डू आयडी आणि अंदाज

संत घोडेकर's picture
संत घोडेकर in काथ्याकूट
23 Jul 2016 - 4:12 pm
गाभा: 

डू आयडी हा नेहमीच माझ्या उत्सुकतेचा विषय राहिला आहे. हि परंपरा कदाचित अहिरावण-महिरावणाच्या काळापासून सुरु झाली असावी. एक धारातीर्थी पडला कि दुसरा जणू त्याच्या रक्तातून उठून पुन्हा युध्दाला तयार! जणू काही आपला जन्मच यासाठी आहे असे डू आयडी ला वाटत असावे. चक्रव्युहात घेरून एखाद्या योद्ध्याला मारणे एकवेळ खूप सोपे हो, पण हा डू आयडी स्वतःच बाकीच्यांना चक्रव्युहात ओढून आपल्याभोवती घेरा घालून आपल्याशी लढण्यास भाग पडतो. अर्थात त्यानंतर तुंबळ युद्ध होऊन अपेक्षेप्रमाणे त्याची अवतार समाप्ती तेथेच होते, पण सर्वांचे लक्ष वेधण्यात तो यशस्वी झाला असतो. कारण हे युध्द रणांगणावरील योद्ध्यांबरोबर इतर प्रेक्षक हि पाहत असतात. विजयीवीरांना आपल्या यशाचा आनंद फारकाळ मात्र घेऊ न देता पुनर्जन्म घेऊन नव्या जोमाने सर्वांसमोर उभा ठाकतो.

आता तुम्ही म्हणाल याला डू आयडीची एवढी उठाठेव का? हा इतका रस घेतो म्हणजे नक्कीच अवतारी पुरुष दिसतोय. होय, मला ही तेच मांडायचंय. म्हणजे ‘तो मी नव्हेच’ इतकंच सांगायचंय. तसे मिपा मला अजिबात अनोळखी नाही, पण मी मात्र मिपासाठी अजून तरी पूर्णपणे ओळखीचा नाही. तसे येथे प्रथम आलेला प्रत्येकजण अनोळखीच होता. तो आला, तो रमला, आणि शेवटी इथेच टिकला ही क्रांती बरेच आयडींच्या बाबतीत घडल्याचा मी अनेक वर्ष साक्षीदार आहे. मूळ आयडी बरोबरच भूछत्रासारखे उगवलेले अनेक डू आयडी आणि त्यांचे मिपावरील ‘दीर्घ’ आयुष्य ही पाहत आलो आहे. तसे आपले मिपाकर आहेतच मुळी हुशार. नवीन आयडी दिसला की आधी त्याची पारख जुने जाणते मिपाकर एखाद्या जवाहीऱ्याला लाजवतील अशा पद्धतीने करतात, याचेच मला नेहमी अप्रूप आहे.

माझा पहिला लेख काही दिवसांपूर्वी मिपावर प्रकाशित झाला. पदार्पणात सर्वांनी अनपेक्षितरीत्या अर्धशतकवीराचा बहुमान मिळवून दिला. सर्वच प्रतिसाद उत्साह दुणावणारे होते. अचानक कुठे तरी माशी शिंकली आणि प्रतिसादांचा रोख डू आयडी कडे वळला. कदाचित माझ्या आयडीमुळेच हा गोंधळ सुरु झाला. त्याबरोबर हाच गोंधळ माझ्या मनातही सुरु झाला. कुठली कसोटी लावली ज्यामुळे सर्वाना मी डू आयडी वाटू लागलो? मात्र, अक्षर कळले संकट टळले, नाना-माई यांच्या वंशाला दिवा मिळाला किंवा तुम्हाला ओळखले, जसे पोलीस ओळखपरेड मधून बरोबर गुन्हेगाराला ओळखून काढत्तात. अशा पद्धतीच्या प्रतिसादांमुळे मात्र माझे कुतूहल चांगलेच जागृत झाले. जरा आपल्याही ज्ञानातही काही तरी भर पडेल आणि आपल्यालाही “जवाहरी विद्यापीठ” मध्ये प्रवेश घेता येईल या विचाराने हा लेखनप्रपंच करावा वाटला. तर मग अनुभवाने जेष्ठ मिपाकरांनो, आपल्या शिष्यासाठी आपले ज्ञानभांडार खुले करा.

-आपलाच नम्र
गुरुविण ज्ञानप्राप्ती करणारा एकलव्य.
टीप – गुरुदक्षिणा म्हणून अंगठा देण्यात दाखविण्यात येईल.

प्रतिक्रिया

फारच सरळ धोपट लेख झाला डुआइडी या तिर्कट विषयावर.मजा नाय.

सुबोध खरे's picture

27 Jul 2016 - 10:32 am | सुबोध खरे

तुम्ही डू आय डी नाही हे प्रथम सिद्ध करा.

संत घोडेकर's picture

27 Jul 2016 - 11:01 am | संत घोडेकर

ते कसे करायचे? काही अग्निपरीक्षा आहे का?

अत्रुप्त आत्मा's picture

23 Jul 2016 - 4:29 pm | अत्रुप्त आत्मा

पांडु मोड अॉन ~

अॉॉSss! अचं जाल चल!

पांडु मोड अॉफ

टेक्स्टबुक पाहिजे असल्यास मिपा वाचत राहावे. नवनीत अपेक्षित हवे अस्ल्यास आयडींबरोबर ओळखी वाढवाव्यात. डायरेक्ट प्रश्नपत्रिका मात्र मिळत नसते.
टीपः ही गुरुची शिकवणी नाही. एक्स्पर्टाकडून पेड सल्ला आहे. फी खात्यावर मांडून ठेवली जाईल.

संत घोडेकर's picture

23 Jul 2016 - 5:50 pm | संत घोडेकर

ओळखी कश्या वाढवाव्यात?

अभ्या..'s picture

23 Jul 2016 - 5:56 pm | अभ्या..

ह्याचा अर्थ तुम्हाला 21 अपेक्षितच हवे आहे. रोज एकवीस आयडीना खरडवहित राम राम घालून यायचा. रोज एकवीस प्रतिसाद तरी द्यायचेच. एंट्रीनंतर किमान एकवीस आठवडे नवीन धागा टाकायचा नाही. त्यानंतरच्या दोन धाग्यात 21 दिवसाचे अंतर ठेवायचे.
आपोआप ओळखी होतील. जमेल का?

चौकटराजा's picture

25 Jul 2016 - 10:46 am | चौकटराजा

रोह एकवीस जोडे दुसर्यास मारायचे की आपली आय्डी परशीद्द होते .हे र्‍यालंच की !

नितिन थत्ते's picture

24 Jul 2016 - 10:03 pm | नितिन थत्ते

"मज्यशि मय्तरी क्रनार क?" असा व्यनि शक्यतो महिला आयडींना करावा. ;)

आनंदी गोपाळ's picture

26 Jul 2016 - 8:31 pm | आनंदी गोपाळ

मला करू नये. मी गोपाळ आहे, व सदैव आनंदी असतो. असा त्या आनंदी गोपाळचा अर्थ आहे.
मय्त्री वाले लय पीयम येतात बा मला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Jul 2016 - 4:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वरिजनल आयडी काय अन डु आयडी काय, आयडीने उत्तम लेखन करावं, उत्तम प्रतिसाद लिहावेत, कौतुक करून घ्यावेत. वैचारिक वाद करावेत आणि थोडं व्यक्तिगत सोडून भांड्न करावं,आणि नाय पटलं तर चपला स्ट्यांड वरुन चपला काढाव्यात, घालाव्यात आणि चालू लागावं. :)

-दिलीप बिरुटे
(मिपा उत्तम जगणारा)

कंजूस's picture

23 Jul 2016 - 6:06 pm | कंजूस

+१

विवेकपटाईत's picture

23 Jul 2016 - 4:56 pm | विवेकपटाईत

थोडं व्यक्तिगत सोडून भांड्न करावं,

चांगले वैचारिक प्रतिसाद देण्यासाठी कोण डु आयडी घेणार. खरा आनंद दुसर्याला .... देण्यातच आहे.

पैसा's picture

23 Jul 2016 - 5:04 pm | पैसा

सांगा बघू, माझे किती डुप्लिकेट आयडी आहेत.

माम्लेदारचा पन्खा's picture

23 Jul 2016 - 5:50 pm | माम्लेदारचा पन्खा

कट्ट्याला भेटा की राव एकदा.... किंवा याच विषयी कट्टा ठेवा ....हाकानाका !

संत घोडेकर's picture

23 Jul 2016 - 5:52 pm | संत घोडेकर

भेटूयात की, पण कधी?

मुक्त विहारि's picture

23 Jul 2016 - 5:55 pm | मुक्त विहारि

"तो आला, तो रमला, आणि शेवटी इथेच टिकला ही क्रांती बरेच आयडींच्या बाबतीत घडल्याचा मी अनेक वर्ष साक्षीदार आहे."

त्यामुळे आधी बरीच वर्षे वामामिपा आणि मग मिपास, असा प्रवास.

प्रचेतस's picture

24 Jul 2016 - 8:11 pm | प्रचेतस

छान लिहिताय हो घोडेकर.
मिपा कट्ट्यात भेटायला आवडेल.

संत घोडेकर's picture

24 Jul 2016 - 8:30 pm | संत घोडेकर

ठरावा कि राव एखादा कट्टा

पुढच्या शनिवारी संध्याकाळी पाताळेश्वर?

संत घोडेकर's picture

24 Jul 2016 - 8:54 pm | संत घोडेकर

वा! चालेल की.

खटपट्या's picture

24 Jul 2016 - 9:01 pm | खटपट्या

कट्टा करा फोटो पाठवा...

मुक्त विहारि's picture

24 Jul 2016 - 9:39 pm | मुक्त विहारि

तुम्ही असे किती दिवस कट्ट्याच्या फोटोवर समाधान मानणार?

आता, भारतात आलात की तुम्ही पण एक कट्टा आयोजीत करा.

खटपट्या's picture

24 Jul 2016 - 9:55 pm | खटपट्या

अमीत गार्डनला आमचा रोजचा कट्टा असेल. कधीही या...

मुक्त विहारि's picture

26 Jul 2016 - 11:42 pm | मुक्त विहारि

पुण्यात असेल तर शक्य नाही.

आमची मजल जेमतेम आकुर्डी पर्यंत.

खटपट्या's picture

27 Jul 2016 - 12:05 am | खटपट्या

आला होतात की. पारसिक नगर...

मुक्त विहारि's picture

27 Jul 2016 - 8:27 am | मुक्त विहारि

हां, हां, आठवले. (आमच्या मेंदूत एक आठवणींचा खंदक आहे, त्या खंदकात कुठेतरी ही आठवण लपली होती.आत्ता मिळाली.)

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

24 Jul 2016 - 10:29 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

हे नाना माई कोण आहेत ,लैइच फेमस आहेत म्हणुन विचारले.

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

25 Jul 2016 - 7:08 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

=((

पक्षी's picture

25 Jul 2016 - 10:32 am | पक्षी

किती तो साळसूद प्रश्न...!

श्री गावसेना प्रमुख's picture

25 Jul 2016 - 10:49 am | श्री गावसेना प्रमुख

सरावलेल्या हातांनाही स्वत नवीन असल्याचे का सांगावे लागते?

सरावल्या हातांनाही कंप का सुटावा?

वेळेवर मिळाली नाही कि सुटतो

वेळेवर मिळाली नाही कि सुटतो

मितभाषी's picture

26 Jul 2016 - 11:15 pm | मितभाषी

कंप