लसूण

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
24 Aug 2016 - 10:57 pm

आपुन पद्या. जग आपल्याला पद्या म्हणतं. का म्हणतं? WE DONT NO.

आपल्याला ल्ह्यायला भौतेक जमणार नाय. आपुन निसता हिंडतो. सायबाला फोन करुन "सायेब कामधंदा कसा काय चाललाय?" म्हणून इचारतो. आपुन सायबाचे फेवरेट. आपल्याशिवाय लाईन चालणारंच नाय. आपल्याला मशनीतलं सगळं जमतं. नुसतं चालवतंच नाय. नट बोल्ट खोलून मेंटेनस बी ठेवतो.
दुपारी आपण कन्वेयरच्या साईडला झोपतो. सायेब काय बोलत नाय. आपण सायबाचे फेवरेट.

चार दिवस सुट्टी मारायची तर आपुन आठ दिवस मारतो. तवा सायेब बोंबलतं. आपुन ऐकूण घेतो. पण आपण सायबाचे फेवरेटंच.

आपण गँगचे लीडर. पोरांना काय दुखलं खुपलं, आपण निस्तारतो.

सकाळी उठलो. दात घासलं. आंघुळ केली. आपण पेश्शल खादी वापरतो. दत्ताच्या देवळात जाऊन नामाटी वढली. सकाळी सातच्या आत कंपनीत हाजर.

मशीन पुसली. सायेब आलं. सायबाला म्हणलं, सायेब पगारवाढ द्या. सायेब म्हणला बघतो. म्हणलं मग बघ.

मशनीवर जॉब आणलं. वळीनं लावलं. शेटींग केलं आणि बसलो मारत. पुडी काढली. मळून खाल्ली. छावीला चार म्यासेज टाकले.
आपली येक छावीपण हाय. आजून तिला कधी बघितलं बी न्हाय. पण आपुन रातरात बोलतो. कधी म्हणते मंबईला हाय. कधी नाशिक. तर कधी तिकडं पार कोल्हापुरची. अशा लय झाल्यात पर ही लय दिवस टिकून हाय.
आपण चायना मोबाईल कानाला लाऊन पोरांना जाळत बसतो. आपलाबी ब्यालन्स लय जळतो. एकदा मीटर लागलं की आपण गायछापला महाग.
दिवसभर काम केलं.
संध्याकाळी सायबाला म्हणलं, सायेब बाय बाय,
मग सायेब बी म्हणलं, बाय बाय रे भावा.

रात्री उशिरा आपण चौकात जातो. वश्या आणि सोम्या आपल्या बरोबर आसतात. मोबाईलची रिंगटोन वाजवत पुलावर बसलो. छावीनं मिसकॉल द्यायला सुरु केलं. मग आकड हाणत माणसात जाऊन "पुना करतू, आता जरा बीजी हाय" म्हणून फोन कट केला. सोम्या 'परत चलै' म्हणून बोंबलंत होता. मग त्येचाच 'गोवा' खाऊन पिचकाऱ्या मारत बसलो. वश्या आपला शेपटासारखा जाईल तिकडं मागं असतो. फिरत फिरत मग जेवण करुन रात्री अकरा बाराला रुमवर गेलो. मग छावीसंगं बोलत दोन वाजोस्तोर टेरेसवर. कधी कधी तर रात रात जागून तसाच कंपनीत जातो.

सकाळी उठलो. दात घासलं. आंघुळ केली. पेश्शल खादी. दत्ताच्या देवळात नामाटी. सातच्या आत कंपनीत हाजर.

मशीन पुसली. सायेब आलं. सायबाला म्हणलं, सायेब पगारवाढ?
सायेब म्हणला, बघतो.
आता सहा महिनं होत आलं. कसला बघतूय पुच्चीचा.

आपण गँगचे लीडर. बाळ्याला म्हणलं, 'याक्वा'ला जा. आपल्या वळखीवर. तिकडं पर डे जास्त हाईत.
पण बाळ्या गेला नाय. शम्नं सालं.

तंबाखू काढली. छावीला चार म्यासेज टाकले. सुपरवायझरला म्हणलं, कंत्राट दुसरीकडं लावा. परवडत न्हाय. तो म्हणला, आता हितंच आय घालायची. तिकडं जाऊन कुणाकुणाचं XXXXX.

सुपरवायजर हांडगा आहे.

सायबानं मला सकाळी सकाळी झाडास्नी पाणी द्यायचं काम लावलं. नळी घीऊन सगळी कंपनी पालथी घातली. हे येगळं काम होतं. म्हणलं हे बरंय. पण दस्तुरखुद्द पद्माकरला हे आसलं बुळगांड काम देऊन सायबानं बरं न्हाय केलं. म्हणलं त्येजायचा पुच्चा. आपल्याला हे कामंच नगं. मग घोगऱ्याला फोन लावला. घोगऱ्या आपला मेन कंत्राटदार. म्हणलं, घोगरे सायेब. आपुन 'ठिस्को'त जातो. हितं काय परवडत न्हाय. बुलून बघा तितल्या एच्चारला.
घोगऱ्या म्हणला, येवढा सीझन काढ. मग तुला आपल्या मेन हाफीसला घेतो. फुल एसीतलं काम.

म्हणलं हेज्याबी आयचा पुच्चा. गेलं चार वर्षे हेच ऐकतोय.

दुपारी पोरं जमवली. म्हणलं उद्या कुणीबी कामावर यायचं न्हाय. कुणी दिसलं तर गेटवरंच कापून टाकतो. पगारवाढ करुनंच घ्यायची. पोरंबी उसाळली. जंगी संप करायचा ठरवून टाकला.

मग बार भरुन सायबाकडं गेलो. म्हणलं, सायेब जेवण झालं का?
सायेब म्हणाला, मस्त मस्त.
मग आपणबी कॉलर टाईट करुन तिथून सटाकलो.

छावीला फोन लावला. जनरेटरच्या बाजूला टेकून निवांत बोलत बसलो. तिकडून एच.आर. येताना दिसला. लांबूनच उभ्या उभ्या माझा फोटो काढला. आणि निघून गेला.
दस्तुरखुद्द पद्माकरचा फोटो? म्हणलं बघतोच याला. एखादा रॉड बीड दिसतोय का बघितलं. मग तावातंच हॉफिसमधे गेलो. एच.आर.म्हणला, "हिकडे रे, हिकडे ये तू, उद्यापस्नं कामावर फोन आणायचा न्हाय. न्हायतर जप्त करीन"
म्हणलं, सायेब घरचा फोन हुता.
तो म्हणला, आता आमाला XXXX शिकवू नको.

संध्याकाळी रुमवर गेलो. चौकात भटकलो. रिंगटोन वाजवत फिरत फिरत टेरेसवर. मग छावीला फोन. शेवटी झोपलो.

सकाळी उठलो. दात घासलं. आंघुळ केली. पेश्शल खादी. दत्ताच्या देवळात नामाटी. सातच्या आत कंपनीच्या गेटवर हाजर.

सगळी पोरं आलती. म्हणलं, कुणीबी आत जायचं न्हाय. गेटवर बसायचं.
पोरं म्हणली, आता नगं. बघू नंतर. कडकी चालूय.

म्हणलं ह्यांनाच गरंज न्हाय तर आपण आपली कशाला घासा. ह्यांच्याबी XXX XX.

मग कंपनीत गेलो. मशीन पुसली. जॉब आणलं. वळीनं लावलं. शेटींग केलं. मारत बसलो. पुडी काढली. मळून खाल्ली. छावीला चार म्यासेज धाडून दिले.

मग सायेब आलं. सायबाला म्हणलं, गुड मॉर्निंग.
सायेब म्हणला, व्हेरी गुड मॉर्निंग.

कथाप्रतिभा

प्रतिक्रिया

संदीप डांगे's picture

24 Aug 2016 - 11:21 pm | संदीप डांगे

वोव!

कविता१९७८'s picture

24 Aug 2016 - 11:24 pm | कविता१९७८

मस्त

शिव्या देऊच नये ह्या मताचा मी नाही पण जिथं गरज तिथंच आणि तेवढ्याच असाव्या.
हे नको जव्हेरभाव, नाही झेपणार हे.

लालगरूड's picture

24 Aug 2016 - 11:33 pm | लालगरूड

+1 पण shopfloor ला असचं असतंय अभ्याभाऊ

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Aug 2016 - 7:02 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अभ्याकडून अशा प्रतिसादाची अपेक्षा नव्हती.

-दिलीप बिरुटे

लालगरूड's picture

24 Aug 2016 - 11:30 pm | लालगरूड

lol

लालगरूड's picture

24 Aug 2016 - 11:32 pm | लालगरूड

लसूण नाव का दिलं

गणामास्तर's picture

24 Aug 2016 - 11:37 pm | गणामास्तर

बाकी अर्ध समजून घ्या की गरुडराव ;)

लालगरूड's picture

24 Aug 2016 - 11:38 pm | लालगरूड

arrrr कळलं

गणामास्तर's picture

24 Aug 2016 - 11:34 pm | गणामास्तर

व्यक्तिचित्रण जबराचं ! शॉप फ्लोर वरचे दिवस आठवले.

जव्हेरगंज's picture

24 Aug 2016 - 11:47 pm | जव्हेरगंज

अभ्याराजे आणि इतर

अगदीच जरुरी पडली म्हणून कथेत काही ठिकाणी शिव्या वापरल्या आहेत.

नकळत पणे भावना दुखावल्या गेल्यास क्षमस्व!

जव्हेरभाव अशा शिव्या वाचून काय दुखावणार माझ्या भावना? हेच तर अयकतो, बोलतो रोज.
एका जब्बरदस्त चांगल्या लेखनाला संस्कृतीरक्षकाचे गालबोट लागू नये हीच इच्छा.
तुम्हाला शुभेच्छा कायमच हैत आपल्या.

अनिरुद्ध.वैद्य's picture

29 Aug 2016 - 5:01 pm | अनिरुद्ध.वैद्य

लोल!

साती's picture

24 Aug 2016 - 11:59 pm | साती

देवा परमेश्वरा,
लसूण घाकून केलेली ही मूळ पाकृ कुठली आणि ती कशी वापरतात हे 'quora.com' वर कळले.
कोंकणात नाही बनवित ही पाकृ.

असो. तेवढीच ज्ञानात भर! ;)

बाकी , छान लिहिलंय हो जव्हेरगंज!
मी तर फॅन क्लबात तुमच्या.

तुमच्या बर्‍याच कथांची नावे मोठी क्रिप्टीक आणि विचार किंवा शोधाशोध करायला लावणारी असतात.
नो सरळ सरळ घास भरवणं वगैरे!

साती's picture

25 Aug 2016 - 12:00 am | साती

* घाकून- घालून.

अजया's picture

25 Aug 2016 - 10:33 am | अजया

पूर्ण प्रतिसादाशी सहमत!

अभिजीत अवलिया's picture

25 Aug 2016 - 12:53 am | अभिजीत अवलिया

जव्हेर भाऊ,
तुमचे लिखाण एकदम हटके असते.
पण मिपा हे संस्थळ लाखो लोक रोज वाचत असतील. त्यामुळे अशा ठिकाणी शिव्या वापरू नयेत अशा मताचा मी आहे.

मुक्त's picture

25 Aug 2016 - 8:20 am | मुक्त

जव्व्हेरभौचे लेखन अस्सल बावनकशी सोने आहे. माजघरातले बेगडी साहित्य नव्हे.
मिसळ पाव म्हणजे झणझणीत. ज्याला सोसेल त्यानेच खावे.
जव्हेरभौचा फॅन मुक्त. (पूर्वाश्रमीचा मितभाषी)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Aug 2016 - 6:51 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>>>. मिसळ पाव म्हणजे झणझणीत. ज्याला सोसेल त्यानेच खावे.

हजारवेळा सहमत.

-दिलीप बिरुटे

बोका-ए-आझम's picture

25 Aug 2016 - 1:18 am | बोका-ए-आझम

म्हणजे काटा किर्र एकदम! हे एकावेळी मल्टिपल ट्रॅक कसे चालतात बुवा? आणि सगळीकडे दर्जा देतो हा माणूस! आपण फ्यान - एकदम पाचवर,रेग्युलेटरशिवाय फिरणारा फ्यान!

खटपट्या's picture

25 Aug 2016 - 1:52 am | खटपट्या

खूब भालो...

कैलासवासी सोन्याबापु's picture

25 Aug 2016 - 8:57 am | कैलासवासी सोन्याबापु

खल्लास लिहिलंय हो जव्हेरभाऊ!! एकदम भोसरी, हडपसर इंडस्ट्रियल इस्टेट आठवली, आयुष्यातला काही काळ पदमजी पेपरमिलच्या लेबर वस्तीत काढल्यामुळे नीट जोडल्या गेलो कथेशी! आवडली खूप

अनिरुद्ध.वैद्य's picture

29 Aug 2016 - 5:03 pm | अनिरुद्ध.वैद्य

हाडपसराला? ती तिकडे हिंजवडीच्याही पुढंय न?

मराठमोळा's picture

25 Aug 2016 - 9:27 am | मराठमोळा

वास्तवदर्शी आणि ओघवतं लिखाण. आवडले. सार्वजनिक संस्थळावर असल्याने शिव्यांच्या वापरा बाबतीत अभ्या आणि अभिजीत अवलिया यांच्याशी सहमत आहे.

अवांतर : पद्दा बरा आहे पण बरेच छोटे 'बिझनेसमन' लोक कामचुकार आणि गरजेपेक्षा जास्त अ‍ॅटीट्युड असलेल्या पद्द्यांमुळे युपी-बिहारी मजुरांना कामावर ठेवतात.

इल्यूमिनाटस's picture

25 Aug 2016 - 9:27 am | इल्यूमिनाटस

जहबहरी....!!! आवडली

संदीप डांगे's picture

25 Aug 2016 - 10:04 am | संदीप डांगे

खास जव्हेरगंज टैप :)

शिव्यांबद्दल आक्षेप नै पटला, नै आवडला. ज्या त्या कॅरेक्टरची कहानी त्याच्या भाषेत मांडली तरच खरेपणा अनुभवता येतो. एखाद्या झोपडपट्टीतल्या नळावरची भांडणे हुच्च भाषेत वाचावी लागणे ह्यासारखी अस्सल साहित्याची प्रतारणा नाही. हे मला अनेकदा खटकलेले आहे. खालच्या वर्गातली शिक्षण, संस्कार नसलेली कॅरेक्टर्स अभिजनवादी सभ्य भाषेत बोलतात तेव्हा लै हसायला येतं.

प्रभाकर पेठकर's picture

25 Aug 2016 - 10:23 am | प्रभाकर पेठकर

सहमत आहे. तरूणपणी मस्तरामच्या कथा चवीने वाचल्या आहेत. शरीरावर रोमांच उभे राहायचे. पण त्याकाळी त्या कथा लपूनछपून वाचाव्या लागायच्या. गेला तो काळ. आता मस्तराम वगैरे आपल्या ज्येष्ठांसमोर मोठ्याने वाचायचा काळ आला आहे. नाहीतर अभिरुची स्वातंत्र्य, व्यक्तिस्वातंत्र्य, भाषास्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य, संस्कृती दडपशाही, प्रस्थापितांची दंडेली वगैरे वगैरे अनेक गोष्टी समस्या निर्माण करतात.

कैलासवासी सोन्याबापु's picture

25 Aug 2016 - 10:28 am | कैलासवासी सोन्याबापु

कैच्याकै कॉमेंट! मस्तराम वडीलधाऱ्यापुढे वाचून/बोलून दाखवल्याची उदाहरणे द्या जमल्यास एकदोन मग बोलूयात, अन ते सगळे राहिले बाजूला ग्रामीण/निम्न आर्थिक/सामाजिक परिस्थितीतल्या पात्राची/ भाषेची तुलना मस्तराम सोबत करणे हे अतिरेकी वाटले

प्रभाकर पेठकर's picture

25 Aug 2016 - 11:35 am | प्रभाकर पेठकर

सोन्याबापू साहेब,

मस्तराम साहित्य हे एका विशिष्ट साहित्यप्रकाराचे द्योतक म्हणून वापरले आहे. त्याचा कोणी शब्दश: अर्थ घेईल असे वाटले नव्हते. तसा तो घ्यायचाही नसतो. भावार्थ समजून घेतला पाहिजे. असो.
घराबाहेर समवस्यकांमध्ये वावरताना आपण शिव्या, अश्लिल शब्दांचा वापर करतो. पण आई-वडील, नातेवाईक, अनोळखी व्यक्ती, स्त्रिया, लहान मुलं अशा समुदायात आपण शिव्या आणि अश्लिल शब्दांचा वापर करतो का?
मिपा व्यासपिठही असेच मिश्र समाजाचे व्यासपिठ आहे. म्हणून कांही जणांना कांही गोष्टी खटकतात. तर कांही जणांना कांही प्रतिसाद 'कैच्याकै' वाटतात असो.

संदीप डांगे's picture

25 Aug 2016 - 10:40 am | संदीप डांगे

मस्तरामच्या कथा ज्येष्ठांसमोर वाचायची कोणी 'जबरदस्ती' करत असेल तर मला सांगाहो, कुठल्याही प्रकारची 'जबरदस्ती' अभिव्यक्तिस्वातंत्र्यास मान्य नाही म्हणून म्हटले.

मिसळपाववर केवळ माजघरी, दवणीय साहित्य हवे असा काही फतवा असल्यास तेही कळवावे.

जव्हेरगंजांना विनंती: यापुढे कथा टाकतांना शिव्या व तत्सम मजकूर असेल तर शिर्षकातच डिस्क्लेमर टाकत जा, उगा बालमनावर परिणाम नकोत. काळजी घेतलेली बरी.

अभ्या..'s picture

25 Aug 2016 - 11:34 am | अभ्या..

100 टक्के सहमत संदीप. कथेतल्या पात्रांचीच नव्हे तर आपल्या रोजच्या वापरातली भाषा लेखनात, प्रतिसादात यावी हे माझे पण मत आहे. इथले कित्येक प्रतिसाद आणि लेख वाचताना खरेच हे असे तुपातले विचार करत असतील का अशी शंका येते.
मला तर आज खरोखर मुक्त झाल्यासारखं वाटतंय. वागण्यात बोलण्यात आणि लिहिण्यात दाम्भीकपणा नसावा. जे पाहतो भोगतो अनुभवतो ते अस्सलपणे लेखणीत उतरावे ह्या आग्रहाला तुमच्यासारखे साक्षेपी वाचक कायमच पाठिंबा देतील. थँक्स जव्हेरभाव आणि संदीपराव.

मुक्त's picture

26 Aug 2016 - 10:59 pm | मुक्त

ब्वाॅररर..

प्रभाकर पेठकर's picture

25 Aug 2016 - 11:46 am | प्रभाकर पेठकर

मस्तरामच्या कथा ज्येष्ठांसमोर वाचायची कोणी 'जबरदस्ती' करत असेल तर मला सांगाहो
मस्तरामच्या कथा ज्येष्ठांसमोर वाचायची जबरदस्ती केली जाते असे मी कुठे म्हंटले आहे मला सांगा हो.

मिसळपाववर केवळ माजघरी, दवणीय साहित्य हवे असा काही फतवा असल्यास तेही कळवावे.
मिसळपावावर कुठले साहित्य असावे हा माझा नाही मिसळपाव प्रशासनाचा निर्णय असेल. पण मिसळपाव वरील कथांवर/प्रतिसादांवर आपले मत व्यक्त करू नये असा काही फतवा असेल तर तसे कळवावे.

जव्हेरगंजांना विनंती: यापुढे कथा टाकतांना शिव्या व तत्सम मजकूर असेल तर शिर्षकातच डिस्क्लेमर टाकत जा, उगा बालमनावर परिणाम नकोत. काळजी घेतलेली बरी.

'बालमनाची' काळजी घेणारी सुचना मांडल्याबद्दल धन्यवाद. मी तर मिसळपाव प्रशासनाला सुचवितो की त्यांनी स्वतंत्र 'प्रौढ साहित्य' विभाग सुरु करावा. म्हणजे माझ्यासारखे मिपाचे 'बाल सदस्य' तिथे फिरकणार नाही.

प्रभास's picture

25 Aug 2016 - 10:13 am | प्रभास

भारीच... लसूण म्हटल्यावरच थोडा अंदाज आलेला...
पण मजेशीरच.. ;)

साहेब..'s picture

25 Aug 2016 - 10:28 am | साहेब..

लसूण म्हटल्यावरच काहीतरी मस्त कथा असणार याची कल्पना आली होती.

शिव्यांबाबत इतरांशी सहमत.
तिकडं जाऊन कुणाकुणाचं XXXXX.
आता आमाला XXXX शिकवू नको.
ह्यांच्याबी XXX XX.

ह्ये केलंय तसं ते बी करता आलं असतं.
आम्ही पन या शब्दांच्या गराड्या असतो, पन सार्वजनिक ठिकाणी 'दृश्य' पणे हे शब्द समोर आले की बावचाळल्यागत होतं.

पद्या: अजून काय लिहियाचं! तुमची यच्चयावत पात्रे खर्‍या आयुष्यातून उचलून तुमच्या लेखनात आलेली असतात.

झुमकुला's picture

25 Aug 2016 - 11:46 am | झुमकुला

मस्त लेख, 2 वर्ष शॉप फ्लोअरवर घासलेल्या कामाची आठवण आली

मृत्युन्जय's picture

25 Aug 2016 - 11:57 am | मृत्युन्जय

कथेचे नाव बघुन शंका आली होती. कथा वाचुन कथेच्या नावासाठी तुम्हाला लाख सलाम. काय कल्पक शीर्षक आहे. कमाल.

कथा कथेच्या शीर्षकाइतकीच दमदार आहे. कमाल लिहिली आहे. जव्हेर भाऊंच्या फ्यान क्लब मध्ये आम्ही पण आहोतच.

बाकी कथेतील अपशब्दांबद्दल बोलायचे झाल्यास टाळले असते तर बरे झाले असते असे वाटते. प्रत्येक संस्थळाचा आपला एक स्वभाव असतो. आयाबहिणींवरुन शिव्या इतक्या ठळकपणे नको वाटल्या. साहित्यिक अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा एक भाग म्हणुन हे आक्षेपार्ह नाही असे म्हणया येइलही पण ते २-३ शब्द वगळल्यास कथेच्या कसदारपणाल कुठलीही आडकाठी येणार नाही आणी वाचकांपैकी कथेचा आनंद घेणार्‍या लोकांची व्याप्ती वाढेल असे वाटते. बाकी याहुन शिवराळ भाषेतले साहित्य आपण सर्वांनी वाचले असेलच त्यामुळे मराठी साहित्यात इतकी शिवराळ भाषा वापरतच नाही असे काही नाही. पण इथे, या कथेत ती नसेल तर बरे असे वाटते

राजाभाउ's picture

25 Aug 2016 - 12:31 pm | राजाभाउ

मस्त हो जव्हेरभाउ !!! . तुमच्या लेखनाबाबतीत मस्त, छान, जबरी, जबरदस्त ..............अस काय काय लिहीणार प्रत्येकवेळी. आमचा शब्दसाठा तोकडा पडतोय त्यामुळ या पुढे फक्त "मस्त हो जव्हेरभाउ !!! " यात ते सगळ आल

कथेतील पात्राच्या पार्श्वभुमीप्रमाणेच पात्र बोलणार त्यामुळे शिव्या वगैरेचा जास्त विचार करू नये जस आहे तस छान आहे. यावरून भाईचे खालील वाक्य अठवले

"रावसाहेबांची वाक्ये जशीच्या तशी वापरायची म्हणजे अवघडच, शरीराप्रमाणे मनालाही पोक आलेली माणस अश्लील अश्लील म्हणुन ओरडायची" -- भाई

बाकी शिर्षक एकदम जबरी

पुंबा's picture

25 Aug 2016 - 12:31 pm | पुंबा

जबरदस्त..!! _/\_

उडन खटोला's picture

25 Aug 2016 - 12:49 pm | उडन खटोला

लेखन अस्सल आहे. अभ्याच्या आक्षेपाशी सहमत. कपड्याच्या आतमध्ये सगळे नागडे असले तरी आहोतच नागडे म्हणून लोक गावभर तसे फिरत नाहीत. भाषेवरून नि पहिल्या एक दोन परिच्छेदावरून पात्र उभं राहतं. किमान जन्मस्थानदर्शक शिव्या तरी टाळायलाच हव्या होत्या. एकंदर शिव्या अनावश्यक वाटल्या.
बाकी दुटप्पी दांभिक भूमिका बद्दल नेहमीप्रमाणे कौतुक.

शिव कन्या's picture

25 Aug 2016 - 6:01 pm | शिव कन्या

+१ प्रतिसादाशी सहमत.

शीर्षकही पूर्णच टाकायला हवं होतं. ते तरी का सूचक टाकलंत मग!

असो. कथेबद्दल वादच नाही. जबरदस्त.

संदीप डांगे's picture

25 Aug 2016 - 12:55 pm | संदीप डांगे

ह्यावर इथे चर्चा करत नाही, स्वतंत्र लेख लिहितो, संस्थळ आणि कुटुंब याबद्दल अनेकांचा गैरसमज झालाय, तसेच वरील लेखानाबद्दलही!

मुक्त's picture

26 Aug 2016 - 5:58 pm | मुक्त

तात्यांच्या लेखाची लिंक दिली आहे.
तुमचाही लेख येवू द्या.

संदीप डांगे's picture

27 Aug 2016 - 12:08 am | संदीप डांगे

लेख सापडला नाही,

मुक्त's picture

27 Aug 2016 - 6:42 am | मुक्त
पाटीलभाऊ's picture

25 Aug 2016 - 1:09 pm | पाटीलभाऊ

शॉप फ्लोअर चा अनुभव नाही...पण काही मित्रांकडून त्यांचे अनुभव ऐकले आहेत.
बाकी कथा मस्त...भाषा लै भारी..!

माधुरी विनायक's picture

25 Aug 2016 - 3:23 pm | माधुरी विनायक

तुमचं नाव वाचून लेख उघडला की सहसा निराशा होत नाही.
खूप दिवसानंतर मिपा वर निवांत वाचायला वेळ मिळाला, त्याचं सार्थक होतंय..

ज्योति अळवणी's picture

26 Aug 2016 - 12:04 am | ज्योति अळवणी

खर तर तुमच लेखन आवडत मला. पण हे काही मला जमल नाही जव्हेरगंज भाऊ

पक चिक पक राजा बाबू's picture

26 Aug 2016 - 7:06 pm | पक चिक पक राजा बाबू

लय भारी जव्हेर भाऊ,अगदी लसनीचा ठेचा खाल्ल्यागत वाटले.

भ ट क्या खे ड वा ला's picture

26 Aug 2016 - 7:41 pm | भ ट क्या खे ड वा ला

नावा सकट आवडली

विखि's picture

26 Aug 2016 - 8:22 pm | विखि

वास्तववादी लिहिलय....

मयुरा गुप्ते's picture

27 Aug 2016 - 2:20 am | मयुरा गुप्ते

पुच्चा साहेब, हांडगा सुपरव्हायजर आणि दस्तुरखुद्द पद्माकरचा फोटो काढणारा (लबाड) एच.आर.

छान पात्र आहेत. थोड्याबहुत फरकाने सगळीकडेच दिसतात. नाव्,गाव्,रंग, देश, वेश काहिही बदललं तरी स्वभावाचा समान धागा असतो.

लगे रहो..

--मयुरा

छान, इतका निरागसपणा सर्वत्र असेल तर काहीच हरकत नाही काहीही लिहायला. ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Aug 2016 - 7:00 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सेठ लेखन आवडलं. कंपनी, कामगार, अपेक्षा, आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्या. अतिशय जबरदस्त लेखन. मिपाचं दालन समृद्ध करत आहात. मन:पूर्वक शुभेच्छा....जियो.

अवांतर : लेखनात आलेल्या शिव्या अगदी सहज वाटल्या त्यामुळे पदमाकर अजून ठसठशीत उभा राहतो. लेखनात शिव्या नसाव्यात वगैरे प्रतिसादांकडे दुर्लक्ष करा, एवढीच विनंती.

-दिलीप बिरुटे

कंजूस's picture

27 Aug 2016 - 7:34 am | कंजूस

:-)

चाणक्य's picture

27 Aug 2016 - 9:48 am | चाणक्य

चांगलय.

अनुराग कश्यप's picture

27 Aug 2016 - 5:06 pm | अनुराग कश्यप

बहोत खूब लिखे हो. एकदम वास्तवतापूर्ण.
हमने भी हमारे सिनेमा के लिए बहुत बार सेंसोर बोर्ड से झगड़ा मोल लिया है. जो दुनिया में होता है वही तो हम बताते है. सेंसोंर वाले कहते है ये नहीं चलेगा वो नही चलेगा, ऐसा थोड़ेही न होता है. जो सामने दीखता है, हम दिखा देते है. पहले वो बंद करो जो लोग कर रहे है.

ज्ञानोबाचे पैजार's picture

27 Aug 2016 - 5:11 pm | ज्ञानोबाचे पैजार

जबराट लिहीले आहे.
फारच आवडले.
पैजारबुवा,

रातराणी's picture

28 Aug 2016 - 10:40 am | रातराणी

मस्त!! आवडलं!

वरुण मोहिते's picture

29 Aug 2016 - 3:30 pm | वरुण मोहिते

एकदम रिऍलिस्टिक

अनुप ढेरे's picture

29 Aug 2016 - 4:13 pm | अनुप ढेरे

मस्तं लिहिलय. शॉप फ्लोरावर भरपूर श्या ऐकायला येतात. त्या लिखाणात यायला काहीच हरकत नाही.

आवडली गोष्ट!

समीरसूर's picture

29 Aug 2016 - 4:56 pm | समीरसूर

एकदम जबरदस्त! जव्हेरभाऊ एकदम बावनकशी लिहितात. वाचतांना कथेत जीव अडकून पडतो. असं वाटतं आपण कथेतलेच एखादे पात्र आहोत.

मस्त कथा!

अनिरुद्ध.वैद्य's picture

29 Aug 2016 - 5:05 pm | अनिरुद्ध.वैद्य

मस्त लिहिलंय जव्हेर भाउ!

शाम भागवत's picture

29 Aug 2016 - 7:16 pm | शाम भागवत

लेखात शिव्या आल्यामुळे शंभरी नक्की पार करणार
ः))

मस्तच लिहिलय. मनात आलेले प्रत्येक विचार जसेच्या तसे मांडण्याची खास हातोटी ,धाडस तुमच्याकडे आहे. कोल्हापुरी
भाषेतील कोणत्या शब्दाने तुम्हचे अभिनंदन करावे हेच कळेना ?

पिलीयन रायडर's picture

30 Aug 2016 - 8:32 am | पिलीयन रायडर

एरवी मला शिव्या खटकतात पण चक्क ह्या लेखात अजिबात अस्थानी वाटल्या नाहीत. आणि नेमकी हीच चर्चा चालु आहे!

चांगलं लिहीलय! शॉपफ्लॉअरवर असंच असतं!

मला फक्त शीर्षक समजलं नाही. सभ्य असेल तर कुणी समजावुन सांगा. नसेल तर राहु द्या.

तुषार काळभोर's picture

31 Aug 2016 - 11:36 am | तुषार काळभोर

:)

अनुप ढेरे's picture

31 Aug 2016 - 11:44 am | अनुप ढेरे

सातींना विचारा.

टर्मीनेटर's picture

17 Sep 2016 - 12:11 pm | टर्मीनेटर

"सायबाला फोन करुन "सायेब कामधंदा कसा काय चाललाय?" म्हणून इचारतो."
लै भारी जव्हेर भाऊ... हे असले प्रकार करणारे महाभाग समाजात अनेक आहेत. जबरदस्त निरीक्षण शक्ती आहे तुमच्याकडे...

drshantiprasad's picture

17 Sep 2016 - 9:11 pm | drshantiprasad

जबरदस्त

नीलमोहर's picture

17 Sep 2016 - 10:28 pm | नीलमोहर

भारीय,

नीलमोहर's picture

17 Sep 2016 - 10:31 pm | नीलमोहर

शीर्षक अर्थातच कळलं नाही, पण जव्हेरगंज यांच्या कथा, त्यात पटापट सगळं समजलं असं कधीच होत नाही.

ईश्वरसर्वसाक्षी's picture

17 Sep 2016 - 11:53 pm | ईश्वरसर्वसाक्षी

गूगल करुन बघा

निखिल निरगुडे's picture

6 Oct 2016 - 9:16 pm | निखिल निरगुडे

जग्गात एक नंबर...