नो...आय डोंट..!!

अनिरुद्ध प्रभू's picture
अनिरुद्ध प्रभू in जनातलं, मनातलं
3 Oct 2016 - 3:42 pm

दुपारची वेळ.

नेहा काहीबाही करत त्या डेस्कवरच्या कॉम्प्युटरमधे आपलं डोक खुपसुन बसली होती. चेहर्‍यावर कामचं टेन्शन ओळखता येत होतं. कपाळावरच्या आठ्या व्यवस्थित दिसत होत्या. एका निवांत क्षणी चेहर्‍यावर आलेली बट सावरत, डोळ्यांवरचा चश्मा वर डोक्यावर ठेवत आपल्या रोलिंग चेअरवर मागं रेंगाळत जरा कुठे आराम करायच्या तयारीत असतानाच डेस्कवरच हाताशेजारी ठेवलेला॑ तिचा मोबाईल वाजला. अगदी त्रासिक चेहर्‍यानं तिनं मोबाईलच्या स्क्रीनवर पाहिलं. कॉल आईचा होता.

"हॅलो..." नेहा.

"हां हॅलो, अगं नेहा ऑफिसमधेच आहेस ना? बिझी नाही ना आहेस? थोडं बोलायचं होतं म्हणुन कॉल केला...."

आईच्या बोलण्याच्या मधे-मधे नेहानं बोलण्याचा प्रयत्न केला पण आईनं हो, हां यापुढे बोलुचं नाही दिलं.

"अगं जरा लवकर निघ आज संध्याकाळी ओफिसमधुन, म्हणजे जमेल ना, नको नको जमवच आणि सहाच्या आत ये घरी कळलं का? आणि येताना लाडुचा बॉक्स घेउन ये...." आई.

" ते सगळं थिक आहे पण......." नेहा.

खरतर इकडे नेहाला टेंशन आलं होतं. घरी नक्कि काय चाललयं याचा पक्का नाही पण किंचितसा का होईना तिला अंदाज येउ लागला होता.

"....पण आहे काय घरी? काही कार्यक्रम आहे का? कुणी यायचं आहे का? मामा-मामी, मावशी वगैरे कुणी? आणि लाडु कशाला? घरामधलं सगळं स्वीट संपलं?" नेहानं एका दमात विचारलं.

" हो म्हणजे तसा कार्यक्रमच आहे घरी. आपल्या घरी पाहुणे येणार आहेत गं....." आई.

नेहा आलेला अंदाज आता हळुहळु सत्याकडे चालु लागला होता. जसाजसा वेळं आणि या दोघींचं बोलणं होत हतं तस-तस नेहाला अजुन टेंशन येत होतं.

"....तो तुला समीर आठवतोय ना..!! मागे तुला फोटो दिला होता तो...तो येतोय संध्याकाळी त्याच्या आईबाबांसोबत आपल्याकडे...तुला बघायला...!!!" आई.

नेहा जवळपास उडालीच होती. तिचा अंदाज आता स्वतः एक पुर्ण सत्य बनलं होतं. तरीही जराही तोल ढळु न देता तिनं बोलणं चालुचं ठेवलं..

"....ती सगळी मंडाळी साडे-सहाला वगैरे येतील म्हणुनच तु सहापर्यंत, शक्यतो सहाच्या आतच ये घरी. आणि हो तो लाडुचा बोक्स मात्र आणायला विसरु नकोस..." आई बोलत होती.

" ठिक आहे, मी पोचते घरी सहापर्यंत.."

मोठ्या प्रयत्नानं, सगळं टेशन आवाजात जराही येउ न देता अगदी सहजतेनं नेहा म्हणाली आणि फोन ठेवला. तिच्यासमोर आता आता एक मोठा प्रश्न उभा होता. आतापर्यंत बरीच स्थळं तिनं नाकारली होती पण हे असं नाकारनं अजुन किति दिवस चालणार होतं हा ही प्रश्नच होता ना....? केव्हा ना केव्हा घरी सांगाव लागणारच होतं...

मग केचातरी तर आज का नको हा विचार तिच्या मनात आला. तो तिन अगदी घट्ट पकडला आणि आपले बग आवरली. आपल्या जागेवरनं लगबगीनं बाहेर जायला उठली. जाता जाता फ्लोर मॅनेजरला म्हणाली...

" माझा हाफ डे लाव. पण-बिन काही नाही. इमर्जन्सी आहे. सो डु वॉटेवर टु डु धिस...ओके?"

अन उत्तराची वाटही न बघता मेन दरवाजातुन बाहेर गेली सुद्धा..!! तो बिचारा फ्लोर मॅनेजर तिच्याकडे पार आश्चर्यचकित होउन बघत होता.

त्याच्यासमोर फक्त हलणारा दरवाजा आणि ती होती.....जाणारी ...पाठमोरी………!!!

(क्रमशः )

-©अनिरुद्ध दिलीप प्रभू

कथा

प्रतिक्रिया

महासंग्राम's picture

3 Oct 2016 - 3:58 pm | महासंग्राम

प्रभू देवा जोरात झालय हे, पुभालटा !!!

पद्मावति's picture

3 Oct 2016 - 4:01 pm | पद्मावति

मस्तं. पु.भा.प्र.

लयंच खंग्री! पुभालटा.

मस्त.. पुढचा भाग लवकर टाका आणि जरा मोठाही चालेल :)

रातराणी's picture

4 Oct 2016 - 8:38 am | रातराणी

पु भा ल टा !

नाखु's picture

4 Oct 2016 - 2:18 pm | नाखु

लीला अपरंपार...

पुभाप्र