शेम्बुड आख्यान

इल्यूमिनाटस's picture
इल्यूमिनाटस in जनातलं, मनातलं
29 Aug 2016 - 8:51 am

शाळेतला एक प्रसंग आठवला. आता या प्रसंगातून सात्विक बोध घ्यावा असे काही नाही आणि ही गोष्ट फार कौतुकाने सांगावी अशातला ही भाग नाही (नावावरून स्पष्ट च आहे!) तरी विरंगुळा म्हणून लिहितो आहे.

वैधानिक इशारा- मन कणखर करा, कारण गोष्टीत बराच शेम्बुड आहे!

शाळा सूरू होऊन दोन महिने झाले होते , तरी अजून नवीन युनिफॉर्म चा पत्ता नव्हता. मला या युनिफॉर्म चं भलतंच आकर्षण वाटायचं. युनिफॉर्म घातल्यावर सगळीच माणसं रुबाबदार दिसतात असं उगीचच मला वाटायचं, आणि ज्ञान प्रबोधीनी चा युनिफॉर्म तर काही औरच! गुलाबी कुर्ता, पांढरी विजार आणि डोक्यावर गांधी टोपी. हे कुर्ता वगैरे प्रकरण माझ्यासाठी जरा नवीनच होतं. एकदा कधी तो गणवेश अंगावर चढवतो असं झालं होतं! पण शिवणकाम करणाऱ्या बाईंना बहुतेक मला हा आनंद उपभोगू द्यायचा नव्हता. आत्तापर्यंत दोन तीन खेटे मारले होते ह्या काकूंकडे, पण काकू काय प्रसन्न झाल्याच नाहीत.

आता नाही म्हणलं तरी या बाईचा मला राग आला होता. बऱ्याच जणांचे युनिफॉर्म ह्या बाईंनी शिवून दिले होते. आमचंच घोडं कुठं अडलय हे बघण्यासाठी आता आम्ही चवथी खेप मारायच्या तयारीत होतो. आम्ही म्हणजे जोश्या , जोग आणि मी.

ह्या शिवणकाम वाल्या बाई , शाळेतल्याच टेक्निकल बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यावर बसायच्या. आम्ही तिघांनी तिथे धडक मारली , परत पदरी निराशाच पडली. शिव्या हासडतच आम्ही खाली उतरत होतो. आता पाचवीतले पोरं शिव्या देऊन देऊन काय देणार?! पण बावळट नालायक म्हणून आम्ही आमचं मन मोकळं करून घेत होतो. दुसऱ्या मजल्यावर पोहोचतो न पोहोचतो तोच एक परिचयाचा आवाज आला. आआआ छच्ची!

जोश्या शिंकला होता. जोश्याला सर्दी झाली होती. त्यामुळे तो सारखाच शिंकत होता. मी दुर्लक्ष करून खाली उतरायला लागलो तर अजून एक आवाज आला, हा हि ओळखीचाच होता , जोग जोरजोरात हसत होता. आता काय झाले म्हणून मी मागे बघितले तर बाप रे बाप! जोश्या नुसताच शिंकला नव्हता तर त्याने त्याचे साईड प्रॉडक्ट हि तयार केले होते. शेम्बुड! साधा सुधा नाही लांबलचक शेम्बुड! हा नाकातून आलेला ऐवज जवळजवळ जमिनीलाच टेकायचा बाकी होता. जोग आणि मी दोघंही जोरात किंचाळलो ईईईईई र्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र घाणेरड्या शिईईईई व्याक थू , वगैरे झाल्यावर आम्ही भयानक हसायला लागलो. आता आमची हि प्रतिक्रिया स्वाभाविकच होती कारण असला भयंकर प्रकार आम्ही कधीच पाहिला नव्हता. एवढा लांब शेम्बुड तयार होऊ शकतो याची आम्हाला कल्पना देखील नव्हती!

आता ह्या जोश्याच्या शेम्बडा बद्दल जोग आणि माझ्यात बरीच मतं मतांतरं होती. दोघांचं मत एव्हरेज करून सांगतो. म्हणजे तुम्हाला या "प्रकाराची" भव्यता कळेल! आणि दिव्यता सुद्धा! लांबी दीड दोन फूट असावी. आत्ताच सांगितल्या प्रमाणे शेम्बुड जमिनीला जस्ट टेकलाच होता. व्यास म्हणाल तर कोलगेट मधून जेवढी पेस्ट बाहेर येते तेवढा असावा. आता रंग अगदीच कोलगेट सारखा नसला तरी हिरवागार देखील नव्हता. पांढऱ्या रंगाला हिरवी झालर होती इतकंच. (अतिवर्णना बद्दल माफी!)

आमचे इकडे हसणे चालूच होते. पार पडून पडून हसत होतो आम्ही. जोश्या मात्र एका बापाने आपल्या नुकत्याच जन्मलेल्या अपत्याकडे ज्या कौतुकाने, आपुलकीने, आणि प्रेमाने पाहावे तसे आपली डोळ्याची बुबुळ नाकाच्या दिशेने आणून त्या शेम्बडा कडे बघत होता. जोश्या जरा वाकुनच थांबला होता. कारण सरळ थांबला असता तर त्या शेम्बडानं जोश्याच्या शर्टाचा आणि प्यांटीचा मुकाच घेतला असता! जोग तेवढ्यात म्हणाला , हसत हसतच, "अरे पडेल ते खाली ही हि हा हा हि" परत जोरात हास्य. मग जोशी हिमेश रेशमिया च्या आवाजात म्हणाला "नाय नाय... नाय पडत!" जोश्याच्या आवाजात विश्वास होता!

आता या अक्राळविक्राळ शेम्बडाचे करायचे काय असा आमच्यासमोर यक्ष प्रश्न उभा राहिला. तिथेच पॅसेज मध्ये एक खिडकी होती , पण खाली बरीच वर्दळ होती. कोणाचा तरी उद्धार झाला असता, मग त्यानी आमचा केला असता! त्यामुळे हा पर्याय नाकारण्यात आला. खालच्या मजल्यावर बेसिन होतं, पण तिथपर्यंत हा प्रकार घेऊन जायचं म्हणजे पंचाईतच होती. मधेच एखादी वाऱ्याची झुळूक आली असती तर त्या शेम्बडाने खालच्या पायरीचे , जोश्याचे किंवा आजूबाजूच्या कोणाचेही जाहीर चुंबन घायला मागे पुढे पहिले नसते! आणि लांबलचक शेम्बुड ही काय मिरवायची गोष्ट आहे?! कोणी पाहीले असते म्हणजे? त्यामुळे हा विचार पण बारगळला. तिथेच फरशीवर टाकणे सभ्य पणाचे नव्हते. काय करावे काही सुचेना.

एवढ्यात जोशी म्हणाला "थांबा.." त्याच्या डोळ्यात निर्धार दिसत होता. आम्ही जोश्या आता काय करतो म्हणून पाहू लागलो. जोश्यानं आपल्या मुठी आवळल्या , डोळे झाकले , तोंड गच्च दाबून बंद केले, त्याचबरोबर एक जोरात आवाज आला, फुर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रफ्फफ्फफर्र्रर्रर्रर्रर्र....!!! जोश्या आपली सगळी शक्ती पणाला लावून तो शेम्बुड वर "वढत" होता. बघता बघता तो ऐवज जमिनीपासून वर जाऊ लागला, आणि जोश्याच्या नाकात गडप झाला. जसा कधी बाहेर आलाच नव्हता! आता मात्र आमची पुरी वाट लागली होती , हसून हसून खूप पोट दुखत होते त्यात असला भयानक प्रकार. जोश्या मात्र आमच्याकडे विजयी मुद्रेने बघत होता. आणि का बघू नये ?! असला पराक्रम जन्माला घालून तो गुरुत्वशक्तीच्या विरोधात शक्ती लावून गायब करण्याची किमया करणारा किमयागारच होता तो! कृष्णाने आपल्या मातेला तोंड उघडून विश्वाचे दर्शन दिले होते, तर इथे जोश्याने आम्हांला शिंकरून त्याच्या नाकातल्या अंतरंगाचे दर्शन घडवून अचंबित केले होते. धन्य तो कृष्ण! धन्य तो जोशी! धन्य तो जोश्याचा शेम्बुड! धन्य ते बघणारे आम्ही! धन्य ते वाचणारे तुम्ही!

पण काहीही म्हणा , त्या दिवसापासून माझ्या मनातला जोश्या बद्दलचा आदर फारच वाढला! ( पुढचे दोन तीन आठवडे आम्ही त्याला आमच्या जवळ देखील फिरकू दिले नाही हा भाग वेगळा!)

समाप्त

विनोदमौजमजाअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

रासपुतीन's picture

29 Aug 2016 - 9:04 am | रासपुतीन

फारच उत्तम. खूप हसलो. छान जमलय.....

संदीप डांगे's picture

29 Aug 2016 - 9:10 am | संदीप डांगे

+१

इल्यूमिनाटस's picture

29 Aug 2016 - 5:25 pm | इल्यूमिनाटस

आभार

खर्डा भाकरी's picture

31 Aug 2016 - 3:50 pm | खर्डा भाकरी

काय खतरनाक शेंबुड काढलाय राव, हसुन हसुन आमचा शेंबुड यायचा बाकी राहीला राव.

मन१'s picture

29 Aug 2016 - 9:21 am | मन१

कै च्या कैच्चे =))
.
.
बादवे, हे आमचे शेंबूड महात्म्य

इल्यूमिनाटस's picture

29 Aug 2016 - 5:26 pm | इल्यूमिनाटस

; )

मार्मिक गोडसे's picture

29 Aug 2016 - 9:37 am | मार्मिक गोडसे

आवडला बुळबुळीत धागा आवडला. ह्या पदार्थाचे उत्तम recycling करता येते.

सुबोध खरे's picture

29 Aug 2016 - 9:53 am | सुबोध खरे

इ इइ ईईईई यक

गणामास्तर's picture

29 Aug 2016 - 11:06 am | गणामास्तर

=)) =)) =))

पाटीलभाऊ's picture

29 Aug 2016 - 5:36 pm | पाटीलभाऊ

हाहाहा..भारी लिहिलंय
"असला पराक्रम जन्माला घालून तो गुरुत्वशक्तीच्या विरोधात शक्ती लावून गायब करण्याची किमया करणारा किमयागारच होता तो!"
चक्क विज्ञानाला आव्हान..

गौतमी's picture

29 Aug 2016 - 5:48 pm | गौतमी

आईईईई गं.. ऑफ्फिसमध्ये वाचण्यालायक नाहीये हे. (कामावरुन काढुन टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही) ;)

इल्यूमिनाटस's picture

29 Aug 2016 - 6:15 pm | इल्यूमिनाटस

इशाऱ्या मध्ये हे टाकायला विसरलो! "ऑफिस मध्ये वाचू नका" ; )

जव्हेरगंज's picture

29 Aug 2016 - 6:21 pm | जव्हेरगंज

पुर्ण नाही वाचू शकलो

vcdatrange's picture

29 Aug 2016 - 9:33 pm | vcdatrange

अरारारा.......

खटपट्या's picture

29 Aug 2016 - 9:47 pm | खटपट्या

यक, लगेच डोळ्यासमोर जोशाचे चित्र शेंबडासकट उभे राहीले...

इल्यूमिनाटस's picture

30 Aug 2016 - 6:42 am | इल्यूमिनाटस

( ・ิϖ・ิ) (^。^)

अमितसांगली's picture

30 Aug 2016 - 4:22 pm | अमितसांगली

भारी लिहलय....

आजानुकर्ण's picture

30 Aug 2016 - 7:18 pm | आजानुकर्ण

अरारारा. अत्यंत चिकट, बुळबुळीत लेखन

भ ट क्या खे ड वा ला's picture

30 Aug 2016 - 8:42 pm | भ ट क्या खे ड वा ला

वर्णन रसभरित आहे .
ही बोटे चघळीत काय बसलास रे राम रे लाळ ही .
या चालीवर काही सुचतय का एखाद्या कवीला .
बिभस्त रसाचं नव परिमाण होइल कुणाला या प्रसंगावर काव्य सुचल तर .

इल्यूमिनाटस's picture

31 Aug 2016 - 12:29 pm | इल्यूमिनाटस

सर्वांचे आभार!

वामन देशमुख's picture

31 Aug 2016 - 2:13 pm | वामन देशमुख

व्याक थू

व्याक थू हा किळसवाणेपणा दर्शविणारा शब्दप्रयोग मी पूर्वी खूपदा ऐकलेला / बोललेला आहे, आजकाल त्याचा फारसा वापर होत नाही; पण सार्वजणिक ठिकाणी / लिखित स्वरूपात तो वापरण्याची हिंमत केली जाऊ शकते हे कधी लक्षातच आलं नाही.

अवांतर:माझी मुलगी आतापेक्षा लहान असताना ओठातून डावीकडून उजवीकडे वेगाने जीभ फिरवून "वॅक थू" व "व्याक थू" च्या मधला एक उच्च्चार करायची ते आठवून गम्मत वाटली.

सूड's picture

31 Aug 2016 - 8:32 pm | सूड

अर्र!!