उदय हुसेन - इराक चा नरराक्षस

लोनली प्लॅनेट's picture
लोनली प्लॅनेट in जनातलं, मनातलं
29 Aug 2016 - 11:02 pm

उदय सद्दाम हुसेन.. खरे तर असल्या कुप्रसिद्ध माणसावर लेख लिहायची आणि स्वतःचे व इतरांचे मन कलुषित करायची आवश्यकताच काय, परंतु माणूस किती चरित्रहीन असू शकतो हे सांगण्यासाठी हा लेखप्रपंच.
सामान्य इराकी लोकांनी काय कुणाचे वाकडे केले आहे तेच समजत नाही. यादवी व अस्थिरता कायम त्यांच्या पाचवीलाच पुजलेली असते. माणसाला जेवढा स्वतःचा इतिहास ज्ञात आहे तेवढ्या संपूर्ण काळात त्या देशाचीच नव्हे तर त्या संपूर्ण प्रांताची हीच अवस्था आहे. सद्दाम हुसेन नि १९७९ साली जेंव्हा संपूर्ण इराक वर आपले वर्चस्व प्रस्थापित केले तेंव्हा खरे तर इराक ला बरे दिवस आले होते. सद्दाम ची राजवट बऱ्यापैकी निधर्मी होती, इराक कडे तेलाचे अमाप साठे आहेत त्याच्याच जोरावर सद्दाम ना इराक ची पश्चिमी देशांप्रमाणे प्रगती करायची होती, त्यांनी तसे प्रयत्न सुरु केले. त्यांची फक्त एकाच मागणी होती "कधीही माझ्या विरोधात जायचे नाही" जे विरोधात गेले ते या पृथ्वीतलावरून नाहीसे झाले. हे ठीक होते परंतु १८ जून १९६४ साली त्यांच्या थोरल्या चिरंजीवाचे प्रताप सहन करणे इराकी जनतेच्या नशिबात होते.

उदय हुसेन

उदय हुसेन हा सद्दाम च्या पहिल्या पत्नी साजिदा पासून झालेला मुलगा. शाळेमध्ये असताना तो कायम वर्गात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होई,तो खूप हुशार होता असे वाटेल परंतु तसे नाही,तो फक्त सद्दाम हुसेन चा सुपुत्र होता म्हणून त्याला १००% मार्क द्यावे लागायचे नाही दिलेत तर शिक्षकांना आयुष्यातून उठण्याची भीती. पुढे त्याने बगदाद विद्यापीठातून इंजिनीरिंग ची पदवी घेतली. तेथील शिक्षकांच्या म्हणण्यानुसार तो पास सुद्धा होत नसे. कॉलेज मध्ये असताना तो त्याची porsche गाडी बास्केटबॉल च्या कोर्टवर लावे, एकदा त्याला शिक्षकांनी एवढेच सांगितले कि "उदय गाडी तिथे लावू नकोस पार्किंग मध्ये लाव" झाले ते शिक्षक पुन्हा कधीहि कोणालाही दिसले नाहीत, हि त्याची पहिली हत्या. त्यानंतर सुरु झाला हत्या, छळ आणि बलात्काराचा न थांबणारा सिलसिला.

सद्दाम चा राजप्रासाद

अतिशय शीघ्रकोपी उध्दट व इतरांना किड्यामुंगी इतकीही किंमत न देणारा हा एक नरराक्षस होता. त्याच्याकडे शेकडोंनी आलिशान गाड्या होत्या, रोल्स रॉयस, लंबोर्गिनी... त्याला हत्यारे बाळगायची आवड होती त्यातील काही हत्यारे सोन्याची होती,उंची महागडे कपडे, शेकडो प्रकारची मद्ये, स्विस घड्याळे, क्युबन सिगार, इतकेच काय चित्ते सिंह असलेला प्राण्यांचा स्वतःचा एक झू देखील होता. वेगात गाडी चालवणे, कर्कश्य पार्ट्या करणे आणि मुली व महिला याची त्याला भलतीच आवड. तो अमली पदार्थांचे सेवनच नाही तर त्याचा व्यापार देखील करत असे. क्रूरकर्मा सद्दाम च्या राजवटीच्या मापदंडानुसार देखील तो एक राक्षस होता. ते देखील त्याला आपला वारसदार होण्याच्या लायकीचा समजत नसत. त्याचे कर्तृत्वच तसे होते तर.
He runs his own dark underworld in Iraq.

सोन्याच्या बंदुका

ऑक्टोबर १९८८ मध्ये बगदाद मध्ये इजिप्त चे अध्यक्ष होस्नी मुबारक यांच्यासाठी एक पार्टी आयोजित केलेली होती तेथे सद्दाम चे अन्न निरीक्षक व त्यांचे जवळचे मित्र कामेल ह्मा यांची उदय ने एका किरकोळ कारणावरून चाकूने पोट फाडून हत्या केली. सद्दाम नि चिडून त्याला तुरुंगातच टाकले, तीन महिने तो तुरुंगात होता. पण शेवटी बापाचं हृदय ते पाघळायला वेळ लागला नाही.
त्यानंतर १९९० मध्ये त्याला स्वित्झर्लंड मधील इराकी दूतावासामध्ये काम पाहण्यासाठी पाठवले गेले परंतु तिथे कोठेही सततच्या त्याच्या भांडणांना स्विस सरकार वैतागले आणि त्याला तेथून हाकलून देण्यात आले.
त्यानंतर या महाशयांना इराकी ऑलिम्पिक कमिटी चे अध्यक्ष केले गेले, आणि मग सुरु झाला इराकी खेळाडूंच्या छळाचा न थांबणारा प्रवास. त्याला खेळाशी काही देणे घेणे नव्हते परंतु जे खेळाडू स्पर्धांमध्ये अयशस्वी ठरतील त्यांचा तो अतोनात छळ करत असे, त्यांना तो ३ बाय ३ च्या अंधाऱ्या खोलीत डांबून ठेवत असे, त्यांना इलेक्ट्रिक शॉक देत असे, सर्व अंगात सुया खुपसायचा, प्रचंड मारहाण करायचा, फुटबॉल पटूना कॉंक्रिट च्या फुटबॉल ला जोराने लाथ मारायला लावायचा, प्रचंड शिव्या द्यायचा व जखमांवर मीठ चोळायचा, त्यांचे मुंडन करून त्यांना टॉयलेट च्या सिवेज टाकीत बुडवायचा. जेंव्हा AFC कप फुटबॉल मध्ये जपान ने इराक चा पराभव केला तेंव्हा याने त्या फुटबॉल पटुंचा एवढा छळ केला कि ते पुन्हा खेळायच्या लायकीचेच राहिले नाहीत.

छळ करायची अवजारे

तो छळ करायच्या नवीन नवीन पद्धती शोधायचा, लोकांना जिवाच्या आकांताने ओरडताना पाहून याला असुरी आनंद व्हायचा. हबीब जाफर नावाच्या एका गायकाने सांगितले कि "एकदा का तुम्ही उदय च्या नजरेत आलात कि तो काही केल्या तुमचा पिच्छा सोडत नसे. गाणे आवडले नाही कि तो मला त्रास द्यायचा, माझ्या आयुष्याची दोरी त्याचाच हातात होती, फक्त एकदाच मी इराक च्या बाहेर गेलो होतो तेंव्हाच मला सुरक्षित वाटत होते"
एकदा एका लष्करी अधिकाऱ्याची त्याने सगळ्यांसमोर हत्या केली, का तर त्याने याला सोल्युट केले नाही. असेच एका पार्टीमध्ये दुसऱ्या एका लष्करी अधिकाऱ्याची याने हत्या केली त्याचा गुन्हा एवढाच कि त्याने उदय ला त्याच्या बायको बरोबर नाचू दयायला विरोध केला. उदय ला त्याला विरोध केलेले अजिबात सहन होत नसे, तसे केले कि तो प्रचंड संतापायचा. त्याच्या तोंडून निघालेल्या शब्दाला कोणी नाही म्हणण्याची सुतराम शक्यता नव्हती. लष्करातील काही लोक त्याचा खूप तिरस्कार करीत.
तो लोकांना प्रचंड दारू प्यायला लावायचा व मग त्यांची मजा बघत बसायचा. आणि तो आपल्या या उदंड कार्याची विडिओ शूटिंग करायचा. हा उदय ला भलताच छंद. त्याने सार्वजनिक व खाजगी कार्यक्रमांचे, केलेल्या प्रत्येक गुन्ह्याचे अगदी बलात्काराचे सुद्धा विडिओ बनवले होते.

उदय त्याच्या सुरक्षा रक्षकांबरोबर महाविद्यालयाच्या बाहेर थांबायचा आणि सुंदर मुलींचे निरीक्षण करायचा आणि जी मुलगी त्याला आवडेल तिच्याकडे बोट दाखवून तिला आणायला सांगायचा आणि मग राजवाड्यात नेऊन तिच्यावर बलात्कार करायचा, त्याला जितके दिवस वाटेल तितके दिवस तिला ठेवून घ्यायचा. बगदाद च्या गल्ली बोळांमधून आवडतील त्या मुली व महिलांना तो उचलायचा. तिने विरोध केला नाही तर ठीक नाहीतर बलात्कार करून तिची हत्या करायचा. मग उदय ची माणसं ते प्रेत गाडीत घालून दूर कुठेतरी नेऊन टाकायचे. अशा प्रकारे शेकडो मुली व महिला अदृश्य झाल्या आहेत.
त्याला जाब विचारायला गेलेल्या अनेक दुर्दैवी बापाची सुद्धा त्याने हत्या केली. एकदा एका हॉटेल मध्ये एक विवाह सोहळा चालू होता नवविवाहित जोडप्याच्या दुर्दैवाने उदय तेथे आला,त्याला वधू आवडली, लगेच आपल्या माणसांना तिला घेऊन येण्याचा त्याने आदेश दिला तिला हॉटेल च्या खोलीत नेले आणि थोड्याच वेळात तिचे जीवन उध्वस्त झाले तिच्यावर अत्याचार करून हा बाहेर आला आणि वाईन पीत बसला जणू काही झालेच नाही. इकडे त्या मुलीने हॉटेल च्या ६ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. तिच्या नवऱ्याला काय वाटले असेल याची आपण कल्पनाही करू शकणार नाही. आत्तापर्यंत अनेक सत्ताधीशांनी जनतेवर केलेल्या अत्याचारांची अंगावर शहारे आणणारी उदाहरणे पाहिलेली आहेत परंतु हा प्रकार मात्र महाभयंकर असाच होता. उदय च्या क्रौर्याला काही मर्यादाच नव्हत्या. तो उघडपणे म्हणायचा मी माझ्या बापापेक्षा क्रूर आहे.
एके दिवशी असाच एकदा बगदाद च्या रस्त्यावरून शिकार शोधत जात असताना त्याच्यावर जीवघेणा हल्ला झाला कोणीतरी त्याच्यावर एक-४७ ने १७ गोळ्या झाडल्या पण तो त्यातून वाचला पण चांगलाच जायबंदी झाला नंतर त्याला धड नीट चालत सुद्धा येत नव्हते. आता एवढे गुन्हे केल्यावर हे तर होणारच होते.

लतीफ याहिया

इराकी लष्करामध्ये त्याच्यासारखाच दिसणारा एक जवान होता त्याचे नाव " लतीफ याहिया" एकदा उदय ची माणसे लतीफ कडे आली आणि त्याला उदय कडे घेऊन गेली. उदय ने त्याला सांगितले कि तुला माझा फिदाई व्हायचे आहे म्हणजे body double. हि विनंती नव्हतीच आदेश होता पण लतीफ नाही म्हणाला, झालं त्याचा छळ सुरु झाला त्याला ३ बाय ३ आकाराच्या खोलीत लाला भडक दिवा लावून कित्येक दिवस डांबून ठेवण्यात आलं. प्रचंड मारहाण करण्यात आली तरीही तो ऐकत नाही म्हटल्यावर उदय ने त्याच्या दोन्ही बहिणींचे नाव घेतले, मग काय त्याला ऐकावेच लागले. आणि मग त्याच्या जीवनातील काळ रात्र सुरु झाली. उदय ला जीवाची भीती होती, तो लतीफ ला त्याच्या ऐवजी कार्यक्रमांना पाठवायचा म्हणजे जर तिथे कोणी हल्ला तर काय व्हायचे ते लतीफ चे होईल. उदय जनतेवर करीत असलेले अत्याचार त्याला सहन होणे अशक्य होते तो कसाबसा इराक मधून निघून इंग्लंड ला पळाला. लतीफ याहिया ने उदय चे आयुष्य जवळून पाहिलेले आहे. आजही तो जेंव्हा स्वतःचा चेहेरा आरशात पाहतो तेंव्हा उदय ला पाहून घाबरतो.
२२ जुलै २००३ हा दिवस इराकी जनतेचा आनंदाचा दिवस होता. सद्दाम ना हटवण्यासाठी अमेरिकेने इराक वर हल्ला केला तेंव्हा त्यांच्या निशाण्यावर उदय व त्याचा भाऊ कुसे हे दोघे सुद्धा होते. मोसुल येथील महालात हे दोघे लपल्याची वार्ता अमेरिकन सैन्याला मिळाली. अमेरिकन सैन्याच्या टास्क फोर्स २० या तुकडीने मोसुल च्या या बंगल्यावर हल्ला केला ४ तास चाललेल्या या चकमकी मध्ये उदय आणि कुसे हे दोघेही ठार झाले. किती आईबापांचे शाप लागले असतील त्याला. उदय ची हि सगळी पापं त्याच्या मृत्यूनंतरच जगासमोर आली

मोसुल

इराक मध्ये आनंदाचे वातावरण पसरले बगदाद मध्ये त्या रात्री फटाके फुटले. परंतु हा आनंद फार काळ टिकला नाही त्यानंतर इराक मध्ये पुन्हा यादवी माजली आणि आता तर उदय आणि सद्दाम सारखे हजारो ISIS च्या रूपाने इराक च्या जनतेच्या जीवनाचा नरक बनवण्यासाठी तयार झाले आहेत.
याला काय म्हणायचं इराकी जनतेचं दुर्दैव... दुसरं काय...

समाजलेख

प्रतिक्रिया

ट्रेड मार्क's picture

30 Aug 2016 - 12:23 am | ट्रेड मार्क

जे तिथे जन्मले नाहीत त्यांनी स्वतःला भाग्यशाली समजावे आणि जे सुरक्षित (तुलनेने) आयुष्य आपल्याला मिळालंय त्याबद्दल जगन्नियंत्याचे आभार मानावे.

माझ्या मनात बरेचदा असा विचार येतो की आपण भारतात आणि त्यातूनही मुंबई/ पुण्यासारख्या सुरक्षित भागात जन्मलो आणि वाढलो. काश्मीर, अतिपूर्वेकडील प्रदेश अथवा तत्सम भागात जिथे सतत अतिरेकी कारवाया चालू असतात तिथे असतो तर आयुष्य फारच जिकिरीचं झालं असतं. आपल्या शेजारील काही राष्ट्र, मध्यपूर्व आणि आफ्रिकेचा काही भाग तर नकोच...

लोनली प्लॅनेट's picture

30 Aug 2016 - 7:30 pm | लोनली प्लॅनेट

100% सहमत
जगातील वरचे प्रगत 15-20 देश सोडले तर भारतच सर्वात सुरक्षित देश आहे

विजुभाऊ's picture

1 Sep 2016 - 10:45 am | विजुभाऊ

हे सगळे प्रकार थोर अकबराने केले. त्या नंतर त्याचा पणतू औरंगजेबानेही तेच केले.
ते लोक थोर म्हणून आज ऑळखले जातात.
विरप्पन ने किंवा प्रभाकरनने फार काही वेगळे केले नाही. विरोधकांची प्रेते प्रभाकरन ने तर झाडाला टांगली होती. तीही त्याच्याच तामीळ बाम्धवांची.

अमितदादा's picture

30 Aug 2016 - 12:43 am | अमितदादा

महाभयानक, राक्षसांना सुद्धा लाजवतील अशी दृष्य कृत्ये. यांच्यासाठी वेगळीच कॅटेगरी काढली पाहिजे.

खटपट्या's picture

30 Aug 2016 - 1:54 am | खटपट्या

बापरे !!

गामा पैलवान's picture

30 Aug 2016 - 2:35 am | गामा पैलवान

बराचसा लेख या दोन ठिकाणी सापडतो :
https://en.wikipedia.org/wiki/Uday_Hussein
https://www.theguardian.com/world/2003/jul/23/iraq.suzannegoldenberg

पण मराठीत वाचायला बरं वाटलं.

-गा.पै.

पण मराठीत वाचायला बरं वाटलं.

येस्स.. हेच लेखकाचे परिश्रम आहेत. या कष्टाचे आणि लेखावर घेतलेल्या मेहनतीचे श्रेय फक्त त्यांनाच आहे.

यासाठी लेखकाचे भरपूर आभार्स.

उदय सद्दाम हुसेन च्या बॉडी डबलची एक डॉक्युमेंट्री आहे. त्यामध्ये त्याच्या क्रूरतेची पुरेपूर माहिती मिळते.

ही आणखी एक डॉक्युमेंट्री..

यासाठी लेखकाचे भरपूर आभार्स.

+१

लोनली प्लॅनेट's picture

30 Aug 2016 - 7:35 pm | लोनली प्लॅनेट

धन्यवाद मोदक राव
नॅशनल जिओग्राफीक वर banged up abroad son of saddam फिल्म दाखवली होती

गंम्बा's picture

30 Aug 2016 - 12:55 pm | गंम्बा

हाऊस ऑफ सद्दाम ही डॉक्युमेंटरी कम ड्रामा फिल्म फार बघण्यासारखी आहे. टोरंट वर मिळते. ४ तासाची आहे.

जव्हेरगंज's picture

30 Aug 2016 - 7:29 pm | जव्हेरगंज

+१

हा सैतानांचा सैतान होता. अगणित स्त्रियांचं आयुष्य उद्ध्वस्त केलेला हा सैतान शेवटी यमसदनास धाडला गेल्यावर इराकी जनतेनं सोडलेला निश्वास पुरेसा बोलका होता. पण आता इसिसच्या रूपाने असले हजारो उदय इराकच्या भूमीवर नंगानाच घालताहेत हे त्याहून भयंकर आहे.

अविनाशकुलकर्णी's picture

31 Aug 2016 - 5:49 am | अविनाशकुलकर्णी

सुंदर माहीतिपुर्ण लेख.....लाईकला

गंमत म्हणजे असल्या नराधमांबद्दल फारसे कुठे वाचले गेले नाही (आणि हो जगातील विशेषतः भारतातील मान्वता वाद्याम्च्या लेखांमध्ये हिटलर्/चंगेज्खान्/कोरिया यांचा उल्लेख हटकून असतोच पण याचा कधीही वाचला नाही)

परिश्रम घेऊन केलेले लिखाण..

पुलेशु

मुक्त विहारि's picture

31 Aug 2016 - 9:58 am | मुक्त विहारि

पण भारतात ही काही वेगळी स्थिती नाही.(प्रमाण कमी आहे, ह्यात समाधान मानणारी जनता कमी नाही.)

मग ते जळगाव सेक्स स्कँडल असो किंवा मेळघाटातील आदीवासींचे जीवन असो. (जमल्यास "मेळघाटातील मोहर" हे डॉ.कोल्हे ह्यांचे पुस्तक जरूर वाचा.)

साम्य इतकेच की, एखादा क्रूरकर्मा वारला किंवा त्याला कैद करून आणि आरोप सिद्ध करून शिक्षा दिली, तरच अशा गोष्टी जगजाहीर केल्या जातात.

संदीप डांगे's picture

31 Aug 2016 - 10:25 am | संदीप डांगे

मुवि, अशा गोष्टी जगात सर्वत्र असतात, कोणत्या मीडियात आणायच्या, कशा आणायच्या हे मीडिया ज्यांच्या हातात असतं ते ठरवतात,

बाकी भारताबद्दलच्या तुमच्या सततच्या निगेटिव्ह प्रतिसादांकडे बघता तुम्हाला युटोपीया प्रकर्षाने हवाय असं वाटू लागलंय,

बाकी भारताबद्दलच्या तुमच्या सततच्या निगेटिव्ह प्रतिसादांकडे बघता

हल्ली प्रमाण वाढले आहे.

मुक्त विहारि's picture

31 Aug 2016 - 5:37 pm | मुक्त विहारि

+ १

काही अशीच भारतीय लेकरे

१. आझाद मैदान दंगल घडवणारे.

२. मुझफ्फर नगर दंगल घडवणारे.

३. राजकीय क्षेत्रात वाढलेली घराणेशाही.

४. प्रामाणिकपणे काम करणार्‍या अधिकार्‍यांची बदली घडवणारे.

५. फूटपाथवर वसलेले (किंबहुना फूटपाथ वर स्थाईक झालेले) फेरीवाले, आजकाल तर फेरीवाले अतिक्रमण हटवणार्‍या अधिकार्‍यांवर हल्ले पण करायला लागले आहेत.

६. एकाच वेळी ३-३ जणांना घेवून जाणार्‍या मोटारसायकल स्वार. (हल्ली प्रमाण वाढलेले आहे.)

७. रांग मोडून बस मध्ये शिरणारी गर्दी. पुर्वी बेस्टच्या थांब्यावर रांग असायची. (हल्ली प्रमाण वाढलेले आहे.)

असो,

तुमच्या दॄष्टीने जगातला सर्वगुणसंपन्न आणि प्रत्येक गोष्टीत परिपूर्ण असा देश कोणता..?

मुक्त विहारि's picture

31 Aug 2016 - 8:41 pm | मुक्त विहारि

"जगातला सर्वगुणसंपन्न आणि प्रत्येक गोष्टीत परिपूर्ण असा देश कोणता..?"

अभ्यास सुरु आहे.

काही देशांची प्राथमिक माहिती गोळा करत आहे.स्वतः तिथे जावून राहिल्याशिवाय आणि स्वानुभवाशिवाय खात्रीलायक माहिती देवू शकत नाही.

काही देशांची प्राथमिक माहिती गोळा करत आहे.स्वतः तिथे जावून राहिल्याशिवाय आणि स्वानुभवाशिवाय खात्रीलायक माहिती देवू शकत नाही.

मुवी हे नक्की गंभीरपणे लिहिले आहे..? किती दिवस कोणत्या देशात घालवणार आणि त्या देशाचा भारतासारखा काळा चेहरा कसा समजणार..?

हो...

"किती दिवस कोणत्या देशात घालवणार आणि त्या देशाचा भारतासारखा काळा चेहरा कसा समजणार..?"

त्यासाठीच तर प्राथमिक माहिती गोळा करत आहे.

मुवी ही बहुतेकजण उत्तरभारतीय लेकरे असतात.

त्या पैकी २-३ गोष्टी सोडल्या तर, इतर गोष्टी स्वतः बघीतलेल्या आहेत.

"कोणत्या मीडियात आणायच्या, कशा आणायच्या हे मीडिया ज्यांच्या हातात असतं ते ठरवतात."

ह्याला अनुमोदन.

जय रूपर्ट मरडॉक आणि जय एकता कपूर.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Aug 2016 - 9:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>> बाकी भारताबद्दलच्या तुमच्या सततच्या निगेटिव्ह प्रतिसादांकडे बघता तुम्हाला.....

असो.....!

-दिलीप बिरुटे

....तुम्हाला"

भाऊ,

मी सुचवलेली पुस्तके आपण वाचली असतीलच.

आधी ती वाचा, कारण त्या पुस्तकांत देशा बाबत (आर्थिक, सामाजिक आणि संरक्षण ह्या बाबतीत) योग्य तो उहापोह फार उत्तम रित्या केलेला आहे.

स्वगत : चाणक्यच्या बाबतीत लेख पाडावाच लागेल असे दिसत आहे.

बबन ताम्बे's picture

31 Aug 2016 - 12:55 pm | बबन ताम्बे

स्वातंत्र्यानंतर भारतात असे कोण हुकूमशहा आणि क्रूरकर्मा राज्यकर्ते झाले ? आणीबाणीत संजय गांधींनी राबवलेला कुटुंबनियोजनचा कार्यक्रम हे एक उदाहरण म्हणता येईल. पण पॉल पॉट, ईदी अमीन, सद्दाम हुसेन, उदय हुसेन, लिबियाचा गडाफी अशा टाइपचे क्रूर हुकूमशहा भारतात झाले नाहीत हे आपले सुदैव .

ह्ये एक बेणं लै खतरन्नाक होतं. कुणाच्या तरी छत्रछायेखाली असली मनमानी करायला नेहमीच उत येतो. छ्त्र उडाले की कुत्रं हाल खात नाही. अजुन एक कुसय का कैतरी नाव असलेला भाव होता ना याचा?

पण ड्युप्लिकेट मेकिंगबद्दल अजुनही वाटते कि उदय हुसेन इतका परफेक्ट इराकी दिसतोय. अगदी तोच उभा भरल्लेला चेहरा, कपाळातुन उगवलेले नाक, दाट कुरळे बारीक केस, जाड ओठ अन भुवया. ह्याच्यासारखे दिसणारे कित्येक इराकी सापडतील. त्या बिचार्‍या लतीफ याहियाला का धरलेय. तो तसा जास्त उदय हुसेनसारखा दिसतही नाही.

लोनली प्लॅनेट's picture

31 Aug 2016 - 2:05 pm | लोनली प्लॅनेट

आता पहा बरे सारखे दिसतायत का..

संदीप डांगे's picture

31 Aug 2016 - 2:09 pm | संदीप डांगे

अजिबात नाही...

अभ्या..'s picture

31 Aug 2016 - 2:10 pm | अभ्या..

जवळपास. नॉट परफेक्ट.
आणि दुसरा फोटो मॉर्फड आहे. कान आणि दाढीवरुन कळतेय. बराचसा सेम करायचा म्हणून केलाय.
एनीवे माझा म्हणण्याच्या उद्देश एवढाच की तसे बरेचसे इराकी सापडतील.

उदय सद्दाम हुसेनच्या बॉडी डबलवर आधारीत "डेव्हिल'स डबल" हा चित्रपट खुप गाजला आहे .

बाकी लेख माहितीपुर्ण .

वपाडाव's picture

1 Sep 2016 - 6:10 am | वपाडाव

द डिक्टेटर
एक विनोदी सिनेमा आहे.
आता समजले की तो ह्या *दरचो* माणसावर बेस्ड होता...
एकुण एक प्रकार दाखवलेत त्यात... बॉडी डबल, सोन्याच्या बंदुका, विरोधकाचा नायनाट प्लस उपभोगित स्त्रियांचे(पुरुषसुद्धा) फोटो अल्बम...
उशिरा मेला बिचारा...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Aug 2016 - 9:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेखन माहितीपूर्ण आहे. धन्स.

-दिलीप बिरुटे

अर्धवटराव's picture

31 Aug 2016 - 10:07 pm | अर्धवटराव

या साहेबांना घराबाहेर पडायची देखील भिती वाटावी अशी परिस्थिती व्हायला पाहिजे होती.

हिटलर कितीही क्रुरकर्मा असला तरी त्याचे आधुनीक जर्मनीच्या निर्मीतीत अतुलनीय योगदान होते. जर्मन देशावर त्याचे प्रेम होते व तो बराच काळ लोकप्रीय देखील होता. हे उदय साहेब तर केवळ बापाच्या भरोशावर जनतेच्या उरावर नाचायला निघाले होत असं वाटतय. सैन्याधिकारी, ब्युरोक्रॅट्स, व इराकची काळजी वाटणार्‍या इतर अनेकांना या साहेबांना धडा शिकवायची इच्छा झाली नसेल काय?

चाणक्य's picture

1 Sep 2016 - 6:05 am | चाणक्य

काय भयानक माणूस (?) होता हा.

बाबा योगिराज's picture

1 Sep 2016 - 9:26 am | बाबा योगिराज

या विषयावरची डॉक्युमेंट्री आणि डेव्हिल्स डबल हा सिनेमा सुद्धा बघितलाय. भलतच अवघड आणि माजोरड प्रकरण होत हे.

बाबा योगीराज.

विशाखा पाटील's picture

1 Sep 2016 - 9:42 am | विशाखा पाटील

चांगला लेख.
सद्दाम हुसेननी आधी या पोरापेक्षा जावई हुसेन कामीलवर विश्वास टाकला होता. पण नंतर पुन्हा त्याने पोराला जवळ केलं. मग हुसेन कामील शेजारच्या जॉर्डनमध्ये बायकोपोरांसह पळाला. अमेरिकेच्या मदतीने आपण सत्ता मिळवू, असा त्याचा विश्वास होता. पण अमेरिकेने त्याच्याकडून माहिती काढून घेऊन त्याला वाऱ्यावर सोडून दिलं. (हा सद्दामच्या जैविक शस्त्रास्त्र निर्मिती कार्यक्रमाचा संस्थापक होता.) पुढे तो कंटाळून माफी मागून परत मायदेशी परतला, तेव्हा उदैने त्याचा काटा काढला. पुढे बुश साहेब आणि त्यांच्या मंडळाने हुसेन कामीलच्या नावाखाली त्यांना हवी ती माहिती खपवली.

संदीप डांगे's picture

1 Sep 2016 - 9:54 am | संदीप डांगे

पुढे बुश साहेब आणि त्यांच्या मंडळाने हुसेन कामीलच्या नावाखाली त्यांना हवी ती माहिती खपवली.

=))

लोनली प्लॅनेट's picture

1 Sep 2016 - 10:17 am | लोनली प्लॅनेट

लेखाला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल वाचकांचे आभार

बाकी अमेरिका फक्त स्वतःचा फायदा पाहते
बाकी गोष्टीशी त्यांना काही देणे घेणे नसते

किसन शिंदे's picture

1 Sep 2016 - 12:05 pm | किसन शिंदे

नॅशनल जिओग्राफिकवरची डॉक्युमेंट्री काल पाह्यली. अतिशय हलकट माणूस होता असे दिसते. त्याचा बॉडी डबल झालेल्या लतीफवर दोन वेळा जीवघेणा हल्ला झाल्याचे दाखवलेय.

डेविल्स डबल नावाचा. लेखात उल्लेख केलेले आणि न उल्लेख केलेले पण बरेचसे प्रसंग दाखवले आहेत त्यात. अतिशय वास्तववादी आणि सुन्न करणारा आहे हा चित्रपट.