मजार की मझार

दिव्य's picture
दिव्य in काथ्याकूट
27 Aug 2016 - 7:06 pm
गाभा: 

हजी अली दर्जासंदर्भातील बातमी अाज वाचली. या बातमीत काही वर्तमानपत्रात मजार तर काही ठिकाणी मझार हा शब्द वापरला अाहे. मराठीत याेग्य शब्द काेणता

प्रतिक्रिया

'मझ़ार' म्हणजे 'थडगे'. फक्त ते एखाद्या संत-फक़िराचे असते. 'क़बर' आणि 'मझ़ार' यांत असा सूक्ष्मसा फरक आहे. प्रत्येक क़बर ही मझ़ार नसते.

अत्रुप्त आत्मा's picture

27 Aug 2016 - 7:27 pm | अत्रुप्त आत्मा

मिपावरील वात्रटपणा संदर्भातील बातमी अाज ख. फ. मधे वाचली. या बातमीनुसार काही धाग्यात बाजार तर काही धाग्यात बझार हा शब्द वापरला अाहे. तर मिपामराठीत याेग्य शब्द काेणता? (मंजे नक्की काय उठवायचं? बाजार की बझार? )

माम्लेदारचा पन्खा's picture

27 Aug 2016 - 9:06 pm | माम्लेदारचा पन्खा

सक्काळी सक्काळी.....

संदीप डांगे's picture

27 Aug 2016 - 7:37 pm | संदीप डांगे

हजी अली दर्जासंदर्भातील

भाते's picture

27 Aug 2016 - 8:30 pm | भाते

कृपया हे असे एकोळी दोनोळी धागे बंद करा. किमान २५/५० शब्द असल्याशिवाय धागा प्रकाशित होणार नाही अशी सोय मिपावर करता येणार नाही का?

दिव्य,
तुम्ही माझ्यापेक्षा जास्त कालावधीसाठी मिपावर आहात. हि शंका खफवर किंवा सदाहरित धाग्यात विचारता आली नसती का? त्यासाठी दोनोळी धागा काढायची काय गरज होती?

रमेश आठवले's picture

27 Aug 2016 - 8:57 pm | रमेश आठवले

मझार शब्दावरून हा शेर लक्षात आला.

मझार पर न लाना रकिबे हमराको
मुसलमा मुर्देको जलाया नही करते

रकिब ( प्रतिस्पर्धी )

कैलासवासी सोन्याबापु's picture

27 Aug 2016 - 9:18 pm | कैलासवासी सोन्याबापु

शहीदों के मझारोंपर लगेंगे हर बरस मेले
वतनपर मरमिटनेवालोंका बाकी यही निशान होगा!

चंपाबाई's picture

28 Aug 2016 - 8:00 am | चंपाबाई

भाषेतील शब्द त्यातील र्‍हस्व दीर्घ वगैरेसाठी एकच धागा ठ्व्वायचा.

विवेकपटाईत's picture

28 Aug 2016 - 11:42 am | विवेकपटाईत

खरा शब्द "मज़ार" असा आहे. फारसी शब्द जो हिंदीत नाही. त्या उच्चारणच्या जवळ असणार्या शब्दाचा खाली बिंदी लाउन हिंदीत लिहिण्याची पद्धत आहे. अन्य शब्द ज़मीर, ज़माना इत्यादी.

स्वामी संकेतानंद's picture

28 Aug 2016 - 5:20 pm | स्वामी संकेतानंद

हेच लिहायला आलो होतो

गामा पैलवान's picture

28 Aug 2016 - 2:12 pm | गामा पैलवान

अवांतर :

मझार वरून आठवलं की हा शब्द युरोपातदेखील काही ठिकाणी दिसून येतो. मझारा-देल-वालो नावाचं गाव मझारा नदीकाठी सिसिलीत आहे. मझाराचा अर्थ उच्चपीठ ( = raised platform) असा असावा. मझारा नदी अचानक पूर येण्यासाठी (कु)प्रसिद्ध आहे. बहुधा त्यावरूनच तिला हे नाव पडलं असावं. तसेच याच परिसरात कांपोबेलो-दि-मझारा या नावाचेही एक गाव आहे. मात्र याचा मझारा नदीशी काही संबंध नाही. अर्थात मझारा = उच्चपीठ या तर्कास पुष्टी मिळते.

-गा.पै.

श्रीगुरुजी's picture

28 Aug 2016 - 9:01 pm | श्रीगुरुजी

अवांतर - विजार हा शब्द कोठून आला असावा?

रमेश आठवले's picture

29 Aug 2016 - 9:34 am | रमेश आठवले

जेथून पैजार बेजार आजार असे शब्द आले तेथून .

सिरुसेरि's picture

31 Aug 2016 - 10:52 pm | सिरुसेरि

काहि वर्षांपुर्वी दुरदर्शनवरील एका मालिकेतील कथेमध्ये मज़ार हा शब्द ऐकण्यात आला होता .

भर पावसाळी रात्री , भयंकर विजा कडाडत असताना तीन अनोळखी प्रवासी एका निर्मनुष्य झोपडीमध्ये आसरा घेतात . वीज झोपडीवर कोसळु नये म्हणुन त्या तिघांतला एक़जण उपाय सुचवितो कि , "या झोपडीच्या जवळच एक मज़ार आहे . आपल्यातल्या प्रत्येकाने एक एक करुन तिथे जाउन आपण केलेल्या पापाची कबुली द्यावी . जो सर्वात जास्त पापी असेल त्याला ती मजार शिक्षा देईल . व तो पापी वीज कोसळुन मरेल ."
एक एक करुन दोघेजण त्या मजारीपाशी जाउन आपल्या पापाची कबुली देतात . पण त्यांना काहिच होत नाही . तेव्हा ते दोघे मिळुन तिस-या प्रवाशाला "ज्या अर्थी आम्हाला काहि झाले नाही , तेव्हा तुच सर्वात जास्त पापी आहेस" असे म्हणत धक्के मारुन झोपडीबाहेर काढतात . तिसरा प्रवासी नाइलाजाने मजारीपाशी जाउन आपल्या पापाची कबुली देतो , तेव्हा जोरदार विज त्या झोपडीवर , आतील दोघांवर पडते .