“मेरे प्रिय आत्मन् . . ."

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
17 Oct 2016 - 2:37 pm

नुकतीच इथे ओशोंवर झालेली चर्चा वाचली. अनेकांनी मांडलेले विचार बघितले. छान वाटलं. त्यातून थोडी भर घालावीशी वाटली व म्हणून इथे लिहितोय. . .

ओशो. . . .

जुलै २०१२ च्या शेवटी ओशो आयुष्यात आले. . योगायोगाने पहिल्याच प्रवचनांमध्ये ध्यान सूत्र ही प्रवचन मालिका मिळाली. तिथून नंतर मग 'एस धम्मो सनंतनो', 'संभोग से समाधी तक', 'ताओ उपनिषद', 'अष्टावक्र महागीता', 'मै कहता आखं देखी' आणि इतर अनेक प्रवचन मालिका ऐकल्या. . . अजूनही रोज प्रवचन ऐकतोय. त्यातून इतकं काही मिळत गेलं आणि मिळतं आहे की, जुलै २०१२ पासून एक नवीनच जीवन सुरू झाल्यासारखं वाटतं. . . . आयुष्याची दोन भागांमध्ये विभागणी करावी- जुलै २०१२ पूर्वी आणि जुलै २०१२ नंतर असं. . .

तेव्हा भेट होण्यापूर्वी अनेक वेळेस त्यांच्याबद्दल तुटक तुटक ऐकलं होतं. वाचलं होतं. पण म्हणतात ना योग्य वेळ आल्याशिवाय काहीही होत नाही. त्यामुळे पूर्वी अनेक निमित्ताने त्यांचं नाव कानी पडूनही परिचय झाला नव्हता. पण त्यानंतर मात्र परिचय झाला; ओळख झाली; एक नवी मिती जीवनात आली. . .

उस ज़िन्दगी से कैसे गिला करे जिस ज़िन्दगी ने मिलवा दिया आपसे. .

ओशो कसे होते, त्यांनी नक्की काय केलं, ते खरोखर महान होते का, ह्यामध्ये मी तर्क करू इच्छित नाही. मी जवळच्या लोकांना इतकंच सांगतो की, ओशो ऐका, वाचा, अनुभवा! थोडी चव घेऊन बघा! आणि मग ठरवा काय ते!

गेल्या चार वर्षांमध्ये इतकं काही भरभरून मिळालं की सांगायची सोय नाही. आणि ते जे सांगतात ते किती जीवनाशी निगडीत आहे, हे पदोपदी कळत गेलं. ते जे म्हणतात; ते जे सांगतात; त्याची प्रचिती बाहेर कोणत्या शास्त्रात नाही, तर आपल्याच जीवनाच्या अनुभवामध्ये मिळते, हे अनुभवलं. . .

नंतर हळु हळु असंख्य प्रेम गीतांचा अर्थच बदलला. प्रियकर- प्रेयसीसाठी असलेली अशी काही गाणी बरोबर गुरू- शिष्य नात्यासाठी लागू पडली. जणू गुरू शिष्याला अनेक जन्मांपासून साद घालत आहेत-

जाईए आप कहाँ जाएंगे
ये नज़र लौट के आएगी
दूर तक आपके पीछे पीछे
मेरी आवाज चली जाएगी

किंवा हेसुद्धा

तेरा मुझसे है पहले का नाता कोई
युंही नही दिल लुभाता कोई
जाने तू या जाने ना माने तू या माने ना

ओशोंचे विचार सांगणं अतिशय अवघड आहे. कारण ते फक्त विचार नाहीत; त्यामध्ये 'निर्विचारता' सुद्धा आहे. त्यांची एक आठवण सांगावीशी वाटते. ते सुरुवातीच्या काळात त्यांच्या प्रवचनाची सुरुवात "मेरे प्रिय आत्मन्" ने करत आणि प्रवचन संपताना म्हणत "आपके भीतर बैठे परमात्मा को प्रणाम करता हूँ, मेरा प्रणाम स्वीकार करें.” लोकांनी स्वत:मधली भगवत्ता ओळखावी असं त्यांना अपेक्षित होतं. आणि १९७३ नंतर त्यांनी स्वत:ला भगवान असं म्हणण्यास सुरुवात केली होती. त्याचाही हेतु हाच होता की, सगळे जणच भगवानस्वरूप आहेत, फक्त ते मान्य करण्यासाठी हिंमत हवी. मी स्वत:ला भगवान म्हणतो आणि तुम्हांलाही स्वत:मधला ईश्वर बघण्यासाठी प्रेरित करतो, असं ते म्हणतात. त्यावेळी त्यांना शेकडो पत्र आली की तुम्ही कसले स्वयंघोषित भगवान, स्वत:ला भगवान कसे काय म्हणता इ. इ. त्यावर ओशोंनी म्हंटलं, 'जेव्हा मी तुम्हांला प्रणाम करायचो, तुमच्यातल्या ईश्वराचा उल्लेख करायचो, तेव्हा मला एकानेही 'का' असं विचारलं नाही. कारण ते तुमच्या अहंकाराला अनुकूल होतं. पण जेव्हा मी स्वत:चा उल्लेख भगवान असा केला, तेव्हाच मग मला तुम्ही का विचारलं? तेव्हा एकानेही प्रश्न केला नाही आणि आता इतके जण विचारत आहेत.' त्यांनी नंतर म्हंटलं आहे की, भगवान नसण्याचा पर्यायच नाहीय. जे काही आहे, ते सर्व भगवानस्वरूपच आहे. फक्त ते उघड्या डोळ्यांनी बघणं किंवा न बघणं, इतकाच फरक आहे.

ओशोंना ऐकताना इतकं काही मिळत गेलं की अक्षरश: जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलला. जीवनामध्ये आपल्याला न आवडणारे; नकोसे असे असंख्य पैलू असतात. ते स्वीकारण्याची दृष्टी हळु हळु आली. जीवनातले ताण- तणाव झपाट्याने हद्दपार होत आहेत. . .

ओशोंच्या प्रवचनामध्ये काही शिष्यांनी प्रश्न विचारताना अशी गाणीच विचारली आहेत-

कुछ दिल ने कहा, कुछ भी नहीं
कुछ दिल ने सुना, कुछ भी नहीं
ऐसी भी बातें होती हैं

त्यावर ओशो म्हणतात की खरा संवाद असाच मौनातून होत असतो. शब्द तर फक्त माध्यम असतात.

एकाने प्रश्न म्हणून हे गाणंच विचारलं-

कोरा कागज़ था मन मेरा
लिख दिया नाम इसपे तेरा. . .
सुना आँगन था जीवन मेरा. . .
बस गया प्यार जिसपे तेरा. . .

आणि

तुम अबसे पहले सितारों में बस रहे थे कहीं
तुम्हे बुलाया गया है जमीं पर मेरे लिए. . .

त्यावर ओशो म्हणतात की, मी तुमच्यासारखाच आहे. पण माझ्यामध्ये असं काही आहे जे ता-यांमधलं आहे आणि ते तुमच्यामध्येसुद्धा येऊ शकतं.

ओशोंनी जी मांडणी केलेली आहे, ती अतिशय जोरदार आहे; युनिक आहे. फक्त वेगवेगळे धर्मपंथ आणि साधना मार्गच नाही; तर त्यांनी प्रचलित समाज; प्रोजेक्टेड ट्रूथ; देश-काळ ह्याविषयी जे काही भाष्य केलं आहे; ते अ ति श य अ फा ट आहे. . . ते इथे सांगण्यापेक्षा इच्छुकांनी मुळातूनच वाचावं (त्यावर थोडी अजून माहिती देणारा माझा ब्लॉग).

ओशोंनी एका ठिकाणी म्हंटलं आहे की, मला तुम्ही गुरूही मानू नका आणि मित्रही मानू नका. तुम्ही रस्त्यावर जाताना तुम्हांला भेटणारा एक अनोळखी वाटाड्या समजा. मित्र जरी मानलं तरी माझ्याप्रती आसक्त व्हाल. मला एक अनोळखी वाटाड्या मानून माझ्यामध्ये अडकून न पडता तुम्ही मी दाखवतोय त्या मार्गाने फक्त जा. . .

सांगण्यासारखं खूप काही आहे. तो भाव व्यक्त करणारी ही काही गाणी. गुरू- शिष्य; अध्यात्माचा सार ह्याचा अर्थ व्यक्त करणारी ही काही गाणी. अशा काही गाण्यांमध्ये आणि विशेषत: ६०- ७० च्या दशकातील काही गाण्यांमध्ये त्या काळात प्रवचन देणा-या ओशोंची उपस्थिती स्पष्ट स्पष्ट जाणवते . . .

यहीं वो जगह है. . . यही वो फिज़ाएँ हैं. . .
यहीं पर कभी आप हमसे मिले थे. . .
इन्हे हम भला किस तरह भूल जाएं . .
यहीं पर कभी आप हमसे मिले थे. . .

खामोश है ज़माना, चुपचाप हैं सितारें
आराम से है दुनिया, बेक़ल हैं दिल के मारे
ऐसे में कोई आहट, इस तरह आ रही है
जैसे की चल रहा हो, मन में कोई हमारे
या दिल धड़क रहा है, एक आस के सहारे. . .
आएगा, आएगा, आएगा. . आएगा आनेवाला

तुम पुकार लो. . .
तुम्हांरा इन्तज़ार है. . .

अगदी ह्या गाण्यांमधूनही असाच अर्थ जाणवतो; अनुभवाला येतो.

अजनबी मुझको इतना बता दे
दिल मेरा क्यों परेशान है
देख के तुझको ऐसा लगे
जैसे बरसों की पहचान है . . .

मन अपने को कुछ ऐसे हल्का पाए
जैसे कन्धों पे रखा बोझ हट जाए
जैसे भोला सा बचपन फिरसे आये
जैसे बरसों में कोई गंगा नहाए. . .

धुल सा गया है ये मन
खुलसा गया हर बंधन
जीवन अब लगता है पावन मुझको. . .

जीवन में प्रीत है, होठों पे गीत है
बस ये ही जीत है सुन ले राही

तू जिस दिशा भी जा, तू प्यार ही लूटा
तू दीप ही जला, सुन ले राही. . .

यूं ही चला चल राही यूं ही चला चल
कौन ये मुझको पुकारे
नदियां पहाड़ झील और झरने, जंगल और वादी
इनमें है किसके इशारे . . .

. . .ज्यांना अधिक खोलात जायचं असेल, त्यांना ओशोंना समजून घेण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे त्यांच्या प्रवचनांमधून सांगितल्या गेलेल्या आठवणींचं संकलन करून बनवलेलं त्यांचं चरित्र. हे १३०५ पानांच पीडीएफ पुस्तक इथे उपलब्ध आहे. ज्यांना रस असेल त्यांनी ते डाउनलोड करून सुरुवातीचे किमान १०० पानं वाचावेत ही विनंती. ओशोंविषयी खूप लोकांनी काही म्हंटलेलं आहे. पण माझा अनुभव आहे की, ओशोंविषयी इतर काय म्हणत आहेत हे बाजूला ठेवून ओशो स्वत: काय म्हणत आहेत, हे ऐकायला सुरुवात केली की हळु हळु शंका उरतच नाहीत. . . तेव्हा ज्यांना काही आक्षेप असतील किंवा ज्यांना प्रश्न असतील; त्यांनी किमान ह्या पुस्तकाचे पहिले १०० पानं वाचून मग आपलं मत द्यावं ही विनंती. फक्त २ तासांचं काम आहे. त्यातही पहिले १५ पानं अनुक्रमणिका आहे; म्हणजे फक्त ८५ पानं. पीडीएफ डाउनलोड करून मोबाईलमध्ये वाचता येईल आरामात. धन्यवाद! :)

शेवट एका गाण्यानेच करू इच्छितो-

उसके सिवा कोई याद नही. . . उसके सिवा कोई बात नही. . .
उन ज़ुल्फों की छाँव में. . . . उन कातिल अदाओं में,
इन गहरी निगाहों में. .
हुआ हुआ मै मस्त. . .

वो दौड़े है रग रग में, वो दौड़े है नस नस में
अब कुछ न रहा मेरे बस में हुआ हुआ मै मस्त. . .

संगीतधर्मजीवनमानकृष्णमुर्तीविचारआस्वादलेखअनुभव

प्रतिक्रिया

सानझरी's picture

17 Oct 2016 - 2:46 pm | सानझरी

सुंदर लेख.. ओशोंच्या अनेक पुस्तकांपैकी Come, Come, Yet Again Come आणि the Rebel ही माझी सगळ्यात आवडती पुस्तके..

सानझरी's picture

17 Oct 2016 - 2:58 pm | सानझरी

सॉरी, the rebellious spirit म्हणायचं होतं..

ओशो तुम्हाला गिल्टी न होउ देता समजावतात. तुमच्या चुकांना समजून घ्या, त्यांचा अभ्यास करा आणी मग त्या दुरूस्त करण्याचा प्रयत्न करा हा संदेश मला आवडतो. 'आदतें छोडी जा सकती है, क्योंकी वो आदतें है, स्वभाव नही. कोशीश करे की वे स्वभाव ना बने.' हे वचन जो धीर देते तो हजारो पुस्तकांतून देखील नाही मिळू शकणार. ओशो धर्म शिकवत नाहीत, अध्यात्म समजावून सांगतात ते देखील हळूवारपणे, चला घ्या हे ज्ञानामृत, ढोसा पटपट, असली घाई नसहे, हे सर्वात महत्वाचे. तुमचा परिचय आवडला.

जयन्त बा शिम्पि's picture

17 Oct 2016 - 6:35 pm | जयन्त बा शिम्पि

छान लेख. आवडला. मी कालच मागच्या लिखाणावर लिहिले होते की ओशोंची " गीता-प्रवचने " जरी वाचली तरी असा विचार कोणीही या पूर्वी मांडला नव्हता हे समजते. ज्या प्रमाणे जे.कृष्णमुर्ती यांनी सांगितले की माझे साहित्य तुम्ही फक्त वाचत रहा, दुसर्‍यांना समजावून सांगण्याच्या भानगडीत पडू नका, कारण ते तुम्हाला जमणार नाही, तसेच ओशो वाचतांना सर्व समजत जाते, मनाला पटत जाते, पुस्तक संपल्यावर कोणी विचारले की काय वाचले , तर त्यावेळी सांगता येत नाही. लिखाण मनमोहक तर आहेच, वाचतांना आनंद होतोच, पण ओशोंना ' हिंदी ' भाषेत ऐकण्याचा आनंद काही वेगळाच असतो.

मार्गी's picture

18 Oct 2016 - 10:25 am | मार्गी

वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद!

@सानझरी जी, पुस्तकांचा उल्लेख केल्याबद्दल धन्यवाद. ही पुस्तकंही वाचणं होईल.

मुक्त विहारि's picture

25 Apr 2021 - 6:05 am | मुक्त विहारि

कुठल्याही समाजांत, व्यक्तीपुजेला स्थान देऊ नये....

व्यक्तीपुजा करणारा समाज, कळतनकळत घराणेशाहीची विषवृल्लीच तयार करत असतो...

बाबा महाराज होणे, हा सर्वोत्तम धंदा आहे .... आणि ह्यासाठी लागणारे भांडवल पण स्वस्त आहे, मिठ्ठास वाणी, हजरजबाबीपणा, आपल्या शरीरयष्टीला अनुसरून केलेला पेहराव आणि भक्तगण...

ह्या जगांत खरे बाबा महाराज फारच कमी झाले ...

गाडगेबाबा आणि तुकडोजी ....

गाडगेबाबांच्या कार्याला लोकाश्रय मिळायला लागला आणि पैशांचा ओघ सूरू झाला, पण त्या पैशांपैकी एकही पैसा गाडगेबाबांनी स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तींना दिला नाही आणि स्वतःही वापरला नाही ...

जवळ जवळ अशीच गोष्ट, तुकडोजी महाराज यांच्या बाबतीत....

हिंदू धर्मात आधीपण व्यक्तीपुजा होती, पण सध्या मात्र हे प्रमाण वाढत आहे ....

ओशो असो किंवा राम रहिम किंवा आसाराम किंवा सत्य साईबाबा, स्वतःची संपत्ती वाढवण्याशिवाय यांनी दुसरे काहीही काम केलेले नाही ...

हिंदू धर्म जोपर्यंत गुणांची पुजा करत नाही आणि व्यक्तीपुजा करणे बंद करत नाही, तोपर्य॔त हिंदू लुबाडले जाणारच...

गॉडजिला's picture

25 Apr 2021 - 9:33 am | गॉडजिला

ओशो नेमके काय (म्हणतात) हे तुम्हास निटसे माहीत नाही, माहीत आसल्यास इथे सांगावेसे वाटत नाही.

मुक्त विहारि's picture

25 Apr 2021 - 1:52 pm | मुक्त विहारि

गाडगेबाबा

गॉडजिला's picture

25 Apr 2021 - 1:59 pm | गॉडजिला

तसेही वाटत नाही... गाडगेबाबांची शिकवण व आपण स्वतःच स्वतःबद्द्ल इथेलिहलेले काही विवेचन विरोधाभासी आहे

मुक्त विहारि's picture

25 Apr 2021 - 2:18 pm | मुक्त विहारि

मी काही तसा दावा पण केलेला नाही ...

गाडगेबाबा यांची मते पटतात आणि ते आदर्श नक्कीच आहेत ...

काही आचरणांत आणता येतात, तर काही नाही ....

गॉडजिला's picture

25 Apr 2021 - 2:20 pm | गॉडजिला

बाबांच्या धाग्यावर त्यानुशंगाने आपले बहुमोल विचार मी नक्किच मनापासुन वाचेन.

धन्यवाद.

मुक्त विहारि's picture

25 Apr 2021 - 2:23 pm | मुक्त विहारि

तोपर्य॔त आम्ही सध्या, बाबा महाराज डोंबोलीकर, यांचीच मते ऐकतो ...

पण कुठे गाडगे बाबा अन कुठे तुमचे महाराज डोंबोलीकर.... छ्या.

मुक्त विहारि's picture

25 Apr 2021 - 2:46 pm | मुक्त विहारि

आम्ही पण तेच म्हणतो ....

आग्या१९९०'s picture

25 Apr 2021 - 11:04 am | आग्या१९९०

गाडगेबाबा कर्मकांडाच्या विरोधात होते इतके जरी समजले आणि आचरणात आणले तरी खूप आहे.

गॉडजिला's picture

25 Apr 2021 - 1:53 pm | गॉडजिला

ओशोनीही आयुश्यभर कर्मकांडावर कमालिचे आसुड ओढ्ले... असे आसुड आजतागायत कोणी संत करु धजला नाहिये

मूकवाचक's picture

25 Apr 2021 - 4:23 pm | मूकवाचक

ओशोंनी कित्येक कर्मकांडांना प्रोत्साहन दिलेले आहे, किंवा त्यांचे स्वरूप थोडेसे बदलले आहे. वानगीदाखल सांगायचे तर विवक्षित ठिकाणी मरून रंगाचाच झगा परिधान करण्याची सक्ती, भ्रातृभाव जागृत करणारा मेळावा असेल तेव्हा सफेद रंगाचाच झगा परिधान करणे (व्हाईट रोब ब्रदरहूड). फरक कुठे असेल तर सोवळे का नेसायचे यावर वितंडवाद घालणारे 'सुलझे हुए' विचार असलेले लोक पांढरा झगा घातल्याने भ्रातृभाव कसा वाढतो, किंवा अमुक ठिकाणी मरून रंगाचाच झगा का घालावा अशा संभ्रमात पडत नाहीत.

त्यांचा फोटो असलेली माळ वागवणे, दीक्षा विधी, स्वामी अमुक किंवा मा तमुक असे नामाभिधान धारण करणे, इतकेच काय तर प्रवचन देण्यासाठी त्यांचे होणारे आगमनात देखील कित्येक कर्मकांडांनी भरलेले होते. त्यांनी करवून घेतलेले कित्येक ध्यान विधी कर्मकांडांनी भरलेलेच आहेत. ते पारंपारिक विधींपेक्षा थोडेसे फॅशनेबल केलेले आहेत इतकेच. असो.

गॉडजिला's picture

25 Apr 2021 - 9:13 pm | गॉडजिला

ओशोंनी स्वतः हे प्रकार म्हणजे एक गंम्मत असेच म्हटले आहे...

मी जे करतोय ते एक प्रकारे कर्म़कांडच आहे पण त्याची तुलना तुम्ही काट्याने काटा काढण्याशी करु शकता. एकदा का आधिचा काटा काढुन झाला की तुम्ही दुसरा काटा त्याजागी खुपसुन ठेवत नाहीत तसेच माझ्या मार्गदर्शनाचे आहे. तुम्ही त्याला पकडुन बसु शकत नाही.

असो, मला वैयक्तीक पातळीवर ओशो कितीही रेबलस वाटला तरी समग्र मार्गदर्शक म्हणुन तो कधीच पटला नाही. त्याच्या शिकवणीतुन काय नाही केले पाहिजे हे भलेही उत्तम समजुन येते परंतु काय केले पाहीजे याचा नेमकेपणा ओशो देत नाही.

कॉमी's picture

25 Apr 2021 - 9:36 pm | कॉमी

उत्तम विचार आहे...

राजेंद्र मेहेंदळे's picture

25 Apr 2021 - 12:31 pm | राजेंद्र मेहेंदळे

मला वैयक्तिक रित्या कुठल्याही बाबा, बुवा महाराजांच्या नादी लागणे आवडत नाही. पण ज्या माणसामागे हजारो लोक जातात त्याच्यात काहीतरी सब्स्टंन्स असला पाहीजे.
ओशोंना मी प्रत्यक्ष पाहीले नाही. पण त्यांची एक दोन पुस्तके वाचली आहेत. ते मुळात मानसशास्त्राचे प्रोफेसर होते असे ऐकुन आहे. त्यामुळे असेल किवा त्यांना आलेल्या अनुभवांमुळे असेल, पुस्तकातील भाषा थेट मनाचा ठाव घेते. जर पुस्तके वाचुन एव्हढा परीणाम होत असेल तर त्यांच्या सहवासात राहुन नकीच माणुस भारावुन जात असणार.
आणि तसेही माणुस जन्मजात आळशी असल्याने त्याला प्रत्येक गोष्ट कॅप्सुलप्रमाणे आयती हवी असते, घेतली गोळी की झाले काम. स्वतः वाचन, मनन, साधनाचे कष्ट करायला नको. त्यामुळेही अशा लोकांनाही ओशो किवा तत्सम बाबा,बुवा,बापु हवेच असतात एक युफोरिया( स्वप्नवत सुखद) स्थिती निर्माण करण्यासाठी. असा हा परस्पर पूरक मामला आहे असे माझे स्पष्ट मत आहे.

मुक्त विहारि's picture

25 Apr 2021 - 1:53 pm | मुक्त विहारि

रासपुटिन

गॉडजिला's picture

25 Apr 2021 - 2:08 pm | गॉडजिला

युफोरिया( स्वप्नवत सुखद) स्थिती निर्माण करण्यासाठी लहानपणी सवंगडी गोळा करुन आम्ही गोल गोल राणी खेळायचो...

राजेंद्र मेहेंदळे's picture

26 Apr 2021 - 12:11 pm | राजेंद्र मेहेंदळे

ही युक्ती तर फारच छान, कोणाला त्रास नाही, भांडवल नको, पैसा,वस्तू काहीच नको. फक्त सवंगडी ,मोकळा वेळ आणि मोकळी जागा

मार्गी's picture

26 Apr 2021 - 12:49 pm | मार्गी

ओहह!!! धागा नव्याने वर आला आणि इतकी चर्चा!!

धागा वर आणल्याबद्दल मुविकाकांना खूप खूप धन्यवाद!

सगळ्यांच्या मतांचं स्वागत आहे आणि मतांचा आदर आहे. त्या त्या मुद्द्यांबद्दल मी इतकंच म्हणेन की आपल्या ऐकीव किंवा वाचीव माहितीपेक्षा किंवा दुस-या कोणाच्या मतापेक्षा आपला स्वतःचा जो फर्स्ट हँड अनुभव असतो, तो खरा महत्त्वाचा असतो. फॉरवर्ड ज्ञानापेक्षा अनुभवाचा एक कण आपल्याला जास्त स्पष्टता देतो.

बाकी मुक्त विहारी काकांच्या नावाचा अर्थ सुंदर आहे. एस धम्मो सनंतनो- धम्मपदावरच्या प्रवचनात ओशो मस्त सांगतात. त्यात धम्मपदामधल्या ओळींवर चर्चा आहे. अनेक जण विचारतात की बुद्ध नेहमी श्रावस्तीमध्ये विहार करत होते असा उल्लेख का येतो? त्यावर ओशोंचं उत्तर आहे की, बुद्धांच्या उपदेशापेक्षा त्यांचं असं विहार करणं जास्त महत्त्वाचं होतं. विहार म्हणजे सहज संचार. उद्दिष्ट न ठेवता सहजस्फूर्तीने फिरणं. विहारचा असा अर्थ त्यामध्ये आहे. आणि बुद्ध तिथे असा विहार करत असल्यामुळेच त्या भागाचं नावच विहार पडलं- म्हणजे आजचा बिहार, अशीही गंमत आहे! असो.

मुवि आहेतच रॉकिंग.
मला मिपावरील कोन्त्याही सदस्यापेक्शा जास्त जवळचे फक्त व फक्त मुवि काकाच वाटतात.
मित्र बनवावेत ते मुविकाकांनी.
मित्र बनावे ते मुविकाकांचे.
कट्याला बसावे ते मुविंसोबतच.
लिखाण सोडले तर मुविकाकांच्या ऊजव्यात कसलेही डावे भिंग लावुन तपासुनही सापडणार नाही इतकी ही व्यक्ती चोख सोने आहे.

बाकी मुक्त विहारी काकांच्या नावाचा अर्थ आपण सुरेख दिलात. बिहार ची अशी ऊकल प्रथमच कळाली.