परसबागेतील शंका समाधान आणि चर्चासत्र.

कलंत्री's picture
कलंत्री in काथ्याकूट
29 Aug 2016 - 4:41 pm
गाभा: 

परसबागेचा आनंद अनेक गोष्टी समजावून घेतांना होत असतो. उदा. कचर्‍याचे खत कसे करावे आणि त्यामागचे शास्त्र, झाडांची देखभाल, पाण्याचे व्यवस्थापन, छोट्या छोट्या तंत्राने बाग कशी फुलवावी, झाडांचा, फुलांचा, भाजीपाल्याचा ताजेपणा आणि अश्या अनेक गोष्टींसाठी सेंद्रिय बागकाम करणाची आवड असणार्‍या साठी एक छोटेसे चर्चासत्र प्रश्न आणि उत्तरे, शंकासमाधानाच्या स्वरुपात आयोजित करण्याचे ठरवलेले आहे.

या चर्चासत्राला माननिय खके काका मार्गदर्शन करणार आहे. ( मनोहर खके या नावाने त्यांचे यु ट्युब वर काही माहितीपूर्ण च्लिपस आहे.)

चर्चासत्राची वेळ ४ सप्टे. २०१६ ला ११ ते ४ या वेळात ठरवलेले आहे.

स्थळ : बालचित्रवाणीच्या / सिम्बाय्सिस मागील टेकडीच्या पायथ्याशी, सेनापती बापट मार्ग, तेथे पुरंदरेकाका चा पत्ता विचारला तरी तेथील लोक मार्गदर्शन करु शकतील.

चर्चासत्राचे शुल्क ऐच्छिक असेल.

नावनोंदणी साठी ८६०० ९९४२९३ या क्रंमाकावर संपर्क साधावा अथवा संदेश पाठवावा.

मर्यादित जागा असल्यामूळे ३ तारखेपर्यंत नोंदणी असणे आवश्यक आहे.

आपल्याबरोबर कोणी हौशी लोकांनाही आणले तर त्यांना यांचें समाधानकारक उत्तरे मिळतील आणि आपलाही छोटासा गट निर्माण होण्यास हातभार लागेल.
येण्यापूर्वीच आपल्या शंका, प्रश्ने, आपले यशस्वी आणि अयशस्वी प्रयोगाच्या लेखी टिपण आणल्यास त्याचा सर्वांनाच फायदा होईल आणि चर्चा भरकटत जाणार नाही.
कृपया या संधीचा जास्तीत जास्त उपयोग करुन घ्यावा ही विनंती.

कलंत्री, पुणे.

प्रतिक्रिया

कलंत्री's picture

1 Sep 2016 - 10:29 am | कलंत्री

मिपावर बागकामाची आवड असणारे कोणीही नाहीत?

गणामास्तर's picture

1 Sep 2016 - 12:13 pm | गणामास्तर

असतील कि. तुमचं धाग्याचं शीर्षक जरा हुकेलै त्यामुळं पब्लिक फिरकलं नसेल असे वाटतंय :)

टवाळ कार्टा's picture

1 Sep 2016 - 12:47 pm | टवाळ कार्टा

=))

मी पुण्यात असतो, तर नक्कीच चर्चासत्राला हजेरी लावली असती.

प्रभाकर पेठकर's picture

1 Sep 2016 - 11:34 am | प्रभाकर पेठकर

भारतापासून दूर असल्याकारणाने हजेरी लावणे शक्य नाही. पण आपण कार्यक्रमानंतर एखादा विस्तृत लेख टाका इथे सर्वांसाठी माहितीपूर्ण होईल.

माझ्या मते चर्चा सत्रे ऐकून बाग फुलत नसती. बाग फुलवणे म्हणजे बाळ वाढविण्यासारखे असते. चर्चासत्रातून आयते कृत्रिम ज्ञान घेण्यापेक्षा कृपया स्वतः नवं नवीन प्रयोग करून बाग घडवण्याचा प्रयत्न करा, दुप्पट आनंद मिळेल. अनुभवसिद्ध..!!
बाकी अगदीच नवीन असाल तर नक्की उपस्थिती लावा.
आणखी चांगला अनुभव हवा असेल तर पुरंदर तालुक्यातील कमी पर्जन्य असणाऱ्या गावामध्ये जाऊन तेथील शेतकरी पेल्याने पाणी घालून रोपटी कशी जगवतात, याचा नमुना पहा.
आणि हो सेंद्रियच फक्त बेस्ट असं काही नसतं. झाडांना योग्य प्रमाणात योग्य पोषण मिळणं महत्वाचं. कोणत्या ही गोष्टीचा अतिरेक हा नेहमी घातकच असतो.

आपले मत योग्यच आहे. चुकणे - शिकणे - कोणालातरी विचारणे - प्रयोग करत राहणे या चक्रातूनच शिकणे होत असते.

रसायनमूक्त अन्न मिळणे यासाठीच हा प्रयोग आहे. वनस्पतीची वाढ त्यातील एक भाग आहे.

सपे-पुणे-३०'s picture

3 Sep 2016 - 3:44 pm | सपे-पुणे-३०

गेल्या डिसेम्बर पासून मातीविना बाग हा प्रयोग करतेय. चांगलाच यशस्वी झालाय. सध्या एक छोटं डाळिंब पण आलंय. सगळी झाडं कुंड्यांमध्येच आहेत. फक्त भाज्यांचा कचरा, खरकटं, नारळाच्या शेंड्या,चहा/कॉफीचा गाळ इ. वापरते.

चंपाबाई's picture

3 Sep 2016 - 4:59 pm | चंपाबाई

नवीन धागा काढा

वाह छानच की. आणखी माहिती देत रहा. जमल्यास फोटो टाकायला हवेत.

यायला खूप आवडले असते, धागा उशीरा पाहिला, आधीच दुसरा कार्यक्रम ठरला आहे...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Sep 2016 - 7:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कलंत्रीसेठ, चर्चासत्र संपल्यावर वृत्तांत तपशीलवार येऊ द्या.

-दिलीप बिरुटे