वेळ ही निराळी (भाग - एक)

कऊ's picture
कऊ in जनातलं, मनातलं
15 Oct 2016 - 9:25 pm

"वेळ ही निराळी"

"यार हे readings बरोबर येतच नाही.
कँडी वोल्टमीटरकडे बघ ग जरा.
सर पण कुठे गायब झाले.
5.30 झाले ना यार"
सेजलची ही बडबड ऐकून डोक दुखायला लागलं.आधीच 10.40-2.40 lectures 2.45 ला लगेचच practical . ते संपणार 5.45 वाजता आणि तोपर्यंत ट्रेनला मरणाची गर्दी.
सिरीयसली ही सेजल prac partner नसती तर शांत पणे practical केल असतं.
एरवी कॉलेजमध्ये इलेक्ट्रॉनिक practical म्हटलं की आम्हाला जरा हायसं वाटायचं.
Readings घ्या , लिहा , सबमिट करा आणि घरी जा.
पुढच्या आठवड्यात गणपतीची सुट्टी
7 दिवस आराम.
पावसाळी वातावरण....बाहेर किती मस्त वाटतं..
कधी संपणार हे prac ..
मोबाईल पण बाहेर काढू शकत नाही lab मध्ये..
तोपर्यंत आले सर.. हुश्श..

"आज कोणाचही readings पूर्ण झाले नाहीत.सो उद्या तुमचे लेक्चर नसले तरी सकाळी 7 वाजता येऊन हे पूर्ण करायचं आहे."गावडे सरांच बोलणं संपल आणि सर्वांनी pack up केलं.आम्ही याला packup असचं बोलतो.
मी गेटच्या बाहेर निघताच मोबाईल पण काढला.फक्त मीच नाही तर almost अख्खा ग्रूपनेच आपपले मोबाईल बाहेर काढले.
कॉलेज पासून स्टेशन जायला दहा मिनिटे लागतात.
प्रत्येक जण मोबाईल मध्ये बिझी..
त्यात मी पण आली..

"शीट 13 मिसकॉल.."
माझा आवाज ऐकून माझ्या पुढे चालणार्या फ्रेंडस् नी मागे वळून बघितलं.

"या आवाजचं काय करु..
देवा.."हे मात्र मी मनात बोलली.

त्याचे 13 मिसकॉल.
जवळपास तीन महिन्यांनंतर माझी आठवण कशी आली.
ठिक आहे ना तो.
मनात विचारांच काहुर..
त्यात तो कॉल उचलत नव्हता..

शेवटी मोबाईल ठेवला आत.
केस जरा वर बांधले.
ओढणी दोन्ही बाजूने पुढे घेतली.
ही सर्व ट्रेन मध्ये चढण्या आधीची तयारी हा..

घरी पोहचायला 7.30 झाले.
फ्रेश होऊन आधी मोबाईल चार्जगींला लावला.
रात्री आँनलाईन होती.
कॉलेज ग्रुप वर मस्ती चालू होती..
अचानक त्याचा msg आला..

तो : Hi
मी : Hi..
तो : कॉल केले होते.
कॉलेज मध्ये होती का.
मी : hmm
तो : हमम करायची सवय सोड.
Actually...
I wanna meet u.
मी : उद्या 11.30 वाजता येते मग
तुझ्या studio मध्ये.
कॉलेज 11 ला सुटणार आहे.
तो : ओके
मी पिकअप करतो मग तुला.
बाय.
Tc
मी : k
By

हा तर नेहमी एक मित्र म्हणून सोबत होता..
आधी स्वतः भांडण करायचं
मग अस अचानक पुन्हा माझ्या लाइफ मध्ये यायच..
भेटून बोलुन सर्व clear करायला हवं..

"मम्मा अग उद्या सकाळी कॉलेजला तो निळा अनारकली घालू का?"
"Practical आहे ना तुझ़
अनारकली घालून जाणार आहे का
काय खास आहे उद्या..
केवलने कॉल केला होता घरी..
भेटुन भांडण संपव.
मनाने चांगला आहे ग तो."
शपथ..
मम्माने तर बाँब फोडला..
त्याने घरी कॉल केला..
ओ गॉड तो तर आमचा family frnd पण आहे..
कस विसरली मी..
लीव..
उद्या बघू काय ते..
कधी एकदा उद्याचा दिवस उजाडतो अस वाटतं होत..

"ओह हो कँडी..
आज काय स्पेशल..??"
सेजलचा हे वाक्य lab मध्ये घुमल्यासारखं वाटलं मला..

माझ्या चांगल्या नावाचं परिवर्तन कँडी मध्ये कधी झाले ते आठवत नाही.

Practical पूर्ण होईपर्यंत 11.15 झाले.
कॉलेजच्या बाहेर निघालेच तर समोर केवल त्याच्या गाडीच्या बाहेरच उभा होता.
जवळपास सर्व मुलींनी केवल ला नजर लावली होती.
हा फक्त मित्र आहे तर कॉलेजच्या मुली माझ्यावर एवढ्या जळत होत्या...
हा माझा bf असता तर..
कैचाकै विचार करते मी..
हा आणि माझा bf ..
मी माझ्याच तंद्रीत होती..
खयाली पुलाव बनवत होती..
"निघायचं ना ?"
केवलच्या आवाज ऐकून तंद्री उडाली..
आम्ही निघणारच तेवढ्यात मागून सेजलने आवाज दिला.
"कँडी कँडी वेट.."
2 पावलं चालून ती आली मग मला कँडी बोलून आवाज का दिला ग..
तिचा तो कँडी शब्द ऐकून केवलला काय वाटलं असेल..
"तुमचं सॉँग मी रोज ऐकते.
एक सेल्फी काढू का तुमच्या सोबत.."
सेजलच्या या प्रस्तावाला केवलने होकार दिला..
सेल्फी काढून झाला..
आणि आम्ही दोघे (मी आणि केवल)
गाडीत बसलो..
खूप क्युट दिसत होता केवल..
पण याला भेटायच्या गडबडीत मी नाश्ता केला नव्हता..
आणि मला एकतर भूक सहन होत नाही..
"एरवी बडबड करून माझं डोक खाते.
आज का शांत?"
आता याला कस सांगू की आता तुझं डोक खाऊन भूक मिटणार का??
शेवटी कसबस बोलली
"खूप महिन्यानंतर भेटला तू..
तुला भेटणार म्हणून एवढी एक्साईट होते की ब्रेकफास्ट केलाच नाही.."

"I know,तुझ्या मम्मीला फोन केलेला मी..त्यांनी सांगितल मला..
Don't worry लंच तयार आहे.
सर्व तुझ्याच आवडीच..
आपण माझ्या घरी जातोय.."
हा आणि माझी मम्मी एकमेकांना अपडेट का देत होते..
मी : "तु बनवलं?"
तो : "हो..का मी बनवलेलं खाणार नाही का?तुला सर्व जेवण गरम आवडत ना सो ते देईन मी..ओके "
मी : "तुझे fans आमच्या कॉलेजमध्ये पण आहेत.."
त्याच्या घरी पोहचेपर्यंत माझी बडबड सुरुच होती..
भूकेचं भान नव्हत मला..
त्याच्या सोबत बोलून माझ्या मनाला वेगळच वाटत होत..

केवलला माझ्यापेक्षा पण चांगली कुकींग येते हे माहित नव्हतं मला.
जेवुन झाल्यावर पुन्हा गप्पा मारायला सुरु करणार तेवढ्यातच कोणीतरी दरवाजा वाजवला.
केवलने दरवाजा उघडताच एक क्युट छोटी मुलगी आत आली.
मी आधी पण केवलच्या घरी आलेली आणि या मुलीला बघितलेलं सुध्दा..
पण नाव आठवत नव्हतं.
तस मला नाव आठवायची गरजच पडली नाही कारण केवलने तिला आवाज दिला..
"पियु काय ग आता आली दादा कडे.
शाळेतून कधीच घरी आलेली ना.."

"अरे दादु माझी ना मावशी आलेली.
हे बघ मला कँडी दिली.."
तिने कँडी हा शब्द बोलताच पुढे काय होणार याचा अंदाज आला मला.

"दादु तू खाणार का कँडी"
हातातली एक कँडी केवलला देत पियु बोलली.
केवल : "नको माझं पोट भरलयं ग,कऊ तु खाणार का?"
मी : मला पण नको..

"दादु तुला कँडी आवडत नाही का?"
फक्त दहा अकरा वर्षाच्या पिऊ ने विचारलेला प्रश्न ऐकून हसू की रडू समजत नव्हत.
पण केवल काय उत्तर देतोय याची उत्सुकता होती मला..
आणि केवलने दिलेलं उत्तर ऐकून मी हसत हसत तोंडावर हात ठेवला..

"अग पिऊ मला कँडी खूप आवडते"
केवल बोलत असताना हसत होता हे मी बघितलं.
केवल पिऊ सोबत बिझी झाला आणि तेवढ्यात मला पण कॉल आला अन् मी कॉल वर बिझी.
मी : हा.बोल अजु..

अजय : कऊ यार आहेस कुठे.
सकाळ पासुन ऑफलाईन.
एवढी बिझी??

मी : अरे बाबा सकाळी कॉलेज मध्ये
होती. आणि आता फ्रेंडच्या घरी
आहे.

अजय : 6 चा इवेंट आहे दादरला
तू 5.30 पर्यंत तरी दादरला
ये.

मी : तु मला ऑर्डर नको देऊ
हा..तुझी gf नाही मी..आणि
बँड मेंबर पण नाही

अजय : टाईम वर ये
बाय..आणि नीट ये
आरामात.सुमित, दिप,करण
सर्व येणार आहे.

एवढ बोलून कॉल कट केला त्याने.
मागून केवल आला..
"काय गं..कोणाचा कॉल?"

"अरे आहे एक फ्रेंड....अजय..ओळखतो ना त्याला..ते सोड.चल ना माझ्या सोबत.. प्लिज.."

"कुठे ते सांग.. येतो मी सोबत..
डोन्ट वरी.."

"दादरला..चल ना निघुया आताच..
पिऊ गेली घरी??
मी ठिक दिसतेय ना??
की घरी जाऊन चेंज करून मग जाउ??"

केवल : "अग हळू जरा..पिऊ गेली घरी.. आणि तु मस्त दिसतेयं..
थोड फ्रेश हो मग निघु.."
शिवाजी पार्कला पोहचताच पाच पांडव दिसले.
पाच पांडव म्हणजे अजय,दुष्यंत,सुयोग,विराज आणि स्वप्निल..
केवल पण या सर्वांना आधी पासून ओळखत असल्याने आणि आम्ही सर्व गप्पा मारत उभे होतो.
तेवढ्यात सुमित, दिप , करण आले.
इवेंट सुरू होण्यास वेळ होता.
सुमित, दिप , करण हे तिघं केवलला ओळखत नव्हते मग ओळख परेड सुरू झाली.

"केवल हा दिप ..हा सुमित आणि हा करण..तिघं पण लास्ट year ला आहेत.
अँड तिघं पण कलाकार आहेत..
N gyz हा केवल...."

करण : याला तर सर्व ओळखतात..
याच ते साँग तर रोज ऐकतो
आम्ही..

सुमित : उद्या रविवार आहे सो सर्व जण फ्री असणार..उद्या माझ्या घरी या..जरा मस्ती मजा करू..केवल आणि तुमच्या बँडची जुगलबंदी पण होऊन जाईल.. अँड हा परवापासून गणपतीची सुट्टी..आमच्या घरचे सर्व गावी गेले आहेत.. कोण कोण येणार??

दोन तीन दिवस चील करू असा विचार करून सर्वांनी होकार दिला..
सुयोग दादाची gf सलोनी आणि करणची gf ऐश्वर्या येत असल्याने मी पण तयार झाली.
इवेंट सुध्दा मस्त पार पडलं.
पुढच्या दिवशी सकाळी सुमितच्या घरी भेटायचं , येताना दोन दिवसांसाठी लागणारे कपडे घेऊन यायच हे सर्व नक्की झाले.
लगेच WhatsApp group पण तयार केला.

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

रातराणी's picture

15 Oct 2016 - 11:51 pm | रातराणी

छान , पुभाप्र.

मनिमौ's picture

16 Oct 2016 - 8:07 am | मनिमौ

लिहीलय. जरा प्रसंग खुलवा अजुन

हो..पुढच्या भागात खुलवेन..

कऊ's picture

16 Oct 2016 - 9:24 am | कऊ

धन्यवाद