असे कधी घडत नसते

सुधीरन's picture
सुधीरन in जनातलं, मनातलं
24 Jul 2016 - 10:58 am

झपाटलेल्या(?) वळणापाशी येताच, तुमची चाल मंदावू लागते
कितीही नास्तिक वा धीट असलात तरी, हलकेसे भय तुम्हास वाटू लागते.
श्वासोच्छ्वासाचा वेग वाढतो.
शरीर थोडेसे घामेजू लागते.
वळण ते पार होताच मात्र, तुमची स्थिती पूर्वपदावर येते.
कधी तरी घरी पोहचता.
घर जणू तुम्हाला आलिंगन देते.
फुललेले चेहरे, उतू चाललेला हर्ष.
तुम्हास ते सारे खटकू लागते.
तुमच्या आगे मागे फिरणा-या त्यांची, तुम्हाला चिड येऊ लागते.
कधीतरी होते सारे असह्य.
तुमच्या तोंडून किंकाळी फुटते.
माणसे, घर सारे... काहीच नाही!
जणू विरून गेले, तुम्हाला जाणवते.
'ते' वळण अजुनही न सरले.
खरंच, असे कधी घडत नसते?

कथा

प्रतिक्रिया

ज्योति अळवणी's picture

24 Jul 2016 - 3:38 pm | ज्योति अळवणी

घडले असले तरी घरापर्यंत येतेच... असे नसते!

सुधीरन's picture

24 Jul 2016 - 7:18 pm | सुधीरन

आभारी आहे