दसरा - एक छोटीशी कथा

स्वलिखित's picture
स्वलिखित in जनातलं, मनातलं
30 Sep 2016 - 4:31 pm

कर्णपुर्याची यात्रा तशी छान वाटली. आज दसर्याच्या दिवशी गर्दीला ऊत आला होता. चार मित्रांसोबत यात्रेत फिरन्याची मजा काही ओरच. लाल निळ्या पिवळ्या ट्युबच्या उजेडाने तो परिसर जनु इंदधनुष्याचा प्रकाश पडावा असे वाटत होते. पारदर्शक मोरपिसतुन पडनार्या प्रकाशा प्रामने यात्रा वाटली, भरपुर गोश्टींचा आनंद लुटला. मंदिरात देवीचं दर्शन घेतल आणि बाहेर पडण्यसाठी मार्ग शोधला. तिथेच एक आजी आजच सोनं विकत होत्या. पाहुन नवल वाटलं. औरंगाबाद सारख्या शहरातही आजकाल आपट्याची पानं विकली जावित याचच काय ते नवल!! आता औरंगाबादही ईतर शहरांसोबत मोजलं जानार याचं दुख:ही झालं.
वीस रुपयाला दोन फांद्या विकत घेतल्या. हे पाहुन बाकी चौघानी पन ते सोनं विकत घेतलं. आणि तिथेच सोन्यासारखी पानं दिली आणि दसर्याच्या शुभेच्या दिल्या.. दसर्याच्या शुभेच्छा भाऊ तुला
“तुला सुदधा..”
“घेरे भाड्खाऊ तु पन”
झालं शुभेच्या झाल्या की शिव्या सुरु. मैत्री शिवाय पुर्ण होतच नाही असा गैरसमज आहे आज काल, की खरच मैत्रीत शिव्या द्यावा लगतात, संभ्रम आहे हो हा!!
आम्ही कमानीतुन बाहेर पडलो आणि स्टेशनरोड वर चालु लागलो. थोडिच लोकं पायी चालत होती, बाकी सारे गाडीवर, गाड्यावर सुसाट येत जात होती. चार मित्र सोबत होते. येनार्या जनार्या मुलींना बघुन आपापसातच कहीतरी बोलत होते.
पोराना होती; पोरी बघन्याची.
“ए ती बघ ती, आपल्याच कॉलेजची ना”
“पन कुनासोबत आली असेल रे ती”
“ती घरी राहते हॉस्टेलात नाही घरी राहते, भाऊ असेल तीचा तो”
“ओ संत , भाऊ नाही सगळी फॅमिली सोबत पाहिजे लागला सांगायला.”
“गाप बसानारे फुकनिच्याहो सनासुदिच्या दिवशीतरी गप बसा” कुणितरी ग्यान झाड्ले
“ I think no any सन सुद ?? right सन सुद for hostel boys” (आमच्या ईथे ग्यान झाडनारे भाड्याने मिळतील)
.......................रोज इतकीच मजा घेणारा मी आज काही शांतच होतो. इतक्या मित्रांच्या गर्दीतही मी एकटाच हरवलो होतो. शांत मन आणि खिन्न चेहरा घेऊनच मी चालत होतो. क्षणात काहितरी अठवत होतं आठऊन हसत होतो एक बोचरी जखम ओली होत होती.
.....................................................................................................................................................
पांढरी शुभ्र टोपी, त्यावर घटातला चांगला शोधून काढलेला तुरा लावलेला. नवीन शर्ट, पॅंन्ट जुनीच घातलेली. सनाचा दिवस म्हनून बुट घातला नव्हता. हा एवढा मोठा आपट्याचा झाडाचा फाटा घेऊन स्वारी मित्रांच्या सोबत तिच्या घरासमोर येऊन ठेपली.
“ए गण्या आधी तु जा”
“का?”
“आरं तिची मोठी बहिण ओवाळीत हाय” वाड्याच्या आत डोकावुन बघत मी गन्याला सांगितलं
“अन जाऊन काय करु?”
“तु काय करु नकोस, तुझ्या पाठ मीच येनार हाय ते, तुला तिची बहिन ओवळीन आण मला ओवाळायच्या टायमाला ती तिच्या बहिणीला घरात लावुन तबक हातात घेईन, तु जा फक्त आत”
“आयला, तुझ्या फयद्यासाठी मला बळी बनीव्तो व्हय रं”
“तु जारं .., न्हाय तर दुसरच कोणीतरी वाड्यात घुसायचं मग सगळाच राडा” असं म्हणत मी गण्याल्या जवळ जवळ वाडात ढकललाच!!......
.....................................................................
.......... द्सरा, दसर्याचा सन हा. संध्याकाळी आपट्याच्या झाडाच्या मोठ्या मोठ्या फांद्या गावाच्या बाहेर घेऊन जातात तेही वाजत गाजत. Dj नाही रे बाबा आराधी मंडळ वाजत गाजत घेऊन जातं गावाच्या बाहेर. मग गावचा पाटिल त्याची त्याची पुजा करणार आरती करुन ताट खाली टेकते न टेकते तोच बाकीच्या मंडळींनी ते जितकं लुटता येईल तितकं लुटायचं आणि गावात आणुन ते घरोघरी वाटायचं. त्यावेळी घरातील स्त्रिया ओंक्षण करतात ही अशी प्रथा .
................................
“जा आत तु म्हनत होतास तसच घडलं, आमच्या वहिनी आल्या आहेत ओवाळायला”
“बरं भावा तु म्हणतोस म्हनुन जातो.”
“जस काय आम्ही नाही म्हणल्यावर जाणारच नाहीस असा बोलतोस, जा भावा तु जा”
आणि स्वारी एखदाची वाड्यात आली. आपल्याच मानसाला पाहुन जशी एखादी लाजुन नजर खाली घालते तशी ती नजर पन गोर्या गालावर मंद हसु.वाटलं जीव जातो कि काय . पांढर्या रंगाचा पंजाबी ड्रेसवर , पदराप्रमाने ओढनी डोक्यावरुन गळ्याभोवती पदर घ्यावा तशी घेतलेली. पन मिश्किल नजरने मान तशीच खाली घातलेली, वाट पाहत कुनाची तरी. का जाने पन मनात काही ओळी आठवल्या.
ना नजर खिळलि माझ्यावरी ह्रदय कठे हे गुंतले
ओतले प्राण मीही काय ही............(जाऊ दे ना मला तरी कुठे कविता येते)
ऐवढ्यात गळा खरखण्याचा आवाज आला,मी भानावर आलो, बहुधा तिची खुन होता , आसपास कुनिच नव्हते, तिचि नजर अजुनही खालीच होती.
थोडासा पुढे झालो. सर्व काहि माहीत असताना सुद्धा मौन तुटावे म्हणुन प्रश्न केला ‘पाटावर कोणता पाय पहिल्यांद्या ठेऊ? उजवा कि डावा” काय बावळट सुरुवात होती ही.
“उजवा” मिश्कील स्वरातच उत्तर मिळले. आणि एकदचा पाटावर बसलो. औक्षणाचा विधी पार पडेपर्यंत गोल फिरणार्या दिव्याकडे गरागरा डोळे फिरवुन पाहने चालुच एवढ्यात हुंकाराची तंबी मिळाली. बहुदा हे तिने पहिले होते. तिच्याकडे पाहत राहण्याचा मोह मात्र मला आवरता आला नाही.
पेढ भरवण्यासाठी तिने हात पुढे केला आणि मीही अर्धाच पेढा खाल्ला. शिल्लक रहिलेला तिने पुन्हा ताटात ठेवला. आता माझी वेळ होती. डाव्या खांद्यावर ठेवलेल्या एवढ्या मोठ्या फांदीची हातात बसतील तेवढी पाने काढली आणि ताटात टाकली.
“बस एवढीच माझ्यासाठी” तिने हसत प्रश्न केला. आणखी हातात बसतील तेवढी पाने काढुन ताटात टाकली.
“एक सांगु”
“काय”
“आज खुप छान दिसतेस”
हसत हसतच “हो का” असं म्हनत तिने ताटातील दोन पानं आणि अर्धा पेढा घेतला आणि घाईतच घरात जायला निघाली.एवढ्यात मागे ओळुन म्हणाली. “म्हणाला असतास तर साडी नेसले असते मी” आणि तशीच वाड्यात निघुन गेली.
मी पन वाड्याच्या बाहेर आलो. सुरज्या म्हणाला “आता मी जाऊ?” त्याला वाड्यापासुन दुर ढकलतच म्हनालो...
“चला ! दसरा संपला”

रेखाटनविरंगुळा

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

30 Sep 2016 - 4:48 pm | टवाळ कार्टा

याकदम झ्याक ;)

नाखु's picture

30 Sep 2016 - 4:54 pm | नाखु

सोन लुटलं (गेलं) लका बघता बघता !!!!

प्राची अश्विनी's picture

30 Sep 2016 - 5:55 pm | प्राची अश्विनी

बस् यादे रह जाती है

“चला ! दसरा संपला”

भारीच की.

स्वलिखित's picture

8 Oct 2016 - 1:07 pm | स्वलिखित

धन्यवाद मैया

पिलीयन रायडर's picture

1 Oct 2016 - 9:12 am | पिलीयन रायडर

छान! :)

विवेकपटाईत's picture

1 Oct 2016 - 11:27 am | विवेकपटाईत

मस्तच

स्वलिखित's picture

8 Oct 2016 - 1:07 pm | स्वलिखित

मग कस तर!!!

रातराणी's picture

1 Oct 2016 - 11:38 am | रातराणी

छान! कथा आवडली!

निखिल निरगुडे's picture

6 Oct 2016 - 8:22 pm | निखिल निरगुडे

भारीच लिहिलय!

उल्तानं's picture

7 Sep 2017 - 1:34 am | उल्तानं

आवडलं आपल्याला

रुपी's picture

27 Jan 2018 - 3:12 am | रुपी

छान कथा :)

Jayant Naik's picture

1 Feb 2018 - 1:23 pm | Jayant Naik

कथा आवडली .