अंधार्या रस्त्यावरची लिफ्ट

स्वीट टॉकर's picture
स्वीट टॉकर in जनातलं, मनातलं
12 Oct 2016 - 10:24 pm

मुंबईहून आम्ही नुकतेच पुण्याला स्थायिक झालो होतो. लोक काहीही म्हणोत, मला मात्र मुंबई आणि पुणं इथल्या लोकांच्या स्वभावात अजिबात तफावत वाटली नाही. पण त्याबद्दल नंतर कधीतरी बोलू.

दोन्हीकडच्या पावसांमध्ये मात्र दोन मोठे फरक आहेत. एक म्हणजे पावसाचं प्रमाण. मुंबईला प्रचंड पाऊस. संततधार लागायची. पुण्याचा पाऊस त्याच्या एक त्रितियांश. दुसरा फरक म्हणजे या पावसाचा विद्युतपुरवठ्यावर होणारा व्यस्त परिणाम. (मराठी भाषेत ‘व्यस्त’ म्हणजे inverse. हिंदी भाषेत ‘व्यस्त’ म्हणजे busy. पण मोबाइल टेलिफोन कंपन्यांच्या मराठी रेकॉर्डिंगमध्ये ‘व्यस्त’ हा शब्द चुकीच्या अर्थानी वापरलेला ऐकून ऐकून ऐकून ऐकून आता तो कोणालाच चुकीचा वाटत नाही. त्यातून बहुतेकांचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालेलं. असो.) मुंबईला इतका पाऊस असूनदेखील वर्षानुवर्ष वीज जायची नाही. पुण्याला मात्र सर आली की वीज गेली अशी अवस्था आमच्या भागात होती.

रात्री आठचा सुमार होता. नुकताच पाऊस पडून गेला होता. अर्थातच वीज नव्हती. मी आणि माझी अर्धांगिनी शुभदा गाडीनी चाललो होतो. हाउसिंग सोसायट्यांच्या जवळपास घरांमधल्या इन्व्हर्टर्समुळे रस्त्यावर अंधुक का होईना, प्रकाश पडतो तरी. आमचा भाग नवीन. त्यामुळे रस्ते देखील नवीन आणि रुंद, घरं नावालाच. रस्ता निर्मनुष्य. मिट्ट काळोख. फक्त आमच्या हेडलाइट्सचा उजेड.

रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या दोन मुलींनी लिफ्ट मागितली. मी गाडी थांबवेपर्यंत आम्ही वीस तीस मीटर पुढे गेलो होतो. माझं आणि शुभदाचं discussion. या मुलींना शूर म्हणायचं का मूर्ख? का या वेगळ्याच प्रकारच्या बायका आहेत. आणि त्यांना लिफ्ट देणं धोकादायक होईल?

गाडी नुकतीच विकत घेतली असल्या कारणानं चोरीला जायला खिशात पैसे उरेलेच नव्हते. लिफ्ट द्यायची आणि या फाजील आत्मविश्वास असलेल्या मुलींना चांगलं फैलावर घ्यायचं असं शुभदानी ठरवलं. रिव्हर्स गियर टाकला तोपर्यंत दोघीही गाडीपर्यंत येऊन पोहोचल्या देखील. छोटी चण असलेल्या कॉलेजकुमारी वाटल्या. त्यांची स्कूटर बंद पडली होती. दोघींना गाडीत घेतलं. त्यांना आमच्या घराच्या जवळच्या एका चष्म्याच्या दुकानात जायचं होतं.

एक मुलगी बडबडी होती. दुसरी शांत. मी मनातल्या मनात बडबडाबाईचं नाव ‘प्रफुल्ला’ ठेवलं. दुसरीचं ‘शांता’. प्रफुल्लानी दोघींची नावं सांगितली. बहिणी असाव्यात असं मला वाटलं.

“मुलींनो, तुम्हाला वाटत नाही की तुम्ही मोठा धोका पत्करलात?” शुभदानी उलटतपासणीला सुरुवात केली. मागच्या सीटवर शांतता.

“आम्हा दोघांऐवजी कोणी भलतेसलते असते म्हणजे?” तरी शांतता.

“काय गं? तुमच्या आईला कळलं की तुम्ही एकट अंधार्‍या रस्त्यावर अशी लिफ्ट घेतलीत तर तुमची आई काय म्हणेल?” शांतता कायम.

“ऐकू येतय् का मी काय म्हणतिये ते?” हे अगदी मृदु आवाजात.

मला या मृदु आवाजाचा फार कठोर अनुभव आहे. आवाज अचानक मृदु होणं ही स्फोटाची पूर्वसूचना असते. आमच्या गाडीत नेहमी हलक्या आवाजात संगीत चालू असतं. मी ते बंद केलं. (आता नाटक सुरू होणार असं वाटलं की मोबाईल बंद करावा.)

शांत मुलगी तोंडातल्या तोंडात काहीतरी बोलली.

“वा ! चारचारदा प्रश्न विचारल्यावर कंठ फुटला का आपल्याला? ज्ञानाचे चार मोती आमच्याकडे देखील भिरकवा की!” राग आल्यावर साधारण माणसाला शब्द पटापट सुचत नाहीत. हिचा म्हणजे झराच सुरू होतो.

“मीच तिची आई.” शांता म्हणाली.

“काऽऽऽय?” शुभदा.

मी क्षणभर गोंधळलो पण मला आश्चर्य वाटलं असं मी म्हणणार नाही. कारण मला तिचं बोलणं खोटंच वाटलं. खोटं वाटायचं कारण काय?

मी शाळेत असताना आमच्या वर्गातल्या एका टवाळ मुलानी “तुझ्या पालकांना घेऊन ये” असं बाईंनी सांगितल्यामुळे आपल्याच गल्लीतल्या एका दारुड्या अंकलला आणलं होतं. व्यवस्थित प्लॅनिंग केलं होतं. त्याला पैसे दिले होते. बाईंनी तक्रार केली रे केली की भाडोत्री बापानी भयंकर राग आला आहे असं भासवून मित्राच्या पाठीत धपाटा घालायचा प्रयत्न करायचा. मित्र पळून जाणार. मग अनावर रागांत बाप त्याला “घरी येच भडव्या, मुस्काट फोडतो की नाही बघ!” असं म्हणून, मग बाईंना उद्देशून, “काढूनच टाका याला सालेतून. त्याला अन् त्याच्या मायला गावाकडं शेतीलाच लावतो.” असं म्हणत अंकलनी तरातरा निघून जायचं – असं ठरलं होतं.

प्रचंड दूरदृष्टी. आत्ताचाच प्रॉब्लेम नव्हे, तर बाईंची कायमचीच सहानुभूती मिळविण्याचा प्लॅन होता मित्राचा.

अपेक्षेप्रमाणे बाईंनी अंकलकडे तक्रार केली. मात्र रागानी लालबुंद होण्याऐवजी अंकलनी “असं का रे वागतोस बाळा,” असं म्हणत मित्राला जवळ घेतलं. “उफ्फ ! असल्या बापाचं पोर असंच असणार” असा चेहरा करून बाईंनी छताकडे डोळे फिरवले. स्क्रिप्टमध्ये अनपेक्षित बदलाव आल्यामुळे मित्र गोंधळला. Guidance साठी आळीपाळीनी आमच्याकडे आणि अंकलकडे बघायला लागला. असे काही सेकंद गेले, आणि अंकलनी दातओठ खाऊन अचानक मित्राच्या कानशिलात सणसणीत भडकावली !

तो लवंगी फटाक्यासारखा आवाज आणि त्या क्षणीचा मित्राचा चेहरा मी आयुष्यभर विसरणार नाही. आश्चर्याच्या पलिकडे असतो तो शॉक. शॉकच्या परिसीमेच्या पलिकडे जे काय असेल ते त्याच्या चेहर्‍यावर क्षणभरच दिसलं. तो गेला भेलकांडत. अंकल उलटपावली वळला आणि तरातरा निघून गेला.

मित्र शॉकच्या पलिकडे आणि आम्ही सगळे हसून हसून मुरकुंडीच्या पलीकडे ! वर्गातला प्रत्येक मुलगा बाकावर नाहीतर जमिनीवर गडाबडा लोळत होता! ते दृष्य अफलातूनच असणार. हे सारं बाईंच्या सहनशक्तीच्या पलीकडे होतं. “कशाला हसताय रे नालायकांनो” असं म्हणत बाईंनीही जमेल तितक्या मुलांना बदडलं.

भरपूर आणि मजेदार violence झाला होता.

तात्पर्य काय, तर माझा काही तिच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही.

मी गाडीतला दिवा लावला. शुभदा सीट बेल्ट काढून पूर्ण मागे वळली. शांताचा चेहरा नीट न्याहाळल्यावर लक्षात आलं की ती खरं सांगत होती. दोघी मायलेकी होत्या ! मुलगी अठरा-वीस वर्षाची होती. म्हणजे त्या आई आम्हाला दहा पंधरा वर्ष सीनियर होत्या ! आपण त्यांना फाडफाड काय काय बोललो ते आठवून शुभदा ओशाळली. शांतेचं नाव मनातल्या मनात बदलून मी ‘शांताकाकू’ केलं.

मात्र embarrassment मधून पुढे सरकणं जरूर होतं. मी शुभदाचाच प्रश्न पुन्हा विचारला. “तुम्हाला वाटंत नाही की तुम्ही मोठी रिस्क घेतलीत म्हणून?”

“अजिबात नाही.” शांताकाकू उत्तरल्या.

आता मात्र मला फारच आश्चर्य वाटलं. इतक्या अनपेक्षित उत्तराला काय प्रतिप्रश्न करावा या विचारात मी असतानाच त्यांनी पर्समध्ये हात घालून काहीतरी काढलं.

“अय्याऽऽऽऽ.” शुभदा.

“काय आहे?” मी.

शांताकाकूंनी मला आरशात पिस्तुल दाखवलं !

“आइ@#%&*!!” मी तोंड आवरायचा आत शब्द निघालेच.

“मला बघू, मला बघू .” शुभदा.

मुली बाहुल्यांशी खेळतात आणि मुलगे बंदुकींशी. इथे या दोघी बंदूक–बंदूक खेळत होत्या आणि मी स्टिअरिंगवर ! मी कचकन् गाडी थांबवली.

“हाः हाः हाः हाः. सारे जेवर मेरे हवाले कर दो. हाः हाः हाः हाः.” हिंदी चित्रपटातल्या खलनायकाच्या आवाजाची नक्कल करत त्यांनी बंदूक माझ्या कानशिलाला लावली.

माझी क्षणभर फाटली. पण प्रफुल्ला हसत होती त्या अर्थी त्या विनोदच करंत असणार.

“भंकस नको. चुकून गोळी सुटेल.” मी.

“छे हो. खोटी बंदूक आहे.” असं म्हणत त्यांनी ती माझ्यापुढे केली. हुबेहूब खर्‍यासारखीच दिसत होती. Beretta. जेम्स बॉन्डची आवडती बंदूक. खरोखर धातूची होती. वजनदेखील खणखणीत.

मग त्यांनी त्यांची हकीकत सांगितली.

बीडला राहात असत. यजमानांची बँकेत नोकरी. एकदा त्यांच्या घरावर दरोडा पडला आणि दुर्दैवानी त्यात यजमानांना वर्मी घाव लागला. ते वाचू शकले नाहीत. मग बँकेनी अनुकंपा तत्वावर नोकरी दिली.

जर चोरांकडे व्यवस्थित हत्यारं असतील तर आपल्या कुलुपांचा काहीच उपयोग नसतो. फारसा आवाज न करता कितीही कुलपं तोडता येतात. (ज्यांच्या घरी घरफोडी झाली आहे त्यांनी ह्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे.) त्या काळात कॉम्प्यूटर नव्हते आणि CCTV कॅमेरे परवडण्याच्या पलिकडे होते.

घरी आई आणि मुलगी दोघीच. त्यामुळे त्या कायम टेन्शनमध्ये असायच्या. काम नवीन, मुलगी लहान. वेळीअवेळी जाग यायची आणि मग रात्रभर झोप लागायची नाही. तब्येतीवर परिणाम व्हायला लागला. स्वतः आजारी पडल्या की मुलीची आबाळ व्हायची. तेव्हां त्यांच्या भावानी त्यांना ही बंदूक आणून दिली. तेव्हांपासून त्या निश्चिंत झाल्या. दोघींची आयुष्यं हळुहळु परत रुळावर आली.

घरी तर छकुली माझ्याबरोबर असतेच. रात्री बाहेर जाताना किंवा प्रवासाला जाताना मी नेहमी छकुलीला बरोबर घेते असं त्या म्हणाल्यामुळे मला वटलं त्या आपल्या मुलीबद्दल बोलताहेत. मग कळलं की त्यांनी बंदुकीला ‘छकुली’ असं नाव ठेवलं होतं !

छकुली ! छकुली ? हे काय बंदुकीला ठेवण्यासारखं नाव आहे? डोक्यात प्रश्न आला की लगेच तो विचारायची सवय असल्यामुळे मी कारण विचारलंच. ते त्यांनी सांगितलं ते असं.

त्या लहान असताना त्यांच्या बाहुलीचं नाव होत ‘छकुली’. त्यांची आई सावत्र होती. वारंवार घायाळ झालेल्या बालमनातले सगळे विचार, शंका, घालमेल, एकटेपणा, दुःख – सगळ्या सगळ्याची वाटेकरी असायची ती छकुली. कधी न कुरकुरता, न कंटाळता, एकही शब्द न बोलता ती छोटीला धीर द्यायची. तिची समजूत काढायची. जोपर्यंत छकुली आपल्या कुशीत आहे तोपर्यंत आपलं काहीही वाईट होणार नाही अशी त्या कोवळ्या मनाची खात्री होती. आणि ती खरी देखील ठरली.

पुढच्या आयुष्यात त्या बंदुकीनेही नेमकं हेच काम केलं. म्हणून तिचंही नाव ‘छकुली’ !

किती समर्पक ! काही मिनिटांपूर्वी मला हेच नाव हास्यास्पद वाटलं होतं. आपण कित्येकदा आपली मतं किती पटकन् आणि अपुर्‍या माहितीनिशी बनवतो ! माझ्या उथळ विचारांची मलाच लाज वाटली.

चष्म्याच्या दुकानापाशी सोडताना शुभदा त्यांना म्हणाली, “चाळिशी?.”

त्या हसल्या. म्हातारीच्या कापर्‍या आवाजाची नक्कल करंत म्हणाल्या, “मुलांऽऽनोऽऽ, चाळीशी म्हणजे काय ते तुम्हाला कळायला खूप वेळ आहे.”

कथाkathaaलेख

प्रतिक्रिया

माम्लेदारचा पन्खा's picture

12 Oct 2016 - 10:39 pm | माम्लेदारचा पन्खा

मजेशीर अनुभव....बंदुकीचं नावही आवडलं.....छकुली !

नीलमोहर's picture

12 Oct 2016 - 10:40 pm | नीलमोहर

एक नंबर अनुभव आणि लिखाण,

शाम भागवत's picture

12 Oct 2016 - 10:49 pm | शाम भागवत

मस्त

सुखीमाणूस's picture

12 Oct 2016 - 11:30 pm | सुखीमाणूस

तुम्ही पण एकदम डेअरिन्गबाज आणि त्या मायलेकी पण

एस's picture

12 Oct 2016 - 11:43 pm | एस

रोचक किस्सा.

निओ's picture

17 Oct 2016 - 11:48 pm | निओ

+1

रातराणी's picture

12 Oct 2016 - 11:51 pm | रातराणी

मस्तच!! शाळेतला किस्सा भारी, अशा अनेक जुगाडांची साक्षीदार असल्यामुळे तर तो किस्सा अजूनच आवडला :)

रेवती's picture

13 Oct 2016 - 12:22 am | रेवती

एका कथेतील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. गोष्ट आवडली.

बापरे! फारच जबरदस्त किस्सा!

वरुण मोहिते's picture

13 Oct 2016 - 1:07 am | वरुण मोहिते

.

पिलीयन रायडर's picture

13 Oct 2016 - 1:12 am | पिलीयन रायडर

कसलं भारी!! आवडली गोष्ट!

तुषार काळभोर's picture

13 Oct 2016 - 6:24 am | तुषार काळभोर

तुमचे जमिनीवरचे अनुभवही तितकेच इंटरेस्टिंग आहेत!

राजाभाउ's picture

13 Oct 2016 - 4:47 pm | राजाभाउ

+१ असेच म्हणतो.

चाणक्य's picture

13 Oct 2016 - 7:33 pm | चाणक्य

+१

लिखाणाची उत्कृष्ट शैली. खूप आवडले.

यशोधरा's picture

13 Oct 2016 - 7:36 am | यशोधरा

अतिशय आवडली गोष्ट.

संदीप डांगे's picture

13 Oct 2016 - 7:39 am | संदीप डांगे

स्वीटटॉकर काका म्हणजे पोटलीवाले बाबा आहेत, काय काय एक अनुभव! मस्त!

नाखु's picture

13 Oct 2016 - 8:53 am | नाखु

दूरदर्शनच्या गुलदस्ता कार्यक्रमाची आठवण झाली,अजूबाजूलाअ घडणार्या कथांअमधले नाट्य्,ताण तणाव टिपणारी कथा.

आवडली.

बोटीला बोट धरून पुढे आणणे ही विनंती.

टवाळ कार्टा's picture

13 Oct 2016 - 9:49 am | टवाळ कार्टा

खिक्क

खेडूत's picture

13 Oct 2016 - 10:29 am | खेडूत

लिफ्ट म्हटलं की ब्रम्हे आठवण्याच्या आजच्या काळात हा वेगळा अनुभव खूपच आवडला.
तुम्ही तो असा मस्त मांडलाय म्हणून आवडला. अजून अनुभव येऊद्यात!

बोका-ए-आझम's picture

13 Oct 2016 - 12:30 pm | बोका-ए-आझम

ब्रम्हे अजरामर आहेत. पण हा किस्सा खरा असल्यामुळे (स्वीटाॅकाकांवर विश्वास आहे) अंतर्मुख करुन गेला.

ब्रह्म्यांचा किस्साही खराच आहे. वाचकांची रिअ‍ॅलिटी गंडली आहे.

- "मेनी वर्ल्ड्स इंटरप्रीटेशन ऑफ क्वांटम ब्रह्मे" या पुस्तकाच्या मलपृष्ठावरून

वेगवेगळ्या पात्रांच्या दृष्टीने प्रकरण (भाग या अर्थाने केकता लफडी या अर्थाने नाही) लिहिली जातात तशी मिपाकरांनी अनुक्रमे खालील व्य्कतींच्या नजरेतून या घटनेचे कथन करावे असे मिपावरच्या सिद्धहस्त लेखकांना आवाहन.

  • जिला लिफ्टबरोबर पैश्याची गिफ्ट मिळाली ती कथानायीका नाव मोनिका शृंगारपुरे
  • कथा नायीकेची मैत्रीण माया जवळकर
  • घरमालक बाई दुर्गाताई जमदग्नी
  • मित्र जनार्दन राजाराम फुल्पापडीकर (ज्याचे लग्न झाले आणि त्या लग्नात लेखकू गेला होता)
  • आणि बाग्काम विभागाचे प्रमुख (लेखकू ब्र्ह्मेचे बॉस भुजंगराव गोजमगुंडे)
  • बागकाम विभागातील माळी बुवा दाशिव दामोदर फुले.

म्हणजे त्या महाकथेला न्याय दिल्या सारखे होईल.आदुदादु तुम्ही सुरुवात करा या जोडसाखळीची.

भारी.. खरंच खतरनाक होईल हे.. मिपावरच्या सिद्धहस्त लेखकांवर पुर्ण विश्वास आहे..

शब्दबम्बाळ's picture

14 Oct 2016 - 10:09 pm | शब्दबम्बाळ

काकांनी भारीच लिहिलंय! पण अंधाऱ्या रात्री आणि लिफ्ट हे वाचल्या वाचल्या पहिले ब्रम्हेच आठवले! :D

संत घोडेकर's picture

13 Oct 2016 - 10:31 am | संत घोडेकर

हा हा हा!
भारी अनुभव

सिरुसेरि's picture

13 Oct 2016 - 12:24 pm | सिरुसेरि

भावनांच्या अनेक छटा दाखविणारी कथा . +१००

अमृत's picture

13 Oct 2016 - 1:33 pm | अमृत

छान किस्सा आवडला

पाटीलभाऊ's picture

13 Oct 2016 - 1:44 pm | पाटीलभाऊ

मस्त लिहिलंय...!

अनुप ढेरे's picture

13 Oct 2016 - 1:50 pm | अनुप ढेरे

छान!

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Oct 2016 - 2:20 pm | डॉ सुहास म्हात्रे

रोचक पण तेवढीच अंतर्मनाला शिवणारी कथा !

लिहीत रहा. तुमच्याकडे लिहिण्यासारखे बरेच आहे हे कळून चुकलेय ! :)

टुकुल's picture

13 Oct 2016 - 2:30 pm | टुकुल

मस्त...

तुमचे अनुभव विश्व जबरा आहे

--टुकुल

विशुमित's picture

13 Oct 2016 - 5:20 pm | विशुमित

वाचताना मज्या आली... मूड फ्रेश झाला..

मी-सौरभ's picture

13 Oct 2016 - 6:23 pm | मी-सौरभ

काका,
तुमच्या लेखनाचा पंखा झालोय. असेच सुचेल आठवेल ते लिहीत रहा.
असलं लेखन आता दुर्मीळ झालंय मिपावर.

स्वीट टॉकर's picture

13 Oct 2016 - 6:45 pm | स्वीट टॉकर

सर्वजण,

धन्यवाद!

नाखु - जसा वेळ मिळेल तसं लिहिणं चालू आहे.

खेडुत - ब्रम्हे? गोष्ट मिपावर आहे का?

मला स्वतःला फिक्शन वाचायला आवडत नाही. त्यात शौर्य, ताकद, शक्ती, भीती वगैरे सगळंच खोटंखोटं असल्यामुळे कशालाच मर्यादा नसते. त्यामुळे मला कोठलीच फिक्शनल गोष्ट पकड घेते असं वाटंत नाही. मात्र गेल्या वर्षी टाइम्स ऑफ इन्डिया नी 'Write India' या नावानी इन्ग्रजीत फिक्शन लिहिण्याच्या स्पर्धा (दर महिन्याला एक अशा एकंदर अकरा) आयोजित केलेल्या होत्या. दर महिन्याला एक नामांकित लेखक एक परिच्छेद द्यायचा. हा परिच्छेद आपल्या कथेत जसाच्या तसा वापरून दोन हजार शब्दांची गोष्ट तयार करायची. मी पाठवल्या होत्या दोन. बक्षीस बिक्षीस काही मिळालं नाही पण एखाद दिवशी मराठीत अनुवाद करून त्या कथा मिपावर टाकीन. त्या लिहिताना मला कळलं की सरळसोट अनुभव सांगणं किती सोपं आहे फिक्शनच्या तुलनेत.

मी-सौरभ's picture

13 Oct 2016 - 7:39 pm | मी-सौरभ

खेडुत - ब्रम्हे? गोष्ट मिपावर आहे का?

काका: ब्रम्हे माहिती नाहीत तुम्हाला :(
ते ई-सकाळ वरचे सुप्पर्हिट्ट लेखक आहेत.
लिन्क देइलच कुणितरी म्हणुन मी शोधत नाही.

मी-सौरभ's picture

13 Oct 2016 - 7:43 pm | मी-सौरभ

हि लिन्क बघा आणि प्रतिसाद वाचाच्च

http://www.esakal.com/esakal/20130122/4824005995910158145.htm

स्वीट टॉकर's picture

13 Oct 2016 - 10:55 pm | स्वीट टॉकर

धन्यवाद सौरभ,
मी सकाळची हार्ड कॉपी वाचतो. पण लिंक उघडण्याचा प्रयत्न केल्यावर
The resource you are looking for has been removed, had its name changed, or is temporarily unavailable. येत आहे.

पिशी अबोली's picture

15 Oct 2016 - 12:06 pm | पिशी अबोली

http://online3.esakal.com/esakal/20130122/4824005995910158145.htm

ही चालतेय का बघा लिंक. माझ्याकडे चालतेय.

मी-सौरभ's picture

14 Oct 2016 - 2:07 pm | मी-सौरभ

जाऊ दे
हा तो मुक्तपीठ वरचा सर्वात प्रसिद्ध लेख

या घटनेला अंदाजे 22 वर्षे झाली. पुणे विद्यापीठात बागेच्या ऑफिसात होतो. नुकतीच नवीन लुना घेतली होती. रोज जाणे असल्यानं बहुतेक मुली परिचयाच्या झाल्या होत्या; पण मला मुलींच्या मागे जाणं, गप्पा मारणं या गोष्टी जमायच्या नाहीत व तशी वेळच कधी आली नाही. कारण मुलीच माझ्याशी आपणहून बोलायच्या, चेष्टा करायच्या. ऑफिसमध्ये जाता-येताना मुली लिफ्ट मागायच्या व मी त्यांना लुनावर सोडत असे, त्यामुळे परिचय व्हायचा.

असाच एकदा सुट्टीच्या दिवशी म्हसोबा गेटसमोरील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून बाहेर पडलो, तर काय एक अतिशय सुंदर, गोरी तरुणी समोर उभी. 'विद्यापीठ गेटपर्यंत सोडता का?'' माझ्या उत्तराची वाट न पाहता ती माझ्या मागे बसली. पुढे कॉर्नरला अशोका हॉटेलमध्ये तिने कॉफी दिली व बाहेर आलो.

मग ती म्हणाली, 'प्लीज, जरा औंधला रूमवर सोडता का? उशीर झाला आहे.'' रात्रीचे साडेआठ वाजले होते. स्त्रीदाक्षिण्य म्हणून आम्ही निघालो. ते दिवस थंडीचे होते. गार वारं व थंडी, राजभवनच्या पुढे गेल्यावर तिला खूप थंडी वाजू लागली. माझा जर्किन तिला घालायला दिला व आम्ही पुढं निघालो. थोड्या वेळानं तिनं अंगचटीला येण्याचा प्रयत्न केला. मी गोंधळून गेलो. तसेच लुना जोरात चालवत होतो. मला असा अनुभव नवीनच होता. केव्हा एकदा तिला रूमवर सोडतो, असं झालं होतं. शिक्षकनगरच्या पुढे कॉर्नरवर तिच्या रूमवर सोडले. ती व तिच्या मैत्रीणींनी आत बोलावून गरम चहा दिला. गप्पा मारताना तिने 4-5 हजार रुपये आहेत का, मला फी भरायची आहे. मी उद्याच तुम्हाला तुमच्या ऑफिसात पैसे परत आणून देते. मी तुम्हाला रोज पाहते. नक्की तुमचे पैसे देईन. विश्‍वास ठेवा, असं सांगितलं. ती नाव, आडनावावरून चांगल्या घराण्यातील वाटली म्हणून माझ्याकडे होते, ते चार हजार रुपये दिले. घरी जायला अजून खूप उशीर होईल म्हणून मी जोरातच घरी आलो.

इतर कामाच्या गडबडीत दुसऱ्या दिवशी ती येणार हे विसरून गेलो. मित्राच्या घरी लग्नाचा कार्यक्रम होता. त्या गडबडीत व कामामुळे ती गोष्ट पूर्ण विसरलो. आठ दिवस झाले, एकदम मला पैशाची व त्या तरुणीची आठवण झाली म्हणून लगेचच ऑफिस सुटल्यावर तिच्या रूमवर गेलो. बेल वाजल्यावर एक वयस्कर बाईंनी दरवाजा उघडला. मी त्यांना आठ दिवसांपूर्वीची सगळी हकिकत सांगितली. त्यांनी सांगितलेली माहिती ऐकून मला तर चक्करच येते की काय असं झालं. त्या म्हणाल्या, की त्या दोन-तीन जणी भाड्यानं राहात होत्या. त्या परवाच त्यांच्या गावी गेल्या. तुझ्यासारख्या दोन-तीन जणांना त्यांनी फसविले आहे. त्या पुढे म्हणाल्या, की नशीब चार हजार गेले. इतर दोन-तीन जणांना तर त्या तिघींनी बराच गंडा घातला आहे. स्त्रीदाक्षिण्य दाखवून मी फसलो गेलो होतो, तेव्हापासून कोणाही अनोळखी तरुणीला लिफ्ट न देण्याचा निश्‍चयच केला.

विशुमित's picture

14 Oct 2016 - 3:41 pm | विशुमित

मुक्तपीठ वरच लेख वाचून भडा-भडा हसलो.

झेन's picture

14 Oct 2016 - 8:44 pm | झेन

हा लेख त्यावरच्या प्रतिक्रियां शिवाय सुफळ संपूर्ण होत नाय वो, ते अपुर्ण काव्य होते.

झेन's picture

14 Oct 2016 - 8:58 pm | झेन

अनुभव जबरदस्त आणि लिहीण्याची शैली मस्म्तच.

मनिमौ's picture

15 Oct 2016 - 8:10 am | मनिमौ

अनुभव.खरच सगळ्या लेखाचे संकलन करून एक छान पुस्तक तयार होईल

पिशी अबोली's picture

15 Oct 2016 - 12:05 pm | पिशी अबोली

भारी अनुभव आणि तुमची सांगण्याची पद्धत तर झकास!

विअर्ड विक्स's picture

15 Oct 2016 - 12:20 pm | विअर्ड विक्स

अनुभव आवडला...

स्वीट टॉकर's picture

15 Oct 2016 - 12:51 pm | स्वीट टॉकर

सर्वजण,
पुन्हा धन्यवाद!

आदुबाळ आणि नाखु - :)

सौरभ - धन्यवाद. तुम्ही लेखच टाकलात ते बरं झालं. माझ्याकडे अजूनही उघडत नाही. झेनचं म्हणणं पटलं. प्रतिक्रियांशिवाय लेख अपूर्ण आहे.

झेन - माझ्या सदस्यनामात अनुस्वार नको. यात तुमचं शुद्धलेखनाचं बौद्धिक घेण्याची अजिबात इच्छा नाही. मात्र
Tonker या शब्दाचा बोली इंग्रजीत अर्थ 'चुथडा करणारी व्यक्ती' असा होतो.

मनिमौ - संकेतस्थळं इतकी user friendly असताना पुस्तकांकडे कोण बघतो?

झेन's picture

15 Oct 2016 - 6:06 pm | झेन

या मोबाईल वर टंकताना अनुस्वाराशिवाय अर्धचंद्र सापडत नाही कधीकधी ईंग्रजी टंकून प्रश्न सुटतो कधी नाही. बाकी माझे शुध्दलेखन सुधारायला खुपच स्कोप आहे.

स्वीट टॉकर's picture

15 Oct 2016 - 1:30 pm | स्वीट टॉकर

सौरभ - दिलगीर आहे. मी चुकून पुन्हा पहिलीच लिंक वापरत होतो. नवी लिंक व्यवस्थित चालली. तुम्ही लोकांनी त्यांना सोललतच की राव!

स्वीट टॉकर's picture

15 Oct 2016 - 1:37 pm | स्वीट टॉकर

वयोमानानी मेंदूत शॉर्ट सर्किट व्हायला लागलय.

पिशीताई - नवी लिंक तुम्ही पाठवली होती. धन्यवाद!

एका कथेत बर्‍याच लघूकथा मस्तच गुंफल्या आहेत.

महामाया's picture

15 Oct 2016 - 6:21 pm | महामाया

अनुभव जबरदस्त आणि लिहीण्याची शैली मस्म्तच.

थोडा धाग्याच्या विचारापेक्षा माझा एक प्रश्न होता...
अमुक एका व्यक्ती कडे गन/रेवोल्वर विद लायसेन्स असेल आणि त्याने एखाद्यावर ती रोखली (स्व संरक्षणार्थ म्हणा किंवा भीती दाखवण्यासाठी) गुन्हा होऊ शकतो का?

स्वीट टॉकर's picture

17 Oct 2016 - 3:48 pm | स्वीट टॉकर

याचं उत्तर कायदेतज्ञच देऊ शकेल.

मात्र "(स्व संरक्षणार्थ म्हणा किंवा भीती दाखवण्यासाठी) " अशा दोन परस्परविरोधी परिस्थितींना आपण एकाच बासनात गुंडाळू शकणार नाही. स्व संरक्षणार्थ बर्याच गोष्टींना परवानगी असेलही जी भीती दाखवण्यासाठी नसेल.

विशुमित's picture

17 Oct 2016 - 4:15 pm | विशुमित

ओके..

नेहमीप्रमाणेच मस्त लिहीलंय. :)