अतिरेक !

इल्यूमिनाटस's picture
इल्यूमिनाटस in जनातलं, मनातलं
18 Aug 2016 - 12:19 pm

विचारांचा अतिरेक झाला की मग मी कोणासोबत तरी बोलून मन मोकळं करतो, पण आज विचार केला की लिहून मन मोकळं करावं!
वर्तमान पत्रात जाहिराती येतात , म्हणजे खूपच येतात. 'वर्तमान पत्रातील जाहिरातींचा अतिरेक' या विषयावर एक वेगळा लेख लिहावा लागेल! पण अधून मधून बातम्या सुद्धा येतात! नाही असं नाही!
कसल्या असतात या बातम्या? दहशतवादाच्या आणि बलात्काराच्या. या दोन भयंकर समस्यांनी भारतालाच काय सगळ्या जगाला ग्रासलंय.
दहशतवाद! हिंसेचा अतिरेक झाला की माणूस दहशतवादी होतो. आता या विषयावर बोलायला लागलं की आपसूकच एक वाक्य ऐकू येतं की "दहशतवादाला धर्म नसतो"! नसतोच मुळी. आणि कोणत्याही एका धर्माला दहशतवादी म्हणणं हि चुकीचंच. पण एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की लढाई हि बंदुकधाऱ्या माणसांशी नसून ती माणसाच्या विचाराशी असते आणि या विचाराला जर धर्म खतपाणी घालत असेल तर या गोष्टी पासून पळून चालणार नाही.
धर्मात अनिष्ट रूढी, परंपरा, समज, गैरसमज हे असणारच. काळानुसार संस्कृती किंवा धर्माचं बदलणं हे त्या संस्कृतीचं जिवंतपणाचं लक्षण असत. आणि या रूढी व परंपरा बदलणं हे त्या समाजातल्या वैचारिक दृष्ट्या प्रगल्भ व्यक्तींचं काम असतं.
हिंदू धर्मात तर असल्या कालबाह्य रूढी अगदी आत्तापर्यंत म्हणजे ब्रिटिश काळा पर्यंत पाळल्या जात होत्या. सती जाणे, स्त्रियांचे केशवपन, पुनर्विवाहाला विरोध, आणि ब्राह्मणांचे अहम् ब्रह्मस्मि धोरण वगैरे भयंकर प्रकार चालायचे. हा सुद्धा धर्माच्या अतिरेकाचाच परिणाम होता. पण न्यायमूर्ती रानडे, आगरकर, गोखले, आंबेडकर , फुले यांनी असल्या रूढींना कडाडून विरोध केला. समाजात बदल झाला. आणि विशेष म्हणजे ज्या ब्राह्मण समाजाचा या सागळ्या रूढीना पाठिंबा होता, त्याच समाजाने ह्या बदलांचा स्वीकार सगळ्यात जास्त प्रमाणात केला!
बदल घडतो!

आता मी लेख वगैरे लिहिणार म्हणल्यावर मला बरेच सल्ले आले. आपण पुण्यात राहतो म्हणल्यावर सल्ले हे यायचेच! पुण्यात सल्ले एकतर बडीसोप् दिल्यासारखे देतात नाहीतर चप्पल फेकून मारल्यासारखे मारतात!
मलाही मित्राने सल्ला दिला/मारला! तो म्हणाला कोणत्यातरी एका मोठ्या व्यक्तीचं वाक्य टाक लेखात, वजन वाढेल लेखाचं! म्हणून हे डांटे चं वाक्य, अर्थात वजन वाढवण्यासाठी!
डांटे म्हणतो
The darkest places in the hell
are reserved for those
who maintain their neutrality
in times of moral crisis

चुकीच्या गोष्टींचा वा पद्धतींचा विरोध न करणं किंवा कोणतीच बाजू न घेणं हे त्या गोष्टींचे समर्थन केल्यासारखेच असते. विरोध करणे गरजेचे!

वाढलं वाटतं वजन!
असो ज्या दिवशी ह्या आयसिस किंवा झाकीर नाईक सारख्या कोडग्या माणसांचा मुस्लिम बांधव कडाडून विरोध करतील तोचि सुदिन!

पूर्वाश्रमीचे angry young man आणि सदीचा महानायक , बिग बी वगैरे असल्या उपाध्या बाळगून असलेले बच्चन साहेब परवाच म्हणाले की हा स्वातंत्र्य दिन आपण बलात्कार मुक्त भारताची सुरुवात म्हणून साजरा करूयात. विचार चांगलाय.
वासनेचा अतिरेक झाला की माणूस बलात्कारी होतो. सिग्नल तोडणे, पोलिसांना चिरीमिरी देऊन विषय मिटवणे, लाच देऊन काम करवून घेणे, डोनेशन देऊन ऍडमिशन घेणे ह्या गोष्टी छोट्या वाटतात, पण नियम तोडून कोणतीही गोष्ट मिळवता येते ही सडकी आणि भिकार प्रवृत्ती जी पसरत चालली आहे ,ती समाजासाठी अत्यंत घातक आहे.
मुळात तीन गोष्टी असतात , त्यातल्या पहिल्या दोन म्हणजे संधी आणि प्रलोभन. या दोन गोष्टी एकत्र आल्या की बलात्कारी माणसाच्या अंगातला सैतान जागा होतो. तिसरी गोष्ट असते ती म्हणजे नैतिकता , मोरॅलिटी किंवा साध्या भाषेत आपण त्याला संस्कार म्हणू. ही गोष्ट ह्या सैतानांकडे नसतेच. म्हणून असले मानवजातीची किळस यावी असे प्रकार घडतात. मग ही नैतिकता किंवा संस्कार आणायचा कुठून?
मग दहशतवाद आणि बलात्कार ह्या अघोरी समस्यांचं सामायिक सोल्युशन सापडतं ते इथे. आणि हे सोल्युशन म्हणजे शिक्षण. साधं नाही , संस्कार युक्त शिक्षण!
लहानपणापासूनच पायथागोरस च्या theorem सोबत, energy conservation च्या नियामासोबत, किंवा स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासासोबत मानावतावादाचं शिक्षण द्यायला हवं. गोष्ट छोटी आहे ,तिचा परिणाम व्हायला सुद्धा वेळ लागेल कदाचित, पण सुरुवात करायला काय हरकत आहे!?
पण मज पामराचे कोण ऐकतो!?

अर्थशास्त्रातात एक बेसिक नियम आहे, पुरवठा वाढला की वस्तूची किंमत कमी होते. हा नियम भाषा शास्त्रात सुद्धा लागू पडत असावा! जास्त बोलल्याने किंवा लिहिल्याने माणसाची किंमत कमी होत असावी , म्हणूनच थांबतो.

मांडणीवावरमुक्तकप्रकटनविचार

प्रतिक्रिया

पैसा's picture

18 Aug 2016 - 12:37 pm | पैसा

विचार आवडले.

इल्यूमिनाटस's picture

18 Aug 2016 - 4:49 pm | इल्यूमिनाटस

धन्यवाद_/\_

धनावडे's picture

18 Aug 2016 - 1:06 pm | धनावडे

मस्त

चंपाबाईच्या मतांच्या प्रतिक्षेत....

कैलासवासी सोन्याबापु's picture

18 Aug 2016 - 1:18 pm | कैलासवासी सोन्याबापु

लेख आवडला! "ब्राह्मण सगळे गोग्गोड अन इतर त्यातही इतरधर्मीय अजूनही बुरसटलेले" असा एकोळी धागा चालला असता,

एकोळी म्हणजे शेंच्युरी पक्की असती असे वाटते! असो!

तर्राट जोकर's picture

18 Aug 2016 - 1:26 pm | तर्राट जोकर

मुस्लिमांनी 'कडाडून विरोध' करणे म्हणजे नेमकं कसं अपेक्षित आहे? काही 'कडाडून विरोध' झालेली इतरधर्मिय उदाहरणे देता येतील काय?

इल्यूमिनाटस's picture

18 Aug 2016 - 4:43 pm | इल्यूमिनाटस

विरोध करणे म्हणजे जुने बुरसटलेले कालबाह्य विचार सोडून पुरोगामी विचार अमलात आणणे या अर्थी. अर्थात धार्मिक क्रांती!
आणि इतर कशाला... इस्लाम धर्मातलंच उदाहरण देतो. इस्लाम धर्मात सुद्धा असल्या "धार्मिक क्रांत्या" झाल्याच की, पण नेमक्या उलट्या दिशेने! सौदीत मुहम्मद वहाब ने अशीच "धार्मिक क्रान्ती" केली आणि वहाबीझम सारखा प्रतिगामी आणि जाचक पंथ सुरु झाला.
अब्दुल बहा ने पुरोगामी आणि काही पाश्चिमात्य विचार जोडून नवा बहाई नावाचा पंथ चालू केला खरा.. पण तो फसला! किंवा वहाबीझम इतका प्रचलित झाला नाही! धर्मसुधारणा योग्य दिशेने होणे गरजेचे.

तर्राट जोकर's picture

18 Aug 2016 - 4:56 pm | तर्राट जोकर

जुने बुरसटलेले कालबाह्य विचार सोडून पुरोगामी विचार

पिवळ्या केलेल्या दोन्ही शब्दसमुच्चयांच्या उदाहरणार्थ काही देऊ शकला??

सतिश गावडे's picture

18 Aug 2016 - 1:43 pm | सतिश गावडे

>> ब्राह्मणांचे अहम् ब्रह्मस्मि धोरण वगैरे भयंकर प्रकार चालायचे.
असहमत.

नाखु's picture

18 Aug 2016 - 3:28 pm | नाखु

पतंग गोता खात आहे इतकेच म्हणेन.

आसारीमुक्त नाखु

इल्यूमिनाटस's picture

18 Aug 2016 - 4:46 pm | इल्यूमिनाटस

का हो नाखु शेठ? असे का वाटले तुम्हाला? परत एकदा वाचा.. पतंग उंच गेलेला दिसेल! आणि नाहीच दिसला तर विवेकाचा चष्मा घालून वाचा! (ओबेरॉय नव्हे)

ठाकूरांच्या विवेकाचं काय झालं?