हिमालय, रॉली आणि मी. भाग २ : लेह - त्सो मोरीरी

किल्लेदार's picture
किल्लेदार in भटकंती
31 Aug 2016 - 9:50 am

हिमालय, रॉली आणि मी. भाग १ : लेह - तुर्तुक

माझा एक आवडता चित्रकार आहे, व्हिन्सेंट वॅन गॉग. सढळ हाताने आणि अतिशय कल्पकतेने केलेला रंगांचा वापर ही याची खासियत. कॅफे टेरेस ऍट नाईट हे त्याचे तैलचित्र बघितले आणि त्यावर फिदाच झालो. निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर केलेला पिवळ्या रंगाचा वापर अफलातून आहे. याची चित्रे अतिशय ओबड-धोबड असली तरी एकंदर मांडणी आणि रंगसंगतीमुळे काळजाचा ठाव घेतात.

फ्रांस मधल्या या चित्रकाराची चित्रं प्रत्यक्ष बघण्याचा योग आजतागायत कधी आला नाही पण माझी ती हौस हिमालयाने नेहमीच पूर्ण केली. आकाशाच्या प्रचंड कॅनव्हॉस वर काढलेली, अफलातून रंगसंगती असलेली त्याची ही चित्रे कुठे कुमाऊंमधल्या पंचचुली शिखरांप्रमाणे आखीव-रेखीव आहेत तर कुठे त्याच्याच शेजारी असलेल्या गढवाल मधल्या केदारनाथ किंवा चौखंबा सारखी ओबड-धोबड. हिमालयाची ही चित्रे सर्वत्र बघायला मिळतात. त्याचे हे कलादालन आपल्याकडे काश्मीर ते अरुणाचल प्रदेश एवढे लांबच लांब पसरलेले आहे.

इतक्या प्रचंड कॅनव्हॉस मधल्या शक्य तेवढ्या फ्रेम्स डोळ्यांनी आणि आठवण म्हणून कॅमेराने टिपायचा मी आजवर प्रयत्न केला. त्यानेही उदार मनाने मला त्या घेऊ दिल्या. माझ्यावर कधी कॉपीराईट चा खटला त्याने भरलेला नाही. एवढी अफाट चित्रे काढायची म्हणजे कॅनव्हॉसही अवाढव्य हवा आणि कलर पॅलेटसुद्धा तेवढेच समृद्ध. मला वाटतं की लडाख हे आपल्या हिमालयाचे कलर पॅलेट आहे.

याचा अनुभव आपल्याला लडाख मध्ये पदोपदी येतो. वातावरण स्वछ असेल तर दिल्ली-लेह विमानप्रवासात याची एक छोटीशी झलक आपल्याला बघायला मिळते. पण त्याची खरी मजा घेता येते रस्त्यानं मनसोक्त भटकताना. एखाद्या चित्रकाराच्या पॅलेटमधे दिसावेत असेच इतस्ततः विखुरलेले रंग आणि छटा ठिकठिकाणी दिसतात. पण हे पॅलेट बघायचे असेल तर मात्र फक्त चित्रे बघण्याचा अट्टाहास सोडून द्यावा. लेह ते त्सो मोरीरी हा माझा यावेळचा मार्ग मी फक्त त्सो मोरीरी बघावा म्हणून ठरवला नव्हता तर या मार्गावर असलेल्या अद् भुत रंगसंगतीने सुद्धा मला भुरळ घातली होती.
https://c7.staticflickr.com/9/8244/28797036510_c142798730_z.jpg
https://c4.staticflickr.com/9/8510/29006684491_b5479dfdb4_z.jpg
लेह ते त्सो-मोरीरी हा पल्ला बराच मोठा आहे. जवळपास सव्वादोनशे किमी. एका दिवसात जाऊन परत लेह ला येणं तर अशक्यच. त्यामुळे अगदी ब्राह्म-मुहूर्तावर मी आणि रॉलीने लेह सोडले. दोघांनीही निघताना पोट भरून खाऊन घेतले कारण या मार्गावर काहिही मिळण्याची शक्यता कमीच. रॉलीचाही थोडा जादा खुराक बरोबर घेतला.

सर्वप्रथम शे-पॅलेसला सुप्रभात केले पण तो गप्प राहिला. त्याचे बहुदा सकाळचे स्तोत्र चालू असावे.
https://c7.staticflickr.com/9/8271/29225251182_e7b08b5c33_z.jpg
थोडे पुढे गेल्यावर लगेचच डावीकडे ठिकसे मोनास्टरी आणि उजवीकडे थोड्या आडवाटेवरच्या स्टाकना आणि माथो मोनास्टरीज आत्ताच जाग्या झाल्याश्या वाटत होत्या. त्यांनाही फारसा त्रास न देता मी पुढे निघालो. इथेच कुठेतरी स्टाकमो नावाचे छोटे, बघण्यासारखे गाव आहे पण आज काही वेळ नव्हता. असो ते परत कधीतरी.
https://c7.staticflickr.com/9/8707/29299638006_c7b1d7e0fa_z.jpg
https://c4.staticflickr.com/9/8332/29254219611_e20373c87e_z.jpg
https://c5.staticflickr.com/9/8242/29299441076_c5cf8eaeaf_z.jpg
उजवीकडे हिरवट निळी सिंधू नदी संथ वाहत होती आणि बराच वेळ आता ती मला सोबत करणार होती.
https://c6.staticflickr.com/8/7696/29006657141_ffcc19729b_z.jpg
https://c4.staticflickr.com/9/8318/29006653211_d3c875cc4b_z.jpg

कारू ला पोहोचलो तेव्हा हिमालयाच्या कलर पॅलेट मधले थोडे थेंब दिसू लागले. आता अगदी थेट त्सो मोरीरी पर्यंत माझा मार्ग त्याच्या या पॅलेट मधूनच होता. कारू ते उपशी गावापर्यंत बुलेट्स चा एक ताफा माझी सोबत करत होता. त्यानंतर तो ताफा धडधडत मनालीकडे वळला आणि मी आणि रॉली त्सो-मोरीरी कडे. मला हायसे वाटले.
https://c3.staticflickr.com/9/8824/28797057850_3bd7db65a4_z.jpg
https://c8.staticflickr.com/9/8465/29006677351_5a182eb9e9_z.jpg
साधारणतः हे अंतर सरळ सरळ कापायला सहा-सात तास पुरेसे व्हावेत पण मला मात्र दहा तासांपेक्षाही जास्त लागले आणि ते सुद्धा मी अंधार पडण्याच्या भीतीमुळे स्वतःला सतत पुढे पुढे ढकलत होतो म्हणून. अन्यथा एवढा कमी वेळ या भागाला देणे म्हणजे भरल्या ताटावरून घाईघाईने दोन घास खाऊन उठण्यासारखे आहे.

रंगीत डोंगरांमधून नागमोडी वाहणारी सिंधू नदी आणि तिच्याशी स्पर्धा करू पाहणारे बी.आर.ओ.ने बांधलेले तसेच नागमोडी रस्ते, छोटे अरुंद पूल, रस्त्याच्या प्रत्येक वळणावर बदलणारे रंग आणि छटा, अचानक कुठूनसे वाटेवर येणारे बर्फाळ पाण्याचे प्रवाह आणि मधूनच माणसाचं अस्तित्व दाखवणारी लहान लहान खेडी. त्यांतली काही तर वस्ती उठून गेली आहे अशी शंका येण्याइतपत शांत. कुठेच कसली लगबग नाही की गडबड नाही. हे सर्व डोळ्यात साठवायचे म्हणजे भरपूर वेळ हवा. इथे घाई उपयोगाची नाही.
https://c6.staticflickr.com/9/8143/29083085005_7e5a48f878_z.jpg
https://c6.staticflickr.com/9/8223/29083059365_aa5fbcba05_z.jpg
https://c6.staticflickr.com/9/8440/29006598741_5e4822b5df_z.jpg
https://c1.staticflickr.com/9/8687/28797012440_254e56af08_z.jpg
https://c5.staticflickr.com/9/8436/29046128700_6b76ece26d_z.jpg
https://c1.staticflickr.com/9/8376/28710053904_16ebed0243_z.jpg
https://c5.staticflickr.com/9/8333/28797019180_fb9ff66f86_z.jpg
https://c3.staticflickr.com/9/8060/28978086482_3fec45d9b2_z.jpg
https://c6.staticflickr.com/9/8744/28465286293_9306276b63_z.jpg
https://c1.staticflickr.com/9/8217/29050476656_79197063b0_z.jpg
https://c5.staticflickr.com/9/8220/28797029380_53f16706c4_z.jpg
https://c7.staticflickr.com/9/8012/29046013230_1acfd89c5d_z.jpg
चुमाथांगहुन थोडे पुढे गेले की एक उजवीकडे एक छोटासा पूल आहे. इथूनच त्सो मोरीरी साठी वळलो आणि आधीच शांत असलेला रस्ता आणखिनच एकाकी झाला. सूर्य पश्चिमेकडे कलला होता आणि त्यात भर म्हणून डोक्यावर काळ्या ढंगांनीही गर्दी केली. मधेच सुमडो नावाचे एक लहानसे गाव दिसले पण कोणाही मनुष्यप्राण्याची चाहूल काही लागली नाही. एका वळणावर बर्फाळ ओढ्यात आरामात बसलेले याक आणि चरणारे काही जंगली घोडे मात्र मला थोडा दिलासा देऊन गेले. बर्फाचा हलकासा थर टाळूवर जमलेल्या आणि एखाद्या पिरॅमिडसारख्या दिसणाऱ्या टेकड्या, नुकतीच हिरवट लव आलेल्या मैदानातून गेलेला, जांभळी खडी असलेला रस्ता यातून मी आणि रॉली शक्य तिथे थांबत पण शक्य तितक्या जलद पुढे जात होतो. मधूनच पावसाचा आणि बर्फाचा हलका शिडकावा होत होता. काळजाला हात घालणारा निसर्ग त्याचवेळी काळजाचे ठोकेही चुकवू शकतो याचा प्रत्यय मला गेल्या वीस पंचवीस किमी मध्ये येत होता.
https://c7.staticflickr.com/9/8514/29304451886_d00747a43f_z.jpg
https://c1.staticflickr.com/9/8452/28796962240_53ba71537b_z.jpg
https://c1.staticflickr.com/9/8772/28462067864_606117cebd_z.jpg
एका छोट्या खिंडीतून रस्ता वळला आणि समोरचे दृश्य एकदम पालटले. लहान लहान डोंगरांनी वेढलेल्या एका विस्तीर्ण मैदानात गर्द टरकॉईज रंगाचा क्यागर त्सो आरामात पहुडला होता. पश्मिना मेंढ्यांचा एक लहानसा कळप खुरट्या कुरणांवर मनसोक्त चरत होता. इथेच तंबू गाडावा आणि निळ्या आकाशाखाली पडून रहावे अशी जबरदस्त उर्मी उफाळून आली खरी पण पाऊस आणि बर्फाच्या हलक्याश्या सपकाऱ्याने लगेच ती जिरली. क्यागर त्सो च्या कडेकडेने जाणारा काळा कुळकुळीत रस्ता आता ओला झाल्यामुळे निळ्या रंगात उजळून निघाला होता.
https://c6.staticflickr.com/9/8404/28712092653_cebe4529d0_z.jpg
https://c3.staticflickr.com/9/8185/28796944570_60e73d92d6_z.jpg
https://c8.staticflickr.com/9/8307/29083020015_41400ba242_z.jpg
https://c5.staticflickr.com/9/8068/28712097444_1a3b8f4b81_z.jpg
मनातली मरगळ कितीही कमी झाली तरी बाकी गात्रे काही बोलायची थांबत नाहीत. अंधार पडायच्या आत त्सो मोरीरी गाठून छप्पर शोधणे आता अत्यावश्यक होते. वर बघून देवाला विनंती केली की बाबा रे आता यापुढे ईष्ट स्थळी पोहोचेस्तोवर एकही चांगले दृश्य दाखवू नकोस नाहीतर माझे काही खरे नाही. डोळ्यांच्या बाजूला झापडं लावल्यासारखा मी भरधाव निघालो आणि यामुळे व्हायचे तेच झाले. मी रस्ता चुकलो. पण जर का चुकलो नसतो तर जे मला बघायला मिळाले त्याला मात्र मी मुकलो असतो. करझोक गावाच्या (रात्रीचे मुक्कामाचे ठिकाण) मी एकदम विरुद्ध किनाऱ्यावर होतो पण त्सो मोरीरीच्या या बाजूने जे काही समोर दिसत होते ते लाजवाब होते.
https://c5.staticflickr.com/9/8178/28978048652_47468e94d1_z.jpg
https://c2.staticflickr.com/9/8474/28465361433_60d37a8c1b_z.jpg

शेवटी हव्या त्या रस्त्याला लागलोच. रस्ता कसला ? वाळू, दगड आणि खडीने भरलेली रुंद पायवाटच. वाट लागणे म्हणजे काय हे आता बरोब्बर उमजत होते. बाहेर तर अंधारले होतेच पण आता आतूनही अंधारून यायला लागले.थोड्याही निष्काळजीपणाला इथे माफी नव्हती.

एकदाचे छप्पर मिळाले, दोन चांगले घास गिळायला मिळाले. गडद निळा त्सो मोरीरी अंधारात हळूहळू आणखिनच गडद होत गेला.बाजूचे करझोक गाव शांत झोपले होते. पोटात गेलेले दोन घास आणि दिवसभराच्या रपेटीमुळे आता जेवढा गारवा होता त्यापेक्षा जास्त जाणवायला लागला. मी माझ्या तंबूत गेलो आणि उबदार स्लिपींग बॅगमध्ये शिरुन दिवसभरातल्या चांगल्यावाईट अनुभवांच्या आठवणींत "रम"माण झालो.

रात्रीची पाच सहा तास गाढ झोप आणि सकाळी उठल्यावर समोरच नजरेस पडणारी त्सो मोरीरीची निळाई मनाची आणि शरीराची ताकद भरून काढायला पुरेश्या होत्या.

नितळपणाची व्याख्या .... त्सो मोरीरी....
https://c3.staticflickr.com/9/8497/28796946490_1f08252df8_z.jpg
करझोक गाव....
https://c2.staticflickr.com/9/8373/28732053753_b3b0667b4d_z.jpg
कियांग
https://c3.staticflickr.com/9/8040/28978046282_de6be68d19_z.jpg
दगडांच्या छोट्या राशी. कृतज्ञता, इच्छा व्यक्त करण्याची तिबेटी पद्धत.
https://c1.staticflickr.com/9/8378/28796948920_4e219bf418_z.jpg
रॉली
https://c3.staticflickr.com/9/8006/28796954890_c43eb1dd08_z.jpg
https://c4.staticflickr.com/9/8312/29336909195_597dee36ea_z.jpg

प्रतिक्रिया

महासंग्राम's picture

31 Aug 2016 - 10:00 am | महासंग्राम

तुफान फोटो आणि वर्णन .... लडाख इच्छा पुन्हा जागृत केली ... फोटो कैच्याकै भारी आलेत take a bow master

किल्लेदार's picture

1 Sep 2016 - 9:56 am | किल्लेदार

:)

मंजूताई's picture

31 Aug 2016 - 10:17 am | मंजूताई

लेख व फोटु !

किल्लेदार's picture

1 Sep 2016 - 9:57 am | किल्लेदार

:)

वेदांत's picture

31 Aug 2016 - 10:30 am | वेदांत

छान लिहीलय.. सगळे फोटो दिसत नाहीत..

किल्लेदार's picture

31 Aug 2016 - 6:33 pm | किल्लेदार

ऑफिस मध्ये फ्लिकर बॅन असेल तर असे होऊ शकेल.

यशोधरा's picture

31 Aug 2016 - 11:01 am | यशोधरा

सुरेख फोटो!

प्रचेतस's picture

31 Aug 2016 - 11:25 am | प्रचेतस

आर्टिस्टिक.

अप्पा जोगळेकर's picture

31 Aug 2016 - 11:47 am | अप्पा जोगळेकर

सुं द र.

वेल्लाभट's picture

31 Aug 2016 - 12:22 pm | वेल्लाभट

क ड क !

हा दिवस माझ्या अयुक्शात कधी येतोय कोण जाणे.

सुंदर, अप्रतिम, कडक, लाजवाब.
फोटोवरून नजर हटत नाही.

नेहमीप्रमाणेच सुरेख.

मोदक's picture

31 Aug 2016 - 1:37 pm | मोदक

झक्कास फोटो... __/\__

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 Aug 2016 - 1:47 pm | डॉ सुहास म्हात्रे

अप्रतिम, भयानक अप्रतिम !!! फोटो आणि वर्णन, दोन्हीही !

या वेड लावणार्‍या भागात जायचं म्हणजे, तीनचार आठवडे वस्ती करत करतच फिरायला जायला हवं !

किल्लेदार's picture

2 Sep 2016 - 4:18 pm | किल्लेदार

प्लॅन तसाच होता पण लेह मध्ये आंतरजाल न मिळाल्यामुळे गाशा गुंडाळून परत यावे लागले.

अनिरुद्ध.वैद्य's picture

31 Aug 2016 - 1:56 pm | अनिरुद्ध.वैद्य

फोटो फारच सुरेख!

दिपस्वराज's picture

31 Aug 2016 - 2:06 pm | दिपस्वराज

दुसरा मुजरा घ्या देवा ! खल्लास ....कातिल ....विलोभनीय (हा शब्द बऱ्याच दिवसांनी लिहिला ) ......कलात्मक ......अशा निसर्गासमोर आणि ते आम्हाला दाखवणाऱ्या समोर नतमस्तक. हे पाहून 'लेह ' मध्ये स्थायिक होण्याचा विचार मनात आला. आणि एकदातरी तुम्हाला भेटण्याची, गप्पा मारण्याची अनावर इच्छा झाली. पुन्हा एकदा तुमच्या सफारीला ......सलाम.

किल्लेदार's picture

1 Sep 2016 - 9:55 am | किल्लेदार

:)

प्रत्येक फोटो कम्पुटर वर डेस्कटॉप ठेवावेत इतके सुंदर आहेत.

सर्वांच्या सफारी, प्रवास वर्णनं, फोटो वाचून आता असं वाटायला लागलं आहे की लदाखला गेल्याशिवाय मनःशांती लाभणार नाही.

वामन देशमुख's picture

31 Aug 2016 - 4:06 pm | वामन देशमुख

सगळंच लई भारी!

रॉली हा शब्द जन्माला घातल्याबद्धल आभार!

सूड's picture

31 Aug 2016 - 4:07 pm | सूड

डोळे निवले.

नीलमोहर's picture

31 Aug 2016 - 6:28 pm | नीलमोहर

डोळ्यांचे पारणे फिटणे म्हणजे काय ते आज कळले,
शब्दातीत आहे सगळंच..

सुबोध खरे's picture

31 Aug 2016 - 6:49 pm | सुबोध खरे

+१००

टवाळ कार्टा's picture

31 Aug 2016 - 7:09 pm | टवाळ कार्टा

+१००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००

कपिलमुनी's picture

31 Aug 2016 - 7:23 pm | कपिलमुनी

सुंदर फोटो !

कॅमेरा व इतर टेक्निकल डिटेल शेयर केल्यास मार्गदर्शन होइल

किल्लेदार's picture

6 Sep 2016 - 6:34 pm | किल्लेदार

जुना कॅनन ४५० आणि कॅनन १००० कॅमेरे, १८-५५ आणि ५५-२५० च्या लेन्सेस

मृत्युन्जय's picture

31 Aug 2016 - 7:26 pm | मृत्युन्जय

+१००

स्रुजा's picture

1 Sep 2016 - 12:38 am | स्रुजा

अगदी अगदी !!!!

काय फोटो काढलेत !!!!! वर्णन तर ___/\___

स्रुजा's picture

1 Sep 2016 - 12:39 am | स्रुजा

अगदी अगदी !!!!

काय फोटो काढलेत !!!!! वर्णन तर ___/\___

पद्मावति's picture

1 Sep 2016 - 2:45 pm | पद्मावति

+१०००००००

पिलीयन रायडर's picture

31 Aug 2016 - 7:30 pm | पिलीयन रायडर

जीवघेणे फोटो...

खटपट्या's picture

31 Aug 2016 - 7:48 pm | खटपट्या

अरारारा ! काय ते फोटो. नीळे पाणी,ती हीमशीखरे, ती रंगाची उधळण... हे सर्व भारतात आहे? विश्वास बसत नाही.

मी कधी काळी या भागात गेलो तर परत येइन की नाही शंका आहे. सन्यासी सन्यास घेउन हीमालयात का जायचे ते आता कळले.

पाटीलभाऊ's picture

31 Aug 2016 - 7:57 pm | पाटीलभाऊ

अहाहा...किती सुंदर फोटो...आणि निळेशार पाणी..!
कार्यालयात बसून लडाखला फिरून आल्यासारखे वाटले.

ओयहोय, किल्लेदारा काय स्वर्ग फिरून आला देवा.
काय ते कलर्स, काय ती नितळ शांतता आणि कसले कंपोझिशन. व्हॅनगॉग कुठला आलाय ह्या निसर्गासमोर. अशी उधळण फक्त दैवी. कॅमेर्यात पकडायचे तुमचे कसब अफलातून, शब्दात मांडायचे सामर्थ्य अजून लाजवाब.
एका सुंदर प्रवासाचे साथीदार करताहात आम्हाला.
आभार तरी कसे मानावं कळेना.

किल्लेदार's picture

1 Sep 2016 - 9:55 am | किल्लेदार

:)

भटक्य आणि उनाड's picture

31 Aug 2016 - 9:17 pm | भटक्य आणि उनाड

लाजवाब,जीवघेणे, फोटो...

भटक्य आणि उनाड's picture

31 Aug 2016 - 9:44 pm | भटक्य आणि उनाड

लडाख मधे फिरतान्ना असे कलर्स डोळ्यान्ना जाणवत नाहीत पण फोटो बघितले कि वाटत... आहाहाहा...खल्लास..
आपण आजकाल इथेच पडीक असतो..
रोज असे सीन पाहुन सवय झाली बहुतेक...

किल्लेदार's picture

1 Sep 2016 - 9:54 am | किल्लेदार

काय सांगता ....

भटक्य आणि उनाड's picture

1 Sep 2016 - 5:32 pm | भटक्य आणि उनाड

येणार्या लोकान्नी कळवावे..आहे इथेच नेक्स्ट ईयर पर्यत...

यशोधरा's picture

2 Sep 2016 - 4:46 pm | यशोधरा

तिथल्या अडचणी ठाऊक आहेत, तरीही, लकी आहात, असेच म्हणेन. :)

भटक्य आणि उनाड's picture

2 Sep 2016 - 11:24 pm | भटक्य आणि उनाड

कधीही या.. स्वागत आहे..

किसन शिंदे's picture

31 Aug 2016 - 9:58 pm | किसन शिंदे

पारणे फिटले राव. किल्लेदार, इथे मिपावर माझ्या आवडत्या छायाचित्रकारांच्या यादीत तुम्ही फार वरच्या स्थानावर आहात.

किल्लेदार's picture

1 Sep 2016 - 9:54 am | किल्लेदार

:)

सिरुसेरि's picture

31 Aug 2016 - 10:14 pm | सिरुसेरि

सुरेख फोटो . +१००

कंस's picture

1 Sep 2016 - 12:07 am | कंस

फोटोंच कौतूक कराव तितक कमी आहे. अतिशय सूंदर फोटो

इरसाल's picture

1 Sep 2016 - 2:16 pm | इरसाल

फोटो चोरले तर चालतील का ?

कवितानागेश's picture

1 Sep 2016 - 2:30 pm | कवितानागेश

अशा ठिकाणाहून तुम्ही परत कसे काय आलात? :)

किल्लेदार's picture

1 Sep 2016 - 4:33 pm | किल्लेदार

डोकं तिथेच आहे. पोट परत आलं आहे.

संत घोडेकर's picture

1 Sep 2016 - 4:46 pm | संत घोडेकर

:))

अजया's picture

1 Sep 2016 - 5:24 pm | अजया

अप्रतिम अप्रतिम _/\_

सुहास बांदल's picture

1 Sep 2016 - 7:03 pm | सुहास बांदल

काय झकास फोटो आहेत. एक नंबर !!!

शरभ's picture

2 Sep 2016 - 5:36 pm | शरभ

अशक्य सुंदर फोटो.

- श

रातराणी's picture

2 Sep 2016 - 11:36 pm | रातराणी

लेख अजून वाचला नाही. फोटो बघून डोळ्यांचे पारणे फिटले!

पैसा's picture

3 Sep 2016 - 10:18 am | पैसा

_/\_

खूपच सुंदर फोटो.. अप्रतिम..
आम्ही डोळ्यांनी बघून येऊ. पण असं वर्णन लिहायला आणि फोटो काढायला कसं जमणार..

अभिजीत अवलिया's picture

5 Sep 2016 - 7:13 pm | अभिजीत अवलिया

किल्लेदार,
मानाचा मुजरा घ्या.
गेली 4 वर्ष 'ऐनवेळी टांगमारू' मित्रांमुळे इकडे जायचे कॅन्सल होतेय. पण आता थांबणे मान्य नाही.

हिमालयासारखा मित्र आणि रॉली सारखी मैत्रीण.... अजून कोण हवे तुम्हाला ;)

स्वीट टॉकर's picture

6 Sep 2016 - 1:07 pm | स्वीट टॉकर

फोटो आणि वर्णन, दोन्हीही अफलातून! पुढच्या लेखांची वाट पहात आहे.

किल्लेदार's picture

6 Sep 2016 - 6:24 pm | किल्लेदार

:)

केवळ एक भाग परत वाचून भागत नाही हेच खरे.
आजपर्यंत अनेकवेळा हे दोन्ही धागे बघून पारायणे झालीत.. तरिही वाटेल तेव्हा मधूनच एक राईड करून यावी तसे इथे येऊन जातो.

भारीच. _/\_

गोंधळी's picture

11 Nov 2017 - 11:03 am | गोंधळी

fantabulous

किल्लेदार's picture

20 Nov 2017 - 1:00 am | किल्लेदार

☺️