मला आवडलेली ५० पुस्तके

हेमंत लाटकर's picture
हेमंत लाटकर in जनातलं, मनातलं
29 Aug 2016 - 9:10 pm

प्रत्येकाने एकदा तरी वाचली पाहिजेत अशी मराठी पुस्तके -

१) मी कसा झालो? प्र. के. अत्रे
२) कर्हेचे पाणी, प्र. के. अत्रे
३) पानिपत, विश्वास पाटील
४) महानायक, विश्वास पाटील
५) झाडाझडती, विश्वास पाटील
६) युगंधर, शिवाजी सावंत
७) छावा, शिवाजी सावंत
८) मृत्युंजय, शिवाजी सावंत
९) स्वामी, रणजित देसाई
१०) श्रीमान योगी, रणजित देसाई
११) पावनखिंड, रणजित देसाई
१२) व्यक्ती आणि वल्ली, पु. ल. देशपांडे
१३) बटाट्याची चाळ, पु. ल. देशपांडे
१४) असा मी असामी, पु. ल. देशपांडे
१५) पुर्वरंग, पु. ल. देशपांडे
१६) आहे मनोहर तरी, सुनीता देशपांडे
१७) पडघवली, गो. नी. दांडेकर
१८) पवनाकाठचा धोंडी, गो. नी. दांडेकर
१९) मृण्मयी, गो. नी. दांडेकर
२०) राऊ, ना. सं. इनामदार
२१) मंत्रावेगळा, ना. सं. इनामदार
२२) शहेनशहा, ना. सं. इनामदार
२३) बनगरवाडी, व्यंकटेश माडगूळकर
२४) माणदेशी माणसे, व्यंकटेश माडगूळकर
२५) पार्टनर, व. पु. काळे
२६) वपुर्झा, व. पु. काळे
२७) रणांगण, विश्राम बेडेकर
२८) ययाती, वि. स. खांडेकर
२९) श्यामची आई, साने गुरुजी
३०) माझी जन्मठेप, वि. दा. सावरकर
३१) सुदाम्याचे पोहे, श्री. कृ. कोल्हटकर
३२) प्रकाशवाटा, प्रकाश आमटे
३३) झोंबी, डॉ. आनंद यादव
३४) मुसाफिर, अच्युत गोडबोले
३५) कोसला, भालचंद्र नेमाडे
३६) इडली आॅर्किड आणि मी, विठ्ठल कामत
३७) चाकाची खुर्ची, नसीमा हुरजूक
३८) पंचतारांकित, प्रिया तेंडुलकर
३९) रहाट गाडगं, चिं. वि. जोशी
४०) रानवाटा, मारूती चितमपल्ली
४१) राशीचक्र, शरद उपाध्ये
४२) गारंबीचा बापू, श्री. ना. पेंडसे
४३) तुंबाडचे खोत, भाग १, २, श्री. ना. पेंडसे
४४) युगांत, इरावती कर्वे
४५) गोट्या, एन. डी. ताम्हणकर
४६) शाळा, मिलिंद बोकील
४७) एक होता कार्व्हर, वीणा गवाणकर
४८) अग्निपंख, अे.पी.जे. अब्दुल कलाम
४९) दुनियादारी, सुहास शिरवळकर
५०) माझा प्रवास, विष्णुभट गोडसे

साहित्यिकआस्वाद

प्रतिक्रिया

बोका-ए-आझम's picture

29 Aug 2016 - 10:50 pm | बोका-ए-आझम

१. विशाखा - कुसुमाग्रज
२. कोंडुरा - चिं.त्र्यं.खानोलकर
३. सारे प्रवासी घडीचे - जयवंत दळवी
४. लव्हाळी - श्री.ना.पेंडसे
५. एम.टी.अायवा मारू - अनंत सामंत
६. बनगरवाडी - व्यंकटेश माडगूळकर
७. मुक्काम पोस्ट सोन्याचे गोठणे - माधव कोंडविलकर
८. युद्धनेतृत्व - दि.वि.गोखले
९. कॅलिडोस्कोप - अच्युत बर्वे
१०. स्वतःविषयी - अनिल अवचट
११. शुभ्र काही जीवघेणे - अंबरिश मिश्र
१२. फिरस्ता - वसंत पोतदार
१३. झुलवा - उत्तम बंडू रूपे
१४. नटरंग - आनंद यादव
१५. रारंग ढांग - प्रभाकर पेंढारकर
१६. एक होती प्रभातनगरी - बापू वाटवे
१७. तीळ आणि तांदूळ - ग.दि.माडगूळकर
१८. गांवगाडा - त्रिंबक नारायण आत्रे
१९. कोल्हाट्याचं पोर - किशोर शांताबाई काळे
२०. तुघलक - गिरीश कार्नाड (अनुवाद - विजय तेंडुलकर)
२१. स्मृतिचित्रे - लक्ष्मीबाई टिळक
२२. ओसाडवाडीचे देव - चिं.वि.जोशी
२३. डोह - श्रीनिवास विनायक कुलकर्णी
२४. काजळमाया - जी.ए.कुलकर्णी
२५. तिसरी घंटा - मधुकर तोरडमल
२६. रोश विरूद्ध अॅडम्स - सदानंद बोरसे
२७. ऋतुचक्र - दुर्गा भागवत
२८. पाडस - राम पटवर्धन (मूळ लेखिका - मार्जोरी राॅलिंग्ज)
२९. देवाघरचा पाऊस - रवींद्र पिंगे
३०. राजधानीतून - अशोक जैन
३१. सांगत्ये ऐका - हंसा वाडकर
३२. सिंहासन - अरुण साधू
३३. मुंबई दिनांक - अरुण साधू
३४. झिप-या - अरुण साधू
३५. प्रेषित - डाॅ.जयंत नारळीकर
३६. पराजित-अपराजित - वि.स.वाळिंबे
३७. सत्तांतर - व्यंकटेश माडगूळकर
३८. रणांगण - विश्राम बेडेकर
३९. तांडव - महाबळेश्वर सैल
४०. शोध - मुरलीधर खैरनार
४१. थँक यू मिस्टर ग्लाड - अनिल बर्वे
४२. राजा शिवछत्रपती - ब.मो.पुरंदरे
४३. नाच ग घुमा - माधवी देसाई
४४. वंगचित्रे - पु.ल.देशपांडे
४५. हसरे दु:ख - भा.द.खेर
४६. बोर्डरुम - अच्युत गोडबोले
४७. टाटायन - गिरीश कुबेर
४८. बखर एका राजाची - त्र्यं.वि.सरदेशमुख
४९. शुभमंगल - विक्रम सेठ (अनुवाद - अरुण साधू)
५०. झिम्मा - विजया मेहता.

सामान्य वाचक's picture

30 Aug 2016 - 3:23 pm | सामान्य वाचक

माझी पण हीच आवडती पुस्तके आहेत कि हो
(काही अपवाद वगळता)

महासंग्राम's picture

30 Aug 2016 - 3:38 pm | महासंग्राम

सिंहासन - अरुण साधू ,मुंबई दिनांक - अरुण साधू लिस्टीत पाहून भारी वाटलं. माझी पण आवडती आहेत हि दोन

बोका-ए-आझम's picture

30 Aug 2016 - 4:08 pm | बोका-ए-आझम

एक तर या दोन कादंबऱ्या जबरदस्त आहेत. दुसरं, अरुण साधू माझे शिक्षक होते आणि तिसरं म्हणजे ते आपले शेजारी आहेत गाववाले - परतवाडा, जि. अमरावती. एवढी ३ घसघशीत कारणं आहेत. त्यांना सिंहासन बद्दल विचारल्यावर ते म्हणाले होते - राम गणेश गडक-यांनी राजसंन्यास नाटकात जिवाजीपंत कलमदाने या एका व्यक्तिरेखेत आख्खं मंत्रालय उभं केलेलं आहे, जे मला दोन कादंबऱ्या लिहूनही जमलं नाही!
अर्थात हा त्यांचा विनय आहे!

महासंग्राम's picture

30 Aug 2016 - 4:44 pm | महासंग्राम

अवांतर : अगदी खरंय आणि महाराष्ट्रातील सध्याचं राजकारण पाहिलं तर ते या दोन्ही कादंबऱ्यांना समान जाणारं आहे. मुख्यमंत्र्यांच्या सध्याच्या चाली पाहता अरुण सरनाईकांची विशेष आठवण येते.

कैलासवासी सोन्याबापु's picture

30 Aug 2016 - 10:08 pm | कैलासवासी सोन्याबापु

साधूंचे "ड्रॅगन जेव्हा जागा होतो" सुद्धा आवडले होते मला

संदीप डांगे's picture

31 Aug 2016 - 12:42 am | संदीप डांगे

आणि चे गवेराही...

बोकेशा, यात साधूसरांची मुखवटा हवी होती.

विप्लवा, त्रिशंकू याही. मी त्यातल्या मला आवडलेल्या सगळ्या टाकल्या. In fact, अरुण साधू सोडून कुठल्याही लेखकाला repeat केलेलं नाही.

बोका-ए-आझम's picture

30 Aug 2016 - 5:12 pm | बोका-ए-आझम

अरुण साधू आणि व्यंकटेश माडगूळकर.

मारवा's picture

30 Aug 2016 - 7:29 pm | मारवा

बोकोबा यादीतली काही नावे आवडती आहेत.
शुभ्र काही जीवघेणे आवडलेला माणूस भेटुन आनंद झाला.
विक्रम सेठ चे मुळ इंग्रजी पुस्तक अधिक आवडते.
फिरस्ता कार पोतदारांना प्रत्यक्ष भेटलेलो तेव्हा त्यांनी फिरस्ता दिलेलं वाचायला. त्यांचं कुमार गंधर्वावरील पुस्तक वाचल असेलच तुम्ही आणि अजब आजाद मर्द गालिब त्यांचच फारच सुंदर आहे.
कृपया रोश विरूद्ध अॅडम्स - सदानंद बोरसे या विषयी माहीती द्यावी हा अनुवाद आहे की ओरीजीनल आहे.
कशाविषयी आहे ?

७. मुक्काम पोस्ट सोन्याचे गोठणे - माधव कोंडविलकर
हे तुमच्या कडुन घाईने देवाचे ऐवजी सोन्याचे झालेले दिसतेय.

रोश विरूद्ध अॅडम्स हा अनुवाद नाहीये बहुतेक. संदर्भग्रंथांच्या आधारे लिहिलेलं आहे. पोतदारांची पुस्तकं ही त्यांच्याकडून भेट म्हणूनच मिळाली होती. अजूनही ती माझ्याकडे आहेत.

विशाखा पाटील's picture

31 Aug 2016 - 11:17 pm | विशाखा पाटील

रोश विरुध्द अॅडम्स हा अनुवाद आहे. विशेष म्हणजे अॅडम्स यांनी अगदी कमी पैश्यात की पैसे न घेता या पुस्तकाच्या अनुवादाचे हक्क दिले होते. आपलं पुस्तक इतर भाषांमध्ये जावं, हाच त्यांचा ध्यास होता.

बोका-ए-आझम's picture

31 Aug 2016 - 11:19 pm | बोका-ए-आझम

सांगितल्याबद्दल धन्यवाद!

राजाभाउ's picture

2 Sep 2016 - 12:26 pm | राजाभाउ

रोश विरूद्ध अॅडम्स वर मागे रमताराम यांनी लिहीले होते. ते पण वाचु शकता.
http://misalpav.com/node/17812

अलका सुहास जोशी's picture

3 Sep 2016 - 3:10 pm | अलका सुहास जोशी

वसंत पोतदार यांचे भीमसेन लाजवाब. घाशीराम कोतवालचा त्यांनी केलेला हिंदी अनुवादही लाजवाब.
माझी भर:
वि का राजवाडे (इतिहासाचार्य) : भारतीय लग्नसंस्थेचा इतिहास
राहुल सांकृत्यायन : व्होल्गा ते गंगा
या दोन पुस्तकांनी सतत ऐकत आलेल्या बाळबोध ब्राम्हणी भंकशीच्या चिंधड्या उडवल्या. डोके नामक अवयव धारण करणार्यांस ही पुस्तके वाचल्याशिवाय पर्याय नाही.

अपर्णा वेलणकरांचं “for here or to go” आणि अनिल अवचटांचं “ अमेरीका” लागोपाठ वाचून पहा. अहाहा अनुभव.
वेगवेगळे unique perspectives अमेरीकेबद्दलचेक.

सुनीताबाईंची जी.ए पत्रे आवडल्याचे कोणीतरी इथे लिहिलंय. मी टू सेम. त्यांचं “ सोयरे सकळ” उत्कृष्टय.

भालजी पेंढारकरांचे चरित्र “साधा माणूस” नक्की वाचा मंडळी. काय अजोड हिंमतवान माणूस! प्रभाकर पेंढरकरांनी आपल्या असामान्य पित्याच्या चरित्राचे केलेले तटस्थ समालोचन म्हणजे “साधा माणूस”. प्रभाकर पेंढरकरांची रारंग ढांग वाचलीच असेल. एक नंबर आहे कादंबरी.

अलका सुहास जोशी's picture

3 Sep 2016 - 3:12 pm | अलका सुहास जोशी

वसंत पोतदार यांचे भीमसेन लाजवाब. घाशीराम कोतवालचा त्यांनी केलेला हिंदी अनुवादही लाजवाब.
माझी भर:
वि का राजवाडे (इतिहासाचार्य) : भारतीय लग्नसंस्थेचा इतिहास
राहुल सांकृत्यायन : व्होल्गा ते गंगा
या दोन पुस्तकांनी सतत ऐकत आलेल्या बाळबोध ब्राम्हणी भंकशीच्या चिंधड्या उडवल्या. डोके नामक अवयव धारण करणार्यांस ही पुस्तके वाचल्याशिवाय पर्याय नाही.

अपर्णा वेलणकरांचं “for here or to go” आणि अनिल अवचटांचं “ अमेरीका” लागोपाठ वाचून पहा. अहाहा अनुभव.
वेगवेगळे unique perspectives अमेरीकेबद्दलचेक.

सुनीताबाईंची जी.ए पत्रे आवडल्याचे कोणीतरी इथे लिहिलंय. मी टू सेम. त्यांचं “ सोयरे सकळ” उत्कृष्टय.

भालजी पेंढारकरांचे चरित्र “साधा माणूस” नक्की वाचा मंडळी. काय अजोड हिंमतवान माणूस! प्रभाकर पेंढरकरांनी आपल्या असामान्य पित्याच्या चरित्राचे केलेले तटस्थ समालोचन म्हणजे “साधा माणूस”. प्रभाकर पेंढरकरांची रारंग ढांग वाचलीच असेल. एक नंबर आहे कादंबरी.

राहुल सांकृत्यायन : व्होल्गा ते गंगा

याबद्दल आणखी लिहाल का?

गणेश उमाजी पाजवे's picture

30 Aug 2016 - 12:42 am | गणेश उमाजी पाजवे

मी सध्या नोकरीच्या शोधात आहे . नुकतेच शिक्षण पूर्ण झाले आहे. नोकरीला लागल्यावर महिन्याला कमीत कमी 3 पुस्तके तरी खरेदी करायची असे स्वप्न आहे.तुमच्या या यादीचा व बोका सरांच्या यादीच खूप फायदा होईल. खूप सारी पुस्तके वाचायची आहेत. :)

मारवा's picture

30 Aug 2016 - 7:46 pm | मारवा

तुमच्यातला निरागसपणा स्वप्नीलपणा आवडला हो फार.
किती सुंदर स्वप्ने आहे तुमच्या डोळ्यात, भेटलो नाहीत काय झाल
आय कॅन इमॅजीन

लव्ह इन द टाइम ऑफ कॉलरा गॅब्रीएल गार्सीया मार्क्वेझ चे वाचा जमल्यास
तुम्हाला आवडेल कदाचित.

गणेश उमाजी पाजवे's picture

30 Aug 2016 - 9:37 pm | गणेश उमाजी पाजवे

पहिले पुस्तक तुम्ही सुचवलेलेच घेईन :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Sep 2016 - 5:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नोकरीला लागलो की अशी पुस्तकं घेईन, तशी पुस्तकं घेईन, कपाट घेईन.
धमुक करीन, सर्व राहुन गेलं. ;)

बाकी, मुळ धाग्यातील बरीच पुस्तकं वाचुन झाली आहेत.

-दिलीप बिरुटे

अभिदेश's picture

31 Aug 2016 - 12:28 am | अभिदेश

सखाराम गटण्यांचे नातू का हो ? त्यांनी देखील आमच्या आजोबांना असेच काहीसे म्हटले होते.

इल्यूमिनाटस's picture

30 Aug 2016 - 6:47 am | इल्यूमिनाटस

यातील बरीच वाचली आहेत
बाकीचे मिपाकर अजून भर टाकतीलच

उल्का's picture

30 Aug 2016 - 7:44 am | उल्का

वा खु योग्य.

वर उल्लेख नसलेली आणि निदान एकदा तरी नक्की वाचावी अशी ही दोन पुस्तके
अंतरीचे धावे - भानु काळे
बदलता भारत - भानु काळे

शिवाय ही काही आहेत
शतपावली - रवींद्र पिंगे
सरमिसळ - द. मा. मिरासदार
मुसाफिर - अच्युत गोडबोले
आत्मचरित्राऐवजी - जयवंत दळवी
गोष्टी जन्मांतरीच्या - रेणू गावस्कर
विरामचिन्हे - वि वा शिरवाडकर

सध्या वाचत असलेले 'मन में है विश्वास' हे विश्वास नांगरे पाटील यांचे पुस्तक पण चांगले वाटते आहे. अजून बरेच वाचन बाकी आहे.

पद्मावति's picture

30 Aug 2016 - 3:27 pm | पद्मावति

खूप छान धागा आणि प्रतिसादही.

सामान्य वाचक's picture

30 Aug 2016 - 3:33 pm | सामान्य वाचक

एका तेलियाने
हा तेल नावाचा इतिहास आहे
Little वूमन
एक होता कार्व्हर
काजलमाया
Catch 22
To kill a mockingbird
Aminal फार्म
Night

सामान्य वाचक's picture

30 Aug 2016 - 3:41 pm | सामान्य वाचक

Gone with the wind

प्रचेतस's picture

30 Aug 2016 - 4:42 pm | प्रचेतस

माझी आवडती.
अर्थात विशिष्ट क्रम असा नाही. महाभारत मात्र नेहमीच सर्वोच्च स्थानावर राहिल.
१. संपूर्ण महाभारत
२. वाल्मिकी रामायण
३. मास्टर ऑफ द गेम - सिडने शेल्डन
४. ब्लडलाईन - सिडने शेल्डन
४. मेमरीज ऑफ मिडनाईट - सिडने शेल्डन
५. रेज ऑफ एन्जल्स - सिडने शेल्डन
६. मनिचेंजर्स - आर्थर हेली
७. हॉटेल - आर्थर हेली
८. इन हाय प्लेसेस - आर्थर हेली
९. संपूर्ण शेरलॉक होम्स - आर्थर कॉनन डॉईल
१०. पडघवली - गो. नी. दांडेकर
११. कादंबरीमय शिवकाल - गो. नी. दांडेकर
१२. त्या तिथे रूखातळी - गो. नी. दांडेकर
१३. गडदेचा बहिरी - गो. नी. दांडेकर
१४. दुर्गभ्रमणगाथा - गो. नी. दांडेकर
१५. जैत रे जैत - गो. नी. दांडेकर
१६. हद्दपार - श्री. ना. पेंडसे
१७. गारंबीचा बापू - श्री. ना. पेंडसे
१८. हत्या - श्री. ना. पेंडसे
१९. कलंदर - श्री. ना. पेंडसे
२०. तुंबाडचे खोत १ व २ - श्री. ना. पेंडसे
२१ एल्गार - श्री. ना. पेंडसे
२२. कामेरु - श्री. ना. पेंडसे
२३. तांडव - महाबळेश्वर सैल
२४. झाडाझडती - विश्वास पाटील
२५. पानिपत - विश्वास पाटील
२६. मर्हाठी संस्कृती - काही समस्या - शं. बा. जोशी
२७. महाराष्ट्र सारस्वत - वि. ल. भावे
२८. सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप - वा. वि. मिराशी
२९. द निगोशिएटर - फ्रेडरिक फॉरसिथ
३०. द फिस्ट ऑफ गॉड - फ्रेडरिक फॉरसिथ
३१. नो कम बॅक्स - फ्रेडरिक फॉरसिथ
३२. आइस स्टेशन झेब्रा - अ‍ॅलिस्टर मॅक्लिन
३३. द गोल्डन रांदेव्हू - अ‍ॅलिस्टर मॅक्लिन
३४. फिअर इज द की - अ‍ॅलिस्टर मॅक्लिन
३५. ओसाडवाडीचे देव - चिं.वि.जोशी
३६. मिरासदारी - द. मा. मिरासदार
३७. मुखवटा - अरूण साधू
३८. बरसात चांदण्यांची - सुहास शिरवळकर
३९. स्टार हंटर्स - सुहास शिरवळकर
४०. प्रयास - सुहास शिरवळकर
४१. सर्व गूढकथा संच - रत्नाकर मतकरी
४२. चंद्राची सावली - नारायण धारप
४३. चेटकीण - नारायण धारप
४४. एन्जल्स अ‍ॅण्ड डेमन्स - डॅन ब्राऊन
४५. शिवरात्र - नरहर कुरुंदकर
४६. जागर - नरहर कुरुंदकर
४७. मुस्लिम मनाचा शोध - शेषराव मोरे
४८. चार आदर्श खलिफा - शेषराव मोरे
४९. अशी ही धरतीची माया (मरळी मण्णिगे) - शिवराम कारंथ
५०. मुकज्जी - शिवराम कारंथ
५१. सार्थ - एस. एल भैरप्पा
५२. आवरण - एस. एल भैरप्पा
५३. जा ओलांडूनी - एस. एल भैरप्पा
५४. वंशवृ़क्ष - एस. एल भैरप्पा
५५. ग्रामायण - रावबहादूर कुलकर्णी
५६. खंडाळ्याच्या घाटासाठी - शुभदा कुलकर्णी
५७. दक्षिणचा लोकदेव खंडोबा - रा. चिं. ढेरे
५८. अ प्रिझनर ऑफ बर्थ - जेफ्री आर्चर
५९. द मिरॅकल - आयर्विंग वॅलेस
६०. टाइमलाईन - मायकेल क्रायटन.

बोका-ए-आझम's picture

30 Aug 2016 - 4:51 pm | बोका-ए-आझम

फोर्साईथ माझापण आवडता. डे आॅफ द जॅकल पासून आत्ताच्या किल लिस्ट पर्यंत सगळ्या पुस्तकांची पारायणं झालेली आहेत. त्याचा The Veteran हा कथासंग्रह जरुर वाचा (अजूनही वाचला नसेल तर.)

सामान्य वाचक's picture

30 Aug 2016 - 4:58 pm | सामान्य वाचक

द अफगाण मस्त आहे

प्रचेतस's picture

30 Aug 2016 - 5:05 pm | प्रचेतस

द अफगाण हा फिस्ट ऑफ गॉडचा सिक्वेल आहे. माइक मार्टिन.

सामान्य वाचक's picture

30 Aug 2016 - 5:51 pm | सामान्य वाचक

अफगाण जास्त चांगले आहे

प्रचेतस's picture

30 Aug 2016 - 5:00 pm | प्रचेतस

The Veteran वाचला नाही अजून. शेरलॉक होम्स, मॅक्लिनचं 'आईस स्टेशन झेब्रा' आणि वॅलेसचं ' द मिरॅकल' सोडलं तर उपरोक्त यादीतील सर्वच पुस्तके अनुवादित आहेत.

रातराणी's picture

27 Sep 2016 - 9:45 am | रातराणी

इथल्या रेकमेंडेशनवर the veteran वाचायला घेतला. अप्रतिम आहे कथासंग्रह. आता the day of the jackal आणि no comebacks आहेत लिस्टमधे. धन्यवाद! :)

सामान्य वाचक's picture

30 Aug 2016 - 4:59 pm | सामान्य वाचक

कधीही आणि कितीही वेळा वाचू शकते

ली चाईल्ड वाचलंय का?

ली चाइल्डचं 'वन शॉट' वाचलंय. मला तो जॅक रिचर वाचून बरेचदा फिरोज इराणी किंवा मंदार पटवर्धन आठवतो. :)

भंकस बाबा's picture

30 Aug 2016 - 7:05 pm | भंकस बाबा

15/16वर्षापूर्वी वाचले होते, अप्रतिम , अजूनही त्यातील ओळ न ओळ आठवते
माझे आवडते म्हणाल पुलं च् व्यक्ति आणि वल्ली , अनेक वेळा पारायण केले आहे

हेमंत लाटकर's picture

1 Sep 2016 - 8:48 pm | हेमंत लाटकर

प्रचेतस तुमच्या यादीतील ३-९, २९-३४, ४४, ५८-६० ही अनुवादित आहेत का?

प्रचेतस's picture

1 Sep 2016 - 8:57 pm | प्रचेतस

शेरलॉक होम्स, आईस स्टेशन झेब्रा आणि द मिरॅकल सोडून इतर अनुवादित.

शान्तिप्रिय's picture

30 Aug 2016 - 4:50 pm | शान्तिप्रिय

१. खरेखुरे आयडॉल्स - अनेक लेखक
२. कार्यरत - अनिल अवचट
३. दुर्दम्य - गंगाधर गाडगीळ
४. एक होता कार्व्हर - वीणा गवाण्कर
५. व्यक्ति आणि वल्ली - पु ल देश्पांडे
६. आनंदवन प्रयोगवन - विकास आमटे
७. समिधा - साधनाताई आमटे
८. म्रित्युंजय - शिवाजि सावन्त
९. राधेय - रणजित देसाई
१० स्वामी - रणजित देसाई.

आणखी ४० आठवणे अवघड आहे.

सर्वांच्या यादीतली निदान ८०% पुस्तकं मी वाचलेली निघत आहेत!
म्हणून त्यांचा उल्लेख न करता इतर पुस्तकं
आशा बगे- भूमी मारवा
सानिया- सर्वच
गौरी देशपांडे - विंचुर्णीचे धडे,एकेक पान गळावयागौरी
मेघना पेठे- नातिचरामि आंधळ्याच्या गायी
अनिल अवचट- स्वतःविषयी आप्त कार्यरत छंदांविषयी
मीना प्रभु- गाथा इराणी ,चिनी माती
व्यंकटेश माडगूळकर - बनगरवाडी माणदेशी माणसं
जयवंत दळवी- आत्मचरित्राऐवजी
संपूर्ण बोरकर
पुलं- मराठी वाङमयाचा गाळीव इतिहास,व्यक्ती आणि वल्ली बटाट्याची चाळ
राॅबिन कुक- कोमट
आर्थर हेलि- फायनल डायग्नाॅसिस
जेफ्रि आर्चर- द प्राॅडिगल सन
प्रकाश आमटे- प्रकाशवाटा

प्रचेतस's picture

30 Aug 2016 - 5:45 pm | प्रचेतस

आर्चरचं 'केन अ‍ॅण्ड एबल' पण भन्नाट आहे. मात्र सन्स ऑफ फॉर्चुन बरचसं कंटाळवाणं आणि स्टोरीलाईन बरीचशी केन अ‍ॅण्ड एबलसारखीच होती.

बोका-ए-आझम's picture

30 Aug 2016 - 5:55 pm | बोका-ए-आझम

आर्चरने फोर्थ इस्टेट आणि फर्स्ट अमंग इक्वल्स मध्येपण केन अँड एबलची नक्कल केलेली आहे. बाकी केन अँड एबलचा सीक्वेल - द प्राॅडिगल डाॅटर आणि त्याचा सीक्वेल - शॅल वी टेल द प्रेसिडेंट - हे मस्त आहेत.

ह्या कुठल्याच वाचलेल्या नाहीत.
द प्रॉडिगल डॉटर वाचायची आहे.
फॉल्स इम्प्रेशननं मात्र निराशा केली होती.

भंकस बाबा's picture

30 Aug 2016 - 7:11 pm | भंकस बाबा

पुस्तकांचा पूर्ण संच घेतला होता सवलतीत!
माझे लंडन सोडल्यास बाकी सगळी अप्रतिम आहेत. कौतुक करण्याची गोष्ट ही की ही सर्व प्रवासवर्णने त्या स्त्री असून देखिल काकुबाई छाप नाहीत.

बोका-ए-आझम's picture

30 Aug 2016 - 5:38 pm | बोका-ए-आझम

१. कलम ३०२ - मधुकर तोरडमल
२. वीज म्हणाली धरतीला - वि.वा.शिरवाडकर
३. तुझे आहे तुजपाशी - पु.ल.देशपांडे
४. ती फुलराणी - पु.ल.देशपांडे
५. एक झुंज वा-याशी - पु.ल.देशपांडे
६. शांतता! कोर्ट चालू आहे - विजय तेंडुलकर
७. बेबी - विजय तेंडुलकर
८. राधा वजा रानडे - चेतन दातार
९. झुलवा - चेतन दातार
१०. अजब न्याय वर्तुळाचा - चिं.त्र्यं.खानोलकर
११. पुरुष - जयवंत दळवी
१२. जास्वंदी - सई परांजपे
१३. पाहिजे जातीचे - विजय तेंडुलकर
१४. शोभायात्रा - शफाअत खान
१५. टूरटूर - पुरूषोत्तम बेर्डे
१६. रायगडाला जेव्हा जाग येते - वसंत कानेटकर
१७. इथे ओशाळला मृत्यू - वसंत कानेटकर
१८. तो मी नव्हेच - आचार्य प्र.के.अत्रे
१९. लेकुरे उदंड झाली - वसंत कानेटकर
२०. महानिर्वाण - सतीश आळेकर
२१. बेगम बर्वे - सतीश आळेकर
२२. हमीदाबाईची कोठी - अनिल बर्वे
२३. रानभूल - प्र.ल.मयेकर
२४. किरवंत - प्रेमानंद गज्वी
२५. ब‌ॅरिस्टर - जयवंत दळवी
२६. लग्नाची बेडी - आचार्य प्र.के.अत्रे
२७. सही रे सही - केदार शिंदे
२८. आॅल द बेस्ट - देवेंद्र पेम
२९. राजसंन्यास - रा.ग.गडकरी
३०. अखेरचा सवाल - वसंत कानेटकर
३१. थँक यू मिस्टर ग्लाड - अनिल बर्वे
३२. आई रिटायर होतेय - अशोक पाटोळे
३३. तुघलक - गिरीश कार्नाड
३४. झोपी गेलेला जागा झाला - बबन प्रभू
३५. अचाट गावची अफाट मावशी - रत्नाकर मतकरी
३६. कुंपणाबाहेरची फुलं- राजू तुलालवार
३७. सीमेवरुन परत जा - बाळ कोल्हटकर
३८. कोवळी उन्हे (मूळ लेखन - विजय तेंडुलकर, नाट्यरुपांतर - संदेश कुलकर्णी)
३९. कन्यादान - विजय तेंडुलकर
४०. बेईमान - वसंत कानेटकर

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Aug 2016 - 5:55 pm | डॉ सुहास म्हात्रे

धाग्याची वाखू साठवली आहे. पुस्तकांच्या लांबलचक याद्या वाचूनच छातीवर दडपण आले :)

: वाचनआळससम्राट

पुंबा's picture

31 Aug 2016 - 3:13 pm | पुंबा

डिट्टो..

देशपांडे विनायक's picture

30 Aug 2016 - 7:17 pm | देशपांडे विनायक

अहो
the fountainhead लिहिणाऱ्या बाईला कसे विसरू शकू ?

सामान्य वाचक's picture

30 Aug 2016 - 8:59 pm | सामान्य वाचक

Fountainhead आणि Atlas shrugged ने काही वर्षांपूर्वी झपाटून टाकले होते
त्यामानाने Anthem फारसे नाही आवडले

लोनली प्लॅनेट's picture

30 Aug 2016 - 7:44 pm | लोनली प्लॅनेट

खूप छान धागा काढलात हेमंतजी भरपूर पुस्तकांचा परिचय होत आहे
अधर्मयुद्ध-गिरीश कुबेर
किमयागार-अच्युत गोडबोले

कृपया भाषांतरीतचा वेगळा धागा काढा अथवा ती यादी प्रतिसादकर्त्यांनी वेगळी द्या.
१)एकच प्याला - गडकरी
२)लेखकाचे घर - जयवंत दळवी
३) एक माणूस एक दिवस - ह मो मराठे
४)रामनगरी - राम नगरकर
५)orion - bal gangadhar tilak
६)पिकासो - माधुरी पुरंदरे
७)two worlds - k p s menon
८)शंवाकीय - शंतनू किर्लोस्कर

कैलासवासी सोन्याबापु's picture

30 Aug 2016 - 10:25 pm | कैलासवासी सोन्याबापु

तसे पाहता माझे वाचन जास्त नाही

तरी, सुचतील तितकी देतो

१. एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर
२. महानायक - विश्वास पाटील
३. वोल्गा जेव्हा लाल होते- वि.स. वाळिंबे
४. इंदिरा - पुपुल जयकर
५. माझेही एक स्वप्न होते - डॉक्टर वर्गीस कुरियन
६. मृत्युंजय - शिवाजी सावंत
७. इडली ऑर्किड अन मी - विठ्ठल कामत
८. माझी जन्मठेप - वि दा सावरकर
९. मानवेंद्रनाथ रॉय,व्यक्ती अन विचार- द्वा भि कर्णिक
१०.शेरलॉक होम्स - सर आर्थर कॅनन डॉयल
११.अफगाण - फ्रेडरिक फोरसाइथ
१२.शास्त्री - अशोक जैन
१३.शहेनशहा - ना स इनामदार
१४.दुर्दम्य - गंगाधर गाडगीळ
१५.हसरे दुःख - भा द खेर
१६.आनंदमठ - बंकिम बाबू

बाकी सलग आठवत नाहीयेत, आठवतील तसे देतो

सगळ्यात महत्वाचे पुस्तक

"भारतीय राज्यघटना"

हेमंत लाटकर's picture

30 Aug 2016 - 10:34 pm | हेमंत लाटकर

सर्वाच्या प्रतिसादातून मराठी पुस्तकाची बरीच मोठी यादी तयार होईल.मराठी पुस्तके सवलतीमध्ये खरेदी करण्यासाठी www.granthdwar.com

ही साईट बरी वाटली. २ इतरत्र मिळत नसणारी पुस्तकेही खरेदी करता आली, ते आवडले, पण शिपिंग चार्जेस जास्त वाटले. साईटसाठी आभार.

रातराणी's picture

31 Aug 2016 - 7:50 am | रातराणी

वाखुसाआ.

नाखु's picture

31 Aug 2016 - 9:29 am | नाखु

वाखुसाआ.

नाखुसाआ

पथिक's picture

31 Aug 2016 - 12:27 pm | पथिक

पुरुषोत्तम बोरकर यांचं 'मेड इन इंडिया' आवर्जून वाचा.
"मी मनात जपलेल्या मोजक्या मराठी पुस्तकांपैकी एक" असे उद्गार या पुस्तकाबद्दल स्वतः पु ल नि काढले आहेत !

वेल्लाभट's picture

31 Aug 2016 - 12:30 pm | वेल्लाभट

आयला
इथे पन्नास पन्नास आवडती पुस्तकं जमतायत...
मी तितकी वाचलेलीही नाहीत.

पण यादी साठवत आहे.

सुमीत भातखंडे's picture

31 Aug 2016 - 12:32 pm | सुमीत भातखंडे

वाखुसा.

महासंग्राम's picture

31 Aug 2016 - 2:19 pm | महासंग्राम

कोणाच्याच यादीत वुडहाऊसचा उल्लेख नाही आश्चर्याची गोष्ट आहे.

आदूबाळ's picture

1 Sep 2016 - 11:26 am | आदूबाळ

जेब्बा! हाथ मिलाओ भाई!

माझ्या (अजून न लिहिलेल्या) यादीत आहे. पहिल्या पाचेक नंबरांत असेल.

महासंग्राम's picture

1 Sep 2016 - 2:31 pm | महासंग्राम

सेम हियर पुलं नी वुडहाऊस च केलेलं कौतुक वाचून त्याला वाचायला सुरवात केली. कधी आवडत्या लेखकांच्या यादीत गेला कळलंच नाही.

चला मिपा ड्रोन्स क्लब काढूया!

महासंग्राम's picture

2 Sep 2016 - 9:24 am | महासंग्राम

कालच डेक्कनला वूडहाऊसच्या 'पिकॅडलीजिम' ची बहुदा १९६५ च्या आधी छापली गेलेली कॉपी मिळाली. विकांत भारी जाणारे या वेळेसचा

नाही टाकली. विंग्रजी पुस्तकं वेगळ्या यादीत टाका की.

महासंग्राम's picture

2 Sep 2016 - 10:05 am | महासंग्राम

वोक्के बॉस... पण कसंय ना सायबाने १५० वर्ष राज्य केल्याने विंग्रजीचा थोडा रागच ए ;)

बोका-ए-आझम's picture

2 Sep 2016 - 12:10 pm | बोका-ए-आझम

त्याच्या भाषेचा नको.

महासंग्राम's picture

2 Sep 2016 - 2:37 pm | महासंग्राम

हो, आता वूडहाऊस भेटलाय ना तेव्हा इतकी सुंदर भाषा आहे उगाच होतो असं वाटतंय

महासंग्राम's picture

4 Sep 2016 - 12:28 am | महासंग्राम

आणी तुमच्यामुळे हि आवड अजून वाढली. आधी फक्त चेतन भगत वाचणारा मी, तुमच्या सकॅरेक्रोव आणि mosaad च्या अनुवाद मालिकेत पुढे काय होईल या उत्सुकतेमुळे 2 हि इंग्रजी पुस्तके वाचून काढली.

कैलासवासी सोन्याबापु's picture

1 Sep 2016 - 9:55 pm | कैलासवासी सोन्याबापु

गले मिलो भाई लोक्स!! उच्चतम कोटीचा इंग्लिश विनोद वूडहाऊस सोडून पूर्ण आकार घेऊ शकत नाही! ती परंपरा खास अश्या टीव्ही सिरीज "येस मिनिस्टर" मध्ये सुद्धा जाणवते :)

अवांतर :- आबासाहेब, बेनी हिल ला फिरंगी दादा कोंडके म्हणावे काय ? =))

महासंग्राम's picture

31 Aug 2016 - 2:19 pm | महासंग्राम

कोणाच्याच यादीत वुडहाऊसचा उल्लेख नाही आश्चर्याची गोष्ट आहे.

गिरिजा देशपांडे's picture

31 Aug 2016 - 2:53 pm | गिरिजा देशपांडे

शशी भागवत - रत्नप्रतिमा, रक्तरेखा, मर्मभेद (रहस्यमय पुस्तक आवडणाऱ्यांसाठी)
आनंद यादव - झोंबी, नांगरणी, घरभिंती, काचवेल
विश्वास पाटील - झाडाझडती
शांता शेळके - चौघीजणी (अनुवादित)
पर्व - एस. एल. भैरप्पा
आनंदी गोपाळ - श्री ज जोशी
एक होती आजी - श्री ना पेंडसे

१-नातिचरामी- मेघना पेठे ( भारतीय व एकंदरीत विवाहसंस्थेवरील मार्मिक भाष्य करणारी कादंबरी )
२-ऑपरेशन यमु- मकरंद साठे ( आधुनिक माणसाच्या अस्थिरतेचा भयाचा तुटत जाण्याचा आलेख अनोख्या शैलीत मांडणारी कादंबरी )
३-गौतमची गोष्ट- लेखकाचे नाव विसरलो दामले आहे बहुधा ( हि गौतमबुद्धावर नाही )
४-आतंक- विलास सारंग चा कथासंग्रह ( याची प्रस्तावनाही अत्यंत मार्मिक आहे एक एक कथा हादरवुन सोडणारी मात्र ही शिर्षकावरुन कदाचित गैरसमज होऊ शकतो तशी रेग्युलर दहशतवाद या विषयावरील कथा यात नाहीत)
५-के फाइव्ह-- अनंत सामंत ( टेरीफीक शैली )
६-अघोरी- बाबुराव बागुल
७-मंद्र- भैरप्पा मराठी अनुवादीत कादंबरी ( कलाकार आणि माणुस यातील विरोधाभासाचा मुलगामी वेध घेणारी )
८-रीटा वेलीणकर- शांता गोखले
काही नॉन फिक्शन
१- मानव आणि मार्क्स- प्रभाकर पाध्ये ( मार्क्सवरील मराठीतील सर्वात प्रगल्भ टीका )
२- दास-शुद्रांची गुलामगिरी- शरत पाटील
३- हिंदु धार्मिक परंपरा आणि सामाजिक परीवर्तन- मे.पु. रेगे
४- आयडियाज आर डेंजरस- राजु परुळेकर
५- जी.ए. चा पत्रसंग्रह ( सर्वात आवडता दुसरा खंड ज्यात सुनिताबाइंनी लिहीलेल्या दिर्घ पत्रांचा समावेश आहे तो )
सध्या इतकच आठवतय.

प्रचेतस's picture

31 Aug 2016 - 3:14 pm | प्रचेतस

गौतमची गोष्ट- अनिल दामले.

भैरप्पांचं 'मंद्र' हेच एकमेव न आवडलेलं पुस्तक. खूप कंटाळवाणं आहे.

अनंत सामंत एक फॅण्टास्टिक लेखक आहेत.

सामान्य वाचक's picture

31 Aug 2016 - 3:21 pm | सामान्य वाचक

त्यांची वाचलेली पहिली कादंबरी होती MT आयवा मारू
काय भन्नाट शैली आहे,

महासंग्राम's picture

31 Aug 2016 - 3:28 pm | महासंग्राम

तुमच्याकडे डाका टाकून पुस्तकं लुटावी लागणार असं दिसतंय.

या कधीपण घरी. ३००/४०० पुस्तके आहेत फक्त. हजारच्या वर पुस्तकांचा संग्रह असणारे दोन तीन मिपाकर माहिती आहेत मात्र. खरंतर त्यांच्याकडे धाड टाकायला हवी. :)

महासंग्राम's picture

31 Aug 2016 - 4:40 pm | महासंग्राम

काय सांगता नक्कीच धाड टाकायला हवी मग

अनुप ढेरे's picture

1 Sep 2016 - 11:28 am | अनुप ढेरे

वल्लींनी कधीतरी गोनीदांची एक-दोन रेअर पुस्तकं असल्याचा उल्लेख केलेला. ती लुटा मिळाली तर आणि पीडीएफ करा अपलोड.

मारवा's picture

31 Aug 2016 - 3:40 pm | मारवा

बरोबर अनिल दामले
अनंत सामंत उत्कृष्ठ लेखक आहेत मला कोणीतरी सांगितल के फाइव्ह नावाचा मराठी सिनेमाही आलाय
पण तो याच कादंबरीवरील आहे की या नावाचा आहे काहीच माहीत नाही.
एमटी आयवा मारु सारख्या कादंबर्‍यांनी नविन विश्व मराठीत आणुन मराठी साहीत्य समृद्ध केलं.
भैरप्पांच आत्मचरीत्रही सुंदर आहे. फार आवडलं. भैरप्पाचे मराठी अनुवादच सुंदर आहेत एकदा चुकुन पर्व चा साहीत्य अकादमीने प्रकाशित केलेला इंग्रजी अनुवाद घेतला होता तेव्हा फ्रस्ट्रेशन आलेलं होत. नंतर मराठीत वाचल्यावर तब्येत सुधारली.
महाभारतावरच वाचायला आवडत किरण नगरकरांचं बेडटाइम स्टोरी हे अफाट नाटक आहे. हे जेव्हा अनेक वर्षापुंर्वी आल तेव्हा त्याला प्रचंड विरोध झाला अनेको ठिकाणी सेन्सॉर कट मारण्यात आले.
नुकताच एक युट्युब वर व्हिडीयो मिळाला यात किरण नगरकर व सोनाली कुलकर्णी यांनी बेडटाइम स्टोरी च काही वाचन केलेलं आहे.
आहे. एक्स्ट्रीमली इंटरेस्टींग एकदा बघा
https://www.youtube.com/watch?v=GqKct_lT6tA
आणि अरुण कोलटकरांचा त्यांच्या निधनानंतर त्यांचा पुस्तक संग्रह आवरतांना अशोक शहाणे व इतर च्या गप्पांचे पण हे दोन व्हीडियो इथे आहेत. मस्त आहेत जर कोणाला रस असेल तर
https://www.youtube.com/watch?v=DrImA6b5BBw
https://www.youtube.com/watch?v=gvrwKkmsQCQ

प्रचेतस's picture

31 Aug 2016 - 4:07 pm | प्रचेतस

सामंतांचीच जहाजाच्या पार्श्वभूमीवर आधारीत अजून दोन कादंबर्‍या आहेत. लिलियनची बखर (ही ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आहे) आणि त्रिमाकासी मादाम (ही कुठे मिळत नाही पण संग्रही आहे).

त्यांची लांडगा ही एक वेगळ्या धर्तीची कादंबरी आहे. छान आहे ती पण.

भैरप्पांच्या जवळपास सर्वच कादंबर्‍या मराठीत उमा कुलकर्णींनी आणल्या. अत्युकृष्ट अनुवाद आहेत ते.

आता सामंतांच्या या कादंबर्‍या वाचायलाच हव्या.
उमा विरुपाक्ष कुलकर्णी ( विरुपाक्ष लय भारी नाव आहे शंकराच आहे का ?) यांचे अनुवाद अत्युत्कृष्ठ आहेत. उमाजींमुळे
कन्नड साहित्याची गंगा मराठीच्या अंगणात आली. त्या नसत्या तर आपल्याला भैरप्पा कुठे वाचायला मिळाले असते.
त्यांनी इतरही अनेक दर्जेदार कन्नड साहित्यातील रत्ने मराठीत आणलेली आहेत. एक गंमत आहे केवळ एका दर्जेदार अनुवादकामुळे व त्यांच्या परीश्रमामुळे आपल्या भाषेत किती सुंदर साहित्य आल. असे एकेक भाषेचे अजुन मिळायला हवेत काय छान होइल. कारण भारतीय इतर भाषातील साहीत्य सहसा इंग्रजीत नसत वा इतर ठिकाणी नसत. ( साहित्य अकादमीचा अनुवादीत ग्रंथाचा सन्माननीय उपक्रमाचा अपवाद वगळता ) सहज उपलब्ध होत नाहीत. शिवाय साहित्य अकादमीच सिलेक्शन हे सहसा जुन्या लेखकांच वा त्यांच्या जुन्या साहित्याच असत. तरीही हे ही नसे थोडके. कधी कधी साहित्य अकादमीच्या अ‍ॅन्थॉलॉजीज कलेकशन्स (सहसा मराठी कवि लेखकांची चांगली असतात- खानोलकर-रेगे छान कव्हर केलेत.) तर उमाजी सारखे एक एक भारतीय भाषेचे मराठी शिलेदार असले तर काय बहार येइल.
कितीतरी कसदार साहित्य आपल्याला भाषेच्या अडचणीमुळे मिळतही नाही.

प्रचेतस's picture

31 Aug 2016 - 4:56 pm | प्रचेतस

विरुपाक्ष हे शंकराचंच नाव :)

मजकडे साहित्य अकादमी, नॅशनल बुक ट्रस्टने प्रकाशित केलेल्या काही कन्नड कादंबर्‍यांचे मराठी अनुवाद आहेत. रा. शं. लोकापूर, मीना वांगीकर हे अजून काही अनुवादक.

मल्ल्याळीतले मान्यवर लेखक तकझी (तकळी) शिवशंकर पिल्ले ह्यांच्या कादंबर्‍या देखील छान आहेत. चेम्मीन आणि दोन शेर धान. सुंदर कादंबर्‍या आहेत ह्या.

बोका-ए-आझम's picture

31 Aug 2016 - 11:17 pm | बोका-ए-आझम

यांनी मास्ती वेंकटेश अय्यंगार यांच्या चिक्कवीर राजेंद्र या पुस्तकाचा अनुवाद केलाय. पण तो मिळत नाही कुठे.

फोर्टला किताबखान्यात कदाचित मिळू शकेल.

बोका-ए-आझम's picture

31 Aug 2016 - 11:30 pm | बोका-ए-आझम

चेकवण्यात येईल.

अलका सुहास जोशी's picture

3 Sep 2016 - 3:19 pm | अलका सुहास जोशी

मारवा यांस....
जळगावला आजन्म वास्तव्य केलेले जगप्रसिध्द फोटोग्राफर म्हणजे केकी मूस. त्यांची फोटोग्राफीक फिलॉसॉफी अनंत सामंतांनी मांडली आहे “ओश्तोरीज” या कादंबरीत. भन्नाट पुस्तक आहे.जरूर वाचावे.