जगणे...!

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
31 Jul 2016 - 8:23 pm

जगणे कसेच होते?, येथे बघून गेलो
मरता इथे जरासा, थोडा जगून गेलो.

ती वेल अमृताची, मीहि तृषार्त होतो
गोडीस चाखताना, पुरता भिजून गेलो.

लागून आस तेंव्हा, त्या मोहमयं क्षणांची
जाळून समय सारा, त्यातच विझून गेलो.

ते वेड जन्मपंथी, त्याची मनात दाटी
भोगावयास त्याला, मी जन्ममृत्यू झालो.

ह्या धाडसास आता, म्हणतो पुन्हा 'खुळे' मी!
मिटताच त्यात अंती, थोडा शिकून गेलो.

जगणे कसेच होते?, येथे बघून गेलो......
....
अत्रुप्त...

कविता माझीशांतरसकविता

प्रतिक्रिया

कविता१९७८'s picture

31 Jul 2016 - 8:28 pm | कविता१९७८

मस्त

किसन शिंदे's picture

31 Jul 2016 - 11:30 pm | किसन शिंदे

मस्त. पण तिसरे कडवे जssरा डोक्याहून गेले.

टवाळ कार्टा's picture

31 Jul 2016 - 11:47 pm | टवाळ कार्टा

तेच तर मेन सांगायला आलेत गुर्जी =))

सतिश गावडे's picture

1 Aug 2016 - 9:21 am | सतिश गावडे

बुवांनी "धाडस" केले तेव्हा तू त्यांच्या संपर्कात नव्हता काय?

अत्रुप्त आत्मा's picture

1 Aug 2016 - 9:52 am | अत्रुप्त आत्मा

सदर काव्याचा विवाहजनीत गलीतगात्ररसाशी संबंध नाही.
असा विणम्र खुला सा करूण आम्मी आमचे जेव्हढे भायेर आले तेवडे शब्द संपवितो! ढण्यवाड्स!

सतिश गावडे's picture

1 Aug 2016 - 10:03 am | सतिश गावडे

अच्चा अस जाल तर

अत्रुप्त आत्मा's picture

1 Aug 2016 - 10:08 am | अत्रुप्त आत्मा

ल्लुल्लुल्लुल्लु.

सतिश गावडे's picture

1 Aug 2016 - 11:09 am | सतिश गावडे

हही हही हही

मेघवेडा's picture

1 Aug 2016 - 12:14 am | मेघवेडा

ज्जे ब्बात!

शेवटची कविता - अतृप्ताची.

एस's picture

1 Aug 2016 - 7:59 am | एस

अप्रतिम गझल!

नाखु's picture

1 Aug 2016 - 9:15 am | नाखु

शांतरसात घुसले आणि मार्गी लागले.

चान चान कवीता, आता बालगीते/बोब्बड गीते कधी?

अखिल मिपा भावविश्व चाहता संघ

सतिश गावडे's picture

1 Aug 2016 - 9:19 am | सतिश गावडे

वाह गुरुजी. छान. एकंदरीत छान चाललं आहे हे दिसतंय कवितेवरुन. आवडले.

अत्रुप्त आत्मा's picture

1 Aug 2016 - 9:54 am | अत्रुप्त आत्मा

सदर काव्याचा विवाहजनीत गलीतगात्ररसाशी संबंध नाही.
असा विणम्र खुला सा करूण आम्मी आमचे जेव्हढे भायेर आले तेवडे शब्द संपवितो! ढण्यवाड्स!

हा सदर काव्याचा ढिस्स क्लेमर समजावा. अशी इणंति!

चौकटराजा's picture

1 Aug 2016 - 10:25 am | चौकटराजा

सर्व सम्राट यांचा जाड्या मित्र रामभाउ अजून इथे कसा टपकला नाही. असो त्याची कमेंट आताच टाकतो.
"कस्सं जमतं हो तुम्हाला बुवा..... आम्हाला तुमच्या फ्यान मधी घ्या णं ! "

ज्योति अळवणी's picture

1 Aug 2016 - 10:43 am | ज्योति अळवणी

ह्या धडासास आता, म्हणतो पुन्हा 'खुळे' मी!

'धाडसास की 'धडासास'?

बाकी कविता अवघड वाटली पण आवडली

अत्रुप्त आत्मा's picture

1 Aug 2016 - 11:35 am | अत्रुप्त आत्मा

ऒह! चुकलं.

धाडसासं असच पाहिजे.

चूक आणून दिल्याबद्दल धन्यवाद. :)

संपादक- प्लीज करेक्शन करा हो.

अत्रुप्त आत्मा's picture

1 Aug 2016 - 11:38 am | अत्रुप्त आत्मा

च्यामारी! =)) ह्यात पण चुकलो.

चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. :)

अभ्या..'s picture

1 Aug 2016 - 11:29 am | अभ्या..

छान छान

कविता खरंच छान आहे गुर्जी.

पैसा's picture

1 Aug 2016 - 11:42 am | पैसा

वा! बुवा! कविता, गझल आवडली. एक बदल सुचवू का? मान्य कराच असे म्हणत नाही पण पण विचार जरूर करा.

तोडून समय सारा, त्यातच विझून गेलो.
जाळून समय सारा, त्यातच विझून गेलो

अत्रुप्त आत्मा's picture

1 Aug 2016 - 11:50 am | अत्रुप्त आत्मा

जाळून समय सारा, त्यातच विझून गेलो ›› रैट्ट ! हे ही चालेल. जास्त अन्वर्थक वाट्टय .

संपादक, प्लीज हा ही बदल करा. _/\_

गुरुजी कविता। कलादालन सदरातच लिहा.कविता तुमची एक कलाच आहे.संपादनही मिळेल.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

1 Aug 2016 - 2:34 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

छान. आवडली.

असा सगळा प्रकार झाला तर!!

स्पा's picture

1 Aug 2016 - 3:36 pm | स्पा

काहीही कळले नाही

उगा एक विडंबन मात्र सुचलेय

पैसा's picture

1 Aug 2016 - 6:11 pm | पैसा

अजिबात नको. =))

जगप्रवासी's picture

1 Aug 2016 - 6:21 pm | जगप्रवासी

वाह क्या बात, मस्त

प्रचेतस's picture

1 Aug 2016 - 7:55 pm | प्रचेतस

:)

मुक्त विहारि's picture

1 Aug 2016 - 9:03 pm | मुक्त विहारि

वल्लींचा प्रतिसाद आला तर....

चौकटराजा's picture

2 Aug 2016 - 11:18 am | चौकटराजा

भटसम्राटाचा जिवलग सोडा फौण्टण॑ मित्र रामभाउ आल्याने बरे वाटले.मुठे पवने चे पाणी वहाते झाले.

मुक्त विहारि's picture

1 Aug 2016 - 9:03 pm | मुक्त विहारि

असो...

मितभाषी's picture

1 Aug 2016 - 9:22 pm | मितभाषी

मला कवितेत ज्ञानेश्वर दिसले. आपली परवानगी असेल तर भावार्थ देतो.

जगणे असे असावे,येथे मिळाले बघाया
रुळता इथे जरासे,जीव लागला फुलाया.

मी वेल अमृताची, होते तरी तृषार्त ,
मोहरत्या नव्या क्षणांत, दु:ख लागले झुराया

पाहुन वाट जेंव्हा,तो क्षण समोर आला
त्या सौम्यशा धगेने, तनु लागली निवाया

हा नाद घुमे कैसा, त्याची मनात दाटी
समजावयास त्याला, की त्यातुनी तराया.

आठवे मज आता, ती रात्र जागलेली,
दिनस्वप्नांचा गुंता, घेतलेला सोडवाया.

जगणे असे असावे,येथे मिळाले बघाया ...

अत्रुप्त आत्मा's picture

2 Aug 2016 - 7:41 pm | अत्रुप्त आत्मा

अप्रतिम! __/\__
मन:पूर्वक धन्यवाद.