा's picture

6 Dec 2016 - 10:34 pm | अत्रुप्त आत्मा

व्वाह!

पैसा's picture

6 Dec 2016 - 10:39 pm | पैसा

कविता आवडली.

रातराणी's picture

7 Dec 2016 - 10:26 am | रातराणी

क्या बात!

मंजूताई's picture

7 Dec 2016 - 10:48 am | मंजूताई

मस्त ! आवडली कविता!