काळे सावळे लोक गोर्या लोकांविषयी असुया का बाळगतात????

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture
टर्बोचार्जड फिलॉसॉफर in काथ्याकूट
5 Dec 2016 - 8:02 pm
गाभा: 

आपल्या भारतीय समाजात गोर्या रंगाला कीती महत्व आहे हे वेगळे सांगायला नको.लग्नाच्या बाजारात would be गोरा/ गोरी असायलाच हवी असा प्रत्येकाचा हट्ट असतो.भलेही पलिकडची पार्टी डांबरी काळी असली तरी .
मी स्वतः गोरा आहे ,अगदी कोकणस्थी गोरा नसलो तरी बर्यापैकी गोराचिठ्ठा आहे.आमच्या लहानपणी जो काळा आहे त्याला काळ्या चिडवने सर्रास चालायचे ,पण कुणा गोर्या मुलाला " गोर्या " चिडवलेले मी तरी ऐकले नाही.मुलगी जर गोरी असली तर ते तिचे prime asset समजले जाते.आजकाल मुलांनाही आपण गोरे असायला हवे असे वाटते.मला त्यात काही गैर आहे असे वाटत नाही
गोरा रंग व त्याचे स्तोम युरोपियनांनी आणले असा समज आहे ,पण जर त्या आधीचा काळ बघितला तरी जगभरात गोर्या रंगाला महत्व होतेच.राधा कृष्णापैकी कृष्णाला" राधा गोरी आणि मी काळा का? असा प्रश्न पड्ला होता.जर देव ह्या कलर हायरार्कीत अडकुन पडत होते तर तिथे सामान्य माणसाची काय कथा?
तर या गोर्या रंगाची महती खुप आहे.गोरा माणुस मग् तो कमी शिकलेला असला तरी त्याला हुशार समजले जाते व काळा माणुस कीतीही शिकला तरी त्याकडे संशयाने पाहीले जाते.याची कारणे अनेक आहेत ,पैकी मला जे संयुक्तीक वाटते ते कारण आहे युरोपियनांनी मागच्या काही शतकात केलेली नेत्रदीपक प्रगती.युरोपियन नुसतेच हुशार नाहीत तर ते गोरे देखील आहेत.अगदी लालसर गोरे.त्यानंतर प्रगत असलेले पौरात्य जसे की जापनीज ,कोरीयन वगैरे .हे युरोपियनांन इतके गोरे नसले तरी नीमगोरे आहेत.भारतीय व मध्यपुर्वेतले लोक आधेमधे कुठेतरी आहेत.सर्वात शेवटी कृष्णवर्णीय आफ्रिकन देशांचा क्रमांक लागतो.आफ्रिका हा अंतर्गत यादवीने त्रस्त व मागास खंड आहे.
माझ्यामते या कारणामुळे गोर्या रंगाला महत्व आहे.व आजकाल ते वाढीस लागले आहे.टिव्ही चॅनल्सवर दर सेकंदाला चालू असलेल्या फेअरनेस प्रॉडक्ट्च्या जाहीरातींची संख्या पाहून हे लक्षात येते.
ही फेअरनेस इंडस्ट्री चालू आहे ती काळ्या सावळ्या लोकांच्या मनात असलेल्या insecurity वर.काळे सावळे लोक गोर्या रंगाविषयी एक असुया बाळगुन असतात.आपणही गोरे असायला हवे होते असे त्यांना वाटत असते.मी कॉलेजला असताना मला व माझ्या इतर गोर्या मित्रांना मैत्रिणी सहज मिळायच्या.मुलगा गोरा आहे म्हणजे हुशार व मनानेही चांगला असेल ,संस्कारी असेल असा समज मुलींमध्ये असतो.मुलंही गोर्या मुलींना सोबर इनोसंट समजतात.गोर्या रंगाला इतके चांगली विशेषणं का जोडली जातात याचा उत्क्रांती शास्त्रानुसार( evolutionary psychology) अभ्यास झाला नाही ,तो व्ह्यायला हवा.
जे रंगाने काळे सावळे आहेत त्यांनी स्वतःचे कॅलिबर सिद्ध करायला हवे.काळे लोक लबाड असतात ,violent असतात असाही एक समज आहे.दुर्दैवाने तो खरा आहे असे मानणारे अनेक आहेत.मी काहि वैयक्तीक अनुभवांवरुन याच्याशी सहमत आहे( माफ करा)
मी समाजात जेव्हा वावरतो तेव्हा मला काळ्या सावळ्या लोकांच्या मनात असलेली असुया वारंवार दिसुन येते.मी जेव्हा दाढी वाढवली होति तेव्हा अनेक मित्रांनी तू गोरा आहेस म्हणुन तुला दाढी चांगली दिसते ,आम्हाला दाढी चांगली दिसत नाही असे बोलुन दाखवले होते.जेव्हा आम्ही मित्र खरेदीला जातो तेव्हाही तिच गत ,तुम्ही गोरे आहात तुम्हाला काहीही शोभुन दिसते असे ऐकावे लागते.माझ्या एका मित्राचे लग्न मोडले ,त्याने कारण काय दिले तर सगळे जुळुण आले होते पण माझ्या काळ्यासावळ्या रंगामुळे ऐनवेळी मुलीने मला नकार दिला.
तर असे हे वर्ण भेद आहेत.जे आपण बाळगुण असतो.काळे सावळे लोक जास्त वर्णभेद पाळतात असे माझे निरीक्षण आहे.आजकालच्या पॉलीटीकल करेक्टनेसच्या युगात काळे गोरे असा भेद करणेही फाऊल समजले जाते.पण प्रत्यक्षात समजात उघड वर्णभेद पाळले जातात. अगदी प्रगत अमेरीकेतही हे अजुन पाळले जातात तिथे भारतासारख्या परंपरावादी व अचल समाजात ते भेद कीती टोकाला गेले आहेत हे वेगळे सांगायला नको.
तर गोर्या लोकांनी स्वतःच्या गोर्या रंगाचा अभिमान जरुर बाळगायला हवा.over political correctness च्या नादी लागू नये.काळ्या सावळ्या लोकांनीही आपल्या मनात असलेले गोर्या रंगाचे आकर्षण सोडून द्यावे.गोर्या लोकांविषयी असलेली असुया सोडून द्यावी.निसर्गाने उपजत दिलेल्या रंगाचा प्रत्येकानेच अभिमान बाळगायला हवा.त्यात कमि किंवा जास्त असे काहि नाही.

प्रतिक्रिया

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

5 Dec 2016 - 8:30 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

याचा उत्क्रांती शास्त्रानुसार( evolutionary psychology) अभ्यास झाला नाही ,तो व्ह्यायला हवा.

ह्याची सुरुवात व्हावी असे ह्यांचेही मत.

काळे सावळे लोक गोर्या रंगाविषयी एक असुया बाळगुन असतात.

हे मत अभ्यास करून मांडले आहेस का फिलॉसॉफरा?

श्रीगुरुजी's picture

5 Dec 2016 - 9:04 pm | श्रीगुरुजी

नाना आणि माई,

तुम्ही दोघे मिक्स्ड सिंगल्स मॅच खेळता का?

वरुण मोहिते's picture

5 Dec 2016 - 9:17 pm | वरुण मोहिते

बाकी टफी मी सावळा आहे मला भेटणार का ??

उत्क्रांती शास्त्रावरून ह्याचा अभ्यास झालाय. मी कधी तरी लिहीन.

गोर्या रंगाचे आकर्षण हे युनिव्हर्सल नाही. स्त्रियांचा समाजातील सहभाग कश्या प्रकारचा आहे ह्यावर हे अवलंबून आहे.

आकर्षण, सौन्दर्य ह्या भावनेच्या खाली "हिच्या पासून मला मुले चांगली होतील का ? " हा प्रश्न दडलेला आहे. उत्क्रांतीच्या प्रक्रियेत चांगली मुले होऊ शकणारी स्त्री आणि तिच्या शारीरिक राचेनला ओळखण्याची दृष्टी पुरुषांनी विकसित केली आहे. आफ्रिकेत अति भव्य नितम्ब (जे कदाचित भारतीयांना किळसवाणे वाटतील) हे सौन्दर्याचे लक्षण मानले जाते. ह्याचे कारण हे कि मूळ जन्मतः मरण्याचे प्रमाण फार मोठे असल्याने खूप मुलांना जन्म देऊ शकणारी स्त्रीला मोठे नितम्ब (आणि त्याप्रमे सहज प्रसव) असणे कदाचित जास्त दिसायरेबल असेल. वेस्टर्न युरोप मध्ये गोर्या महिलांत ज्यांची त्वचा tanned आहे त्यांना पुरुष जास्त प्रेफर करतात. अमेरिकेत stripper लोकांच्या इन्कम मध्ये काळया आणि ब्लॉन्ड गोर्या स्त्रिया सामान पैसे कमावतात पण लाल केस असणाऱ्या गोर्या महिलांना सर्वांत कमी पैसे मिळतात.

भारतांत कदाचित गरीब स्त्रियाना घराबाहेर मजुरीचे काम करायला लागायचे ज्यामुळे त्या आणखीन काळ्या होत. तर त्यामानाने सधन घरातील स्त्रियांना आंत काम करायला लागायचे त्यामुळे "कमी काळी = सधन = जास्त चांगली मुले" असे समीकरण बनले असेल. सधन घरांत कुपोषणाचे प्रमाण कमी असल्याने गरोदर महिला प्रसव मध्ये मरण्याची शक्यता कमी असते. एखादे anecdotal उदाहरण कदाचित वेगळे वाटेल पण गोरी त्वचा आणि अनेक पिढ्यांची सधनता correleated असावी असे वाटते.

मराठी कथालेखक's picture

6 Dec 2016 - 4:01 pm | मराठी कथालेखक

"अडगुलं मडगुलं" नावाचा एक मस्त मराठी चित्रपट आहे. त्याची आठवण झाली.

प्रसाद गोडबोले's picture

6 Dec 2016 - 4:17 pm | प्रसाद गोडबोले

ह्या धाग्याला जातीय / धार्मिक / राजकीय तडका न दिल्याने धागा फोल गेलेला आहे . =))

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

6 Dec 2016 - 5:01 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

मार्कसभाऊ तुम्ही धाग्यवर आला म्हणजे धाआ फोल गेला नाही असे समजतो आम्ही.

प्रसाद गोडबोले's picture

6 Dec 2016 - 5:52 pm | प्रसाद गोडबोले

आम्ही तुमचे मनासुन फॅन आहोत टर्बोराव, तुमच्या धाग्यावर प्रतिसाद नाही देणार तर कोणाच्या देणार :)

बॅटमॅन's picture

7 Dec 2016 - 12:50 am | बॅटमॅन

हा ना राव, किमानपक्षी "गोरेघारे" असा सूचक तरी उल्लेख दिसायला पाहिजे होता. छ्यॅ राव, पूर्वीचं मिपा राहिलं नाही.

विवेकपटाईत's picture

6 Dec 2016 - 7:18 pm | विवेकपटाईत

आपली सीता आणि द्रौपदी दोन्ही सावळ्या होत्या. आपले श्रीराम आणि श्रीकृष्ण दोन्ही सावळे होते. आपापली दृष्टी ....

प्रसाद गोडबोले's picture

6 Dec 2016 - 7:36 pm | प्रसाद गोडबोले

एक टेक्निकल डाऊट :

गोरे सावळे आणि काळे ह्या स्किन टोन च्या बाऊंडरी नक्की कशा ठरवतात ?
विकिपेडीयावर ह्य्मन स्किन कलर म्हणुन सर्च केले तर हा चार्ट सापडला :

a

ह्यात गोरे कोण , सावळे कोण आणि काळे कोण ? ह्यात कोण कोणाविषयी असुया बाळगत असावे ?

अवांतर: अस्मादिक २५-२६ च्या आसपास येत असल्याने स्वतःचा उल्लेख गव्हाळ वर्ण करायच्या ऐवजी
"सुवर्णवर्णो हेमांगो वरांगश्चन्दनाङगदी " असा करत असतो .

ख्यॅ ख्यॅ ख्यॅ

पगला गजोधर's picture

6 Dec 2016 - 11:14 pm | पगला गजोधर

'काय भुललासी वरल्या रंगा'
म्हणजे, संत म्हणतात तसं, काळा रंग (मनाचा, शरीराचा नव्हे) हे खल प्रवृत्तीचे, तर गोरा रंग
सात्विक वृत्तीचा, असं काहीसे, वळण आपल्यासारख्या आयडी कडून मला अपेक्षित होतं, असो टफि नी काढलेल्या या धाग्याला, वाचनीय वळण लागो, त्वचेचा गोरेपणा दाखवणाऱ्या स्केलपेक्षा, मनाच्या नितळपणाची (रेफ-काय भुललासी वरल्या रंगा) एखादी स्केल मिपावर असती, तर किती छान झालं असतं नै ?

प्रसाद गोडबोले's picture

7 Dec 2016 - 12:49 am | प्रसाद गोडबोले

मनाच्या नितळपणाची स्केल मिपावर असती, तर किती छान झालं असतं नै ?

>>>

:) एकदम गोनीदांची आठवण झाली , अगदी ह्याच आशयाचे एक वाक्य कोणा एकाची भ्रमणगाथा मध्ये वाचल्याचे आठवते .

अवांतर : बाकी ते मोदी भक्त आणि रुग्ण , सीमोर मॅडम आणि द्रौपदी वगैरे डोक्याला शॉट धाग्यांच्या गदारोळात टफि राव जरा हलके फुलके निरर्थक अत्मरंजन करायला चान्स देतात म्हणून आपली मजा करीत आहे ह्या धाग्यावर :)
कृ गै न लो अ .

कैलासवासी सोन्याबापु's picture

7 Dec 2016 - 6:20 am | कैलासवासी सोन्याबापु

आमाला गोरेपणाची स्केल म्हणजे फक्त टीव्हीवर यामी गौतम नामक फंजाबी कन्येने फेयर अँड लव्हलीच्या झैरातीत क्रीम विकाया हाती धरलेली कागदी पट्टी वाटत असे, पण जल्ला हे नवे प्रकरण थोरच आहे हो मार्कसबुआ!. २५ नंबर काय शेड काय धुरळा तिच्यायला....

(यामी फॅन) बापुस

चित्रगुप्त's picture

8 Dec 2016 - 5:04 am | चित्रगुप्त

.
.

चारु राऊत's picture

8 Dec 2016 - 6:39 am | चारु राऊत

सहमत

चित्रगुप्त's picture

6 Dec 2016 - 11:39 pm | चित्रगुप्त

.

प्रसाद गोडबोले's picture

7 Dec 2016 - 12:39 am | प्रसाद गोडबोले

हा किती साली काढलेला फोटो आहे ;)

सौन्दर्य's picture

8 Dec 2016 - 5:34 am | सौन्दर्य

गोरी म्हणजे पु लं च्या यमीपेक्षा गोरी का ?

चारु राऊत's picture

8 Dec 2016 - 6:31 am | चारु राऊत

इंग्रज व मुस्लिम आक्रमक येताना बायका घेऊन आले नव्हते.त्यांचा रंग खूप गोरा होता. बेसिक आपण भारतीय ब्राऊन

चारु राऊत's picture

8 Dec 2016 - 6:40 am | चारु राऊत

इंग्रज व मुस्लिम आक्रमक येताना बायका घेऊन आले नव्हते.त्यांचा रंग खूप गोरा होता. बेसिक आपण भारतीय ब्राऊन

पाटीलबाबा's picture

9 Dec 2016 - 4:20 am | पाटीलबाबा

म्हनजे येथिल गोरे कोन ?

अनुप ढेरे's picture

11 Dec 2016 - 9:49 pm | अनुप ढेरे

काळे देखील बाहेरूनच आले आहेत.

टवाळ कार्टा's picture

9 Dec 2016 - 9:21 am | टवाळ कार्टा

मिपाची हागणदारी करण्यासाठी इथे बसल्याबद्दल अभिनंदन

पगला गजोधर's picture

9 Dec 2016 - 12:44 pm | पगला गजोधर

इथे गोरे लोकं नव्हते (मुस्लिम, इंग्रज) पूर्वी, असे म्हणणे धाडसाचे होईल.

उत्तरेत आढळणारे हे कॉकेशस पर्वतरांगेतून मायग्रेट झालेल्या आर्यांशी जनुकीय संबंधित आहेत.

भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर हजारो वर्ष्या पूर्वी ग्रीक उपखंडातून येऊन स्थायिक झालेले लोकं पण आहेत,
साधारणपणे गौर त्वचा निळे हिरवे डोळे अशी अनुवंशकीय ओळख सांगता येईल.

सर्व मनुष्य लोकांचे मूळ एकच दक्षिण आफ्रिका ......

पाटीलबाबा's picture

9 Dec 2016 - 4:21 am | पाटीलबाबा

म्हनजे येथिल गोरे कोन ?

पगला गजोधर's picture

10 Dec 2016 - 1:42 pm | पगला गजोधर

सॉरी, 'ग्रीक उपखंडातून' च्याऐवजी ग्रीस देशातून समुद्रमार्गे आलेले, व कोकण किनारपट्टीवर वसलेले, असं वाचावे,

शिवाय इराण मधून समुद्र मार्गे आलेले व गुजरात मधे वसलेले झोराष्ट्रीयन व इराणी सुद्धा गोरे होते.

धर्मराजमुटके's picture

11 Dec 2016 - 8:22 pm | धर्मराजमुटके

यामी फेअर अँड लव्हली लावता लावता एवढी गोरी होऊन जाईल की कदाचित दिवसाउजेडी दिसणारही नाही अशी मला सार्थ भिती वाटते.