मराठी शब्द सुचवा

साहना's picture
साहना in काथ्याकूट
19 Oct 2016 - 6:54 am
गाभा: 

काही आधुनिक शब्दांना मराठी शब्द सुचवा.

ह्या शब्दांना/वाक्यांना खोल अर्थ आहे आणि थोडा विनोदी अर्थ सुद्धा आहे. तो सर्व भावार्थ मराठी शब्दांत सुद्धा यावा. Google एके काली "I am feeling luck" चे भाषांतर "आलीय भोगासी" असे करत होता त्या प्रमाणे. शब्दशः भाषांतर इथे अपेक्षित नाही.

इंग्रजी शब्दाचा भावार्थ समजावा म्हणून एक चित्र किंवा अर्थ सुद्धा दिले आहे. ह्याच प्रकारचे इतर इंग्रजी शब्द असतील तर त्यांचे मराठी शब्द देण्याचा आगावूपणा सुद्धा केला तरी चालेल.

१. YOLO : http://cdn.smosh.com/sites/default/files/bloguploads/yolo-meme-girl-fire...

२. Friend Zone : http://delightfullydysfunctional.com/wp-content/uploads/2016/02/snape-fr... किंवा आपले मराठी उदा : http://images1.tickld.com/live/13677.jpg

३. wikiot : An fool who believes all information found on Wikipedia is accurate and true.

४. Butt Dial : चुकून खिशांत,पर्स मध्ये ठेवलेला फोन लोक केलेला नसल्याने कुणाला तरी डायल करतो.

५. Flat Earther : ख्रिस्ती देशांत अनेक लोक असे आहेत ज्यांना अजून पृथ्वी फ्लॅट आहे असे वाटते. मिपा कर टणाटणी हा शब्द कदाचित ह्याच अर्थाने वापरात असावेत.

६. NSFK - Not Safe For Kids

७. NSFW - Not Safe For Work

८. TGIF

९. ASAP

१०. BBW : Big Beautiful Woman (आपण लठ्ठ आहोत हे सांगण्याचा PC शब्द)

११. Askhole : मूर्खपणाचे किंवा मुद्दाम हुन भांडण/वाद उरकून काढण्यासाठी निरर्थक प्रश्न विचारणारा माणूस.

१२. Baby bump : गरोदर महिलेच्या पोटाला संबोधण्यासाठी असलेला हा निवन इंग्रजी शब्द.

१३. Blamestorming : झालेला घोटाळा कुणावर ढकलावा हे ठरवण्यासाठी घातलेला वाद.

१४. Earjacking : दुसऱ्यांचे बोलणे चोरून ऐकणे.

१५. Pwned : पूर्णपणे अपमानित करून हरवणे !

१६. Swag

प्रतिक्रिया

माम्लेदारचा पन्खा's picture

19 Oct 2016 - 9:31 am | माम्लेदारचा पन्खा

Askhole : मूर्खपणाचे किंवा मुद्दाम हुन भांडण/वाद उरकून काढण्यासाठी निरर्थक प्रश्न विचारणारा माणूस....

बोका-ए-आझम's picture

19 Oct 2016 - 1:20 pm | बोका-ए-आझम

दारूच्या नशेत वाट्टेल ते बरळणारा/री. हा जेम्स जाॅईसच्या फिनेगन्स वेक मध्ये वापरलेला आहे (असं ऐकलंय).
DEJABREW - दारूच्या नशेत केलेल्या गोष्टी जशाच्या तशा शुद्धीत असताना आठवणे.
Gluttorious - Notorious as a glutton. अतिखादाड म्हणून कुप्रसिद्ध.

असंका's picture

19 Oct 2016 - 1:34 pm | असंका

Blamestorming: ढकलाढकली ...

अमु१२३'s picture

19 Oct 2016 - 2:51 pm | अमु१२३

Swag = तोरा ..
ASAP (As soon as possible)= त्वरीत ..

mayu4u's picture

19 Oct 2016 - 8:52 pm | mayu4u

पढतमूर्ख

कल्हईवाले पेंडसे's picture

19 Oct 2016 - 10:36 pm | कल्हईवाले पेंडसे

Butt-dial - पार्श्वध्वनि
Man boobs - पुरोज

mayu4u's picture

2 Dec 2016 - 5:51 pm | mayu4u

पार्श्वध्वनि! :द

पुरोज! :DD

प्रभाकर पेठकर's picture

20 Oct 2016 - 2:12 am | प्रभाकर पेठकर

३. आंतरजालीय भोळाभाबडा.
५. पृथ्वी सपाट वृत्ती.
६. मुलांसाठी असुरक्षित.
७. कामासाठी असुरक्षित.
८. व्वा! सप्ताहांत.
९. शक्यतितक्या लवकर.
१०. सुडौल बांधा.
११. चोमडा.
१२. गर्भार पोट.
१३. दोषारोपण चर्चा.
१५. मानखंडन.
१६. झुल.

अनिल रामचंद्र's picture

21 Oct 2016 - 3:18 am | अनिल रामचंद्र

३. wikiot : An fool who believes all information found on Wikipedia is accurate and true.

= विमुर्ख , वियझ, विफुल

४. Butt Dial : चुकून खिशांत,पर्स मध्ये ठेवलेला फोन लोक केलेला नसल्याने कुणाला तरी डायल करतो.

= शरीर किंवा शरीरावरील कोणत्या तरी वस्तु मुळे ( पर्स, बँग इ.) आवश्यकता नसताना लागलेला काँल = शकाँल = शाकाल

५. Flat Earther : ख्रिस्ती देशांत अनेक लोक असे आहेत ज्यांना अजून पृथ्वी फ्लॅट आहे .
= सपाटगण

NSFK - Not Safe For Kids

= बासासुना ( बालकां साठी सुरक्षित नाही)

७. NSFW - Not Safe For Work

= कासासुना

८. TGIF

९. ASAP

= शतिल ( शक्य तितक्या लवकर )

१०. BBW : Big Beautiful Woman (आपण लठ्ठ आहोत हे सांगण्याचा PC शब्द)

= लठ्ठ सुंदरीण = लसुण

११. Askhole : मूर्खपणाचे किंवा मुद्दाम हुनभांडण/वाद उरकून काढण्यासाठी निरर्थक प्रश्न विचारणारा माणूस.
= प्रश्नाकर

१२. Baby bump : गरोदर महिलेच्या पोटाला संबोधण्यासाठी असलेला हा निवन इंग्रजी शब्द.

= गोलगप्पा च्या धर्तीवर बाळगप्पा?

१३. Blamestorming : झालेला घोटाळा कुणावर ढकलावा हे ठरवण्यासाठी घातलेला वाद.

= हु?( who?)तु(you!)तु(you!)वाद! = हुतुतूवाद!!!

१४. Earjacking : दुसऱ्यांचे बोलणे चोरून ऐकणे.

= कर्णप्राशन

१५. Pwned : पूर्णपणे अपमानित करून हरवणे !

= पाकिस्तान करणे

गामा पैलवान's picture

4 Dec 2016 - 10:12 pm | गामा पैलवान

साहना,

माझा प्रयत्न :

२. Friend Zone : http://delightfullydysfunctional.com/wp-content/uploads/2016/02/snape-fr... किंवा आपले मराठी उदा : http://images1.tickld.com/live/13677.jpg

मैत्रीमौर्ख्य (नाम)
मैत्रीमूर्ख (विशेषण)

३. wikiot : An fool who believes all information found on Wikipedia is accurate and true.

विकीपादांध

४. Butt Dial : चुकून खिशांत,पर्स मध्ये ठेवलेला फोन लोक केलेला नसल्याने कुणाला तरी डायल करतो.

बुडारोळी = बूड + आरोळी

५. Flat Earther : ख्रिस्ती देशांत अनेक लोक असे आहेत ज्यांना अजून पृथ्वी फ्लॅट आहे असे वाटते. मिपा कर टणाटणी हा शब्द कदाचित ह्याच अर्थाने वापरात असावेत.

सपाटमहीय वा सपाटमहीमहोदय

६. NSFK - Not Safe For Kids

बालसुरक्षाविरहित

७. NSFW - Not Safe For Work

कार्यसुरक्षाविरहित

८. TGIF

अग्रेसरांगुष्ठ = Toes Go In First

९. ASAP

सत्वर = त्वरित = विनाविलंब

१०. BBW : Big Beautiful Woman (आपण लठ्ठ आहोत हे सांगण्याचा PC शब्द)

लठ्ठसुंदरी

११. Askhole : मूर्खपणाचे किंवा मुद्दाम हुन भांडण/वाद उरकून काढण्यासाठी निरर्थक प्रश्न विचारणारा माणूस.

पृच्छापुच्छ

१२. Baby bump : गरोदर महिलेच्या पोटाला संबोधण्यासाठी असलेला हा निवन इंग्रजी शब्द.

गरोदाराकृती (गरोदर + आकृती)

१३. Blamestorming : झालेला घोटाळा कुणावर ढकलावा हे ठरवण्यासाठी घातलेला वाद.

कोण म्हणतो टक्का दिला!

१४. Earjacking : दुसऱ्यांचे बोलणे चोरून ऐकणे.

कर्णचौर्य

१५. Pwned : पूर्णपणे अपमानित करून हरवणे !

धुव्वापमान

आ.न.,
-गा.पै.