ऊरी...

अर्थहीन's picture
अर्थहीन in जनातलं, मनातलं
29 Sep 2016 - 11:20 am

पहाटे झोपेत असताना
काशमीरात तैनात असलेल्या मराठा लाईट इन्फन्टरीतल्या एका मित्राचा फोन येतो...... आवाज कमालीचा दबलेला... माझा जीव कातरून जातो...
.
तो म्हणतो- सच्या घरी फोन कर रं माझ्या
---बायको -दोन बारकी लेकरं -कुणीच कशी फोन उचलनायती... आता ड्युटी संपली- पहाटेपासणं करतोय फोन...
.
.
मी त्याच्या घरी फोन करतो... 12-13 वेळात एकदाही फोन उचलला जात नाही... काळजी वाटायला लागते........
.
.
गावाकडच्या एका मित्राला त्याच्या घरी जाऊन यायला सांगतो...
.
.
परत फोन करतो... पलीकडून वाहिनीचा घाबरलेला
-(कधीपासून) रडत असलेला आवाज येतो...
.
थोडासा चिडलेला मी विचारतो --फोन का उचलत नव्हता...??
.
.
वाहिनी रडायला लागतात... जोरात!
बांध फोडतात...
त्यांचा झालेला अवतार -मला डोळ्यासमोर स्पष्ट दिसायला लागतो... तोंडा नाकातून गळत असलेली लाळ -माझ्या 250 किलोमीटर दूर असलेल्या हातावर पडायला लागते...
.
शेवटी रडत-रडत त्या एवढंच म्हणू शकतात...
.
.
.
.
फोन उचलायला भीती वाटतेय भैय्या आता... जीव फाटत चाल लाय हळूहळू माझा
-----------------------------------------------------------------------------------------

कथामुक्तकसमाजजीवनमानविचारलेखअनुभव

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

29 Sep 2016 - 12:25 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

लेका सरसरुन काटा आला अंगावर..

टिवटिव's picture

30 Sep 2016 - 6:30 am | टिवटिव

+१

शाम भागवत's picture

29 Sep 2016 - 12:37 pm | शाम भागवत

साधारण परिस्थितीतही खरच रात्री अपरात्री आलेला फोन नको वाटतो.
इथे तर नवरा काश्मिरात आहे.

शुभं भवतु

llपुण्याचे पेशवेll's picture

29 Sep 2016 - 1:04 pm | llपुण्याचे पेशवेll

भारताने पाकीस्तान व्याप्त काश्मिरात हवाई हल्ले केले आहेत.

वरुण मोहिते's picture

29 Sep 2016 - 1:16 pm | वरुण मोहिते

+१

पद्मावति's picture

29 Sep 2016 - 1:25 pm | पद्मावति

खुप सुरेख!

भम्पक's picture

29 Sep 2016 - 1:28 pm | भम्पक

.........!!!!

टवाळ कार्टा's picture

29 Sep 2016 - 1:29 pm | टवाळ कार्टा

:(

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Sep 2016 - 1:39 pm | डॉ सुहास म्हात्रे

:(

राजकीय चुकांची आणि राजकीय दुबळेपणाची किंमत, सजग नसलेल्या जनतेला... आणि सबळ असलेल्या सैन्यालाही मोजावी लागते, हे दुर्दैवी सत्य आहे :(

नाखु's picture

29 Sep 2016 - 2:51 pm | नाखु

तंतोतंत सहमत.

मिपा विचारवंत्त संदीप ताम्हणकरांनी या लेखाची रोज किमान ५ तरी पारायणे करावीत अशी माझी शिफारस आहे.

भोट सिव्हीलीयन नाखु

ज्याक ऑफ ऑल's picture

29 Sep 2016 - 1:50 pm | ज्याक ऑफ ऑल

वाचताना राग , वेदना , चीड ... सगळं एकच वेळी अनुभवलं ...

लेखनाला चांगलं म्हणावं का नाही ... याबद्दल मत होत नाहीये , मन धजावत नाहीये ... !!

अत्रुप्त आत्मा's picture

29 Sep 2016 - 1:54 pm | अत्रुप्त आत्मा

काटा आला अंगावर!

अशी परिस्थिती आपल्या देशाचे रक्षण करणार्‍या कोणत्याही सैनिकावर यापुढे येउ नये !
होय, आम्ही LOC पार करुन अतिरेक्यांचा खात्मा केला : इंडियन आर्मी

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दिल ले डूबा मुझको अराबिक आँखों में आज लूटा लूटा मुझको फ़रेबी बातों ने... :- AIRLIFT

पैसा's picture

29 Sep 2016 - 2:40 pm | पैसा

काळजीने सैनिकांच्या घरची मंडळी रोज हजार मरणे मरत असतात. हे कधे थांबायचं!

अर्थहीन's picture

29 Sep 2016 - 4:05 pm | अर्थहीन

धन्यवाद सर्वान्चे...

मास्टरमाईन्ड's picture

29 Sep 2016 - 4:18 pm | मास्टरमाईन्ड

काटा आला..

अभ्या..'s picture

29 Sep 2016 - 6:36 pm | अभ्या..

अर्रर्र, काय रे हे.
माफ कर माय. एकदोन विजयाने हुरळतो आम्ही.
तुमचा जीव तिकडं गहाणवट पडला आमच्यापायी.

संदीप डांगे's picture

29 Sep 2016 - 7:12 pm | संदीप डांगे

वरिल सर्व प्रतिक्रियांशी सहमत.

अवांतरः
चांगलं लिहिलंय ह्यात वाद नाही पण फेसबुकवर फिरत होतं हे... त्या मूळ पोस्टचे लेखक तुम्हीच का?

खटपट्या's picture

29 Sep 2016 - 9:30 pm | खटपट्या

हेच म्हणतोय...

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

30 Sep 2016 - 9:01 am | मिसळलेला काव्यप्रेमी

जर तुम्ही सचिन अटकरे यांची पोस्ट वाचली असेल तर हेच ते.

अर्थहीन's picture

30 Sep 2016 - 11:11 am | अर्थहीन

तो मी नव्हेच...

पैसा's picture

30 Sep 2016 - 11:55 am | पैसा

हा लेख कोणाचा आहे? तुम्ही स्वतः लिहिला आहे का?

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

30 Sep 2016 - 12:26 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

नौटंकी साला..

स्रुजा's picture

29 Sep 2016 - 8:25 pm | स्रुजा

अगं आई गं ! काय होत असेल घरच्यांचं कल्पना पण करवत नाही..

रातराणी's picture

30 Sep 2016 - 9:22 am | रातराणी

:(

कैलासवासी सोन्याबापु's picture

30 Sep 2016 - 12:04 pm | कैलासवासी सोन्याबापु

च्यायला उगाच वाचलं! :(

नीलमोहर's picture

30 Sep 2016 - 12:07 pm | नीलमोहर

:(