मी बी बियर बार काढीन म्हणतो : सामान्य मानव

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जे न देखे रवी...
20 Jul 2016 - 11:51 am

हजारांच्या नोटेची चमक पाहीन म्हणतो
मी बी बियर बार काढीन म्हणतो...!!

बियरला रास्त भाव
भेटला काय, न भेटला काय
पिणार्‍यांच्या मनांत
असल्या भूक्कड गोष्टी येतच नाय
मी पण थोडे फार कमवीन म्हणतो
मी बी बियर बार काढीन म्हणतो...!!

पिणार्‍यांना नशा
चढली काय, न चढली काय
पिणार्‍यांना भरपुर रिचवायची सवयच हाय
मी पण थोडे फार कमवीन म्हणतो
मी बी बियर बार काढीन म्हणतो...!!

अन्नाचे भाव आणि दूधाचे भाव
वाढले काय, अन चकण्याचे भाव पण वाढले काय
या पिणार्‍यांना उपजत अक्कलच नाय
बियरच्या साथीने वाईन पण विकीन म्हणतो
मी बी बियर बार काढीन म्हणतो...!!

बियर विकून सत्तेत येता येते
बियर पिणार्‍यांना उधार देणारा
खड्ड्यामधी जाते
बियर पिणार्‍याचे नाव फक्त
कागदोपत्री घ्यावे
बियर शॉपीचे, वाईन शॉप झाले की
भाव अजुन वाढवावे
सतत भाव वाढ करतच रहावे
तरच मिळतो भरपूर मलिदा
"चियर्स" करून बियर वर बियर पिऊ!
आणि म्हणू...
मदिराक्षीचा विजय असो....!!!

अविश्वसनीयकाहीच्या काही कविताजिलबीभूछत्रीरतीबाच्या कविताविडंबनविनोद

प्रतिक्रिया

माझीही शॅम्पेन's picture

20 Jul 2016 - 11:53 am | माझीही शॅम्पेन

मी पहिला , भन्नाट विडंबन :) मुवि रॉक्स

मुक्त विहारि's picture

20 Jul 2016 - 12:11 pm | मुक्त विहारि

कधी बियर बार काढलाच तर...

तुम्हाला आमच्या तर्फे किंगफिशरचे कॅलेंडर फ्री (पण त्याच बरोबर एक क्रेट बियर मात्र विकत घेणे कंप्लसरी)

माझीही शॅम्पेन's picture

20 Jul 2016 - 11:55 am | माझीही शॅम्पेन

तुम्ही बियर बार काढाच आम्ही आमची शॅम्पेन बाजूला ठेवून नक्की येऊ :)

बियर में जो मज्जा है जो शँपेन में कहां है.

टवाळ कार्टा's picture

20 Jul 2016 - 11:58 am | टवाळ कार्टा

आयला =))

मोदक's picture

20 Jul 2016 - 12:04 pm | मोदक

लोकं ""फ्रेश"" झाली बगा

भारी जमलंय

मुक्त विहारि's picture

20 Jul 2016 - 12:18 pm | मुक्त विहारि

तुमचा पत्ता द्या.

घरी येवून बियर देतो.

बेकार तरुण's picture

20 Jul 2016 - 12:24 pm | बेकार तरुण

तुमच्याच बार मधे बीयर पीत पत्ते खेळु :)

बेस्ट जमलं आहे हे काव्य (प्रतिसादात काव्याविषयी एक ओळ तरि लिहिली आहे, सो मला झब्बु देउ नका पत्ते खेळताना)

मुक्त विहारि's picture

20 Jul 2016 - 12:33 pm | मुक्त विहारि

मदिरेच्या संगे "रमी"च खुलते.

बेकार तरुण's picture

20 Jul 2016 - 12:36 pm | बेकार तरुण

कवितेसंबंधीत प्रतिसाद नसल्याने (मी धागाकर्ता नसलो तरी) माझा पास :)

सामान्य वाचक's picture

20 Jul 2016 - 12:07 pm | सामान्य वाचक

मारता का काय
बाकी कविता भारी

अवांतर : विडंबन असे म्हणून परत कुणाचा रोष पत्कारायला नको म्हणून कविता

मुक्त विहारि's picture

20 Jul 2016 - 12:23 pm | मुक्त विहारि

आमची "कविता" नहमीच भारी असते.

कृपया आमच्या "कविते" बद्दल काही बोलू नये.

शेतकर्‍यांना तुमच्या बार मधे डीस्काऊंट मिळणार की नाही ते सांगा आधी...

अट फक्त एकच, त्यांनी इन्कम टॅक्स भरल्याची पावती दाखवायची.

अत्रुप्त आत्मा's picture

20 Jul 2016 - 12:37 pm | अत्रुप्त आत्मा

आरारारारा! =))

मुटे परेंत मारणार अता लोक!

सुबोध खरे's picture

20 Jul 2016 - 12:45 pm | सुबोध खरे

कविता --आय माय स्वारी -- मला त्यातील "क"सुद्धा कळत नाही म्हणून विडंबन म्हणतो विडंबन छान आहे.

आदिजोशी's picture

20 Jul 2016 - 12:47 pm | आदिजोशी

तुमच्या बारचा पत्ता द्या. ५००-६०० पानी आमंत्रण पत्रिका चापून देईन म्हणतो.

प्रवासखर्च पाठवून द्या. आणि हो, आम्ही तिकडे आल्यावर कटोर्‍यात बिअर पाजलीत तरी चालेल.

स्वच्छंदी_मनोज's picture

20 Jul 2016 - 1:09 pm | स्वच्छंदी_मनोज

ठ्ठो !!!

नाखु's picture

20 Jul 2016 - 2:56 pm | नाखु

कटोरा आधी तपासून घेणे, नंतर त्याला खालून छिद्र होते ही तक्रार चालणार नाही..

सहाय्यक व्य्वस्थापक मुवी आर्य बीअर मदीरा मंडळ

माम्लेदारचा पन्खा's picture

20 Jul 2016 - 1:38 pm | माम्लेदारचा पन्खा

मात्र बियर विका तरच नोट दिसेल !

संदीप डांगे's picture

20 Jul 2016 - 2:23 pm | संदीप डांगे

Aso. Shetipeksha beer madhe paisaa jaast aahe. =))

मुक्त विहारि's picture

20 Jul 2016 - 4:32 pm | मुक्त विहारि

+ १

पण नुसत्या बियर शॉपीत जास्त पैसा नाही, त्याच्या बरोबर वाईन शॉप पण हवेच.

मोदक's picture

20 Jul 2016 - 5:54 pm | मोदक

शेजारी हॉटेल पण टाका..

स्वच्छंदी_मनोज's picture

20 Jul 2016 - 6:56 pm | स्वच्छंदी_मनोज

आणी टाकलेत की आम्हाला पत्ता द्या :) :)

मुक्त विहारि's picture

20 Jul 2016 - 7:07 pm | मुक्त विहारि

आयला,

कुठे कुठे धागाकर्ते पत्ते मागतात, तर आमच्या बारचे आणि त्या अनुशंगाने असणार्‍या बर्‍याच गोष्टींचे पत्ते, वाचकांना हवे आहेत.

बार, हॉटेल आणि पानाची टपरी उघडले की लगेच पत्ता देतो.

बादवे,

पानाची टपरी हा एकदम मस्त धंदा आहे.

ओन्ली इन्कम, नो इन्कम टॅक्स.

शेतीचा व्यवसाय नसता केला तर, पानाची टपरी टाकायचाच विचार होता.

पानाची टपरी टाकायचाच विचार होता.

कुठे? पत्ता द्या.

मुक्त विहारि's picture

20 Jul 2016 - 7:26 pm | मुक्त विहारि

टिळकनगर शाळे जवळ.

सध्या त्या भागांत एक पण पान-टपरी नाही.

तुमचा पत्ता न मागता, आम्ही पत्ता दिलेला आहे. ह्याची जरा नोंद घ्यावी.

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Jul 2016 - 10:34 pm | डॉ सुहास म्हात्रे

शेतीत पानमळा करा आणि पानाची टपरी पण टाका... अपवर्ड आणि डाऊनवर्ड इंटिग्रेशन होईल, हाकानाका !

बिअरची चव चाखून पाहीन म्हणतो..
म्यापण दारु प्यायला शिकावं म्हणतो..!
बाई,बाटली..अन् मटणाची ताटली..यांच्या नादी लागावं म्हणतो!
म्यापण दारु प्यायला शिकावं म्हणतो...!

मुक्त विहारि's picture

20 Jul 2016 - 6:06 pm | मुक्त विहारि

मादक गोष्टींपासून जितके दूर राहता येईल तितके रहा.

(ह्या विडंबनांत मुद्दामच "मादक" पदार्थ वापरला आहे. सत्तेचे आणि पैशाचे व्यसन ह्या अशा मादक गोष्टीं पेक्षा जास्त हानीकारक असते. जमल्यास "वूल्फ ऑफ वॉल स्ट्रीट" हा सिनेमा किंवा गेला बाजार आपला "सामना" हा सिनेमा बघीतलात तर मी "बियर"चा उल्लेख का केला ते समजेल.)

टवाळ कार्टा's picture

20 Jul 2016 - 6:11 pm | टवाळ कार्टा

आणि त्यांचे सासरेबुआ रागवले तर??

मुक्त विहारि's picture

20 Jul 2016 - 6:52 pm | मुक्त विहारि

मिया बिबी राज़ी, तो क्या करेंगे पापाज़ी....

टवाळ कार्टा's picture

20 Jul 2016 - 7:08 pm | टवाळ कार्टा

"मादक गोष्टींपासून जितके दूर राहता येईल तितके रहा." यासाठी लिहिलेले ते =))

मुक्त विहारि's picture

20 Jul 2016 - 7:14 pm | मुक्त विहारि

ह्यासाठी हे अजून एक उदाहरण मिळाले.

स्वामी संकेतानंद's picture

20 Jul 2016 - 7:41 pm | स्वामी संकेतानंद

'मोदक' पोस्टींपासून जितके दूर राहता येईल तितके दूर राहा, असेही म्हणता येईल का?

...अजिबात नाही.

आम्हाला गूळ-खोबरे घातलेले, उकडीचे मोदक आवडत नाहीत.

पण हे मिपाचे "मोदक" आणि "खिमा-मोदक" आवडतात.

उकडीचे मोदक आवडत नाहीत.

आता कधी कट्टा ठरला तर मेनु ठरवायला बरं!! अजून कोणाकोणाला आवडत नाहीत पटापट सांगा. =))

तुम एक बार, खिमा-मोदक खाऊन देखना, ये गूळ-खोबरेवाला मोदक भूल जायेंगा.

स्वामी संकेतानंद's picture

20 Jul 2016 - 8:08 pm | स्वामी संकेतानंद

मायला! हा माणूस बाटवणार आम्हाला!
( प्रामाणिक प्रश्न- खीमा कोणत्या प्राण्यापासून करतात? )

ते सोड्याचं कालवण कोणत्या सोड्याचं असतं? खाणाच्या, पिण्याच्या की धुण्याच्या!!

=))

अरेरे अरेरे अरेरे...

हे देवा, काही लोकं वांग्याच्या भाजीत पण सोडे घालत नाहीत, त्यांना माफ कर.

बादवे,

सोडे हे बोलण्याचे प्रकरण नाही.ती एक मैफिल आहे.

मुक्त विहारि's picture

20 Jul 2016 - 8:14 pm | मुक्त विहारि

आम्ही "जो जे वांछिल, तो ते लाहो." ह्या पंथातील.

त्यामुळे तुम्ही मांसाहार करत नसाल तर एखादा बटाटे-वडा कट्टा पण करू. वाटल्यास चिंचेची चटणी पण खाऊ.

खीमा कोणत्या प्राण्यापासून करतात?

आमच्याकडे बोकडापासून किंवा कोंबडी पासून.

मला व्यक्तीशः कोंबडी-खिमा आवडत नाही.बोकडाचा खिमा उत्तम लागतो.

मला व्यक्तीशः कोंबडी-खिमा आवडत नाही.बोकडाचा खिमा उत्तम लागतो.

मुवि.. तुम्ही माझाच डुआयडी असल्यासारखे वाटत आहे. बोकडाचा खिम झक्कास लागतो.

तुम्ही ससा खाल्ला आहे का हो?

टवाळ कार्टा's picture

21 Jul 2016 - 12:13 am | टवाळ कार्टा

ससा? उद्या हरिण खाशील

इरसाल's picture

21 Jul 2016 - 10:47 am | इरसाल

मी ससा, हरिण(आल्प्स मधलं), टर्की(कोरियन), कोंबडी, बोकड, मेंढा आणी जंगली डुक्कर खाल्लय.

मुक्त विहारि's picture

21 Jul 2016 - 12:15 pm | मुक्त विहारि

उंट मात्र एकदम बेचव.

खरी मजा डुकराचे मटण खाण्यात.

बाकी, ससा एकदा ट्राय करायला हरकत नाही.

जावई's picture

20 Jul 2016 - 7:04 pm | जावई

अजून माझं वरील गोष्टींनी हाड बाटलं नाही.या गोष्टींपासून चार हात दूर आहे,अन् दूरच राहीन.

मस्त...

आमचे कंजूस काका पण तुमच्या सारखेच आहेत.

ते मिपाचे आंतरजालीय, मोष्ट इलिगिबल जावई तेच का तुमी?

जेपी's picture

20 Jul 2016 - 8:45 pm | जेपी

बार चा पत्ता द्या.
बार बाहेर अंडा आम्लेट भुर्जीची गाडी टाकावी म्हणतो

मुक्त विहारि's picture

20 Jul 2016 - 8:49 pm | मुक्त विहारि

आणि फक्त गाडी नको टाकूस, त्या जोडीला पानाची टपरी पण टाक.

तुला पानाची टपरी नको असेल तर, दुसर्‍या कुणा मिपाकराला देईन म्हणतो.

स्वामी संकेतानंद's picture

20 Jul 2016 - 8:50 pm | स्वामी संकेतानंद

गरीब शेतकऱ्याला द्या, चार पैसे मिळतील.

ओके.

आता तुम्ही म्हणताच आहात देवू या की.

पण मग त्याच्या शेतीचे काय?

स्वामी संकेतानंद's picture

20 Jul 2016 - 9:04 pm | स्वामी संकेतानंद

ती तो कार्यक्षम आणि आवश्यक ती साधने असलेल्या शेतकऱ्याला भाड्याने देईल.

मुक्त विहारि's picture

20 Jul 2016 - 9:41 pm | मुक्त विहारि

आयजीच्या जीवावर बायजी उदार....

खटपट्या's picture

20 Jul 2016 - 11:06 pm | खटपट्या

तुमच्या बारमध्ये कांप्लीमेंटरी काय मिळणार चकना म्ह्णून. चकली, काकडी...
आजकाल काम्प्लिमेंटरी चाकना बंद केलाय बार वाल्यांनी, आणि मी फक्त त्यासाठीच मित्रांबरोबर जात असल्यामुळे आजकाल बीयर बारमधे फेर्‍या कमी हैत.

संदीप डांगे's picture

20 Jul 2016 - 11:08 pm | संदीप डांगे

आता टकाने पुढील प्रमाणे धागा काढावा राव!

"मी बी यंदा बार काढीन म्हणतो"

००टकेश, हल्केच घेणे का भौ, तुला सुवर्णपेयाची शपथ००

टक्या नुसताच चखणा खात बसला तर बसून बसून बारच काढणार.
त्याला असल्या शपथा काय घालताय? उपेगाच्या नाहीत.

टवाळ कार्टा's picture

21 Jul 2016 - 12:12 am | टवाळ कार्टा

=))

नाखु's picture

21 Jul 2016 - 9:11 am | नाखु

हजार बार देखो.....की ना देखने की चीज है......

अश्या मैफीलीत अनुपस्थीत असलेला नाखु

हवाबाण हरडे, बार काढी हर डे!! =))

प्रकाश घाटपांडे's picture

21 Jul 2016 - 10:41 am | प्रकाश घाटपांडे

सोता पिनार्‍याने हा धंदा करु नये. जो सोता न पिता दुसर्‍यांना प्यायला लावतो तो लई भारी धंदा करतोय!

गंगाधर मुटे's picture

22 Jul 2016 - 7:18 am | गंगाधर मुटे

मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका
या कवितेचे विडंबन केल्याबद्दल धन्यवाद!
एखाद्या कवितेचे विडंबन होणे किंवा विडंबन करावेसे वाटणे हे त्या कवीचे आणि कवितेचे फार मोठे यश असते. कवितेचा आशय किंवा आकृतीबंध म्हणजे दोन किंवा एक किंवा दोन्हीही जेव्हा रसिकाच्या थेट हृदयाच्या आरपार जाते, रसिकाला खुणावते किंवा वेड लावते तेव्हाच ती कविता सफल होते, असे मला वाटते. आणि अशीच सफल कविता विडंबनाला पात्र ठरत असते. कवितेचे विडंबन म्हणजे रसिकाने कवीच्या कौशल्याला दिलखुलास दाद असते.

आता या कवितेच्या विडंबनकाराला असेही वाटेल की मी जे वर लिहिले ते खोटे आहे. मी तर मूळ कवीची चेष्टा करण्यासाठी, टर उडवण्यासाठी हे विडंबन केले आहे, हे निखालस असत्य असून त्या विडंनकाराने करून घेतलेली स्वतःची फसगत आहे.

विडंबनकाराने आता हे लक्षात घ्यावे;

मूळ कवितेच्या कविचे आणि विडंबनकाराचे कवितेच्या आकृतीबंधाशी मतभेद नसून कवितेतल्या आशयाशी मतभेद आहे किंवा कवितेबाहेरच्या व्यक्तीगत आकसाशी निगडीत आहे.

पण या विडंबनाने मूळ कवितेच्या आशयाला कुठेही धक्का लागलेला नाही किंवा कवीच्या व्यक्तीगत विचारधारेलाही धक्का लागलेला नाही.

कवितेच्या आकृतीबंधाने विडंबनकारावर मोहिनी घातली, असा त्याचा अर्थ असल्याने मूळ कविता ही कवीची अत्यंत सफल कलाकृती असल्याचे सिद्ध होत आहे.

मात्र विडंबनाच्या खाली किंवा वर मूळ कवितेची लिंक आणि कवीचा उल्लेख यायला हवा होता. पण मानवी मनाचा कोतेपणा लक्षात घेतला तर त्यातही काही वावगे वाटून घेण्याची आवश्यकता उरत नाही.

(ही पोस्ट लिहिताना मी प्रताधिकाराच्या बाबीकडे दुर्ल्क्ष केले आहे)

- गंगाधर मुटे

गंगाधर मुटे's picture

22 Jul 2016 - 7:41 am | गंगाधर मुटे

विडंबनाबद्दल खास नजराना म्हणून एक शेर पेश करतो. विडंबनकाराने सहर्ष स्विकार करावा, अशी अपेक्षा आहे.

घमासान आधी महायुद्ध होते
पुढे माणसांचे यशू-बुद्ध होते

(मिसळपाववर पूर्वप्रकाशित)