अर्नळगुंडू

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
17 Jul 2016 - 9:29 pm

"इधर ना रातको शैतान लोग आते है" रेलींगजवळ उभारलेली बाई म्हणाली.
"अच्छा, तो?"
फुटपाथवर खुर्च्यांची माळ पसरली होती. नावालाच छप्पर असलेल्या बसस्टॉपवर मी बसलो होतो. सोबतीला होता अंधार. अन अचानक पुढे आलेली ती बाई.
"नै, तुम अच्छा आदमी लगता है, इधर क्या कर रा है?"
डोक्यावर पडलीय काय ही? मग मीच तिला उलटं विचारलं,
"तू क्या कर रही है इधर?"
"अरे मेरा तो रोजका है, इधरीच होती है ना मै"
"तो मै क्या करू? पागल तो नै हो?"
"नै" हसली का ती?
"तो फिर भाड मे जाव"

मी सिगारेट काढली. ती बाई जरा वेळ उभारली आणि बाजूलाच बसली कोपऱ्यात खाली. नसती कटकट तिच्यायला.
शहराच्या बदनाम गल्लीत हा बसस्टॉप पडतो, त्याला इलाज नाही. अर्धा अर्धा तास बसेस येत नाहीत, त्यालाही इलाज नाही. माझं ऑफिस याच एरीयात पडतं, त्याला तर मुळीच इलाज नाही. आणि आज तर ऑफिसची बस चुकली. तर पुढे हे भलतंच.

"मुझे भी एक मिलेगी क्या?" त्या बाईने हात पसरवत विचारले.
कितीही कंट्रोल केले तरी शेवटी ठसका लागलाच. पाकीटच दिले तिच्याकडे. कर काशी.
पाकीट देताना तिला जरा जवळून बघितले. मी बाईच समजत होतो. ही तर निघाली पोरगी. सलवार कमीज मधली. अंधारानं एवढा वेळ घोळ केला होता. जवानीतली करीष्मा कपूरपण हिच्यापुढं फिक्की. जरा वाईटच वाटलं. पण काय इलाज?

दोन तिनं काढून घेतल्या. माचीस तिच्याकडं असावं बहुदा. पाकीट परत देत म्हणाली,
"जिंदगी झंड हो गयी है साली, आज पक्का मरनेवाली मै" आमच्या ऑफिसमधला गुप्ता असाच बोलायचा. बॉस त्याची काय नेहमीच ठासत नसायचा. पण बोअर झाले की माझ्या डेस्कजवळ येऊन बरळत बसायचा.
"अच्छा है!" बहुतेक मी गुप्ता मोडमध्येच असल्याने असला येडाबिद्रा रिप्लाय दिला.
"सच मे, मजाक नै कर रही मै, रफीक भाय छोडेगा नै मुझे"
"रफीक भाई कौन?"
"है एक च्युत्या, डॉन है डॉन, भडवा दलाल साला"

"......." एवढ्या वेळ तर ठिकठाक होती की राव ही.
मग जरा तिनं सावध इकडंतिकडं बघितलं, अन थोडी जवळ येत दबक्या आवाजात म्हणाली,
" पता है एक रात मे पचास लाख कमाने के लिये क्या करना पडता है?" एखादं गुपित फोडावं तसं तिनं मला विचारलं. तिच्या दबक्या आवाजाने मी जरा घाबरलोच. उत्तर बहुदा तिच देणार होती. म्हणून गप्पच बसलो.
"चोरी करनी पडती है, जो मैने की है"

आज मी कुठल्या मुहूर्तावर जागा झालो होतो कुणास ठाऊक. पण असल्या अद्भुत प्रसंगात पहिल्यांदाच सापडलो होतो. ही नक्कीच सायको असणार.
"सचमे?"
"माल तैयार है, बस भागने की देर है" नक्कीच हिनं ढोसली असावी.
"किधर है माल?"
"मेरे खटीयाके निचे"
"और किधर से ऊठाया?" आता माझ्याकडे भरपूर प्रश्न होते.
"क्यों, पुलिस को बतायेगा?
"नै, बस ऐसेही"
"फिर?"
"फिर क्या?" मी गोंधळून विचारलं.
"अगर ठंडे दिमानसे सोचो, तो हम 50-50 कर सकते है" हा मात्र सिक्सरच होता.

बऱ्याच दिवसांपूर्वी एक सुविचार वाचला होता.
"Opportunity knocks our door only once"
नेमका त्यावेळीच का आठवला माहीत नाही.

"नाम क्या है तुम्हारा?"
"शर्मीली"
"अच्छा?, कितनी शर्मीलीया है यहापे?"
"तो?"
"असली नाम बता" माझंही डेअरींग आता वाढलं होतं.
"अर्नळगुंडू"
"क्या बोली?"
"नाम है मेरा, अर्नळगुंडू"
साला शर्मीलीच चांगलंय.

तिला विश्वासात घेऊन मला तिने पैसे कुठून चोरले, कसे चोरले, का चोरले वगैरे माहिती काढायची होती. खरतर टाईमपास करायचा होता. बस येईपर्यंत नाहीतरी बोअरच होणार होतो.
पण तिची स्टोरी मात्र इंटरेस्टींग होती. इंटरेस्टींग कसली साक्षात घडतच होती माझ्यापुढे.
खरंच घडत होती?
का तीही बसल्या बसल्या टाईमपास म्हणून एखादा बकरा गटवत होती?

बाकी पोरगी होती मात्र गोड.

"तो रफीक का पैसा चुराया तुने.."
"हा ना..." तिनं एकदम माझ्या नजरेस नजर मिळवली. माझा अंदाज बहुदा सटीक बसला असावा.
"हमेशा रखके जाता है थैली, कोठेपे, रातरात उधरीच पडी रहती है. आज मैने चुपचाप उठायी, और खटीया निचे डाल दी"
"आज कब?"
"अभ्भी, अभ्भी डालकेच इधर आयी हू"
तरी मी विचार करतोय, आल्यापासून ही एवढी सटकल्यासारखी का करतेय.
"तो फिर, थैली लै के भाग जा ना"
"वही तो, अकेली हू, जाऊ तो कहा?, दुनियाका आता पता मालूम नै मेरेको"
"समझ गया"
"तू निकालेगा मुझे यहासे बाहर? दूर कही जायेंगे, छोटासा घर बसायेंगे" च्यायला, बॉलिवूडचे पिच्चर लै बघत असावी.

अडचणीत सापडलेला प्रत्येकजण समोरच्यावर नको तेवढा विश्वास टाकतो. त्याशिवाय इलाजच नसतो म्हणा. आणि काय काय स्वप्नं होती सालीची, दूर कही काय, छोटासा घर काय.

"लेके आ थैली, आपुन आयेगा तेरे साथ, अभ्भी" तिच्या स्टोरीतला खरेपणा जाणण्यासाठी मी उतावळा झालो होतो.

"सचमे?" ती उठूनच उभा राहिली.
"सचमे, मै मजाक नै कर रहा" मी बसूनच बोललो.
मग ती अजून जवळ आली, खांद्यावर हात ठेवून हलक्या आवाजात म्हणाली,
"क्या बात है पंटर, लेकीन एक वादा कर, तू जो कोईभी है, मेरा भरोसा नै तोडेगा, हमेशा, हमेशा सोचसमझके कदम उठायेगा, गद्दारी नै"
ओढणीच्या मोहक अत्तराचा सुगंध दरवळत आता माझ्या मनाच्या कोपऱ्यात.
"मंजूर है, चलेगा"

तशी ती निघाली. मध्येच थांबत "पाच मिनट मे आती हू" म्हणून निघूनही गेली.

खुर्चीवरुन उठून मी फुटपाथवर आलो. ऑफिसची बॅग गळ्यातच होती. आजूबाजूच्या जूनाट बिल्डींगमध्ये पिवळट प्रकाश पसरला होता. घड्याळात बघितले साडेनऊ झाले होते. गेला अर्धा तास किती सुपरफास्ट गेला कळलंच नाही. रुममेटला उशीर होण्याबद्दल एसेमेस टाकून कळवलं. त्याचा रिप्लाय येईल वाटलं होतं पण नाही आला.
बसस्टॉपच्या कॉर्नरजवळ येऊन जरा वेळ थांबलो. दूरवर आमच्या ऑफिसचं गेट दिसत होतं. कानटोपी घालून वॉचमन गेटसमोरच खुर्चीवर डुलक्या काढत बसला होता. रोज पिऊन तर्रर असतो साला. ओव्हरटाईमच्या नावाखाली तीन तीन दिवस हलत नाही कंपनीतून.
ऑफिसकडे बघवेना. नेहमीसारखंच रुक्ष वाटत होतं. सालं त्या वॉचमनसारखं जगणं झालंय आमचं. बस त्याच्यासारखं ऑनड्युटी पिता मात्र येत नाही. एवढाच काय तो फरक. शर्मीलीच्या भाषेत 'जिंदगी झंड हो गयी है साली, सटीया गयी है'. पण काय इलाज?

मगाचा थरार आता कुठल्या कुठे गायब झाला होता. आणि रोजच्या भणंग जगण्यानं माझ्यावर पुन्हा एकदा झडप घातली होती. पण ते म्हणतात ना, 'हर एक आदमी के अंदर एक शैतान छुपा हुआ होता है'.
बस उसे जगाने की देर है. साल्या शर्मीलीनं जागा केला होता एवढ्या वेळ. पण झोपला पुन्हा ढाराढूर.

विचार करत पुन्हा बसस्टॉपवर आलो. बराच वेळ थांबलो. शर्मीलीचा पत्ता नव्हता. नाहीच येणार बहुदा.
हेडलाईटस चमकवत बस मात्र येताना दिसली. मी बॅग सावरुन तयार झालो. गल्लीच्या कोपऱ्यावर शेवटची नजर मारली अन पाठीमागून शर्मीली येताना दिसली. हातात थैली घेऊन ती अगदी सहज चालत होती.

बस स्टॉपवर येऊन थांबली. शर्मीली माझ्याजवळ थैली देत म्हणाली,
"ये ले, जिंदगी एक जुआ है पंटर, एकबार खेलके तो देख"
मी हातानच थैली चापचली. थोड्या उजेडात जाऊन त्यातल्या नोटांचे बंडलही बघितले. तिची स्टोरी अस्सल होती. अगदीच खरी.

बस कधीच निघून गेली होती. आणि मला त्याची आता अजिबात फिकीर नव्हती.

रिक्षा करणं आता सोयीचं नाही पडणार. सरळ रेल्वे स्टेशन गाठणंच ठिक राहिल. चालतच शॉटकट मारावा लागणार.
"ये देख मैने सेफटी के लिये क्या लाया है" शर्मीली पर्स उघडून दाखवत म्हणाली.
आतमधले काळे चकचकीत दोन रिवॉल्व्हर भर अंधारातही उठून दिसत होते.
मी चालत चालत मागे वळून बघितलं. रिकामा बसस्टॉप, बदनाम गल्ली, ओसाड इमारती आता घाबरुन गेल्यासारख्या वाटत होत्या. मी मनातच म्हटलं,
"रफिकभाय, तैयार रैना, नया पंटर आयेला है"

कथाप्रतिभा

प्रतिक्रिया

बोका-ए-आझम's picture

17 Jul 2016 - 9:35 pm | बोका-ए-आझम

हे मस्त आहे जव्हेरभौ! क्रमशः लिहायला विसरला आहात की काय?

जव्हेरगंज's picture

17 Jul 2016 - 9:53 pm | जव्हेरगंज

याचा पुढचा भागपण टाकणार आहे!
पण हा भाग एक स्वतंत्र कथा वाटली म्हणून क्रमश: लिहीलं नाही.

संजय पाटिल's picture

19 Jul 2016 - 12:25 pm | संजय पाटिल

इऊध्या लवकर..
बाकि कथा जबरटच नेहमिप्रमाणे..

एस's picture

17 Jul 2016 - 9:50 pm | एस

भारी.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Jul 2016 - 10:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेखन शैली सुरेख आणि कथनही. पुभाप्र.

-दिलीप बिरुटे

तुषार काळभोर's picture

17 Jul 2016 - 10:21 pm | तुषार काळभोर

स्वतंत्र कथा म्हणून पण आवडली.

आणि पुढच्या भागाचीसुद्धा उत्सुकता लागून राहिलीय.

जियो हत्तीदादा!

लालगरूड's picture

17 Jul 2016 - 10:24 pm | लालगरूड

रविवार सत्कारणी लागला

टवाळ कार्टा's picture

17 Jul 2016 - 10:26 pm | टवाळ कार्टा

जब्रा

पद्मावति's picture

17 Jul 2016 - 10:33 pm | पद्मावति

सही!!!

नीलमोहर's picture

17 Jul 2016 - 10:52 pm | नीलमोहर

लैच भारी.

रातराणी's picture

17 Jul 2016 - 11:09 pm | रातराणी

पुभाप्र!

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Jul 2016 - 11:13 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं सुरुवात ! पुभाप्र.

लोथार मथायस's picture

17 Jul 2016 - 11:53 pm | लोथार मथायस

अगदी मस्त.
पुढचा भाग लवकर येवूदे

प्रचेतस's picture

18 Jul 2016 - 12:14 am | प्रचेतस

झकास लिहिलंत.
एकाच भागातली कथा म्हणून पण छान आहे..दुसरा भागही काढू शकताय.

खेडूत's picture

18 Jul 2016 - 10:40 am | खेडूत

+१
आवडली कथा...

एकच नंबर!
पुढचा भाग टाकाच.

प्रमोद देर्देकर's picture

18 Jul 2016 - 9:31 am | प्रमोद देर्देकर

लय भारी.

संत घोडेकर's picture

18 Jul 2016 - 10:41 am | संत घोडेकर

पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

सस्नेह's picture

18 Jul 2016 - 10:49 am | सस्नेह

पुढचा भाग असेल तर...इंट्रेस्टिंग !

वेदांत's picture

18 Jul 2016 - 11:05 am | वेदांत

छान आहे लेख.
जिवंत व्यक्तीचित्रण .

चांदणे संदीप's picture

18 Jul 2016 - 12:20 pm | चांदणे संदीप

फिल्मीही वाटतीये मध्येच एखादी चांगली लघुकथा वाचल्यासारखंपण होतंय.... ऑल इन ऑल शिंपली फ्यांटाश्टीक! :)

Sandy

मितभाषी's picture

18 Jul 2016 - 12:54 pm | मितभाषी

झक्कास.

किसन शिंदे's picture

18 Jul 2016 - 2:10 pm | किसन शिंदे

भारी !!

Vidyadhar1974's picture

18 Jul 2016 - 2:27 pm | Vidyadhar1974

छानच

अनुप ढेरे's picture

18 Jul 2016 - 2:38 pm | अनुप ढेरे

छानच लिहिता तुम्ही!

राजाभाउ's picture

18 Jul 2016 - 2:46 pm | राजाभाउ

आयला कुठुन , कुठुन आणता येवड काय कळत नाय राव!! तुम्हाला भेटलच पायजे एकदा !!

भारी, जबरा. (आयला प्रतेकवेळी नविन नविन विशेषणं कुठुन आणु ते पण कळेना झालय )

चिनार's picture

18 Jul 2016 - 2:56 pm | चिनार

कथा शैली खास जव्हेरगंज पेटंटेड !
पण शेवट काही झेपला नाही..नेमकं काय झालं?

नाखु's picture

19 Jul 2016 - 11:16 am | नाखु

नाही तर वर्गाबाहेर काढू का?

बाकडा तीन "जव्हेरगंज मास्तरांचा तास"

विषय "काशी केलेली व न केलेली"

सांगातात ते लिहून काढ..

मॉनीटरचा मित्र नाखु

हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून बसलेलो आहे नाखुकाका...

इथंच काय..मिपावरच्या बऱ्याच धाग्यांवर आमची हीच भूमिका असते..आजकाल तर लघुशंकेची शंका विचारायला सुद्धा तोंड उघडत नाही मी गरीब बापडा..

नाखु's picture

19 Jul 2016 - 11:57 am | नाखु

माईंचा दरारा असा असतो.

गपचिप नाखु

सुबक ठेंगणी's picture

18 Jul 2016 - 2:56 pm | सुबक ठेंगणी

मस्त खिळवून ठेवणारी कथा आणि कथन.
पु. भा. प्र.

बरखा's picture

18 Jul 2016 - 3:09 pm | बरखा

पुढची कथा येउद्या लवकर.

आदिजोशी's picture

18 Jul 2016 - 5:35 pm | आदिजोशी

मोठं लिहा हो थोडं. पटकन संपली गोष्ट. आणि पुढचा भाग टाका पटापट :)

पीशिम्पी's picture

18 Jul 2016 - 7:03 pm | पीशिम्पी

पुढे काय, शर्मीलीला गोळी घातली आणि पैसा घेउन फरार..... वाचकांच्या विचारशक्तीला आव्हान .. कथा पुर्ण करा :)

खुप छान

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Jul 2016 - 12:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शर्मिलेला गोळी घालावी लागेल, तिचा अपघात होईल, किंवा तो दलाल तिला परत घेऊन जाईल, तो तिला संपवून टाकेल, असं काही तरी घडविण्याशिवाय पर्याय दिसत नाही.

-दिलीप बिरुटे

अभ्या..'s picture

18 Jul 2016 - 7:35 pm | अभ्या..

हे भारीच.
आवडली.

चैतू's picture

18 Jul 2016 - 8:03 pm | चैतू

खास जव्हेरगंज शैली!

विअर्ड विक्स's picture

18 Jul 2016 - 10:59 pm | विअर्ड विक्स

कथा जबरी वळणावर आहे. एक प्रेमळ विनंती , यात कुठे क्लिक ची किक नको...

तुमची स्वाक्षरी हवी आपल्याला...!

वरुण मोहिते's picture

22 Jul 2016 - 2:18 pm | वरुण मोहिते

लिहिता हो तुम्ही

इशा१२३'s picture

22 Jul 2016 - 3:59 pm | इशा१२३

सहि!पुभाप्र!

इशा१२३'s picture

22 Jul 2016 - 4:00 pm | इशा१२३

सहि!पुभाप्र!

इशा१२३'s picture

22 Jul 2016 - 4:01 pm | इशा१२३

सहि!पुभाप्र!

इशाबाई तुम्ही ते आयडीतलं १२३ काढा बरं. त्याशिवाय हे तीन तीन प्रतिसाद थांबणार नाहीत. ;)

कायले तु पोरीला छेडू राहलाय !!!!

भाग्यश्री कुलकर्णी's picture

23 Jul 2016 - 3:36 pm | भाग्यश्री कुलकर्णी

सही कथा.

पी महेश००७'s picture

24 Jul 2016 - 5:34 pm | पी महेश००७

कथा एकदम मस्त... आवडली बुवा...

‘एक चालीस की लास्ट लोकल’सारखा फील जाणवला... पण पोरगी एकदम पोचलेली आहे. दुसऱ्या भागाची खरंच उत्सुकता लागली आहे... जास्त अंत पाहू नका हे आर्जव...

निओ's picture

26 Jul 2016 - 1:17 am | निओ

भारी लिहिली आहे

श्रीरंगपंत's picture

26 Jul 2016 - 1:05 pm | श्रीरंगपंत

खूपच भारी लिहिलीये कथा. मी तर तुमच्या लेखनशैलीचा मोठा पंख आहे जव्हेरभौ. पुभाप्र

निखिल निरगुडे's picture

28 Jul 2016 - 12:47 am | निखिल निरगुडे

मिपावर वामा असल्यापासून तुमच काही लोकांचं नाव दिसलं कि धागा ना चुकता वाचतो, त्यातले साहेब एक... जबरदस्तच लिहिता तुम्ही... तुमच्या शैलीतून शिकण्यासारखे आहे... फॅन कम फॉलोवर :)

आदूबाळ's picture

28 Jul 2016 - 11:24 pm | आदूबाळ

जव्हेरभाव, भारी, नेहेमीप्रमाणेच.