छोटीशी गोष्ट

परिधी's picture
परिधी in जनातलं, मनातलं
7 Oct 2016 - 6:57 am

दिवस पहिला:

"आज वेळ आहे थोडा? बोलायचय"

"आज खूप काम आहे, उद्या बोलूया नक्की"

"ओके"

दिवस दुसरा:

रिंग रिंग

रिंग रिंग

रिंग रिंग

"कुठे गायब, कधीची फोन करतीये"

दिवस तिसरा:

"अरे काल अचानक पार्टी ठरली ऑफिसमधे"

"ओके, अजून काही?"

"अजून काही नाही, चल आवरतो, खुप काम आहे"

"के बाय"

"बाय"

दिवस चार:

......

दिवस पाच:

......

दिवस सहा:

व्हाट्सएप्प फॉरवर्ड

व्हाट्सएप्प स्माइली

"आज माझा बड़े आहे"

"मेनी हैप्पी रिटर्न्स ऑफ़ द डे, थांब फोन करतोय"

"नको नको घरच्यां बरोबर बाहेर आलीये"

"ओके, एन्जॉय"

"थैंक्स बाय"

दिवस सात:

.......

दिवस आठ:

.......

दिवस नऊ:

"आज बोलू शकते"

"मला अजून अर्धा तास आहे घरी पोचायला, तू करतेस का मी करू?"

रिंग रिंग

"हां बोल"

"काही नाही"

"बोलायच होतं ना तुला?"

"तू सुरुवात कर मग मी बोलते"

"काय करतीये?"

"बाहेर आलीये"

"ऑफिस नाही?"

"तुझ्याशी बोलायच म्हणून बाहेर आलीये ऑफिसमधून"

"हं काय केल मग बडेला?"

"काही नाही फ्रेंड्स बरोबर पार्टी"

"गुड, तू बोल ना तू काय बोलतच नाही"

"आता सूचत नाहीये, नंतर करते परत फोन बाय"

"बाय"

दिवस दहा:

"ए कसले पांचट जोक पाठवतो"

"नको पाठवू?"

"......."

दिवस अकरा:

.......

दिवस बारा:

.......

दिवस तेरा:

"बोलणार नाही?"

"खुप काम पडली आहेत"

"ओके बाय"

"बाय"

दिवस चौदा:

......

दिवस पंधरा:

"तू कसा आहेस?"

"मस्त"

"तुझ काय चालु आहे?"

"काही नाही कंटाळा आलाय"

"चल मी निघतोय ऑफिसला"

"के बाय"

"बाय"

व्हाट्सएप्प फॉरवर्ड

व्हाट्सएप्प फॉरवर्ड

दिवस सोळा:

आता सुरु झाला आहे

कथा

प्रतिक्रिया

आवक

एक आढवण

अश्रु

शेवट

प्रतिसादासाठी धन्यवाद , आठवण म्हणायच आहे का तुम्हाला?

जव्हेरगंज's picture

7 Oct 2016 - 12:22 pm | जव्हेरगंज

दिवस सोळा:

आता सुरु झाला आहे

काय सांगता!!!!!!

WHAT IS THE LATEST UPDATE....!!!!!!

cc

वाचकानी आपल्याला हवा तसा शेवट करून घ्यावा म्हणून ते तसे लिहिले आहे, आभार.

नीळा's picture

7 Oct 2016 - 3:49 pm | नीळा

आठवण च म्हणायचे होते

बाकी ढ आणि ठ वरुन दुसरीत खाल्ले ला मारही आढ नाही आठवला

परिधी's picture

7 Oct 2016 - 5:13 pm | परिधी

धन्यवाद.

अश्विनी वैद्य's picture

7 Oct 2016 - 6:31 pm | अश्विनी वैद्य

आवडलं...!

बाजीप्रभू's picture

7 Oct 2016 - 8:21 pm | बाजीप्रभू

कमाल आहे!!
बरोब्बर सोळाव्याला थांबलात. 'सोळावं वरिस धोक्याचं' गाणं आठवलं या निमित्ताने.

15 दिवस. फकस्त हाय आन बाय..

रातराणी's picture

7 Oct 2016 - 11:57 pm | रातराणी

छान, शेवट केला असता तर अजून आवडले असत.

ज्योति अळवणी's picture

8 Oct 2016 - 4:09 pm | ज्योति अळवणी

साधारण वय २५ ते २७? अजून नक्की ठरलं नाहीय वाटत... नाहीतर एव्हाना कोणा एकाने संपवलं असत.

छान लिहिलं आहे.

महासंग्राम's picture

8 Oct 2016 - 4:30 pm | महासंग्राम

अर्रर्रर्रर्र लैच तुफान आवडलं आहे, सध्या अगदी जवळून घेतलेला अनुभव आहे हा !!!

महासंग्राम's picture

8 Oct 2016 - 4:31 pm | महासंग्राम

आणि पटकन कनेक्ट पण झालं.

परिधी's picture

8 Oct 2016 - 6:36 pm | परिधी

धन्यवाद सर्वाना