अनुवाद मदत हवी आहे.

नीलकांत's picture
नीलकांत in जनातलं, मनातलं
25 Sep 2008 - 12:11 pm

नमस्कार,

लोकायत.कॉम हे मराठीतून संगणक तंत्रज्ञान विषयक लेखन करण्यासाठीचं संकेतस्थळ आहे हे आपणा सर्वांना माहितीच आहे. सध्या या संकेतस्थळावर वेगवेगळ्या विषयावर लेख लिहीने चाललेले आहे.

यापैकी एक लेखमाला आहे मुक्तस्रोत सॉफ्टवेअर्स बद्दल. मुख्यतः लिनक्स विषयी मराठीतून तपशीलवार माहिती देण्याचा विचार आहे. हे करतांना एक अडचण जाणवली , ती म्हणजे या मुक्तस्रोत चळवळीचं सार सांगणार्‍या यांच्या परवाण्याचं मराठी भाषांतर उपलब्ध नाही आहे. मी लिनक्स कसं वापरावं याबद्दल लिहू शकतो मात्र या कायदेशीर परवाण्याचं मराठी भाषांतर करणं मला कठीण आहे. त्यासाठी मिसळपाव वरील मित्रांना / वरिष्ठांना या परवाण्याचं मराठी भाषांतर करून देण्याची विनंती करीत आहे.

मुक्तस्रोत आणि त्या मागचा विचार जाणण्यासाठी ह्या परवाण्याचा उपयोग होईल असं वाटतं. मुक्तस्रोता मागची भूमीका सुध्दा लक्षात येईल. अनेक लोकांना या लेखाद्वारे लिनक्सची ओळख होईल. ओळख होतानाच त्या लोकांपर्यंत मुक्तस्रोतामागची भूमीका पोहोचली तर कदाचित मुक्तस्रोतात योगदान देणार्‍या मराठी संख्येत वाढ होईल आणि मराठीला त्याचा लाभ होईल.

अनुवाद खुप साचेबंद असावा का नसावा ते तुम्ही ठरवा. मात्र मुख्य हेतू आहे की त्या परवाण्यातील गाभा या अनुवादात असावा. त्या अनुवादासोबत मुळ परवाण्याचा दूवा देण्यात येईलच. त्यामुळे खुप कसरती कराव्या लागणार नाहीत.

मात्र या दस्तऐवजाला संदर्भमुल्य लाभू शकतं त्यामुळे ते अधीक आखीव असावं अशी कुणाची भूमिका असेल तर त्यावर सुध्दा विचार होऊ शकतो.

हे परवाणे जरा लांब आहेत.

लिनक्स जीएनयु लायसन्स : ३००० शब्द
जीपीएल : ५६६० शब्द

त्यामुळे एकट्याने हे काम न करता काही लोक एकत्र येऊन केल्यास लवकर होईल आणि या विषयावर चर्चा सुध्दा करता येईल.

परवाण्याचे दूवे देत आहे.
जीएनयु लायसन्स येथे आहे. http://www.linux.org/info/gnu.html
जीपीएल येथे आहे. http://www.gnu.org/copyleft/gpl.html

नीलकांत

भाषातंत्रमदतमाहितीभाषांतर

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 Sep 2008 - 12:29 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मी मदत करू शकते (अनुवाद करायला जमतं का नाही माहित नाही). पण गेली चार वर्षं माझं आयुष्य "विण्डोजविरहीत" ठेवल्याबद्दल मी लिनक्ससाठी काहीतरी करू शकले तर बरं वाटेल.

अदिती

यशोधरा's picture

25 Sep 2008 - 12:30 pm | यशोधरा

नीलकांत, मदत करायला आवडेल.

जैनाचं कार्ट's picture

25 Sep 2008 - 12:32 pm | जैनाचं कार्ट (not verified)

मी पण मदत करेन !

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

आनंदयात्री's picture

25 Sep 2008 - 12:56 pm | आनंदयात्री

अवांतर लेखन होउ नये म्हणुन तुमच्याशी या विषयावर खरडवहीत बोलायला आवडेल :)

अमिगो's picture

25 Sep 2008 - 12:36 pm | अमिगो

मला पण मदत करायला अवडेल.

नंदन's picture

25 Sep 2008 - 12:42 pm | नंदन
विजुभाऊ's picture

25 Sep 2008 - 12:43 pm | विजुभाऊ

मी ही मदत करु शकेन

डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत

आनंदयात्री's picture

25 Sep 2008 - 12:56 pm | आनंदयात्री

अवांतर लेखन होउ नये म्हणुन तुमच्याशी या विषयावर खरडवहीत बोलायला आवडेल :)

बेसनलाडू's picture

25 Sep 2008 - 1:29 pm | बेसनलाडू

(मदतनीस)बेसनलाडू

ऋषिकेश's picture

25 Sep 2008 - 1:33 pm | ऋषिकेश

मी भाषांतर करू शकेन नव्हे आवडेल.. पण संकलन आणि व्यवस्थापन(कोणी काय करायचं इ.) कोणीतरी करावे
-('मिसळ'लेला) ऋषिकेश

अभि's picture

25 Sep 2008 - 2:24 pm | अभि

याचाही अनुवाद करेल का कोणी ?
हि प्रतिक्रिया वरील विषयाला सुसंगत नाही तरीही
http://www.citehr.com/5056-journey-lifetime-must-read.html

धनंजय's picture

25 Sep 2008 - 8:34 pm | धनंजय

फार चांगली गोष्ट.

आता तुम्ही लेखाचे ~१० भाग करा, आणि आम्हाला एक-एक वाटप करा. कोणाला उत्तम पारिभाषिक शब्द सुचला की ते या धाग्यावर देतील.

सध्या अनुवादक आहेत :
१. नीलकांत
२. १_६
३. यशोधरा
४. जैन
५. अमिगो
६. नंदन
७. विजुभाऊ
८. बेसनलाडू
९. ऋषिकेश
१०. धनंजय

मी स्वतः अजुन लिनक्स चा फारसा वापर केलेला नाही. पण त्याविषयी थोडीफार माहिती आहे. जर माझी काही मदत होऊ शकत असेल, तर मी या उपक्रमात सहभागी होऊ ईच्छितो.

मुशाफिर.

नीलकांत's picture

26 Sep 2008 - 12:47 am | नीलकांत

तुम्हा सर्वांच्या सक्रिय सहभागाबद्दल सर्वप्रथम धन्यवाद.

सध्या ग्नू लायसन्सचा अनुवाद करायचे ठरले आहे. शक्य तेवढ्या लोकांना व्य. नि. पाठवले आहेत.
अनुवादाचा कमाल कालावधी एका आठवड्याचा ठरवलेला आहे. जेवढ्या लवकर शक्य असेल तेवढा प्रयत्न करू या.

या दरम्यान काही अडचणी आल्यास येथे लिहा किंवा मला व्य. नि. पाठवा.

नीलकांत

धनंजय's picture

26 Sep 2008 - 7:19 am | धनंजय

"प्रोग्रॅम" आणि "सॉफ्टवेअर" दोन्ही शब्दांच्या जागी मी "प्रणाली" शब्द वापरत आहे. लोकायत-डॉट-कॉम वरील काही लेखांमध्ये असाच वापर झालेला दिसतो, आणि संदर्भामुळे कुठलाच घोटाळा होत नाही.

GNU शब्द "ग्नू" असा लिहिला आहे. वर नीलकांत यांनी तसाच लिहिला आहे. ग्नू फाउंडेशनच्या संकेतस्थळावर तसाच उच्चार सांगितला आहे. GNU शब्दाची फोड "GNUझ नॉट युनिक्स" अशी स्वयंचक्री (रिकर्सिव्ह) केल्यामुळे त्या शब्दाचे/फोड केलेल्या वाक्याचे भाषांतर दुरापरस्त आहे.
ग्न्यू = ग्-न्-यू = "ग्न्यू नसे यूनिक्स" अशी फोड शक्य आहे, पण मग कोणाला ओळखू येणार नाही असे ग्न्यू ('य' घातलेले) नाव उत्पन्न होईल.

त्यापेक्षा "ग्नू" असेच बरे.

ऋषिकेश's picture

27 Sep 2008 - 4:16 pm | ऋषिकेश

अरेच्या हे मी वाचलेच नाहि.

मी प्रोग्रॅमला आज्ञावली आणि सॉफ्टवेअरला प्रणाली वापरला आहे. GNU मी जीएनयु असा लिहिला आहे. चालेल का बदलून परत पाठवू?

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

नीलकांत's picture

27 Sep 2008 - 2:26 pm | नीलकांत

नमस्कार,

आता पर्यंत धनंजय आणि ऋषिकेश यांनी अनुवाद करून पाठवलेला आहे.

त्यांचे मनापासून आभार.

नीलकांत

घाशीराम कोतवाल १.२'s picture

27 Sep 2008 - 4:50 pm | घाशीराम कोतवाल १.२

मला सुद्धा आवडेल तुमच्या बरोबर काम करयला

यशोधरा's picture

27 Sep 2008 - 4:52 pm | यशोधरा

प्रोग्रॅमला आज्ञावली हे समर्पक वाटते...

नीलकांत's picture

27 Sep 2008 - 4:58 pm | नीलकांत

आपण जे काही मराठी प्रतिशब्द वापरणार आहोत त्याची सूची आणि त्याचा इंग्रजी समानार्थी शब्द खाली संदर्भासाठी देऊया. म्हणजे अडचण जाणार नाही. आणि तसेही आपण संदर्भासाठी मुळ परवाण्याचा दूवा तेथे कायम ठेवणारच आहोत.

नीलकांत

नीलकांत's picture

28 Sep 2008 - 5:21 pm | नीलकांत

आता पर्यत

धनंजय,
ऋषिकेश,
यशोधरा.

यांनी अनुवाद पाठवलेले आहेत.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Oct 2008 - 11:59 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मराठी प्रतिशब्द हवे आहेत:

Copyright
a नाही to Copy (प्रत/प्रती बनवणे?)
warranty

आनंदयात्री's picture

2 Oct 2008 - 12:04 pm | आनंदयात्री

Copyright - प्रताधिकार
warranty - पोकळ हमी

नीलकांत's picture

4 Oct 2008 - 10:58 am | नीलकांत

आतापर्यंत

धनंजय,
ऋषिकेश,
यशोधरा,
१_६ विक्षिप्त अदिती

यांनी अनुवाद पाठवले आहेत. बाकी लोकांच्या अनुवादाची वाट पाहत आहे.

हे अनुवाद लवकरच प्रकाशित करतो.

नीलकांत

नीलकांत's picture

2 Nov 2008 - 12:32 pm | नीलकांत

अनुवाद प्रकल्प खुप रेंगाळला आहे.

अद्याप तीन लोकांनी अनुवाद पाठवलेला नाहीये. त्या लोकांना काही कामामुळे शक्य नसेल तर आपण ह्या वेळी ते काम इतर लोकांना देऊ शकतो.

कारण हे एकत्र केलेले अनुवाद एकत्र जोडतांना सुध्दा त्यात एकवाक्यता येण्यासाठी काही काम करावे लागेल. हा दुसरा टप्पा आहे . तो आता लवकरच करावा आणि हे भाषांतर प्रकाशित करावं अशी मागणी होत आहे.

नीलकांत

आनंदयात्री's picture

4 Nov 2008 - 10:11 am | आनंदयात्री

कार्यबाहुल्यामुळे कुणाला अनुवाद देणे शक्य नसल्यास तसे सांगावे म्हणजे इतर स्वयंसेवकांकडुन ते करवुन घेता येईल.

देवदत्त's picture

18 Jan 2009 - 12:37 am | देवदत्त

अरेच्च्या.... हे माहितच नव्हते.... लोकायत वर पाहिल्यावर इथे खोदकाम करून पाहिले...
मी काही मदत करू शकतो का?