डीसेंडींग ट्रेक - लोणावळा (कुरवंडे) ते खोपोली (चावणी) - सह्याद्री ग्रुप - २ ऑक्टोबर २०१६ - (भाग १)

कविता१९७८'s picture
कविता१९७८ in जनातलं, मनातलं
4 Oct 2016 - 8:32 am

डोंगर नद्या हे लहानपणापासुन पाहत आल्याने आणि माझ्या पदयात्रेचा रस्ताही अशाच भागातुन जात असल्याने ट्रेक हा प्रकार तसा मला नवखा नाही. पण अनोळखी ग्रुप बरोबर पहिल्यांदा खर्‍या अर्थाने ट्रेक केला तो २०१५ च्या महीला दिनाच्या दिवशी. माझ्या एका मैत्रीणीने मला सांगितले की सह्याद्री म्हणुन एक ट्रेकींग गृप आहे जो श्री शैलेंद्र सोनटक्के लीड करतात आणि श्री महेंद्र भोर, कविता नवरे, विश्वेश नवरे, नागेश धोंगे आणि अजुन २-३ मंडळी त्यांच्याबरोबर बाकीच्या जबाबदार्‍या संभाळतात. हा ग्रुप नो प्रोफीट नो लॉस बेसीस वर चालतो. या ग्रुप ने महीला दिना निमित्त महीला विशेष ट्रेक आयोजित केला आहे. श्री शैलेंद्र सोनटक्के यांना ग्रुप मेंम्बर्स कॅप्टन म्हणतात ते १९८३ पासुन जवळपास दर महीन्याला ट्रेक करतात. त्यांना ट्रेकींगचा दांडगा अनुभव आहे. मग मी महीला दिन विशेष माझा पहीला आसनगावाहुन जवळपास ३०-३५ कीमी लांब असलेला आजोबागड ट्रेक केला. साधारण ५०-५५ महीलांनी त्या दिवशी हजेरी लावली. महीला दिन असल्याने त्यांना सोपा असा ट्रेक आयोजित करण्यात आला त्यांतर गेम्स वगैरे आयोजित करुन महीला दिन साजरा करण्यात आला. शेवटी झालेला खर्च वजा करुन उरलेले पैसे परत करण्यात आले. कुठेही गैरसोय झाली नाही , खायला प्यायला व्यवस्थित मिळुनही अगदि कमी पैशात इतका छान ट्रेक झाला याचेच मला जास्त कौतुक वाटले. आणि या ग्रुपचे वेगळेपण माझ्या बरोबर इतरांच्या मनात ही ठासले गेले. आता या ग्रुप बरोबरच बाकीचे ट्रेक करायचे हे मी ठरवुन टाकले. त्यानंतर एक नाईट ट्रेक मिळुन एकुण ३-४ ट्रेक केले.

पावसाळा सुरु झाल्यानंतर आडोशी धबधबा ट्रेक ठरवला गेला तसे कॅप्टन त्यावेळी बिझी असल्याने मला ट्रेक ची व्यवस्था पाहण्यासाठी सांगितले म्हणजे कस्काय ग्रुप वर त्या दिवशीजे मेंम्बर्स येणार त्यांच्यासाठी टेंपररी ग्रुप उघडुन ट्रेक अमाउंट जमवणे, सर्वांना ट्रेक चे टाईमटेबल सांगणे. मेंबर्सची लिस्ट बनवणे. मी हो तर सांगितले पण लगेचच वायरल तापाने आजारी पडले, खुपच अशक्तपणा आल्याने मला जबाबदारी संभाळता आली नाही आणि त्या ट्रेकलाही जाता आले नाही. कॅप्टननी पहिल्यांदा माझ्यावर काही जबाबदारी सोपवली आणि ती मला पार पाडता आली नाही याची खंत मला लागुन राहीली आणि आता काही परत कॅप्टन मला अशी जबाबदारी देणार नाहीत असे वाटले. पण सप्टेंबर सुरु झाला आणि कॅप्टन चा मला फोन आला की मी २ ऑक्टोबर ला लोणावळा ते खोपोली असा डीसेंडींग ट्रेक ठरवलाय , मी १८ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर हिमाचल प्रदेशला असेन आणि महेंद्र भोर ही बिझी असल्याने तुम्ही ही जबाबदारी घ्याल का? मी २८ सप्टेंबरला येतोच आहे. मला पुन्हा एक संधी मिळाल्याने मी आनंदातच हो म्हंटले.

कॅप्टन नी २ ऑक्टोबरच्या ट्रेकचा कस्काय टेंपररी ग्रुप बनवुन जेवणा , नाश्ता , ट्रान्स्पोर्टेशन यासाठी कुणाशी बोलायचे वगैरे सगळ्यांचे संपर्क क्रमांक दिले. जवळ जवळ १५ सप्टेंबर पर्यंत कुणीचाच काही निरोप नसल्याने या ट्रेकला काही १० माणसे सोडुन जास्त कुणी येणार नाही असे वाटले. त्यामुळे मी निवांत बसले. पण २० तारखेनंतर भराभर मेंम्बर्स चे मेसेजेस येउ लागले आम्हाला यायचय तर टेंपररी ग्रुप मधे आम्हाला घ्या आम्ही ट्रेकची फी नेट ट्रान्सफर करतो. तसतसे मी त्यांना टेंपररी ग्रुप मधे अ‍ॅड करत गेले. सर्वांना ट्रेक चा रस्ता , टाईम टेबल आणि कुठल्या अकाउंट मधे पैसे ट्रान्सफर करायचे याची माहीती देत गेले. लोणावळाला सर्वांनी एकत्र भेटायचे ठरले, तिथ पर्यंत सर्वांनी आपापले यायचे होते, ग्रुप मधल्या काही जणानी बाकीच्यांशी बोलुन पुणे इंटरसिटी चे रीझर्वेशन केले. लोणावळाला नाश्ता करुन लोणावळा ते कुरवंडे गाव अशी वेहीकल अरेंजमेंट , कुरवंडे ते खाली उतरुन चावणी गावात जेवण आणि चावणी गाव ते खोपोली रेल्वे स्टेशन अशी बस , एक गाईड , नवरात्र असल्याने उपवास वाल्यांसाठी वेगळा नाश्ता आणि जेवण अशी सर्व सोय केली.

२८ तारखेला कॅप्टन परत आले पण कॅप्टन हिमाचल प्रदेश मधे असताना त्यांच्या ग्रुप मधल्या एका बसला जबरदस्त अ‍ॅक्सीडंट झाल्याने २-३ जण क्रीटीकल अवस्थेत इथे आणल्याने इथे येउन कॅप्टन हॉस्पीटल मधेच फेर्‍या घालत होते म्हणुन मला काही लक्ष देता येणार नाही तर तुम्हीच पुढची अरेंजमेंट पहा असे कॅप्टननी मला सांगितले. मग १ ऑक्टोबर पर्यंत मी सगळी व्यवस्था करुन सगळा हिशोब लिहिला. ३० तारखेपासुन धो-धो पाउस सुरु झाला , मी कॅप्टन ना विचारले आता काय करायचे? ट्रेक कसा होईल तर ते म्हणाले काही हरकत नाही आपण भिजत भिजत ट्रेक करु. बोईसरला राहत असल्याने मला २ ऑक्टोबरची सकाळची ६.५० ची इंटरसिटी गाठणे शक्य नसल्याने १ ऑक्टोबरला मी दादरला पोहोचले. रात्री पर्यंत जेवणाची , नाश्त्याची आणी गाड्यांची सोय करणार्‍यांशी बोलत राहीले. रात्री सकाळी ५ चा गजर लावला पण पहिल्यांदाच ट्रेकची व्यवस्था पाहत असल्याने आणि एकुण ५० मेंम्बर्स जमल्याने सगळे व्यवस्थित होईल की नाही याची चिंता तर लागुन राहीली होतीच आणि यावेळ अजया येउ शकत नसल्याने तिलाही मिस करत होते या सगळ्या विचारातच रात्री उशीरा १ वाजता झोप लागली.

सकाळी ५ ला उठुन , आवरुन दादर स्टेशन गाठले , ईंटरसिटी मधे बसले, गृपमधे सर्वजण जसजसे चढत गेले तसतसे गृपमधे मेसेजेस येउ लागले. नाश्ता आणि कुरवंडे गावापर्यंत जायला गाडया अरेंज करणार्‍यांशी पुन्हा एकदा संपर्क करायला कॅप्टन नी सांगितले. चावणी येथे जेवणाची व्यवस्था करणार्‍या श्री नारायण पाटलांनी एक गाईड अरेंज करुन दिला होता तो ८.३० लाच कुरवंडे गावी हजर झाला होता. साधारण ९ वाजता लोणावळाला पोहोचलो. स्टेशनलाच सगळे एकत्र भेटलो. लोणावळाला राहणार्‍या श्री. रंगनाथ वरे यांनी नाश्ता आणि कुरवंडे गावी पोहोचण्यासाठी सुमो ची व्यवस्था करुन दिली होती. सर्वांना गाड्यामधे बसुन हातात प्रत्येकी दोने वडापाव दिले तर उपवास वाल्यांकरता साबुदाणा वड्यांची व्यवस्था केली होती. सर्व गाड्या पुढे निघाल्या. शेवटी आम्ही नाश्त्याचे आणि गाड्यांचे पैसे देउन कुरवंडे गावी निघालो.

(क्रमशः)

प्रवासआस्वाद

प्रतिक्रिया

अजया's picture

4 Oct 2016 - 8:44 am | अजया

वाचतेय.
मी ट्रेक मिसला असल्याने जास्त जळवुन वर्णन लिहु नये पुढच्या भागात ही विनंती ;)

किसन शिंदे's picture

4 Oct 2016 - 11:26 am | किसन शिंदे

तोपर्यंत तुम्ही हे पहा..

1

1

1

1

उदय के'सागर's picture

6 Oct 2016 - 2:47 pm | उदय के'सागर

वा क्या बात! किसनजी तुमचा कॅमेरा कोणता आहे हो?

किसन शिंदे's picture

6 Oct 2016 - 5:14 pm | किसन शिंदे

मोटोरोला सेकन्ड जनरेशन

ढग उतरलेत रस्त्यावर! सुंदर फोटो.

नूतन सावंत's picture

4 Oct 2016 - 8:47 am | नूतन सावंत

पुभाप्र,तू इथे यशस्वी होणार याची खात्री आहेच.

बोका-ए-आझम's picture

4 Oct 2016 - 9:39 am | बोका-ए-आझम

ते सुद्धा बोईसरमध्ये राहून! एवढा उत्साह कुठून आणते? _/\_. पुभाप्र!

किसन शिंदे's picture

4 Oct 2016 - 11:17 am | किसन शिंदे

कंटाळवाणा प्रवास, शनिवारी घर सोडून परत सोमवारी घरी पोचणे आणि ते ही फक्त एका दिवसाच्या ट्रेकसाठी.!
तुमच्या दांडग्या उत्साहाला सलाम.

नाखु's picture

4 Oct 2016 - 11:51 am | नाखु

असेच म्हणतो.

आणि ट्रेक यशस्वी करण्याकरता केलेली धडपड कौतुकास्पद आहे.

भुमी's picture

4 Oct 2016 - 2:31 pm | भुमी

पुढचा भाग फोटोंसकट लवकर येऊ दे.

शरभ's picture

5 Oct 2016 - 12:58 pm | शरभ

पूभाप्र

- श

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Oct 2016 - 8:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

असं असतं तर... बाय द वे,

-- शेवटी आम्ही नाश्त्याचे आणि गाड्यांचे पैसे देउन कुरवंडे गावी निघालो.

नाश्त्यात काय काय होतं ते न लीहिण्यामुळे ज़रा हिरमोड़च झाला. अजुन तपशीलवार वर्णन येऊ द्या. पुभाशु.

-दिलीप बिरुटे

वडापाव आणि साबुदाणा वडे लिहिलं आहे ना :)

रेवती's picture

5 Oct 2016 - 8:51 pm | रेवती

वाचतिये.
किस्ना, फोटू भारीयेत. जळजळ झालीच!

प्राची अश्विनी's picture

6 Oct 2016 - 10:20 am | प्राची अश्विनी

सुरेख!पु.भा.प्र.

स्वच्छंदी_मनोज's picture

6 Oct 2016 - 12:14 pm | स्वच्छंदी_मनोज

मस्तच सुरुवात..

हा ट्रेकच जबरी आहे..खरे तर कुरवंडे घाट पण कारतलब्खानाच्या लढाईमुळे उंबरखिंड नावाने प्रसिद्ध पावलह्य्मुळ घाट कुरवंडा गावाच्या पाठी नागफणी पायथ्याला वळसा मारून पुढे धनगरवाड्यात च्या इठून सरळ खाली उतरत होता पण काही वर्षांपुर्वी इथून गेलने गॅस पाईपलाईन खोदल्याने मुळ घाट तुटला आणी आता आपल्याला लांबचा वळसा मारून चावणीला उतरावे लागते.

ह्याच धनगर वाड्याच्या इथून उजवीकडे चावणीकडे न वळता सरळ गेले की फल्याण घाट लागतो जो कोकणात माण खोर्‍यात (मृगगड पायथ्याशी) फल्याण गावात उतरतो.

पुढचा भाग लवकर येऊद्या.

Maharani's picture

6 Oct 2016 - 1:13 pm | Maharani

Mast lihila aahes g...pubhapra

पियुशा's picture

6 Oct 2016 - 2:45 pm | पियुशा

मस्त !

मस्त.. इतक्या जणांसाठी एवढी व्यवस्था करणे कौतुकास्पद आहे.