द स्टार्क स्टोरी-३

क्षमस्व's picture
क्षमस्व in जनातलं, मनातलं
24 Aug 2016 - 8:56 pm

कमांडर रक त्या काळ्या धूसर आकृतीपुढे उभा होता.
आकृतीचा चेहरा अस्पष्ट होता. सर्वांग काळ्या चमकदार कपड्याने झाकलेले होते.
कमांडर रक गुडघ्यावर बसला....
एक दीर्घ आणि खोल आवाज घुमला...
"कमांडर.."
"येस डार्थ.."
"डार्क फोर्स तुझ्याबरोबर राहील..."
रकने मान डोलावली!
"सर्व जीवसृष्टीचा विनाश... आणि पुनर्निर्माण... "
"येस डार्थ!"
"तू जाऊ शकतोस...."
रकने तिथून काढता पाय घेतला.
मात्र लांबूनही आकृतीचा हसण्याचा आवाज येत होता...
रक तिथून तडक उडत्या युद्धनौकेकडे निघाला. ती युद्धनौका म्हणजे गॅलॅक्सिचं एक आश्चर्यच होतं.तिचा आकार नाबू ग्रहाएवढा आणि त्रिकोणी होता. नौकेचे तीन भाग होते.तिन्ही शिरोबिंदूंना तीन डार्थ वीस लाख क्लोन सैन्यासह उभे होते. त्रिकोणाच्या कडांना ठिकठिकाणी बौन्टि हंटर तैनात होते. मधील भागात लाईटगन आणि लाईटकॅनन बनवण्याचा कारखाना होता. त्याचबरोबर फ्लाइंग आणि मारचिंग ग्राउंड इथेच होतं. इथे तैनात असलेल्या क्लोन सैन्याची संख्या पाच कोटी होती. त्यांनंतर अजून मधल्या भागात स्पेसशीप बनत होत्या. इथे अत्यन्त कुशल अशी आठ कोटी क्लोन सेना होती. यांनंतर सर्वात आतला भाग म्हणजे कंट्रोल रूम! इथून सर्व स्पेसशीप कंट्रोल होत असे आणि सर्व कमांड्स इथूनच येत असत.
याच कंट्रोल रूममध्ये सर्वांत आतला भाग हा डार्क रुम म्हणून प्रसिद्ध होता! या रुममध्ये फक्त कमांडर रकलाच जायची मुभा होती...
तेरा कोटी साठ लक्ष सेना सर्व ग्लॅक्सीवर राज्य करण्यासाठी पुरेशी होती...
*
स्टार्क सरळ नाबूवर उतरला...
नाबू ग्रह हाच रेबेल सैण्यासाठी एक शेवटचा पर्याय उरला होता. मात्र त्यांची संख्या आता फक्त सहा लाख एवढीच राहिली होती.
म्हणूनच लियाने पृथ्वीवासीयांकडून मदत मागितली होती....
कमांडर लिया डार्थ वेडरची मुलगी... लूक स्कायवॉकरची बहीण... हान सोलोची पत्नी....
आणि बेन सोलोची आई...
बेन सोलो, स्नोकचा एकनिष्ठ सेवक डार्क फोर्सकडे पूर्णपणे झुकलेला!
आणि आपल्या पित्याला मारणारा!
"स्टार्क तू पृथ्वीवर राहायला हवं होतंस." लिया म्हणाली
"मलाही पृथ्वी सोडता येत नव्हती पण..."
स्टार्कने लाल कापड्याकडे इशारा केला.
कमांडर लियानें कपडा उघडला.
आणि विजेचा झटका बसावा तशी ती मागे सरकली...
कपड्यात होतं...
डार्थ सिडियसचं मुंडकं...
**
"डार्थ सिडियसला कोणी मारले?"
"डार्थ वेडरने..."
"मग त्याचं शीर कोणी कापलं?"
"माहिती नाही."
"सिनेटर हि घटना कित्येक वर्षपूर्वी घडलेली आहे आणि ती आता अशी समोर यावी?"
"कमांडर डार्थ वेडर जिवंत असण्याची शक्यता नाही, कारण त्याने लुकच्या कुशीत प्राण सोडला, आणि लुकनेच त्याचा अंत्यसंस्कार केला."
मग डार्थ सिडियसचं शीर आताच का समोर यावं....?
यावर लियाने विचार केला...
"मला जावं लागेल सिनेटर."
"कुठे?"
"केव ऑफ सोलमध्ये..."
***
लिया केव्ह ऑफ सोलकडे निघाली... सोल केव्ह म्हणजे जेडीचं अंतिम विसाव्याचं ठिकाण. डार्क फोर्सपासून पूर्णपणे अलिप्त असलेली...जगाच्या नजरेतून दूर असलेली...
या जागेचा पत्ता शेवटचा जेडी लूकने लियाला सांगितला होता आणि तोही याच ठिकाणी विसावा घेत होता...
सोल केव्ह हि दारसीच्या पर्वतरांगांमध्ये होती. तिची उंची त्रेपन्न फूट आणि लांबी चार मैल होती. हि केव्ह सदैव बर्फाने आच्छादलेली असे आणि यामुळेच तिला पांढरा रंग प्राप्त होत होता.
लियाने केव्हमध्ये पहिलं पाऊल टाकलं आणि आठवणींनी तीचं मन भरून आलं...
याच केव्हमध्ये तिचा भाऊ विश्राम करत होता...
लिया सरळ आतमध्ये आली आणि शेवटच्या टप्प्यात आल्यावर तिने त्याला आवाज दिला....
आवाज संपुर्ण केव्हमध्ये घुमला....
केव्हमधील बर्फ थरारला...
सोसाट्याचा वारा सुटला...
जमीन हादरली...
आणि तिच्या समोर 'तो' उभा राहिला......!!!!!!

कथा

प्रतिक्रिया

क्षमस्व's picture

24 Aug 2016 - 8:59 pm | क्षमस्व

href="http://www.misalpav.com/node/36979" title="द स्टार्क स्टोरी-१">

क्षमस्व's picture

24 Aug 2016 - 9:01 pm | क्षमस्व

द स्टार्क स्टोरी-१
http://www.misalpav.com/node/36979
द स्टार्क स्टोरी-२
http://www.misalpav.com/node/37009

प्रभास's picture

24 Aug 2016 - 9:27 pm | प्रभास

तुम्ही खरंतर मार्व्हल काॅमिक्स वगैरे ठिकाणी चांगले काम करू शकता... जब्बरदस्त स्पीड आणि पकड... मस्तच...