सुश्याचं प्रेमपत्र

निखिल माने's picture
निखिल माने in जनातलं, मनातलं
16 Aug 2016 - 4:56 pm

"सुश्या फुगाला प्रपोज करणार"
हि बातमी संजीवनच्या होस्टेलमध्ये वणव्यासारखी पसरली.सुश्याच्या नेभळटपनाकडे बघून आणि त्याचा पूर्वेतिहास माहित असल्याने मी तिकडे फारसं लक्ष दिलं नाही.पण त्याला भेटून त्याचा रागरंग त्या बातमीवर विश्वास ठेवावाच लागला.
कॉलेजच्या शेवटच्या वर्षीतरी ती आपल्याला 'हो' म्हणेल या भोळ्या आशेपोटी हा बहाद्दर हे नसतं धाडस करतोय हे मला कळून चुकल.खरतर आमचा सुश्या आणि फुगा दोघेही कॉलेजमध्ये प्रचंड फेमस! अभ्यासात सतत टोप केल्यामुळे सुश्या आणि आपल्या जरा जास्त नखर्यामुळे फुगा कॉलेजमध्ये प्रचंड फेमस झाले होते. फुगाच हे जगावेगळ नाव आम्ही पोरांनी पाडलं होत, कारण फस्ट यीअरला चवळीच्या शेंगेप्रमाणे असणारी फुगा जेव्हा मेसचं जेवण जेवून जेवून जेव्हा हळूहळू फुगू लागली तेव्हा कम्परीझनसाठी आम्हाला दुसरा शब्दच सापडला नाही.मेसमध्ये तिला जेवताना बघून जगात २५ कोटी भूकबळी आहेत याची खात्री पटायची,आणि ते का आहेत याचं कारणदेखील समजून यायचं.सुश्याला फुगात काय आवडल हे माहित नव्हत पण या वयात गाढवी पण अप्सरेसारखी दिसते हे समजून आलं होत.
तर अस हे कपल कॉलेजमधल्या इतर कपल्सपेक्षा जरा वेगळ होत,कारण हे एक सिझनल कपल होत,ह्यांच्या दोस्तीचा सिझन फुगाच्या गरजेवर अवलंबून असायचा.म्हणजे सबमिशन ,प्रोजेक्ट,टयुटोरीअल अशावेळी दोघे हमखास एकत्र दिसायचे.पण जेव्हा या गोष्टी नसतील तेव्हा या दोघांतील अंतर मोजायला कोनात इंस्तृमेंट वापरावं हा यक्षप्रश्न आम्हाला पडत असे.कदाचित प्रेमाच्या भरती ओहोटीचा हा प्रकार असेल म्हणून आम्हीही तिकडे दुर्लक्ष करायचो.तरस हे सिझनल कपल अजून कन्फर्म नव्हत त्याच महत्वाच कारण म्हणजे नेभळट स्वभाव.एरवी तीन तीन तास गप्पा मारणाऱ्या सुष्याला ती तीन अक्षर उच्चारायला तीन वर्षात एकदापण जमल नव्हत.म्हणूनच गेले तीनही valentine day स्वत:ला बाथरुममध्ये कोंडून घेणारा सुश्या हा valentine day गाजवेल अशी कुणाचीही अपेक्षा नव्हती.पण आता हि बातमी ऐकून "आज कूच तुफानी होगी " हे मी ताडलं.
प्रेमाचा प्रक्टिकल अनुभव शून्य असूनही थिअरीत प्रचंड विद्वान असणारे बुद्धीजीवी इन्जीनियर सुश्याच्या रुममध्ये न बोलविता फुकटचा सल्ला द्यायला जमा झाले.अगदी शोलेपासून थ्री इडीयटच्या प्रपोज स्टाइलवर विचार करणे सुरु झाले.पण कॉलेजजवळ कुठेच पाण्याची टाकी नसल्याने आणि त्यातही सुष्याला उंचावर चक्कर येत असल्यामुळे शोलेचा ऑप्शन बाद झाला.थ्री इडीयट प्रमाणे गर्ल्स होस्टेलवर जाण्याचा बेत सुश्याने सांगितला पण गर्ल्स होस्टेलच्या वोचमनच्या हातात हा सापडला तर याचं काय होईल या काळजीपोट आम्ही त्याचा हा बेत हाणून पाडला.कारण हा वोचमन खली चा दुरून नातेवाईक लागतो असं आमच्या कानावर आलं होत.आणि त्याची अगडबंब शरीराकडे भागून ऐकणाऱ्याला ते पटायचं देखील.
शेवटी जगन्नाथाने दिलेला प्रेमपत्र लिहिण्याचा सल्ला सर्वांनी उचलून धरला.खरतर हा मार्ग आउटडेटेड असला तरी निर्धोक आहे आणि सुश्यला मार बसण्याची शक्यता फारच कमी असल्याने आम्ही याला मान्यता दिली.प्रेमपत्र कस लिहायचं आणि कस पोचवायच हे प्रश्न आता समोर उभे होते.पहिला प्रश्न इंद्रजीतने लगेच सोडविला आणि गुगल वर love-letter असं टाइप करताच ७०००० रिझल्ट आले,मग सुश्याने टेबलवरील जर्नल पेपर उचलला आणि इमानदार इन्जीनियरिंग स्तुडंटप्रमाणे कॉपी करायला सुरुवात केली.शेवटी कसाबस त्याचं ते तीन पाणी फर्ड्या इंग्लिश मधील प्रेमपत्र तयार झालं.आणि मग शेवटी दिपकने दिलेला दोघांचाही नाव न टाकण्याचा सुरक्षित सल्ला मान्य करून तो ते पत्र पोचवायला तयार झाला.
ते प्रेमपत्र त्याने मग नुकत्याच लिहिलेल्या टयुटोरीअलमध्ये अलगद ठेवून दिलं,टयुटोरीअल लिहील कि तो ते पहिल्यांदा फुगालाच देतो हे आतापर्यंत संपूर्ण पन्हाळा तालुक्याला माहित झालं होत.एवढ महान कार्य पार पडून सुशान्तराव शेवटी झोपी गेले.पण मला झोपी जाऊन चालणार नव्हत,मी पहिल्यांदा जाऊन होस्टेलच्या टेरेसला कुलूप लावलं,होस्तेलमधल्या सगळ्या दोऱ्या लपवून ठेवल्या.कारण त्या पत्राच उत्तर काय असेल ह्याचा अंदाज मला आतापर्यंत आला होता.पुढचे काही दिवस असेच शांततेत गेले .फूगाने ते पत्र वाचले अशी काही बातमी एकू आली नाही कारण सुश्याच्या रूममधून ना रडण्याचा आवाज वगैरे आला होता ना तो टेरेसकडे जाताना दिसला होता .त्यामुळे जसजसा वेळ जात होता तसं सर्वांची उत्सुकता वाढत चालली होती.शेवटी फूगाने ती टयुटोरीअल परत आणून दिली,तरीसुद्धा काहीच झाल नाही बिचारा सुश्या तर टेन्शनने मरायला आला होता पण तिने ती टयुटोरीअल आधीच लिहिली असेल अस सांगून त्याची समजूत काढण्यात आली.आणि आता परीक्षा जवळ आल्यामुळे तुझ्या प्रपोजचा कार्यक्रम जरा लांबणीवर टाकू असं सांगून त्याला अभ्यासाला बसविण्यात आलं.
असेच काही दिवस शांततेत गेले.preparation leave सुरु झाली होती.सर्व topper लोक आता वाघ जसा शिकारीवर तुटून पडतो तसे अभ्यासावर तुटून पडले होते.आणि मग थोड्याच दिवसात मी आमच्या नेहमीच्या कट्ट्यावर अभ्यास(?) करीत बसलेलो असताना फुगा तिथे आली.कदाचित सुष्याला शोधत तिथे आली,नक्कीच अभ्य्सात काहीतरी डाउट असेल असं मला वाटल.मला पाहताच ती माझ्याजवळ आली,आणि म्हणाली,
"अरे सुश्या कुठाय?"
"तो रूमवर अभ्यास करतोय,का? काही काम होत का?"
"अरे काही नाही,त्याला हि पत्रिका द्यायची होती "
"कसली?"
"अरे लग्नपत्रिका,माझं लग्न ठरलंय "
मी ताडकन उभं राहिलो.हि वेळ येणार हे माहित होत पण येवढ्या लवकर येईल हि अपेक्षा मी काय कुणीच केली नव्हती.अंतर्बाह्य हादरने या लहानपणी शिकलेल्या वाकप्रचाराचा अनुभव मला आत्ता पहिल्यांदाच येत होता.बिचाऱ्या सुश्याचा चेहरा सारखा समोर येत होता आणि या धक्क्यातून स्वत:ला कसाबसा सावरून घेत होतो तोच शेजारी बसलेल्या उम्याने स्वत:च्या मंद,मूर्ख आणि अतिशहाण्या स्वभावाला अनुसरून प्रश्न विचारलाच,
"कुणाशी?"
"घुमे सरांशी!"
प्रमाणापेक्षा जास्तच लाजत फुगा उत्तरली.हे तीच उत्तर ऐकून आत्ताच्या आता हि धरती दुभंगावी आणि तिने मला पोटात घ्यावं असं वाटल नाहीतर कमीत कमी पुढच्या भिंतीवरून उडी टाकून जीव द्यावा अशी इच्छा मनात उफाळून आली.पण माझ्या आईला नातवंडांचा चेहरा पहायची इच्छा असल्याने मी स्वत:ला आवरलं.या सलग दोन धक्क्यातून सावरायच्या आतच फुगा माझ्या नावाची पत्रिका देऊन निघूनही गेली होती.
पंधरा मिनिटानंतर सावरलो,पण हे कस घडल याचा विचार करू लागलो.मग तिच्या काही मैत्रीण आणि माझे स्टाफरूम मधील सोर्स वापरून मिळालेल्या त्रोटक माहितीच्या आधारे जेव्हा वस्तूस्थितीच जे काही चित्र उभं राहिलं तेव्हा तर मी बेशुध्द पडायचा बाकी राहिलो होतो. खरी गोष्ट अशी होती कि,सुश्याने जेव्हा टयुटोरीअलमधून प्रेमपत्र फुगला तील तेव्हा तिने ते उतरून उतरून काढलं पण ते लिहिताना "सबमिशन करताना त्यातील माहित हि गोपनीय आहे असे समजून मी ती कधीच वाचणार नाही "या इंजिनियरिंग स्तुडंतच्या प्रतीत्नेची तिने पुरेपूर आठवण ठेवली होती.आणि सुश्याच ते दोन पाणी प्रेमपत्र उतरून काढताना त्यातील एक अक्षरही वाचण्याचा त्रास तीन आपल्या अवजड शरीराला दिला नाही . आणि लिहून झाल्यावर ते घुमे सरांना सबमिट केल.आणि सरांनी आपल्या महाखडूस,महा........,महा............. (teacher's day जवळ आला असल्याने शब्द आणि भावना आवरल्या आहेत) स्वभावाला अनुसरून तीच एक ना एक अक्षर वाचून काढलं आणि त्या पत्रात नावं नसल्याने गैरसमज करून घेतला.त्यावेळी नक्की काय झाल असेल माहित नाही पण नक्कीच हा माणूस मायकल ज्याक्सनचा बाप बनून नाचला असणार हे नक्की! कारण अभ्यास करून पडलेल टक्कल ,रात्री जागरणं करून(कशासाठी जागत असेल हे कृपया विचारू नका ) डोळ्याभोवतीची वर्तुळ आणि जरा जास्तच शिकल्याने लग्नाचं उलटून गेलेलं वय असं तगड आणि रुबाबदार व्यक्तिमत्व असलेल्या माणसाला अशावेळी हर्षवायू होणे स्वाभाविकच आहे.
मग काय! घुमे सर आपला सारा गोतावळा घेऊन फुगाच्या घरी हजार झाले.आणि सोयरिक जमवूनच बाहेर पडले.कारण ५०,००० पगाराचा जावई मिळन तसं भाग्याचाच लक्षण.म्हणून फुगाच्या वडिलांनी लगेच होकार कळवू टाकला आणि एवढा वेल सेटल(कि मेंटल) नवरा मिळाल्यामुळे फुगाच्या नकाराचा प्रश्नच नव्हता.अश्या प्रमाणे फुगाच लग्न सरतेशेवटी ठरलं,घुमे सराच्या चेहऱ्यावरील आनंद कारंज्याप्रमाणे फुटून येत होता खरतर त्यांना हसताना आम्ही सगळे पहिल्यांदाच पाहत होतो..
आता हसावं कि रडावं हेच समजेनास झाल म्हणून शांतपणे बाहेर पडलो,सागरच्या दुकानातून दोन पाकीट घेतली आणि सुश्याची समजूत कशी काढायची या विवंचनेत त्याच्या रूमकडे चालू लागलो.........................

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

च्यक् च्यक् च्यक्! अरेरे! ;-)

सूड's picture

16 Aug 2016 - 5:17 pm | सूड

=))

चिनार's picture

16 Aug 2016 - 5:30 pm | चिनार

एक नंबर जमलंय..

राजाभाउ's picture

16 Aug 2016 - 5:48 pm | राजाभाउ

एक नंबर !!!! =))

ज्योति अळवणी's picture

16 Aug 2016 - 5:52 pm | ज्योति अळवणी

झक्कास जमली आहे भट्टी..
फक्त शुधलेखनातील चुका कमी असत्या तर अजून मजा आली असती

निखिल माने's picture

16 Aug 2016 - 7:02 pm | निखिल माने

पुढच्या वेळी कमी चुका करेन

फक्त शुधलेखनातील चुका

लुक व्हू इज स्पीकिंग!!

संजय पाटिल's picture

16 Aug 2016 - 5:54 pm | संजय पाटिल

व्वा!! घुम्याला भारी चानस लागला राव!!

मी-सौरभ's picture

16 Aug 2016 - 6:07 pm | मी-सौरभ

या कथेवर झक्कास विनोदी एकांकिका बसेल राव

जव्हेरगंज's picture

16 Aug 2016 - 7:18 pm | जव्हेरगंज

कडकच झालीय स्टोरी !!

अमितदादा's picture

16 Aug 2016 - 7:33 pm | अमितदादा

खुमासदार लेख...मस्तच..

पैसा's picture

16 Aug 2016 - 7:42 pm | पैसा

अरेरे!

स्रुजा's picture

16 Aug 2016 - 7:44 pm | स्रुजा

हाहाहा !! भारी लिहिलंय ... बरं झालं की पण, गुड रिडन्स सुश्याला.

संत घोडेकर's picture

16 Aug 2016 - 8:22 pm | संत घोडेकर

वा! छान, चांगलं जमलंय की.

हॉस्टेल च्या कथा जोरात सुरु आहेत एकंदर,
युंद्या आजुन,

आम्ही आणि आमचे सर्व मित्र मंडळ हास्टेलाच्या श्वानपथक युनिट मधे आसल्या कारणाने किस्सा जवळच्या दोस्ताचा आसल्यागत वाटला एकदम.

किसन शिंदे's picture

16 Aug 2016 - 8:44 pm | किसन शिंदे

हीहीही! एक नंबर बर्का

अंतु बर्वा's picture

16 Aug 2016 - 9:19 pm | अंतु बर्वा

लोल!! छान कथा आणि मधे मधे पेरलेले पंचेसही खास!

नीलमोहर's picture

16 Aug 2016 - 10:54 pm | नीलमोहर

वाईट हसवलेत हो, बेक्कार !!
दिवाळी अंकांतील निखळ विनोदी कथा वाचल्यासारखं वाटलं,
मस्त लिहिलेय.

टिवटिव's picture

17 Aug 2016 - 2:18 am | टिवटिव

महालोल!!!

पिलीयन रायडर's picture

17 Aug 2016 - 2:19 am | पिलीयन रायडर

अर्र् र्र र्र्र र्र

फार्च बेक्कार हो!! आणि हे होऊ शकतं.. इंजिनिरिंग्चे लोक एक शब्दही न वाचता पानं च्या पानं लिहु शकतात, लव्ह लेटर सुद्धा गुगल करु शकतात!!

आवडली!

आनन्दिता's picture

17 Aug 2016 - 8:00 am | आनन्दिता

हेच लिहायचं होतं !!
=))

स्मिता.'s picture

17 Aug 2016 - 3:43 am | स्मिता.

बेक्कार!!
एकही शब्द न वाचता / अर्थ समजून न घेता पानंच्या पानं लिहिणं हे वाचून इंजिनिअरिंगचे दिवस आठवले.

मराठमोळा's picture

17 Aug 2016 - 3:50 am | मराठमोळा

हाहाहा....

सुश्या वाचला म्हणायचं. आयुष्यभर फुसका फुगा गळ्यात बांधून फिरावं लागलं असतं पण नकळत का होईना ते लोढणं योग्य जागी पोहोचवल्याबद्दल सुश्याने आणी आपला मित्र वाचला म्हणून त्याच्या मित्रांनी घुम्याच्या वरातीत तुफानी नाचून जल्लोष करायला हवा. =))

अभ्या..'s picture

17 Aug 2016 - 10:46 am | अभ्या..

हेहेहेहेहेहे
भारीच की.
जमेश कथा.

निखिल माने's picture

17 Aug 2016 - 11:20 pm | निखिल माने

थँकेश

अभ्या..'s picture

27 Aug 2016 - 12:09 pm | अभ्या..

मस्तच स्पोर्टीनेसपणा.
येऊद्या नवीन कथा आता.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Aug 2016 - 7:09 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खुसखुशीत लेखन आवडलं.

-दिलीप बिरुटे

क्षमस्व's picture

17 Aug 2016 - 7:42 am | क्षमस्व

मस्त लिहिलंय।

नाखु's picture

17 Aug 2016 - 9:25 am | नाखु

आणि घुम्या अडकला...

अता आयुष्यभर सब मिशन (फुगा)

मस्त कथा
पुलेशु

ज्ञानोबाचे पैजार's picture

17 Aug 2016 - 9:57 am | ज्ञानोबाचे पैजार

अपराध सुश्याने केला शिक्षा घुम्याच्या कपाळी
पैजारबुवा,

पद्मावति's picture

17 Aug 2016 - 11:18 am | पद्मावति

मस्तं कथा :)

सानझरी's picture

17 Aug 2016 - 11:20 am | सानझरी

झकास कथा. लै आवडली.
खूप पूर्वी लोकसत्ताची एक 'हास्यरंग' पुरवणी यायची. त्याची आठवण झाली. :)

निखिल माने's picture

17 Aug 2016 - 11:18 pm | निखिल माने

धन्यवाद

जागु's picture

17 Aug 2016 - 1:28 pm | जागु

हाहाहा...
चांगली जमलेय.

णुकतेच इंजिनीअरिंग करून बाहेर पडलेले दिसताय.
- सबमिशन कॉमर्स च्या मित्राकडून हातापाया पडून पूर्ण करुन घेतलेला ;)

निखिल माने's picture

17 Aug 2016 - 11:17 pm | निखिल माने

बाहेर पडून झाली थोडी वर्ष
पण कथा पूर्वीच लिहिली होती.

मृत्युन्जय's picture

17 Aug 2016 - 3:35 pm | मृत्युन्जय

हाहाहा. मस्त जमलीये कथा

सस्नेह's picture

17 Aug 2016 - 4:44 pm | सस्नेह

मस्तं...भारी !

पिशी अबोली's picture

17 Aug 2016 - 5:40 pm | पिशी अबोली

हा हा, भारीच जमलंय.
बिचारा सुश्या.. पण गुगलून लव्ह लेटर लिहिणाऱ्यांचं असंच व्हायचं. 'कर्मा' की काय म्हणतात ते..

बबन ताम्बे's picture

17 Aug 2016 - 6:27 pm | बबन ताम्बे

मस्त !!

रातराणी's picture

17 Aug 2016 - 11:26 pm | रातराणी

खी खी खी. भारीये =))

अभिजीत अवलिया's picture

19 Aug 2016 - 1:07 am | अभिजीत अवलिया

चांगलं जमलंय

प्रभाकर पेठकर's picture

19 Aug 2016 - 11:15 am | प्रभाकर पेठकर

वसतीगृह जीवनाचा आणि सबमिशन्स वगैरेचा कांही अनुभव नसला तरी मोजक्याच शब्दात अगदी अचूकतेने चितारलेले शब्द्चित्र फार सुरेख जमले आहे. ह्यात शेवटी सुशाच्या वर्तमानाचे वर्णन आले असते किंवा त्याची कशी कशी समजुत काढली ह्याचे वर्णन आले असते तर अजून मजा आली असती. माझ्या डोळ्यांसमोर त्याचे, दाढीचे खुंट वाढलेले, चुरगळलेले पारोसे लेंघा आणि बुशकोट घातलेले आणि इतरांकडून मागून आणलेल्या सिगरेटच्या थोटकांचे 'शेवटचे' झुरके मारणारे असे चित्र उभे राहिले. असो. शेवटी लेखकाचे स्वातंत्र्य आहेच.

निखिल माने's picture

8 Oct 2016 - 1:58 pm | निखिल माने

अशी अपयशे फार common असतात पेठकर सर, अशी प्रकाराने खरंच फार खोल घाव देत नाही. हे असाच चालत कॉलेजमध्ये .

हलकं फुलकं प्रेम

अपयश आलं कि महिनाभराचाच हँगओव्हर राहतो मग नई मंझिल नई कहाणी

सिरुसेरि's picture

24 Aug 2016 - 4:52 pm | सिरुसेरि

भारीच +१ .
--------संपूर्ण पन्हाळा तालुक्याला माहित झालं होत----- हे वारणानगर कॉलेज का ?

निखिल माने's picture

26 Aug 2016 - 11:54 am | निखिल माने

नाही, संजीवन, पन्हाळा

ब़जरबट्टू's picture

24 Aug 2016 - 5:20 pm | ब़जरबट्टू

आवडली राव :)

शलभ's picture

24 Aug 2016 - 6:14 pm | शलभ

मस्त गोष्ट.
जेव्हा सबमिशन मधे पत्र पाठवलं तेव्हाच वाटलं असं होईल. :)
आमच्या रूम वर पोरं सबमिशन लिहायला यायची. काहीजण मधे मधे पिक्चर ची स्टोरी, गाणी लिहायचे.

इल्यूमिनाटस's picture

24 Aug 2016 - 7:22 pm | इल्यूमिनाटस

साबमिशन लय वाईट हो लय वाईट , याचा असाही तोटा होईल असा नव्हता विचार केला ;)
बाकी ष्टोरी छान जमलीय

अजया's picture

26 Aug 2016 - 4:28 pm | अजया

धमाल कथा! लिहिते रहा.

अभिजीत अवलिया's picture

27 Aug 2016 - 6:11 pm | अभिजीत अवलिया

मी इंजिनीरिंगला असताना एका मुलाने दुसऱ्याची असाइनमेंट कॉपी करताना पहिल्या पानावर ज्याच्या असाइनमेंटची कॉपी करत होता त्याचेच नाव व रोल नंबर टाकला होता. सरानी पकडल्यावर हसून हसून पुरेवाट झाली होती सगळ्यांची.

कैलासवासी सोन्याबापु's picture

27 Aug 2016 - 10:18 pm | कैलासवासी सोन्याबापु

आयला आज वाचलं हे!! कसलं सही आहे राव! हे धागे वर आणा रे! खास करून

"ह्या वयात गाढवी देखील...." अन "माझ्या आईला नातवंड पाहायची इच्छा असल्यामुळे" ह्या दोन वाक्यांना प्रचंड जास्त हसलोय मी!

कैलासवासी सोन्याबापु's picture

27 Aug 2016 - 10:19 pm | कैलासवासी सोन्याबापु

बाकी संजीवन कॉलेज ऑफ इंजिनीरिंग, पन्हाळा का?

निखिल माने's picture

29 Aug 2016 - 3:15 pm | निखिल माने

संजीवन इंजिनीरिंग अँड टेकनॉलॉजि इन्स्टिटयूट पन्हाळा

कैलासवासी सोन्याबापु's picture

2 Sep 2016 - 8:00 am | कैलासवासी सोन्याबापु

मेकॅनिकलला आर एस के आहेत का अजून???

निखिल माने's picture

13 Jan 2017 - 4:32 pm | निखिल माने

कुलकर्णी सर का?
आहेत ना, HOD होते amhala

अमितसांगली's picture

30 Aug 2016 - 4:35 pm | अमितसांगली

मस्त......

रुपी's picture

1 Sep 2016 - 2:18 am | रुपी

मस्त.. मजेशीर :)

असंका's picture

1 Sep 2016 - 8:17 am | असंका

एकदम फ्रेश...एक नंबर!!

धन्यवाद...

सुखीमाणूस's picture

2 Sep 2016 - 6:47 am | सुखीमाणूस
सुखीमाणूस's picture

2 Sep 2016 - 7:02 am | सुखीमाणूस
सुखीमाणूस's picture

2 Sep 2016 - 9:14 am | सुखीमाणूस
सुखीमाणूस's picture

2 Sep 2016 - 9:15 am | सुखीमाणूस
निखिल माने's picture

8 Sep 2016 - 5:59 pm | निखिल माने

धन्यवाद

संजय क्षीरसागर's picture

15 Jan 2017 - 11:48 am | संजय क्षीरसागर

आज वाचली. रविवारची मस्त सुरुवात झाली.