'उडता महाराष्ट्र'

मनिषशिल्पाअनुसे's picture
मनिषशिल्पाअनुसे in काथ्याकूट
21 Jul 2016 - 8:59 am
गाभा: 

'उडता महाराष्ट्र'
काही दिवसांपूर्वी 'उडता पंजाब' हा चित्रपट आला आहे.त्या चित्रपटवरून खूप वाद झाला..म्हणून म्हंटलो कि बघू चित्रपट... आहे तरी काय नक्की त्या चित्रपटा मध्ये कि ज्या वरून एवढा वाद झाला.पण चित्रपट बघितल्यावर खरच वाटलं कि किती 'भीषण' परिस्थिती आहे पंजाब मध्ये...काही वर्षांपूर्वी पंजाब मधील तरुण हे खेळात पुरस्कार मिळवत होते.पण आज तिथले तरुण हे 'व्यसनाच्या' अधीन झाले आहे...परन्तु व्यसन हा प्रश्न फक्त पंजाब पुरता मर्यादित नाही आहे...आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा 'अंमली पदार्थांचे व्यसन' आपले पाय रोवून उभा आहे...आज प्रत्येक ठिकाणी अगदी सहज पणे गुटखा(बंदी असूनही),तंबाखू,सिगरेट,गांजा इ. प्रकारचे 'अंमली पदार्थ' सर्रास पणे विकले,व खरेदी केले जातात...एका सर्वे मधून असे कळे आहे कि महाराष्ट्रा मध्ये विशेषतः मुंबई मध्ये 'ड्रगचे' प्रमाण जात आहे..पंजाब पेक्षा जास्त...त्या मुळे आता पासूनच ह्या सर्व गोष्टींना आळा घातला पाहिजे...अन्यथा काही काळाने जसा उडता पंजाब हा चित्रपट आला तसा 'उडता महाराष्ट्र'हा चित्रपट येयला वेळ लागणार नाही.......
-मनिष शिल्पा अनुसे ७०५७२१८१०६

प्रतिक्रिया

एकुलता एक डॉन's picture

21 Jul 2016 - 9:43 am | एकुलता एक डॉन

हे सगळे सॉफ्ट ड्रुग्स आहेत
उडत पंजाब सारखी स्थिती महाराष्ट्र मध्ये होऊ नाही शकत

कैलासवासी सोन्याबापु's picture

21 Jul 2016 - 9:47 am | कैलासवासी सोन्याबापु

सॉफ्ट ड्रग्स आहेत हे मान्य, तरी कमी पोटेंसी असलेले म्हणून विषाची महती कमी होत नाही,शिवाय सध्या पंजाब सारखी उडता महाराष्ट्र स्थिती नसली तरी, ती होणारच नाही हे छातीठोकपणे सांगणे सुद्धा शक्य नाही माझ्यामते.

मनिषशिल्पाअनुसे's picture

22 Jul 2016 - 10:00 am | मनिषशिल्पाअनुसे

आज महाराष्ट्रामध्ये जरी पंजाब सारखी स्तिथि नसलि तरी.....बाकीच्या व्यसनांचे प्रमाण जास्त आहे हे विसरुन चालणार नाही....आज महाराष्ट्रात तंबाखु,गुटखा,जर्दा,इ. अमली पदार्थ सरार्सपणे खाले(सेवन केले) जातात......

सुंड्या's picture

21 Jul 2016 - 9:50 am | सुंड्या

का बरं महाराष्ट्रात 'पंजाब' सारखी स्थिती होऊ शकत नाही?

एकुलता एक डॉन's picture

21 Jul 2016 - 11:17 am | एकुलता एक डॉन

पंजाब हून इथे मीडिया जास्त सक्रिय आहे ,इथे मुस्कट दाबी नाही होऊ शकत

हरकाम्या's picture

22 Jul 2016 - 12:20 am | हरकाम्या

इथे मीडिया फार सक्रिय आहे. हे खरे आहे ते लगीच ४ टाळकी गोळा करतील पुढचे सांगणे नकोच.

म्हणजे पंजाबात ड्रग्जचं व्यसन मध्यमवर्गीय मुलांमध्ये पसरलं आहे. माझ्या एका पत्रकार मित्राच्या म्हणण्यानुसार - पंजाब का पिछला जनरेशन शराब ने बिगाड दिया और ये जनरेशन ड्रग्ज की वजह से बिगड रहा है! महाराष्ट्रात recreational drugs (कोकेन, हेराॅईन) ही उच्चभ्रू वर्गात आणि गर्द किंवा तत्सम ड्रग्ज ही कष्टकरी वर्गात वापरली जातात. पण महाराष्ट्रातला मध्यमवर्ग या व्यसनांपासून ब-यापैकी अलिप्त आहे. पंजाबचं पाकिस्तान सीमेपासून जवळ असणं हाही एक महत्वाचा मुद्दा आहे. शिवाय मुक्तांगण आणि नार्कोटिक्स अॅनाॅनिमस सारख्या संस्थांचं कामही आहे.

टवाळ कार्टा's picture

21 Jul 2016 - 12:41 pm | टवाळ कार्टा

आपल्याइथे एम्डी पावडर किती सहज मिळते ते माहीत आहे का?

एकुलता एक डॉन's picture

21 Jul 2016 - 2:39 pm | एकुलता एक डॉन

पुण्यात ?

संदीप डांगे's picture

21 Jul 2016 - 10:32 pm | संदीप डांगे

टकाचे 'आपल्याइथे' म्हणजे 'पुणे'च असे कसे काय वाटले बुवा तुम्हाला...?

बोका-ए-आझम's picture

22 Jul 2016 - 1:18 pm | बोका-ए-आझम

आणि लोक त्याच्या आधीन होणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तसं तर थिनर, आयोडेक्स, फेव्हिकाॅल याही गोष्टी सहजपणे उपलब्ध आहेत आणि कायदेशीर रीत्या. कचरा वेचणारे थिनरचा वापर नशेसाठी करतात, हे माहित आहे का? शिवाय कोरेक्स किंवा इतर कफ सिरप्स आहेतच.

कैलासवासी सोन्याबापु's picture

22 Jul 2016 - 1:57 pm | कैलासवासी सोन्याबापु

कोरेक्स आजकाल ओटीसी मिळत नाही बहुदा

आदूबाळ's picture

22 Jul 2016 - 3:30 pm | आदूबाळ

डी कोल्ड मिळतं ना.

बोका-ए-आझम's picture

22 Jul 2016 - 2:16 pm | बोका-ए-आझम

की ती NDPS (Narcotic Drugs and Psychotropic Substances) Act अनुसार प्रतिबंधित पदार्थ म्हणून समाविष्ट नव्हती. त्यामुळे त्याचा वापर खुलेआम व्हायचा. अजून असंच एक म्हणजे Ketamine. त्याचा वापर horse tranquilizer म्हणजे घोड्यांचं झोपेचं औषध म्हणून होतो. त्याच्यावरही NDPS नुसार बंदी नव्हती. त्यामुळे Rave parties मध्ये किंवा on street, ही ड्रग्ज सहजपणे मिळत होती आणि कोकेन किंवा हेराॅईनपेक्षा स्वस्तही होती. मला वाटतं आता या दोन्हीही drugs चा समावेश NDPS मध्ये केलेला आहे आणि race course किंवा stud farm वर ketamine चा वापर हा नियंत्रित असावा असा निर्णय घेतला गेलेला आहे पण अशा निर्णयांचं काय होतं हे माहित आहेच. त्यामुळे अजूनही या दोन्ही पदार्थांचा वापर होत असावा.

वरुण मोहिते's picture

21 Jul 2016 - 2:47 pm | वरुण मोहिते

आमच्या मुलुंड ला पण सहज मिळते . मुंब्रा वरून येते पावडर .. आमचे एक फॅमिली फ्रेंड आहेत त्यांच्या मुलाला १७ व्य वर्षी रिहॅब ला टाकावं लागलं ... ते गृहस्त सहआयुक्त आहेत .. तरी अशी वेळ यावी

एकुलता एक डॉन's picture

21 Jul 2016 - 2:50 pm | एकुलता एक डॉन

सहआयुक्त ? पोलीस ?

वरुण मोहिते's picture

21 Jul 2016 - 4:27 pm | वरुण मोहिते

हो....

एकुलता एक डॉन's picture

21 Jul 2016 - 4:46 pm | एकुलता एक डॉन

पोलीस मध्ये घराकडे वेळ कमी असतो तसेच कामाचे स्वरूप बघता मुलगा सापळ्यात अडकलाय असे स्पष्ट आहे

टवाळ कार्टा's picture

21 Jul 2016 - 8:02 pm | टवाळ कार्टा

१७ व्या वर्षाच्या मुलाला अक्कल नसते असे म्हणायचे आहे का?

एकुलता एक डॉन's picture

22 Jul 2016 - 10:37 am | एकुलता एक डॉन

सध्या एक राजकीय पक्षाचा नेता 40 चा आहे ,त्याही TV वरची मुलाखत .....

चौथा कोनाडा's picture

21 Jul 2016 - 8:13 pm | चौथा कोनाडा

म्हंजे, तरुणांना अशा व्यसना पासून दुर ठेवायचे असेल तर प्रथम पोलीसांच्या ड्युटीचे तास कमी करावे लागतील म्हंजे त्यानां घरी लक्ष देता येइल.

सुरुवात गृह खाते, कायदा व्यवस्था यांच्या पासुन करावी लागेल.

मराठमोळा's picture

22 Jul 2016 - 5:36 am | मराठमोळा

ड्रग्स आणी अतिरेकी ह्या जागतिक समस्या आहेत. हेच खरं तिसरं महायुद्ध असावे. दोन्हीमधे आंतरदेशीय राजकारणाचा मोठा वाटा आहे आणी त्याबद्दल इथे जास्त न बोललेलेच बरे. प्रगत देशातदेखील गल्लीबोळात ड्रग्सचा वापर वाढत आहे. बर्‍याचदा किशोरवयीन मुले यात अडकतात आणी त्यातली बरीचशी प्रौढत्व आल्यावर सुटतात देखील. पण मानसिक रित्या कमकुवत असलेली किंवा उपेक्षित मात्र कायमची बुडतात. कायदे कडक केल्याने याचे समाधान होत नाहीच, उलट भ्रष्टाचार वाढतो. समाजात व्यसनाधीन लोकांना कोणतेही स्थान नाही आणी त्यांना सावरण्यासाठी मूलभूत साधनेही/सिस्टीम नाही. त्यात एकदा गुन्हेगार म्हणून शिक्का बसला की ती व्यक्ती आयुष्यभर आपण गुन्हेगार आहे म्हणूनच वावरते. शिक्षण, संवाद आणी 'Compassion' फार महत्वाचे आहे. 'Compassion' यासाठी की एखादा व्यक्ती शारिरीक रित्या आजारी असला की त्याला सहानूभूती/उपचार मिळतो ते व्यसनाधीन लोकांच्या बाबतीत घडत नाही मग ते आणखी गुरफटत जातात. हीच बाब ईंटरनेटच्या बाबतीतदेखील लागू होते. एकटेपणा, 'peer pressure' किंवा मानसिक ताण हेही कारणीभूत ठरते.

थोडं अवांतर :
Trigger -> Behaviour -> reward ही मानवी मेंदूची स्वाभाविक प्रक्रिया आहे. उदा. गोड खाण्याचा मोह (Trigger) -> मग पोटभर गोड खाणे (Behaviour) -> छान वाटणे (reward).
व्यसनांच्या बाबतीत ट्रिगर बर्‍याचदा भिती/भावना/विचार असतात. मुलांना मानसिक रित्या खंबीर बनवणे फार महत्वाचे ठरेल. आणी व्यसनाधीन लोकांना शिक्षण, संवाद आणी 'Compassion' तसेच Trigger -> Behaviour -> reward हीच थेरपी वापरून परत आणता येईल. (हवी असल्यास यावर आंतरजालावर आणखी माहिती मिळेल)

आज महाराष्ट्रामध्ये जरी पंजाब सारखी स्तिथि नसलि तरी.....बाकीच्या व्यसनांचे प्रमाण जास्त आहे हे विसरुन चालणार नाही....आज महाराष्ट्रात तंबाखु,गुटखा,जर्दा,इ. अमली पदार्थ सरार्सपणे खाले(सेवन केले) जातात......
-मनिष अनुसे(सदस्य,भा.ज.पा.,कोथरुड) ७०५७२१८१०६

अभ्या..'s picture

22 Jul 2016 - 2:06 pm | अभ्या..

-मनिष अनुसे(सदस्य,भा.ज.पा.,कोथरुड) ७०५७२१८१०६

हे काय आहे?
ते मिस्कॉल द्यायच्या मोहिमेतले सदस्य का?

तुषार काळभोर's picture

22 Jul 2016 - 2:56 pm | तुषार काळभोर

२०१७ ची तयारी

कल्याण ला फ़लाट क्रं. २ च्या समोर ट्र्याक वर ५- ६ मुलM (वयोगट ८ ते १५ ) मळकट कपड्याच बोळ तोंडात घालुन ओढत असतात, पुर्वी मला वाटायचं ह्या मुलानां खोकला वैगरे असेल पण मग पुढे कळालं की ती मुलं व्हाईटनर कपड्याच्या बोळ्यावर टाकुन तो हुंगत/ओढत असत. एक दोन वेळा मी स्वता त्याना व्हाईटनर च्या बॉटल्स ना बोळ्यावर रिकाम्या करताना पाहीलय.

२ वर्षापुर्वी एकदा रात्री शेवटची कर्जत पकडुन घरी जाताना होतो, गाडी फलाट क्र. २ वर लागली कसारा लाईन चा सिग्नल असल्याने गाडी बराच वेळ थांबली, गाडी बर्‍यापैकी रिकामी होती, मी दाराकडे उभा होतो, तेवढ्यात एक मुलगा रॉंग साईड ने गाडीत चढला. आणी त्याने त्याचा व्हाईटनर वैगरे साहीत्य घेउन बोळा ओढायला सुरुवात केली, गाडी एव्हाना विठ्ठलवाडी ला आली होती, बोळा ओढता ओढता गडी दारात लोंबकळु लागला होता, काळजी पोटी मी त्याला आत यायला सांगीतलं, तेन्वा बोलता बोलत त्याला वीचारलं कि तु काय ओढतोयस? का ओढतोय?
त्यावर तो मुलगा म्हणाला " इस्से बुक नै लग्ता अवर नींद आता"

पुढे अम्बरनाथ आल्यावर तो मुलगा रॉंग साईड्ने उतरुन काळोखात गायब झाला..

अगोदर बुचभर फुकट देतात नंतर तो बाटलीभर विकत घ्यायला येतो तेव्हा त्याच्याकडून वाटेल ती कामं करून घ्यायची त्या बदल्यात.पकडला गेला तर तो पकडला जातो.

उडता महाराष्ट्र नाही मळता महाराष्ट्र आहे,
अगदी खुप पुर्वी पासुन समाजमान्यता असल्यासारखे.

प्रतिभान's picture

2 Aug 2016 - 2:00 am | प्रतिभान

मी ही व्हाईतनर बद्दल ऐकुन आहे. हा सहज उपलब्ध होतो का?