एक कप कॉफी...

निखिल निरगुडे's picture
निखिल निरगुडे in जनातलं, मनातलं
24 Jul 2016 - 2:17 am

आज तो बराच वेळ कसल्याश्या विचारात मग्न होता. आपण बराच वेळ टेबलावरच्या paper-weight शी उगाचच खेळतोय ह्याचं त्याला भानंच नव्हतं. अचानक मनाशी काहीतरी निर्धार करून तो जागेवरून उठला आणि थेट एका desk पाशी जाऊन थांबला. ताज्या फुलांचा मंद सुगंध त्या डेस्क पासून सुरु होऊन ऑफिस भर दरवळत असावा, असे त्याला उगाचच वाटले.

"Hi!" ऑफिसातल्या नवीन तरूणीला त्याने सहजच म्हटले.

"Hi!" तिने तुटकेच उत्तर दिले, formality म्हणून.

''मी नचिकेत," त्याने हसून ओळख करून दिली.

"मी स्वाती," तिने मोजकेच हसत उत्तर दिले, formality म्हणून आणि समोरच्या file मध्ये डोके खुपसले..

काही क्षण शांतता, आणि मग ती उठून जातच होती, तितक्यात तो पुन्हा म्हटला, "आज संध्याकाळी काय करतेयस?"

तिला हा प्रश्न अपेक्षित नव्हता. "का?", तिने वळून विचारले.

"काही नाही, सहज. कॉफीसाठी बाहेर जावं म्हणत होतो."

"चांगलंय ना मग, जा की.समोरच्या इराण्याकडे मस्त कॉफी मिळते म्हणे." हे बोलून ती पटकन निघून गेली, त्याने काही बोलायच्या आत.

त्याला कळले की तिला त्या गेल्या तीन-चार दिवसात ऑफिसमधल्या बऱ्याच जाणांनी कॉफीसाठी विचारले असणार. तिचा नक्की गैरसमज झाला असणार. पहिल्या भेटीत अनोळखी तरूणीला कॉफीसाठी विचारणाऱ्यातला तिला तो एक वाटला असावा. पण, कदाचित तो तसा नव्हता. He seemed quite a gentelman compared to others.

* *

संध्याकाळी तो ऑफीस समोरच्या इराण्याच्या हॉटेलवर कॉफी पित बसला होता, तेव्हा त्याने पाहिले, तीही तिथेच आली. त्याला पाहून न पहिल्यासारखे करत एका टेबलावर बसली.

त्याची कॉफी संपली होती, पण तो मुद्दाम ती उठे पर्यंत बसून राहिला आणि मग ती उठल्यावर लगबगीने काउंटरवर बिल द्यायला गेला. मागोमाग तीही आलीच.

अगदी अचानक पहिल्यासारखे करत, त्याने हसत विचारलेच, "इकडे कुठे?"

त्यावर तिने तितकेच सहज उत्तर दिले, "इथली कॉफी छान आहे असं ऑफीस मधले staff सांगत होते. So try केली."

त्याने मोकळेपणे हसत विचारलं, "आवडली..?"

"काय..?," ती गोंधळली.

"कॉफी!"

यावर तोच काय काउंटरवरचा मॅनेजर देखील खळखळून हसला.

तीही मोजकेच पण पुर्वी पेक्षा कितीतरी मनमोकळे हसली आणि दोघे बाहेर पडले.

Bike कडे जाता जाता तो सहज तिला म्हटला, "सकाळी मी तुला कॉफीसाठी विचारलेलं तुला थोडं awkward वाटलं असेल. पण. खरंतर तीन-चार दिवसापासून पाहतोय, तू ऑफीस मधे नवीन आहेस आणि बाकीचा staff पण इतका adjusting नाहीये. म्हणून म्हटलं कॉफीच्या निमित्ताने थोडी ओळख होईल आणि तुला हळू हळू थोडं comfortable वाटेल, ऑफीसमधे."

"Oh! Sorry! Nothing personal, पण मी अनोळखी व्यक्ती सोबत नाही कधीच कॉफी पित.", काहीसे नाईलाजाच्या सुरातच बोलून ती पुढे गेली.

त्याच्या बोलण्यावरून तो इतर तरुणांसारखा, एखादी नवीन मुलगी दिसली कि मागे पाळणारा वाटत नव्हताच. तसा असता तर त्याने इतरांप्रमाणे पहिल्याच दिवशी ओळख काढली असती आणि मागे लागला असता. पण… कधी कधी एखाद्या नव्या व्यक्ती वर पटकन विश्वास ठेवण कठीण असते. खास करून, जेव्हा आपण पूर्वी ठेच खाललेली असते तेव्हा...

* *

काही दिवस अबोल्याचे गेल्यानंतर एक दिवशी ऑफीस मध्ये अचानक मागून येणारी हाक ऐकून तो दचकलाच.

"नचिकेत!"

मागे चक्क ती उभी होती.

"अरे, मला तुझी थोडी मदत हवी होती. त्याचं काय आहे, मी पूर्वी फारसं Powerpoint मध्ये काम केलं नाहीये ना, so I need some help आणि ऑफिस मध्ये मी तू सोडून कुणालाच फारसं ओळखत नाही ना."

यावर तो मिश्किल हसत बोलला, "ओळखत तर आपणही एकेमेकाला नाही! But I won’t mind helping you."

हा त्यादिवशीच्या 'अनोळखी व्यक्तीसोबत कॉफी पीत नाही' या वाक्यावर टोमणा होता, हे तिला कळले, म्हणून ती गालातल्या-गालात हसली.

त्या पुढे अर्धा तास जवळपास ते दोघे कामाबद्दल बोलत होते. तो इतका तल्लीन होऊन कामाविषयी बोलत होता, की त्याने नोटीस नाही केले की ती त्याच्याकडे मधून-मधून पाहतेय. तिला ही गोष्ट आवडली की तो निदान इतरांसारखा विनाकारण तिच्याशी flirt करत नव्हता.

काम संपवून उठून जात असताना ती त्याला thanks बोलली तेव्हा त्याने पुन्हा प्रश्न टाकला, "ऑफिस नंतर, एक कप कॉफी?"

तिने आनंदाने हसत हो म्हटले.

* *

संध्याकाळी दोघांनी सोबत इराण्याच्या हॉटेलवरच्या कॉफीचा आस्वाद घेतला. मनमोकळेपणे भरपूर इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या.

त्याची कॉफी केव्हाच संपली होती, पण तीचे सावकाश चालूच होते.

त्याने थट्टेने तिला विचारलेच, "अगदी गप्पा संपेपर्यंत कॉफी पुरवावी लागेल असं काही नाहीये. हवं तर आणखी एक मागवू."

"नाही रे, सकाळी जरा चहाने तोंड भाजले होते. म्हणून थोडा वेळ लागला."

त्यावर तो फक्त हसला आणि तिची कॉफी संपल्यावर दोघे उठून निघाले.

बिल देत असताना मॅनेजरने हळूच त्याला विचारले, "काय आवडली का मग?"

"काय?", तो गोंधळला.

"कॉफी!", म्हणत मॅनेजर इतक्या खदाखदा हसला कि तिलाच काय सगळ्या हॉटेलला ऐकू गेलं असेल.

तो किंचित लाजतच पटकन बाहेर गेला.

तरी तिने विचारलेच, "काय म्हणत होता तो?"

"काही नाही. असंच... मी तुला घरी सोडू?"

तिने कसाबसा सोबत कॉफीचा मोह केला होता, पण यापुढे तिने स्वतःला सावरलं.

"नको, मी रोज bus ने जाते. आजपण जाईन bus नेच. उगाच नसत्या सवयी नकोत लावायला ."

ते वाक्य ऐकून तो क्षणभर थबकला.

आणि मग दोघे आप-आपल्या मार्गाने निघून गेले, ती bus stop कडे आणि तो bike कडे.

Bike चालवता चालवता एकच विचार त्याच्या डोक्यात घोळत होता. खरंच सकाळचा चहा भाजल्यावर माणूस संध्याकाळची कॉफी देखील फुंकून पितो!

* *

काही दिवस असेच उलटले. एक दिवशी त्याने ऑफिस नंतर जात असताना तिला हाक मारली. ती थांबली.

"स्वाती, तुझी थोडी मदत हवी होती."

"माझी मदत? कसली?"

"अग, आई साठी एक साडी घ्यायचीये आणि मला अश्या गोष्टींची तितकी पारख नाही. म्हणून म्हटलं तू मदत केली असतीस तर.."

"हो चालेल ना." ती पटकन बोलली.

पुढे सुमारे एक-दीड तास साडी घेण्याचा कार्यक्रम चालू होता. पण, तिने विषय आई आणि साड्या सोडून कुठेही भरकटू दिला नाही.

सगळं झाल्यावर त्याने तिला विचारलं,
"Shopping करून थकली असशील ना. एक कप कॉफी घेऊया?"

तिने चटकन "नको" म्हणून विषय बदलला.

त्या दिवसा पासून ती थोडी अलिप्त वागत आहे, हे त्याला जाणवत होतं. कदाचित, त्या मॅनेजरच्या विनोदामुळे असेल. कदाचित, त्याने तिला ''bike वर घरी सोडू का'' विचारण्यात खूप घाई केली होती.

पण एक त्याला जाणवलं होतं, की कुठलीतरी जुनी जखम अजून पुरेपूर भरली नाहीये. कोणती हे तिला विचारून तो त्या जखमांची पुन्हा खपली काढणार नव्हता. ती जखम भरण्यास पुरेपूर वेळ द्यायला हवा...

* *

साडी निवडून bus stop वर पोहोचेपर्यंत बराच उशीर झाला होता. तरीही त्याने तिला bike वर सोडू का विचारले नाही. तो फक्त इतकंच बोलला, "बराच उशीर झालाय. Bus मिळेपर्यंत थांबतो मी सोबत."

तिनेही फक्त, “बरं!” म्हटलं.

काही वेळात पाउस सुरु झाला. पण bus येण्याचा पत्ता नव्हता. शेवटी ती त्याला म्हटली, "बराच उशीर होतोय. तू जा आता. मी जाईन rickshaw ने."

न राहवून पुन्हा त्याने तोच प्रश्न विचारला, "पण इतक्या पावसात आणि इतक्या उशिरा तू एकटी rickshaw ने कशी जाणार? मी सोडू का?"

तिने फक्त एकदा त्याच्याकडे रोखून पहिले आणि मग नजर वळवली. त्यानंतर काही क्षण पाउस आणि येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांच्या आवाजाव्यतिरिक्त भयाण शांतता..

काही वेळाने एक rickshaw भरधाव वेगाने येउन bus stop समोर थांबली. काहीही न बोलताच ती पटकन बसली आणि rickshaw आली तश्याच वेगाने निघून गेली.

त्यानेही त्याचा raincoat अंगावर चढवला, bike ला kick मारली आणि निघाला.

* *

पावसामुळे समोरचे अस्पष्टच दिसत असल्याने वाटेतले खडे चुकवत तो सावकाश bike चालवत होता.

तितक्यात वाटेत त्याला लुकलुकणाऱ्या गाडीच्या tail-lights दिसल्या. एक चालक भर पावसात बंद पडलेली rickshaw चालू करण्याचा प्रयत्न करत होता आणि बाजूला एक तरुणी, भर पावसात भिजत, ती चालू होण्याची वाट पाहत उभी होती. होय, ती तीच rickshaw होती. त्याने bike चालकाजवळ थांबवली आणि विचारले, "काका, काय झालं?"

Bus stop वर पाहिले असल्याने चालकाने त्याला ओळखले. "गाडी बंद पडली रे. चालू होत नाहीये. आता ढकलत garage वर न्यावी लागेल. तसं जवळच आहे. पण हा पाउस बघतोयस ना आणि त्यात ladies passenger. "

त्याने चटकन अंगावरचा raincoat काढला आणि त्याला देत म्हणाला, "तुम्ही एक काम करा पाउस खूप आहे, हा raincoat घ्या आणि सावकाश जा. मी madam ना घेऊन जातो.

चालक आश्चर्याने त्याला म्हटला, "अरे! raincoat तुलाच राहूदे की रे. तू पण भिजतोयस."

"नाही मी ठीक आहे. तुमची rickshaw नाक्यावरच असते ना. Raincoat उद्या येउन घेईन."

ती मागे उभी राहून मोठ्या कौतुकाने हे पाहतच होती.

त्याने काही बोलण्याआधीच ती येउन त्याच्या मागे bike वर अलगद बसली आणि नकळत कुठून तरी आलेल्या विश्वासाने तिने त्याच्या ओल्या खांद्यावर आधारासाठी आपला थरथरता हात ठेवला.

* *

गाडी खड्डे चुकवत तिच्या घरापर्यंत पोहोचली. ती उतरली.

"हे काय घरात अंधार दिसतोय?"

"अरे पाउस पडतोय ना. लाईट गेली असेल. आई-बाबा पण बाहेरगावी गेलेत ना. मग कुणी दिवेही लावायला नाही घरात. "

"अच्छा", एवढंच बोलून तो निघणार तितक्यात त्याला थांबवत ती बोलली,

"हे काय. अरे, तू भिजलायस खूप. एक कप कॉफी तरी घेऊन जा." आणि खूप गोड हसली.

त्याने क्षणभर विचार केला. मोठ्या मुश्किलीने त्याने एक कप कॉफी आणि bike वर lift देण्याइतका का होईना तिचा विश्वास कमावला होता.

उतरण्यासाठी त्याने गाडीचे stand लावले इतक्यात त्याचं लक्ष घरातल्या अंधाराकडे गेलं.

काही विचार करून तो तिला म्हणाला, "ए, आज नको गं. नंतर येईन कॉफी प्यायला.. तुझे आई-बाबा असतील तेव्हा. नक्की..."

तो bike चालू करून निघून गेला. त्याच्या पावसात भिजत जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहून ती खुदकन हसली आणि धावत घरात गेली. आज तो थांबला नसला म्हणून काय झालं, कॉफीचा एक कप आत तिची आतुरतेने वाट पाहत होताच…

* * *

कथा

प्रतिक्रिया

आवडली बरं का. कथा हो! :-)

संदीप डांगे's picture

24 Jul 2016 - 12:23 pm | संदीप डांगे

+१११

स्रुजा's picture

24 Jul 2016 - 4:43 am | स्रुजा

फार च गोड ! मला पण आवडली.. तीच हो, कथा ! :)

सोनुली's picture

24 Jul 2016 - 7:19 am | सोनुली

आवडले

कविता१९७८'s picture

24 Jul 2016 - 10:33 am | कविता१९७८

मस्त

संजय पाटिल's picture

24 Jul 2016 - 10:45 am | संजय पाटिल

आमच्या कडे पण मस्त पाउस पडतोय, समोर मस्त कॉफी चाहाचा कप आहे. आणि हि कथा!! मस्त.

मुक्त विहारि's picture

24 Jul 2016 - 11:07 am | मुक्त विहारि

मस्त...

ज्योति अळवणी's picture

24 Jul 2016 - 3:32 pm | ज्योति अळवणी

आत्ता काहीतरी घडेल अस वाटता वाटता गोड शेवट करत आणि मनाला हुरहूर लावत संपली.

रुस्तम's picture

24 Jul 2016 - 3:43 pm | रुस्तम

कथा आवडली

रुस्तम's picture

24 Jul 2016 - 3:43 pm | रुस्तम

कथा आवडली

Bhagyashri satish vasane's picture

24 Jul 2016 - 4:01 pm | Bhagyashri sati...

छान आवडली.... कथा

जव्हेरगंज's picture

24 Jul 2016 - 7:02 pm | जव्हेरगंज

मस्त , गोड आहे गोष्ट!

पद्मावति's picture

24 Jul 2016 - 7:08 pm | पद्मावति

फारच मस्तं लिहिलंय. एकदम गोड आहे कथा.

टवाळ कार्टा's picture

24 Jul 2016 - 8:09 pm | टवाळ कार्टा

गोग्गोड

बाबा योगिराज's picture

24 Jul 2016 - 11:40 pm | बाबा योगिराज

पुभाप्र, पुलेशु.

चलत मुसाफिर's picture

25 Jul 2016 - 12:36 am | चलत मुसाफिर

पण आईबाबा लेकीला सोडून भर पावसाळ्यात सहली काढताना पाहून मौज वाटली :-)

हेमन्त वाघे's picture

25 Jul 2016 - 7:22 am | हेमन्त वाघे

बरोबर आहे , आई बाबांशिवाय ते बाळ कसे राहील ? ते तर नोकर ना?
ती मुलगी बाल कामगार होती का?
नौकरी करणाऱ्या लहान बाळावर घर कसे सोडून जाणार ?

आम्हा भावंडांवर तर कॉलेज पासून घर सोडून जाणाऱ्या बेजबाबदार आई वडिलांचा मला अभिमान वाटतो !!

संदीप डांगे's picture

25 Jul 2016 - 8:42 am | संदीप डांगे

=))

अमितदादा's picture

25 Jul 2016 - 12:58 am | अमितदादा

सुंदर..

निखिल निरगुडे's picture

25 Jul 2016 - 1:38 am | निखिल निरगुडे

इतक्या "गोड" प्रतिक्रियांसाठी सर्वांचे मनापासून आभार... :)

नाखु's picture

25 Jul 2016 - 9:13 am | नाखु

कॉफी बरोबर बरेच काही असा सिनेमा बनवायला हवा..

अट: मराठी सिनुमात स्व्पनील-मक्या-भरत-संजय सोडून कुणालाही घ्यावे

कथा मस्त , योग्य वळणावर (अर्थासहीत) समारोप.

मिपा नितवाचक नाखु

वेदांत's picture

25 Jul 2016 - 10:34 am | वेदांत

छान..

नितिन५८८'s picture

25 Jul 2016 - 11:51 am | नितिन५८८

फारच मस्तं लिहिलंय

प्रमोद देर्देकर's picture

25 Jul 2016 - 1:27 pm | प्रमोद देर्देकर

कथा भयकथा आहे काय? घरात कोणीच नसताना आत अंधार असताना एक कप कॉफी अगोदरच कशी तयार असणार?

स्पावड्या बघतोयस ना?

तुम्ही येऊ द्या दुसरा भाग अशी कलाटणी देणारा :)

राजाभाउ's picture

25 Jul 2016 - 1:31 pm | राजाभाउ

आवडली ...

पैसा's picture

25 Jul 2016 - 2:29 pm | पैसा

कथा आवडली. फक्त ते मधे मधे विंग्लिह्स शब्द रोमन लिपीत लिहिलेले जरा जास्तच झाले.

रुपी's picture

26 Jul 2016 - 12:03 am | रुपी

+१

प्रसाद गोडबोले's picture

25 Jul 2016 - 3:04 pm | प्रसाद गोडबोले

कथा आवडली , अशा हळुवार प्रेमकथा वाचताना अगदी गुदगुल्या केल्यासारखे होते मनाला :)

पुढील भाग लिहावा , कथा पुढे चालु ठेवावी अशी नम्र विनंती करीत आहे.

--

नाखु's picture

25 Jul 2016 - 4:38 pm | नाखु

प्रतिसादाला दिसलासं ते !

तू हरवल्याची बातमी देणार होतो.

निखिल निरगुडे's picture

26 Jul 2016 - 3:34 am | निखिल निरगुडे

पुढील भागा बद्दल अजून तरी विचार केला नव्हता, मूळ कथा इथेच संपते.. बघू, विचार करू पुढे काही सुचलेच तर... बाकी सूचना प्रतिक्रियांसाठीसाठी आभार!

एकनाथ जाधव's picture

26 Jul 2016 - 12:28 pm | एकनाथ जाधव

कथा आवडली.

सिरुसेरि's picture

26 Jul 2016 - 4:57 pm | सिरुसेरि

+१ . कथा आवडली . "सावधानीमे समझदारी है " / "समझदारीमे सावधानी है" असा काहिसा आशय वाटला . कॉफी पिण्यावरुन "प्यारके साईड इफेक्टस" आठवला .

निओ's picture

26 Jul 2016 - 6:23 pm | निओ

छान आहे कथा.

रातराणी's picture

26 Jul 2016 - 11:46 pm | रातराणी

छान लिहिलंय पण पूर्ण नाही वाटलं. (शेवट गोड करणार असाल तर) पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

इशा१२३'s picture

27 Jul 2016 - 4:28 pm | इशा१२३

छान गोड गोड कथा!

नीलमोहर's picture

27 Jul 2016 - 5:03 pm | नीलमोहर

मस्त, आवडली कॉफी,
पुढील भागही लिहाल.

किसन शिंदे's picture

27 Jul 2016 - 5:28 pm | किसन शिंदे

मस्त..हळूवार कथा आवडली.

कथा जमलीये. छानच. ह्या कथेवर चित्रपट काढला तर कोणते नायक-नायिका डोळ्यासमोर येतात??

श्रेयसी's picture

1 Aug 2016 - 3:45 pm | श्रेयसी

कथा आवडली :)