बाप्पाचा नैवेद्य

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in जनातलं, मनातलं
22 Jul 2016 - 9:14 am

गणपती बाप्पा मोरया!
सालाबादप्रमाणे यंदाही आपण गणेशोत्सवात बाप्पाच्या नैवेद्याच्या पाककृती मिसळपाववर प्रकाशित करणार आहोत.
गणपतीचे विविध प्रकारचे नैवेद्य आपल्या घरी बनत असतात. घरोघरच्या चालीरीतींप्रमाणे खिरापती ,शिदोरी आदि वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. त्यांच्या पाककृती तसेच आपल्या कल्पनेतून सादर केलेल्या विविध प्रकारच्या नैवेद्य पाककृती तुम्हाला फोटोसकट लिहून पाठवायच्या आहेत .
या उपक्रमात भाग घेण्यासाठी सर्व मिपाकरांना हे निमंत्रण.

बाप्पाचा नैवेद्य असणारी कोणतीही गोड किंवा तिखट पाककृती फोटोसह २५ आॅगस्ट पर्यंत sahityasampadak.mipa@gmail.com या पत्त्यावर पाठवायची आहे.
चला तर मग आपल्या विविध पाककृतींचा नैवेद्य दाखवून मिसळपाव.काॅमचा गणेशोत्सव साजरा करु या!

संस्कृती

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

22 Jul 2016 - 9:29 am | मुक्त विहारि

भरपूर पा.कृ. मिळणार, असं दिसतंय.

कंजूस's picture

22 Jul 2016 - 10:04 am | कंजूस

भाविक नसलो तरी प्रसाद मिळणाय्रा देवळात जायला फार आवडतं लहानपणापासून॥यात मारुती एक नंबर.खोबरं असणारच.रामाच्या देवळात रामनवमिला सु्ंठवडा.माटुंग्याच्या वरदादादाच्या गणपतीत मुलांना भरपूर उकडलेले चणे देत असत.सत्यनारायणाच्या पुजेचा प्रसाद फार महत्त्वाचा असं पोथीत सांगितलंय.डाकोरजी ठाकोरजी असले की छपन्न भोग ( सात दिवस अष्टोप्रहर ) प्रसाद असतो.प्रसादाला न्याय दिल्याने देव भेटतो म्हणजे आम्हास एकनाएक दिवस देव भेटायला येणा रच.

जागु's picture

22 Jul 2016 - 11:17 am | जागु

नक्की प्रयत्न करते.

हम्म्म, बघतो कसं जमतंय.

पैसा's picture

29 Jul 2016 - 9:33 am | पैसा

सगळ्या हौशी बल्लव आणि सुगरणींनी कामाला लागा पटापट!

विप्लव's picture

5 Aug 2016 - 2:57 pm | विप्लव

नक्कीच जर का प्रकाशीत करताना परत एरर नाही आला तर

जीमेल वर साहित्य संपादकाना पाठवा.

पाकृ या सदरात प्रकाशित केलेली चालेल का?

पाकृ या सदरात प्रकाशित केलेली पाकृ पाठवली तर चालेल का?

स्वाती दिनेश's picture

5 Aug 2016 - 6:55 pm | स्वाती दिनेश

पूर्वप्रकाशित पाकृ अपेक्षित नाही, नसावी.
स्वाती

पैसा's picture

26 Aug 2016 - 1:04 pm | पैसा

३१ तारखेपर्यंत मुदत वाढवली आहे. कोणी अजून पाकृ देऊ इच्छितात का?

प्रभाकर पेठकर's picture

29 Aug 2016 - 12:50 am | प्रभाकर पेठकर

मी उद्या पाठवतो.

एक पाकृ फसली २६पर्यंत. पण आता मुदत वाढवलीय तर बघू जमतं का.नाहीतर फसलेली म्हणून नंतर खफवर जागा आहेच.