एक पणती माझीही!!

बाजीप्रभू's picture
बाजीप्रभू in जनातलं, मनातलं
1 Dec 2016 - 8:24 am

"अरे सहाब क्यू इतना झंझट करवाते हो आप? कौन जायेगा बँक में घडी घडी लाईन लागाने को?. मेरा तो अकाउंट भी नही है बँक में, आप मेरे को कॅशहि दे दो."

साधारण सहा महिन्यापूर्वीचं आमच्या नवीन बंगाली कामवाली बाईचं हे वाक्य.
नवरा पुराणिक बिल्डर्सच्या कन्स्ट्रक्शन साईटवर मजूर, आणि हि त्याच कॉम्प्लेक्समधे धुणी-भांडी, जेवण बनवण्याचं काम करते. कॉलेजात शिकत असलेली दोन मुलं शिकण्यासाठी कोलकातामधे. नवऱ्याच्या पगारात दोघे भागवतात आणि तिचा सगळा पगार मुलांच्या शिक्षणासाठी पाठवते.

मी :- आपका बँक अकाउंट नाही है? तो आप पैसा कैसे भेजती हो हर महिने?
ती :- एक पहचान का आदमी है वो भेजता हैं.
ती :- हर महिने वो ३०० रुपया लेता हैं, पैसा भेजनेका.
मी :- अरे!! क्यू खुदका नुकसान करवाती हो? मुझे आपके लडके का अकाऊंट नंबर दे दो, मैं उसके अकाऊंट में डाल देता हू. आपका हर महिनेका ३०० रुपया बच जायेगा. (सगळे इतर फायदे ऐकल्यानंतर)
ती :- ठीक हैं, पूछती हू उसको.
मी :- ओके.

दोन दिवस झाले... चार, पाच असं करत तीन आठवडे झाले. मिसेसला आठवण केली, "अग तिने अजून मुलाच्या अकाऊंटचे डिटेल्स दिले नाहीत ते?. मिसेस म्हणाली "अहो ती एकदम अडाणी आहे. तिला तुम्ही सांगितलेलं काहीही कळत नाही. तिच्या मागे डोकेफोड करण्यात काहीही अर्थ नाहीये, रोज काहीना काही कारण सांगते, आज परत एकदा आठवण करते"

मिसेस :- अहो ती म्हणतेय. तिचा मुलगा तिच्यावर भडकला. "एक्झाम के टाईम पे ये क्या तुम्हारा नाटक है? मेरे को टाइम नहि है।"
मी :- असं म्हणाला तो? च्यायला YZ च दिसतोय.
मिसेस :- नाहीतर काय! तुम्ही तिकडे बसून शेळ्या हाकू नका. तिला कॅशच देत जाऊ.
मी :- एक सांग तिला, कॅश हमलोग रखते नही घर्मे, और मेरे को भी टाईम नहीये बँक मे जाने को, तुम चेक वैगरा जमताय क्या वो देखो नय तो काम छोड दो.
मिसेस :- काय डोकं फिरलय का तुमचं?. मोठ्या मुश्किलीने बाई मिळाली आहे आणि तुम्ही?
मी :- अगं जरा धीर धर. एक "गॅम्बल" तर करून बघू.
मिसेस :- ओके! आणि हो मै तुम्हारी मराठी बैको हू. मेरेसे हिंदी में बात करू नको तुम.
मी :- ह्या ह्या ह्या, सो फनी. ती बंगाली आहे हैद्राबादी नाही.

दुसऱ्या दिवशी काहीच प्रगती नाही म्हणून मग मिसेसला सांगितलं तिच्या मुलाचा नंबर घे आपण बोलू त्याच्याशी. नंबर मिळाला, WAवर त्याला मेसेज केला "आप जितना दिन बँक डिटेल्स देने में लेट करोगे उतना आपके मम्मी का पगार लेट होगा, आप खाली चेकबुक का एक फोटो भेज दो"

दुसऱ्या दिवशी त्याने पासबुकचा फोटो पाठवला. बँक होती "उत्तर बांगा क्षेत्रीय ग्रामीण बँक" अकाउंट होल्डरच नाव होतं. "असादुल हाक्युल मकबूल हुसैन". ते वाचून मिसेसच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.

मिसेस :- ती बाई तर "जमीर" नाव सांगत होती, हा "असादुल" कोण?
मी :- अगं तुझ्या त्या लाडक्या(वातड) सल्लू मियाँ सारखं असेल. त्याचं पण नाव "अब्दुल रशीद सलीम सलमान खान" असं काहीतरी आहे.
मिसेस :- ओ मिस्टर!! सल्लू तीन तास नुसता झोपलेला जरी स्क्रीनवर दाखवला असेल ना तरी बघेन मी त्याला. सल्लूला मधे आणायचं काम नाय.
मी:- खरंच सांग त्याला झोपायला, ती एकच ऍक्टिंग चांगली जमेल त्याला. खी.. खी.. खी.
मिसेस :- सो फनी, बाईला विचारून उद्या सांगते. (फोन कट)
मी :- आठवणीने!! तिच्या पगाराला चारच दिवस राहिलेत, हॅलो हॅलो! च्या आयला त्या सल्लूच्या!!

दुसऱ्या दिवशी कन्फर्म झाल्यावर HDFC A/c मधे "थर्ड पार्टी बेनिफिशरी" मधे ऍड करायला घेतलं. च्याआयला!! त्याच्या बँकेचा "IFSC" कोड HDFC च्या लिस्टमधेच नव्हता. अकाउंट ऍड करणं शक्य नव्हतं. SBI च्या साईटवरदेखील तेच रडगाणं.

मिसेस :- काय.. झाला ना पोपट? मोठया बाता मारल्यात त्या बाईला. (पुढे मग मी स्पीकर म्यूट केला त्यामुळे पुढल्या ओव्या ऑटोमॅटिक संपादित झाल्यात.)
मी :- बर्रर्रर्रर्र झालं बोलून?
मी :- पण थांब जरा. आधीच तिला सांगू नकोस, HDFC ला लिहून बघतो. नाही झालं तर "कॅश" देऊ.
मिसेस :- आधीच सांगितलं असतं तर त्या दिवशीच कॅश काढून ठेवली असती. दगडावर पेरायचं प्रयत्न करू नका, इंडिया आहे हा. तुमच्या थायलंडची थेरं इथे चालत नाहीत.

आता हा एकदम प्रेस्टिज इशू झाला होता. बाईपेक्षा बायकोसमोर पोपट होणार याची जास्त चिंता लागली होती. HDFC चा कस्टमर केअर, लाईव्ह चाट सगळे पालथे घातले. स्टँडर्ड FAQ शिवाय काही हाती लागत नव्हतं. आंतरजालावर बरेच उंदीर मारल्यानंतर एक ई-मेल आयडी मिळाला. कम्प्लेंट लाँच केली, SBI ला देखील. दोन दिवस वाट बघितली काहीच उत्तर नाही. माझाही धीर आताशा सुटत आला होता. "आयडिया केली आणि बोxxx गेली" असं वाटू लागलं. तिकडे बाई देखील "मै मेरा, दुसरे घरोंसे मिल्नेवाला पगार भी आपको देती हूं. आप लडके को ट्रान्स्फर कर देना" असं म्हणत माझ्या नामुष्कीत भर घालत होती.

३० तारीख उगवली!! शेवटची न्याहारी करून मराठ्यांचे सैन्य जसे अब्दालीच्या सैन्याला पानिपतात भिडले त्या तयारीशिनी ऑफिसला आल्या आल्या इंटरनेटवर भिडलो. HDFC चे दरवाजे परत एकदा ठोठावून बघितले काहीच उत्तर नाही. मग विचार केला या "उत्तर बांगा क्षेत्रीय ग्रामीण बँके"वर गुगल करूयात. केला गुगल.. एका वेबपेजवर "IFSC" कोड ओळखीचा वाटला. त्या वेबपेजच्या एका "Note" वर लक्ष गेलं आणि डोक्यात ट्यूब पेटली. ती नोट होती "5th character is Zero".

-

मी इतके दिवस लेटर "ओ" टाकत होतो. लागोलाग ऍड बेनिफिशरीमध्ये जाऊन बरोबर IFSC कोड टाकल्यावर बँक लोकेट झाली. अर्ध्या तासाने "मकबूल मियाँ"च अकाउंट ऍड झाल्यावर रु.५०० टेस्ट म्हणून पाठवले. मिळाल्याचं कन्फर्म झाल्यावर दुसऱ्यादिवशी पगाराचे पैसे ट्रान्स्फर केले आणि एक तारखेचा मुहूर्त अचूक साधला. (आनंदी आंनदी गडे, सर्वांगाला झेंडूची फुले)

बायकोला शेंडी लावली. माझ्या पत्र व्यवहारामुळेच HDFC ने नवीन कोड ऍड केला असं सांगून पाठ थोपटवून घेतली. (असे प्रसंग दुर्मिळ असतात म्हणून चान्स मारून घेतला). त्याच्या पुढल्या महिन्यात कामवाल्या बाईचं "प्रधानमंत्री जनधन" योजने अंतर्गत जवळच्याच "बँक ऑफ बरोदा" मधे अकाउंट उघडून दिलं. फक्त १२ रुपये जास्त भरून तिला एक इन्शुरन्सहि काढून दिला. पेन्शनसाठी प्रयत्न केले पण ४० पेक्षा जास्त वय असल्याने "अटल पेन्शन" योजना घेता आली नाही. मिसेस ने दिलेल्या ट्रेनिंगवर आता तिचं अकाउंट ती स्वतःच संभाळते.

निश्चयाने पेटवलेल्या या पणतीची ज्योत, नोटबंदीच्या काळातही तग धरून होती. घरचा भाजीपाला ऑलरेडी ऑनलाईन पोर्टलवरून येत होता. नोटबंदीत कामवालीची आबाळ होऊ नये म्हणून तिला घरीच जास्तीचं जेवण बनवून घेऊन जात जा सांगितलं. तिची लाईट, फोन, केबलची बिलं मी ऑनलाईनच भरतो. तिच्या इतर घरकामातहि मालकांना "कॅश" साठी तिने फोर्स केला नाही. "वो ४०१ नंबरवाली भाभी हैं ना? उसके पास जाव, वो आपको मोबाईल पे सब्जी-वब्जी मंगा देगी" असं कॉम्प्लेक्सभर अड्वर्टाइझ करून बायकोची कॉलर टाईट केली. स्वतः बरोबर आपल्या कामवाल्या बाईला देखील "लेस कॅश" बनवल्यामुळे नोट बंदीच्या गर्दीतली निदान दोन माणसं तरी कमी करू शकलो याचा मला झालेला आनंदहि काही कमी नव्हता.

आपल्या पंतप्रधानांचा नोटबंदीचा निर्णय हा वादळावर दिवा लावण्याचा प्रयत्न आहे. त्या दिव्याला आपल्यासारख्या टेक्नोसॅव्ही मंडळींच्या हाताची ओंजळी मिळाली तर ज्योत लवकर स्टेबल होऊन आपल्या सगळ्यांनाच प्रकाश मिळेल. प्रत्येक तरुणाने आपल्या जवळच्या फक्त चार अनभिज्ञ लोंकांना ऑनलाईन व्यवहाराची ट्रेनिंग दिल्यास परिस्थिती लवकर सुधारेल हे पंतप्रधानांचं आवाहन मी या पोस्टच्या निमित्ताने समस्त मिपाकरांना करू इच्छितो.

धोरणविचार

प्रतिक्रिया

एस's picture

1 Dec 2016 - 9:07 am | एस

गुड!

मराठी_माणूस's picture

1 Dec 2016 - 9:26 am | मराठी_माणूस

चांगला उपक्रम.

बाजीप्रभू's picture

7 Dec 2016 - 2:48 pm | बाजीप्रभू

धन्यवाद "मराठी_माणूस"

खेडूत's picture

1 Dec 2016 - 9:29 am | खेडूत

मस्त खुसखुशीत कहाणी..
अन आमची सकाळ फ्रेश केल्याबद्दल आभार!

बाजीप्रभू's picture

7 Dec 2016 - 2:49 pm | बाजीप्रभू

धन्यवाद!! खेडूतजी

पगला गजोधर's picture

1 Dec 2016 - 9:41 am | पगला गजोधर

१+

आनन्दा's picture

1 Dec 2016 - 9:48 am | आनन्दा

आजच एका ठिकाणी कार्डने ट्रान्जेक्शन करण्यासाठी १०रु जास्ती घेतले.. याची तक्रार कुठे करता येते?

ही तर सर्रास चालणारी चोरी आहे.
२% जास्त घेतो म्हणतात; अरे २% तुम्ही ती सोय घेण्याचे पैसे आहेत. तुम्ही कस्टमरकडून घेणं बेकायदेशीर आहे. तुम्ही कार्ड घेतलं नाहीत तर गिर्‍हाईक दुसर्‍या दुकानात जाईल, नुकसान तुमचं आहे. पण नाही ! असे महाभाग एक आणि तुम्ही समजवायचा प्रयत्न करू लागलात की 'जाऊदे ना तू सरळ कॅश काढ' किंवा 'दे चल दोन टक्के त्यात काय मोठं?' असं म्ह्णणारे तुमच्यासोबत खरेदीला आलेले महाभाग दुसरे. हे दुसरे जास्त डोक्यात जातात. अशी सणक जाते ना सगळं चालवून घेण्याच्या वृत्तीमुळे!

वेल्लाभट's picture

1 Dec 2016 - 11:56 am | वेल्लाभट

यावर जरा माहिती संकलन करतो आणि तुम्हाला सांगतो. मलाही यादी द्यायचीय अशा दुकानांची.

टवाळ कार्टा's picture

1 Dec 2016 - 9:50 am | टवाळ कार्टा

भारी, रच्याकने मला आधी बांगलादेशात घुसाल असे वाटले :)

सुधांशुनूलकर's picture

1 Dec 2016 - 10:27 am | सुधांशुनूलकर

रोख-तुटवड्याची खिंड यशस्वीपणे लढवून 'बाजीप्रभू' आयडी सार्थ केलंत.

शेवटचा परिछेद -

आपल्या पंतप्रधानांचा नोटबंदीचा निर्णय हा वादळावर दिवा लावण्याचा .......... पोस्टच्या निमित्ताने समस्त मिपाकरांना करू इच्छितो.

- सहमत. असंच एका पणतीने दुसरी पणती पेटवत जाऊ आणि यातून मार्ग काढू.

अतिशय महत्त्वाचं - 'मला लागलेली **** कशी सोडवावी' या प्रकारच्या धाग्यांच्या जाळ्यातून तुमच्या पणतीचा प्रखर प्रकाश खरा उजेड देतो आहे.

संजय पाटिल's picture

1 Dec 2016 - 10:27 am | संजय पाटिल

असेच म्हणतो..

यशोधरा's picture

1 Dec 2016 - 10:26 am | यशोधरा

छान.

बाजीप्रभू's picture

7 Dec 2016 - 2:51 pm | बाजीप्रभू

धन्यवाद!! यशोधराजी

वेल्लाभट's picture

1 Dec 2016 - 11:58 am | वेल्लाभट

बाकी ठीक. तुमचं काम स्तुत्यच आहे. वाद नाही.
पण बंगाली बाई; मुंबईत राहते.... बंगालात कामं मिळत नाहीत का विचारलं नाहीत? आणि इथे रहायचं तर मराठी बोललंच पाहिजे म्हणावं.

टवाळ कार्टा's picture

1 Dec 2016 - 12:10 pm | टवाळ कार्टा

बेंगलोरात बरेच मराठी लोक आहेत....त्यातले किती जण तोडकी मोडकी का होईना कन्नड शिकले असतील असे वाटते?

वेल्लाभट's picture

1 Dec 2016 - 12:16 pm | वेल्लाभट

अनेक. आणि तो पण करतो, मग मी केलं तर काय किंवा तत्सम व्हॉटबाउटरी व्यर्थ असते.

टवाळ कार्टा's picture

1 Dec 2016 - 12:17 pm | टवाळ कार्टा

मी अजून एकहीजण बघितला नाहीये, असो माझा परीघ छोटा असणार

नीलमोहर's picture

1 Dec 2016 - 1:31 pm | नीलमोहर

माझा भाऊ आहे तिकडे, तो आवर्जून कन्नड शिकलाय, बोलतोही व्यवस्थित, वहिनीही शिकतेय,
तेथील काही लोकांना हिंदी, इंग्लिश येत नाही मग कन्नडला पर्याय नसतो.
कुठल्याही ठिकाणी तिथले दैनंदिन व्यवहार समजण्यासाठी, कामकाज करण्यासाठी स्थानिक भाषा शिकणे सहसा गरजेचे असते,

तीथे काय काम मीळणार? आपल्या भागात पोट भरायची सोय असेल तर कोणी सुखासुखी देशाच्या दुसर्‍या टोकाला भांडी घासातला जातील काय?

बंगालच्या ग्रामीण भागात जाउन पाहीले तर स्वःताच्याच खीशातले काढुन द्यावेसे वाटते.

पैसा's picture

1 Dec 2016 - 11:58 am | पैसा

खूप चांगले काम आहे. फक्त मोलकरीण आणि तिच्या मुलाचे नाव वाचून डोक्यात घंटा वाजली. हे बांगलादेशी घुसखोर असतील तर त्याना आपल्या सिस्टीममधे सामील करून घेणे धोक्याचे वाटते.

वेल्लाभट's picture

1 Dec 2016 - 12:02 pm | वेल्लाभट

आधार कार्ड, वास्तव्याचा दाखला हे असण्याची शक्यता कमीच दिसते, जर अकाउंटच नसेल बँकेत. ही मंडळी अधिकृतपणे राहतात की पैतै म्हणतात त्याप्रमाणे बांग्लादेशी आहेत. असतील तर उद्देश काय, इतर वेळी कुठल्या प्रकारच्या उलाढाली करतात हे सगळे प्रश्न येतातच.

टवाळ कार्टा's picture

1 Dec 2016 - 12:12 pm | टवाळ कार्टा

लोकल नगरसेवक/आमदारांच्या कृपेने रेशन कार्ड मिळते असे ऐकून आहे...आणि या बाबतीत सर्व पक्ष समभाव आहे

बाजीप्रभू's picture

1 Dec 2016 - 1:02 pm | बाजीप्रभू

नीट वाचलेले दिसत नाही. "पुढल्या महिन्यात तीच जनधन अकाउंट उघडले गेलेले आहे". तेहि ठाण्यात, आधारकार्ड होतं तिच्याकडे. सगळ्या कागदपत्रांची तपासणी बँकेने केली असावी. "मेड" ठेवल्यानंत पोलीस व्हेरिफिकेशन वैगरे सोपस्कार पार पाडलेले आहेत.
रच्याकने,
पोस्ट मध्ये "बंगाली" म्हटलं आहे "बांग्लादेशी" नाही. बाई मालवणी जेवण फर्मास बनवते. राज ठाकरेंचा फोटो अजून घरात लावलेला नाहीये. मोड तोड करून ऐकायला मिळणारी मराठी भाषा तिच्या तोंडून ऐकायची सध्यातरी इच्छा नाहीये.

पैसा's picture

1 Dec 2016 - 1:09 pm | पैसा

बांग्लादेशींना आधार कार्ड आणि रेशन कार्ड आपल्या आधी मिळतात. हे लोक त्यातलेच असतील असे मी म्हणत नाही. पण एक शंका आलीच आपली. बोलता बोलता कधीतरी तिचा जिला, परगणा कोणता ते विचारून घ्या ना.

संदीप डांगे's picture

1 Dec 2016 - 1:31 pm | संदीप डांगे

सहमत आहे, बांगलादेशी घुसखोरांना नगरसेवक मंडळी मतदार बनवून घेतात हे काही गुपित नाही. पासपोर्ट पासुन सगळं त्यांना उपलब्ध होतंय.

बांगलादेशी घुसखोर नोकरांना कामावर ठेऊन चान्स घेऊ नये असे माझे मत आहे. तेवढीच प्रत्यक्ष देशसेवा.

धागाकर्त्याने आपल्या मोलकरणीबद्दल पोलिसांच्या सूचनेनुसार पोलिसात नोंदणी केली असावी अशी अपेक्षा आहे.

पैसा's picture

1 Dec 2016 - 1:52 pm | पैसा

पोलीस व्हेरिफिकेशन केलाय त्यांनी पण पोलीस अशा प्रकारात फार खोलात चौकशी करत नाहीत. याला काही इलाज नाही. बंगला देशी हा वेगळा विषय झाला पण लेख आणि लेखकाची एका अख्ख्या कुटुंबाला अर्थसाक्षर करायची धडपड खूप आवडली. जमेल तसे सगळ्यांनीच हे काम करत राहू.

तुषार काळभोर's picture

1 Dec 2016 - 12:07 pm | तुषार काळभोर

liked

पाटीलभाऊ's picture

1 Dec 2016 - 12:51 pm | पाटीलभाऊ

चांगला उपक्रम

बाजीप्रभू's picture

7 Dec 2016 - 2:52 pm | बाजीप्रभू

धन्यवाद पाटील भाऊ!!

सस्नेह's picture

1 Dec 2016 - 12:57 pm | सस्नेह

पण कार्ड ट्रॅन्झॅक्शनवर काही दुकानदार चार्जेस लावतात त्याचे काय ? उद्या भाजीवालेपण कार्ड स्वॅपिंग चे दोन टक्के घेऊ लागले तर औघड होईल :(

टवाळ कार्टा's picture

1 Dec 2016 - 1:18 pm | टवाळ कार्टा

प्रॉब्लेम काय आहे? जर बँक २% दुकानदाराकडून फक्त मशिन लावण्याच्या सोयीसाठी घेते तर तो भार दुकानदाराने का उचलावा? जर महिन्याकाठी कार्ड पेमेंटची रक्कम समजा १ लाख आहे (अंदाजे...) तर त्याचे २% म्हणजे २००० रुपये दुकानदाराने का भरावे? प्रत्येकाने आपापल्या खरेदिवर २% भरा की

संदीप डांगे's picture

1 Dec 2016 - 1:27 pm | संदीप डांगे

सहमत आहे, कॅशलेस इंडियासाठी खिशातून अतिरीक्त पैसा टाकायला लागेल. सुविधेचे पैसे कंपन्या घेणारच. त्यात तक्रार करण्यासारखं काय आहे ते समजत नाही.

वेल्लाभट's picture

1 Dec 2016 - 1:55 pm | वेल्लाभट

ओ भाई!
ती 'दुकानदाराने' घेतलेली सोय आहे. 'ग्राहकाने' नाही. ती नाही घेतली तर ग्राहक दुसरीकडे जाईल. प्रश्न दुकानदाराचा आहे त्याने ती घेऊन ग्राहक वाढवावेत की ती न घेता सोडावेत. प्रत्येकाने भार वगैरे उचलायचा प्रश्नच येत नाही. काहीपण लॉजिक मांडण्या आगोदर जरा माहिती काढ रे टका.

टवाळ कार्टा's picture

1 Dec 2016 - 2:00 pm | टवाळ कार्टा

यात ग्राहकाचीसुद्धा सोय नाहीये? रच्याकने तुमचे पुण्यात कुठे दुकान आहे का? :ड

वेल्लाभट's picture

1 Dec 2016 - 2:03 pm | वेल्लाभट

बरं सांग कशी सोय आहे ते. दहा दुकानं आहेत मी जो कार्ड घेतो त्याकडे जाणार. नाही त्याकडे नाही. माझी सोय कुठे यात. मला फक्त पर्याय आहे. बास.

क्रेडिट कार्ड घेतल्यावर बँक अ‍ॅन्युअल चार्जेस, रिन्युअल चार्जेस लावते ना? 'ते' ग्राहकाच्या सोयीचे पैसे आहेत.
दुकानदाराचे २% हे 'त्याच्या' सोयीचे पैसे. ते त्याने बघायचं.

ती 'दुकानदाराने' घेतलेली सोय आहे. 'ग्राहकाने' नाही.
सहमत !
याबद्दल बँकांनीच चार्ज लावायला नाही पाहिजे. सरकार इकडे लक्ष देईल काय ?

वेल्लाभट's picture

1 Dec 2016 - 2:00 pm | वेल्लाभट

आणि चायला या न्यायाने दुकानदाराने एसी लावला, मग त्याच्या वीजबिलातलाही भार प्रत्येक गिर्‍हाईकावर लावावा प्रॉब्लेम काय आहे? असं म्हणशील.

याविषयी घरी अनेकदा आमची चर्चा झालीय. माझे बाबा म्हणतात त्याप्रमाणे ते दोन टक्के हे सर्वार्थाने सेल्स प्रमोशन एक्स्पेन्डिचर आहे. पण आपल्याकडे वेगळीच लॉजिक्स असतात.

सुबोध खरे's picture

1 Dec 2016 - 7:57 pm | सुबोध खरे

वेल्लाभट - Thu, 01/12/2016 - 14:00
आणि चायला या न्यायाने दुकानदाराने एसी लावला, मग त्याच्या वीजबिलातलाही भार प्रत्येक गिर्‍हाईकावर लावावा प्रॉब्लेम काय आहे?
अर्थातच
वातानुकूलित केश कर्तनालयाचा दर हा नेहमी जास्तच असतो.
काळी पिवळी टॅक्सी आणि कूल कॅब यांच्या दरात फरक नसतो का?
वीज काय फुकट मिळते का? महाराष्ट्रात व्यावसायिकांना ११ रुपये प्रति युनिट ने विजेचे बिल भरावे लागते.
दुकान चकाचक असेल तर पैसे जास्त पडतात ना? हॉटेलात/रेस्टॉरंट मध्ये वातानुकूलित विभागाचे दर वेगळे असतातच.

वेल्लाभट's picture

1 Dec 2016 - 9:32 pm | वेल्लाभट

काय आहे माहिती आहे का खरे साहेब, तुम्ही उदाहरण आणि सरळ सरळ तुलना यात नेहमीच गल्लत करता. नंबर एक.
नंबर दोन; तुम्हालाही विषय कळला असेल असं मानतो मी, तरीही फुक्कट अ आहे तर ब का नाही असे निराधार प्रश्न विचारून काहीतरी साधायला बघत असाल तर मला उत्तर द्यायचं नाही.

तुमचं चालूदे.

सुबोध खरे's picture

2 Dec 2016 - 12:31 pm | सुबोध खरे

आपला मुद्दा खोडला गेला म्हणून अकांड तांडव का करता आहात?
उद्या (जेंव्हा माझ्याकडे २ आठवडयांनी कार्ड स्वाइपिंग मशीन येईल तेंव्हा) माझ्याकडे रुग्ण आला आणि क्रेडिट कार्डावर पैसे देतो म्हणाला तर मी त्याला स्पष्टपणे सांगणार कि वरचे २ % तू भरायचे. कार्ड हे तुझ्या सोयीसाठी आहे अन्यथा ए टी एम मधून पैसे काढून आण किंवा चेक दे. मी बिल देतोच त्यामुळे "तसाही" प्रश्न नाही.
ज्या रुग्णाला दुसऱ्या डॉक्टरकडे जायचे आले त्याने खुशाल जावे.
चितळे बंधूनी सांगितले बाकरवडी क्रेडिट कार्डावर हवी असेल तर २% भरा अन्यथा रोख पैसे द्या किंवा काका नाना हलवायाकडे जा.
संपला प्रश्न.

वेल्लाभट's picture

2 Dec 2016 - 12:52 pm | वेल्लाभट

मी त्याला स्पष्टपणे सांगणार कि वरचे २ % तू भरायचे

सोडा हो, तुमच्या समजेच्या पलिकडचं आहे हे. तुम्ही मागा २%, माझ्यासारखा एखादा करेल तक्रार मग ग्राहक मंचाशी करा जो काही युक्तिवाद करायचा तो. आता तुम्हाला आपण नियमापेक्षाही मोठे आहोत असं वाटत असेल तर हास्यास्पद आहे.

शब्दबम्बाळ's picture

2 Dec 2016 - 1:27 pm | शब्दबम्बाळ

एका बाजूला cashless व्यवहारांचे कौतुक करायचे आणि दुसरीकडे आपल्या सोयीने त्याच्या विरुद्ध आचरण करायचे याला काय म्हणावे?
RBI चे Notification आहे या २% च्या मुद्द्यावर, खाली लिंक आणि मुद्दे पण देतोय पहा!

4. Levying fees on debit card transactions by merchants - There are instances where merchant establishments levy fee as a percentage of the transaction value as charges on customers who are making payments for purchase of goods and services through debit cards. Such fee are not justifiable and are not permissible as per the bilateral agreement between the acquiring bank and the merchants and therefore calls for termination of the relationship of the bank with such establishments.

लिंक, इथे संपूर्ण माहिती मिळेल.

बर आता कोणी व्यापारी ऐकतच नसेल तर काय करायचे? त्याच्या विरुद्ध बँक कारवाई करू शकते.
What you should do, if Shopkeeper does not agree ?

RBI has clearly asked all the banks to break their relationship with those merchants who are practicing this. So, when any merchant asks you for extra 2% charges and even after the debate they do not agree, you can complain to the RBI about this and also complain to the bank. Each Bank has a “Merchant Services” section on their website and when you mail them or complain in personal to their branch, mention that you want to complain about Merchant Services

इथे ICICI बँकेची लिंक आहे ती वापरून तुम्ही त्याची तक्रार करू शकता.

माझे असे मत आहे कि एक धागा काढावा ज्यावर प्रत्येक बँकेच्या या विभागाची लिंक असेल. जर कोणी दुकानदार असे करत असेल तर लोकांना बरे पडेल शोधायला तक्रार कुठे करायची ते!

संदीप डांगे's picture

2 Dec 2016 - 2:03 pm | संदीप डांगे

नका हो असे कॅशलेस इंडियाचे बुरखे फाडू, तुम्हाला मोदींची शपथ!! =))

लिंक आणि माहितीसाठी धन्यवाद, शब्दबंबाळ.

वेल्लाभट's picture

2 Dec 2016 - 2:41 pm | वेल्लाभट

काही मंडळी आर बी आय पेक्षाही मोठी असतात हो शब्दबंबाळ शेट.

पण तुम्ही नेमकी माहिती, नेमके दुवे दिलेत त्याबद्दल तुमचं कौतुक. तुम्ही जरूर काढा एक धागा. सूज्ञ मिपाकरांना नक्कीच लाभ घेता येईल.

संदीप डांगे's picture

2 Dec 2016 - 2:44 pm | संदीप डांगे

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश ते, ते म्हणतील तेच सत्य, बाकी सर्व निखालस असत्य! नमोनमः...

गामा पैलवान's picture

2 Dec 2016 - 2:53 pm | गामा पैलवान

खरे डॉक्टर,

तुमचा मुद्दा समजला. मात्र तुम्ही पेढीकडून जे यंत्र आणणार आहात त्याच्या अटींनुसार (माझ्या मते) २% अधिभार लावण्यास मनाई आहे. पेढीने चौकशी केली तर तुम्हाला यंत्र परत करावे लागेल.

आ.न.,
गा.पै.

पुष्कर जोशी's picture

2 Dec 2016 - 8:43 am | पुष्कर जोशी

AC आणि non AC अशा मिश्र हाॅटेल मध्ये जाउन पहा ..
सगळे जण सर्व खर्च ग्राहकाकडूनच घेतात ..
काही जण सांगतात...
काही जण सांगत नाहीत..

जे सांगतात ते प्रामाणीक तरी आहेत ...
नाहीतर बाकीचे MRP वरून गुप्त पणे घेतात

शेवटी कोणताही व्यापारी आपला ठरलेला नफा सोडत नाही ...

(होतकरू व्यापारी)
पुष्कर जोशी

नेत्रेश's picture

1 Dec 2016 - 2:00 pm | नेत्रेश

काही काळाने ५% चार्ज घेउ लागले तर?
बँक / कार्ड चा चार्ज MRP मध्ये include असावा, वेगळा लावला जाउ नये.

वेल्लाभट's picture

1 Dec 2016 - 2:01 pm | वेल्लाभट

सॉरी. यू कॅनॉट रिकव्हर इट फ्रॉम द कस्टमर. इन नो वे.

अभिजित - १'s picture

1 Dec 2016 - 3:49 pm | अभिजित - १

घेणारच .. सुतार , प्लम्बर , कामवाली सगळे .. टॅक्स नेट मध्ये आले कि. सर्व्हिस टॅक्स मध्ये आले कि ... सुतार म्हणेल कॅश मी दिया तो इतना , पेटीम से दिया तो इतना .. जो mangata है वो दे दो .. तुम्ही मोदी प्रेमी असाल तर पेटीम करा. मी कॅश देणार ..
हा समजा मोदी ने सगळी कडचा करप्शन संपवला , निदान काही प्रामाणिक प्रयत्न जरी दाखवले तर मी पेटीम कारेन .. पण तसे काही होईल असे वाटत नाही. मोदी फक्त महसूल वाढवायच्या मागे आहे देशाचा .. जनता गेली तेल लावत ..

वेल्लाभट's picture

1 Dec 2016 - 4:02 pm | वेल्लाभट

करा मग. माझं काय जातं?

अभिजित - १'s picture

1 Dec 2016 - 4:37 pm | अभिजित - १

तुम्ही मोगली भक्त वाटते !! मग पेटीम करो .. हा हा हा !!!

वेल्लाभट's picture

1 Dec 2016 - 4:43 pm | वेल्लाभट

थँक्यू.

पुष्कर जोशी's picture

2 Dec 2016 - 8:45 am | पुष्कर जोशी

पेटीम बिलकुल मत करो ... ४०% अलीबाबा चीन ची गुंतवगूक ...

तुमचा मोबाईल/ल्याटपॉट्/ड्येस्कटॉप ज्यावरून तुम्ही हा प्रतिसाद टाईपला, तो कुठे बनलेला आहे, ते तपासून सांगता का?
तुम्ही जे युएसबी डोंगल/वायफाय राऊटर्/मोडेम वापरून मिसळपावशी जोडले गेलात, तो कुठे बनलेला आहे, ते तपासून सांगता का जरा?

(बाकीच्या गोष्टी नंतर, तुर्तास त्या गोष्टी पाहू ज्या वापरून हा प्रतिसाद दिला गेला.)

वेल्लाभट's picture

1 Dec 2016 - 2:07 pm | वेल्लाभट

http://timesofindia.indiatimes.com/business/india-business/No-surcharge-...

इकॉनॉमिक टाईम्स ची बातमी आहे. अर्थात तुम्हाला दुव्यांची अ‍ॅलर्जी नसेल तर.

स्वीट टॉकर's picture

1 Dec 2016 - 1:48 pm | स्वीट टॉकर

मस्त खुसखुशीत लेख आहे.

त्या दिव्याला आपल्यासारख्या टेक्नोसॅव्ही मंडळींच्या हाताची ओंजळी मिळाली तर ज्योत लवकर स्टेबल होऊन आपल्या सगळ्यांनाच प्रकाश मिळेल. + १

बाजीप्रभू's picture

7 Dec 2016 - 2:53 pm | बाजीप्रभू

धन्यवाद "स्वीट टॉकर"

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Dec 2016 - 1:50 pm | डॉ सुहास म्हात्रे

खुसखुशीत शैलीतला अनुभव आवडला !

चिकाटीने किल्ला लढवणे आवडले ! स्वच्छ व्यवहार करताना होणार्‍या थोड्या थोड्या त्रासाबद्दल कुरबूर करत त्याच स्वासात "सिस्टीम"ला दुषणे देण्याच्या स्टाईलच्या दिवसात तुमचे वागणे उठून दिसत आहे !

"नागरीक म्हणून तुम्ही देशाला काय देऊ शकता ?" या फार मोठ्या वाटणार्‍या प्रश्नाचे हे सरळ, साधे आणि सोपे उत्तर आहे !

अभिनंदन व धन्यवाद !

बाजीप्रभू's picture

7 Dec 2016 - 2:54 pm | बाजीप्रभू

धन्यवाद! डॉ साहेब.

मोदक's picture

1 Dec 2016 - 1:53 pm | मोदक

अभिनंदन..!!!

*** माझा अनुभव ***

आमच्या मावशींकडे सगळी कागदपत्रे होती पण बँक अकाऊंट नव्हते. घरातल्यांनी पाठपुरावा करून बँकेत जनधन योजनेचे अकाऊंट काढायला लावले आणि त्यांचा पगार तेथे जमा होवू लागला. मागच्या वर्षी त्यांनी खात्यात ५० हजार पेक्षा जास्ती रक्कम साठवली.

नंतर एकाला त्यांनी विश्वासाने ATM कार्ड देवून ५ हजार काढण्यास सांगितले तर त्या हिरो ने २५ हजार काढले.

मागच्या महिन्याअखेरीस त्यांनी खात्यातील शिल्लक पुन्हा ५० हजार च्या दरम्यान आणून ठेवली आहे.

..आणि हे सगळे बघून त्यांच्या इतर मैत्रीणी कागदपत्रे घेऊन घरी येतात आणि फॉर्म वगैरे भरून घेऊन जातात. त्यांचे पण नियमीतपणे पैसे साठत आहेत. :)

(हे सगळे यापूर्वी लिहिणार होतो मात्र येथील टवाळ सदस्यांना लगेच लाल डब्याचा साक्षात्कार होतो म्हणून टाळाटाळ केली.)

टवाळ कार्टा's picture

1 Dec 2016 - 1:59 pm | टवाळ कार्टा

हे असले लाल डबे हक्काने मिरव...बाकीच्या लाल डब्यांचे काय करायचे ते मिपाकर बघून घेतीलच :ड
बाकी त्या निमित्ताने तु स्वतःच लाल डबेवाला असल्याचे मान्य केले हे काय कमी आहे?
=))

तुझी इथली मते आणि इतर ठिकाणची मते यात इतके अंतर का असते..?? =))

टवाळ कार्टा's picture

1 Dec 2016 - 2:59 pm | टवाळ कार्टा

माझी मते तिच असतात...दोन्हीकडच्या तुझ्यातला बदल लक्शणीय आहे

आता काय... बाकीचे मिपाकरच आहेत. सूज्ञ आहेत. तुच एकटा काय तो सालस.

खुश..? :=))

टवाळ कार्टा's picture

1 Dec 2016 - 3:26 pm | टवाळ कार्टा

ते मत माझे एकट्याचे नाहीये इतके बोलून मी इथेच थांबतो :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Dec 2016 - 2:16 pm | डॉ सुहास म्हात्रे

काही जणांना तसा साक्षात्कार व्हायला लाल डबा सुद्धा जरूर नाही... ते लाल रंगाचा चष्मा घालून फिरत असतात :)

अश्या लोकांना जितकी त्यांची किंमत आहे तेवढीच द्यायची... ना कमी, ना जास्त.

मंजूताई's picture

1 Dec 2016 - 2:07 pm | मंजूताई

खुशखुशीत शैलीतला लेख आवडला व आपले प्रयत्न व चिकाटीही!
मी पण माझ्या उर्मिलाला सही करायले शिकवले व आयडीबायमध्ये खाते उघडून दिले होते...

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

1 Dec 2016 - 3:19 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

झकास ओ प्रभू!!

बायकोला शेंडी लावली. माझ्या पत्र व्यवहारामुळेच HDFC ने नवीन कोड ऍड केला असं सांगून पाठ थोपटवून घेतली. (असे प्रसंग दुर्मिळ असतात म्हणून चान्स मारून घेतला).

हम्म....

पिलीयन रायडर's picture

1 Dec 2016 - 8:31 pm | पिलीयन रायडर

मस्तच हो!!

आणि बायकोला अजिबात खरं वाटलं नसणार ते कोड अ‍ॅड केला बँकेने वगैरे टेपा! खरंच असं झालं तरी बायकांचा नवर्‍याच्या कर्तुत्वावर अजिबात विश्वास नसतो! =))

खटपट्या's picture

1 Dec 2016 - 10:38 pm | खटपट्या

कीती तो आत्मविश्वास... :)

पुष्कर जोशी's picture

2 Dec 2016 - 8:28 am | पुष्कर जोशी

बडोदा बॅंकेत पण असेच आहे ... fifth char is zero ...

ज्योति अळवणी's picture

9 Dec 2016 - 2:30 pm | ज्योति अळवणी

खूप छान. आम्ही demonetization नंतर आमच्याकडे काम करणाऱ्या बाईंचं अकाउंट उघडलं. पण 'देर से ही सही....' नाही का?