टाळी - शतशब्द कथा

विशाल चंदाले's picture
विशाल चंदाले in जनातलं, मनातलं
29 Aug 2016 - 7:44 pm

काठीवर डाव्या पायाचा भार देत तिने एकापुढे हात पसरले. पाऊल पुढे टाकत त्याने मान हलवली. उपाशीपोटी ती हात पसरत पुढे निघाली. एक, दोन रुपयांपेक्षा जास्त मिळत नव्हते. नळावर पाणी पीत असताना एका टाळीने तिचं लक्ष्य वेधून घेतलं. एक हिजडा रेल्वेमध्ये टाळी वाजवून हात पसरत होता/ती. लोक लगबग करून दहा रुपयाची नोट हातावर टेकवत होते. तिने हातातल्या एक रुपयांकडे बघून आशाळभूत नजरेने हिजड्याच्या हातातल्या दहा रुपयांकडे बघितले. मनातल्या मनात स्वतःच्या नशिबाला दूषणे देत ती निघाली.
एकाएकी तिचा चेहरा उजळला. ती थबकली. तिला काहीतरी सापडलं होतं.
तिने नळावर चेहरा धुतला. रुपयाचं पान खाऊन तोंड रंगवलं. आणि हातातली काठी टाकून जोरात टाळी वाजवली.

कथा

प्रतिक्रिया

खटपट्या's picture

29 Aug 2016 - 9:34 pm | खटपट्या

हम्म्म

निखिल निरगुडे's picture

5 Sep 2016 - 5:59 am | निखिल निरगुडे

पोटाची तिडकी कोणाला काय करायला भाग पाडेल सांगता येत नाही... :/

आतिवास's picture

5 Sep 2016 - 9:42 am | आतिवास

चांगली लिहिली आहे, आवडली असं मात्र म्हणवत नाही ते केवळ त्यातल्या विदारकतेमुळं.