अमेरिकेत मी काय वाचतोय ? भाग २ रा

जयन्त बा शिम्पि's picture
जयन्त बा शिम्पि in जनातलं, मनातलं
26 Aug 2016 - 6:58 am

असाही एक अजब गजब दिन ! !

नुकताच भारतात व येथे अमेरिकेत सुद्धा, सर्वच भारतीयांनी १५ ऑगस्ट २०१६ ला " भारतीय स्वातंत्र्य दिन " मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला.त्याचे ' चलचित्रण ' ( म्हणजे व्हिडिओ ) मी सुद्धा, येथे अमेरिकेत बसल्या बसल्या, दुरून दर्शन करून ( दूरदर्शन संचावर ) अनुभवले. आणि सहज विचार केला कि आपण वर्षभरात किती तरी दिन साजरे करीत असतो. उदाहरणार्थ Mother's Day, Father's Day, Republican Day, झालंच तर Valentine Day.यादी बरीच लांबू शकेल.येथे अमेरिकेत सुद्धा वेगवेगळे दिन साजरे करतात हे ही माहित होते.४ जुलैला अमेरिकन स्वातंत्र्य दिन, २६ नोव्हेंबरला Thanks Giving Day, ऑक्टोबर मध्ये Hello Win Day.
अमेरिकेत एक गोष्ट विशेष रीतीने लक्षात आली कि येथील काही लोकांना, कुत्र्यांचे फार वेड आहे. किमान पक्षी आम्ही न्यू जर्सीच्या भागात(माहवाह सिटीमध्ये )सध्या रहात आहोत, तेथे तर ७० % घरात एक एक कुत्रा पाळलेला दिसत आहे.रोज ज्याला जसा वेळ मिळेल तसा, कुत्राधारी ( किंवा कुत्रा/कुत्री धारीणी ललना) अमेरिकन, येथे हातात कुत्र्याला बांधलेली दोरी घेवून घराबाहेर पडतो. कशासाठी ? तर त्या कुत्र्याला ' विधी ' करायचा असतो. आमच्या भारतात हे असले कुत्र्यांचे सोडा, पण इतर कोणत्याही प्राण्यांचे लाड कोणी पुरवीत नाही.किंबहुना कुत्र्यांना तर ' विधी ' कोठे व केंव्हा करावा याचे प्रशिक्षण जन्मजात मिळालेले असते. प्रसंगी इलेक्ट्रिकचा खांब, कारचे टायर, सोसायटीचे गेट, झाड काहीही चालू शकते. आता भारतात सुद्धा कुत्रे पाळणारे नाहीत असे नाही.पण थेट " कुत्र्याचा सुद्धा 'कुत्रा दिन " साजरा करण्यात, एतद्देशीय अमेरिकन्स, इतके पुढारलेले असतील असे वाटले नव्हते. आता हे मुक्या प्राण्यांबाबाबतचे प्रेम म्हणावे कि काय? पण पुन्हा प्रश्न उद्भवतो कि बाकीच्या मुक्या प्राण्यांचे काय? त्यांच्या म्हणण्यानुसार कुत्रा हा अगदी ' इमानी ' प्राणी असतो , प्रसंगी तो प्राण वाचवू शकतो. यांच्या जाहिरातीमधील कुत्रा त्यांना दारातील ' पेपर ' तोंडात धरून, न फाडता( न वाचता सुद्धा !) बसल्या जागी आणून देतो.मग त्याच्यासाठी इतके ही करावयाचे नाही, हे काही चांगले नव्हे.
मान्य आहे कि कुत्रा पाळणे म्हणजे दिवसभराचा ताण हलका करण्याचे एक साधन आहे, कुटुंबातील सर्वांशी तो प्रेमाने, पण आगंतुक पाहुण्याशी मात्र खडूस वृत्तीने वागतो. कुटुंबाचा एक घटक म्हणून, त्याची जबाबदारी सर्वांवर येते. पण अमेरिकेत कुत्रा पाळणे, कुटुंबाच्या आर्थिक खर्चाशी पण निगडीत आहे, हे लक्षात घ्यावे लागते.
तर सांगावयाचे तात्पर्य इतकेच कि उद्या शुक्रवार २६ ऑगस्ट हा येथे अमेरिकेत " National Dog Day " म्हणून साजरा करण्यात येतो. अमेरिकेत ASPCA ( अमेरिकन सोसायटी फॉर प्रिवेन्शन ऑफ क्रुएल्टी टू एनिमल्स ) अशी संस्था आहे. लोकांनी कुत्री पाळावी म्हणून ही संस्था सतत प्रयत्न करीत असते.
कुत्र्यांच्या भरपूर जाती आहेत,त्यात फार खोलवर शिरायचे आपणास काही कारण नाही.पण सर्वसाधारणपणे छोटे व मोठे असे सरसकट दोन भाग करु या. ज्याने नव्यानेच कुत्रा पाळावयास घेतला असेल, त्या व्यक्तीला पहिल्या वर्षाला छोटया व मोठया कुत्र्यासाठी साधारणपणे अनुक्रमे रु.८०,०००/- ते रु.१,२०,०००/- इतका खर्च करावाच लागतो. यात त्या कुत्र्यावर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया,कुटुंब-नियोजनाची शस्त्रक्रिया, त्याचे प्रशिक्षण,वैद्यकीय फी आणि जाळीचा लोखंडी पिंजरा याचा समावेश असतो.पुढील वर्षापासून, थोडी खर्चात कपात होते, म्हणजे छोटया व मोठया कुत्र्यासाठी अनुक्रमे ४०,००० रु. ते ६०,००० रु. इतका खर्च करावा लागतो.कारण उघड आहे, त्याचा खाण्याचा खर्च वाढता असतो.
अमेरिकन लोकांसाठी, कुत्री म्हणजे जणू स्वतःची बाळेच असतात. ज्यावेळी, सर्व कुटुंबाला, बाहेरगावी जायचे असते, तेंव्हा ह्या कुत्र्यांना कोणी सांभाळायचे? त्याचीही व्यवस्था होऊ शकते. आपल्याकडे जशी लहान मुलांसाठी ' पाळणाघर ' असते तसे येथे सुद्धा, कुत्र्यांचा सांभाळ करणाऱ्या मुली / मुले उपलब्ध होऊ शकतात. त्यांचे दरही तसेच जबरदस्त असतात. वर्षभरासाठी अंदाजे रु.१,९०,०००/- तर एका रात्रीसाठी किमान रु. १६८०/-, प्रशिक्षणासाठी रु. २७००/- एका तासासाठी, कुत्र्याचे दात स्वच्छ करावयाचे असतील तर किमान रु.२७,०००/- आणि वैद्यकीय खर्च शून्य रुपयापासून रु. २,००,०००/- पर्यंत सुद्धा जातो असे म्हणतात. अचानक उद्भवणारा वैद्यकीय खर्च, कुत्र्याच्या मालकासाठी नेहमीच डोकेदुखी ठरत असतो. हा खर्च वाचवायचा तर कुत्र्यास नियमित व्यायाम ,नियमित दात साफ करणे हे केले पाहिजे, अर्थातच मालकाने त्यासाठी वेळ काढण्याची तयारी ठेवले तरच हे शक्य होते.
आता सर्वच कुत्री काही सारखी नसतात, त्यांच्यातही उच्च प्रतीच्या पैदाशीच्या कुत्र्यांचा खर्च सुद्धा तसा जास्तच असतो. वैद्यकीय दृष्ट्या खर्चिक अशा पहिल्या पाच जातीमध्ये Bernese mountain Dogs, Newfoundlands, Rottweilers, English cocker, spaniels आणि Doberman pinschers ही कुत्री मोडतात.त्यांचा खर्च वर्षाला सरासरी रु ६७,०००/- पासून ते रु. ९०,०००/- पर्यंत ( Bernese mountain Dogs चा ) जाऊ शकतो.संमिश्र जातीच्या ( Mix Breed ) कुत्र्यांना, तुलनेने कमी खर्च येतो. एका पशु वैद्याचे म्हणणे असे आहे कि " जर त्यांचाही ( कुत्र्यांचा ) विमा उतरविला तर खर्चात कपात होऊ शकते. विम्याचा खर्च वर्षाला किमान रु. १५,०००/- येतोच. त्यामध्ये त्याची वार्षिक नियमित तपासणी होत असते.शिवाय कुत्रा लहान असतांनाच ,Heart-worm disease दूर करता येतात किंवा लहान शस्त्रक्रिया करून tumours काढून टाकता येतात ". आता मानव काय आणि कुत्रा काय, वेळेवर तपासण्या आणि आजार होऊच नयेत म्हणून काळजी घेतल्यास, खर्चात नेहमीच बचत होते.
तर असे हे ' अमेरिकन्स ' आणि त्यांचा असा हा " राष्ट्रीय कुत्रा दिवस " ! ! भू : भू :

संस्कृतीलेख

प्रतिक्रिया

कुत्र्या सारखा इमानी प्राणी नाही.....

उदय's picture

26 Aug 2016 - 8:41 am | उदय

I want my children to have a dog
Or may be two or three
They'll learn from them more easily
Than they will learn from me.

A dog will teach them how to love,
And have no grudge or hate
I'm not so good at that myself
But a dog will do it straight

I want my children to have a dog,
To be their pal and friend
So they may learn that friendship
Is faithful to the end.

There never yet has been a dog
That learned to double cross
Nor catered to you when you won
Then dropped you when you lost.

- Martin Hale

शि बि आय's picture

26 Aug 2016 - 2:41 pm | शि बि आय

भू..भू.. ✌

शि बि आय's picture

26 Aug 2016 - 2:41 pm | शि बि आय

भू..भू.. ✌

बोका-ए-आझम's picture

26 Aug 2016 - 4:10 pm | बोका-ए-आझम

मग मांजर असो की कुत्रा.

पुढचा जन्म जर कोणता हवा असे विचारले तर अमेरिकेत कुत्रा म्हणुन जन्माला यावे काय , विचार करण्यासारखि गोश्ट आहे
नाहि.

विंजिनेर's picture

27 Aug 2016 - 2:40 am | विंजिनेर

ते हॅलोविन (halloween) आहे हो ते. hello-win नव्हे हो.
बाकी चालू दे.

फारएन्ड's picture

28 Aug 2016 - 5:11 am | फारएन्ड

आणि अचूकपणे लिहायचे असेल, तर थॅन्क्स गिव्हिंग सुद्धा नोव्हेंबर मधल्या चौथ्या गुरूवारी असतो. २६ नोव्हेंबर असा तारखेने नव्हे.

चौथ्याच गुरूवारी का? शेवटच्या का नाही - म्हणजे १ नोव्हेंबरला गुरूवार असेल, तर शेवटचा गुरूवार २९ नोव्हेंबर ला असेल. अशा वेळेस २२ नोव्हेंबरला सुट्टी असेल. एरव्ही सगळ्या गोष्टी सोप्या करून वापरणारे अमेरिकन्स या तारखांच्या बाबतीत चमत्कारिकरीत्या क्लिष्ट आहेत. अध्यक्ष निवडणुकीचा दिवस कोणता, तर "नोव्हेंबरच्या पहिल्या सोमवारनंतरचा दुसरा दिवस (मंगळवार)" - पहिला किंवा दुसरा मंगळवार नव्हे. म्हणजे एक नोव्हेंबरला मंगळवार आला, तर तो नाही, ८ चा.

फारएन्ड's picture

28 Aug 2016 - 5:06 am | फारएन्ड

पण पुन्हा प्रश्न उद्भवतो कि बाकीच्या मुक्या प्राण्यांचे काय? >>> तुम्ही पाळीव कुत्र्यांबद्दल जे लिहीले आहे त्यातले बरेचसे सर्वच पाळीव प्राण्यांबद्दल लागू आहे.

इथे ऑफिस मधेही लोक कुत्रे घेउन येतात. काही कंपन्या त्याला परवानगी देतात.

मात्र इथे कुत्र्यांना "न भुंकण्याचे" प्रशिक्षण कसे देतात हे एक आश्चर्यच आहे. पाळीव कुत्री उठसूठ भुंकताना दिसत नाहीत.