माझा मिपाविश्व प्रवेश

संत घोडेकर's picture
संत घोडेकर in जनातलं, मनातलं
17 Jul 2016 - 4:31 pm

साधारण ७-८ वर्ष झाली असतील, ऑफिसमध्ये काम करीत होतो. कंटाळा आला म्हणून शेजारी बसलेल्या सहकाऱ्याशी गप्पा माराव्या म्हणून त्याच्या डेस्क जवळ गेलो. तो हि बहुतेक कंटाळला असावा कारण त्याच्या संगणक पडद्यावर तो एक pdf उघडून कुठली तरी कथा वाचत बसला होता. “ काय रे, हे काय?”, मी विचारले. “अरे छान कथा आहे, अगदी उत्कंठावर्धक. तुला पाठवतो वाचून सांग कशी आहे ते”. त्याने उत्तर दिले. ठीक आहे म्हणून त्याने पाठविलेल्या कथा वाचनात मी गुंग झालो. खरोखरच उत्तम अशी ती कथा होती. “कुठून मिळाली रे कथा, खरेच छान आहे की”. दुसऱ्या दिवशी ऑफिस मध्ये मी त्याला विचारले. “अरे एक मराठी संस्थळ आहे xyz नावाचे तिथे प्रकाशित झाली आहे”. तो पर्यंत असे काही संस्थळ असते आणि त्यावर कथा प्रकाशित होतात याबद्दल मी घोर अज्ञानी होतो. त्यावेळी आमच्याकडे कार्यालयीन वेळेत इंटरनेट वापरावर संपूर्ण बंदी होती. “कसे काय उघडले रे संस्थळ?” मी सहकाऱ्याला विचारले. “अरे माझा भाऊ त्याच्या ऑफिस मध्ये उघडून, pdf तयार करून मला पाठवितो”. त्याने माहिती पुरविली. “वा छान! यापुढे तुला आलेल्या कथा मला पाठवीत जा”. मी त्याला विनंती करून कार्यालयीन वेळ सत्कारणी लावण्याची सोय करून घेतली. बरेच दिवस सहकाऱ्याचा भाऊ जमेल तश्या कथा पाठवीत होता आणि आम्ही दोघे जमेल तसे त्याचा फडशा पाडत होतो. नंतर बऱ्याचदा कामात व्यस्त असल्यावर ऑफिस मध्ये वाचनास वेळ पुरेनासा झाला. घरी इंटरनेट असल्यामुळे तो ही प्रश्न निकालात निघाला. घरी आता मी बऱ्यापैकी निवांतपणे कथा वाचत होतो.

“तू तो अमुक तमुक लेखकाचा प्रवास वर्णनाचा लेख वाचलास का?” एके दिवशी सहकाऱ्याने मला विचारले. “नाही, कधी झाला प्रकाशित?” मी आश्चर्याने विचारले. “कालच मिसळपाव वर झाला आहे प्रकाशित”. “मिसळपाव?” एखादे खाद्यपदार्थाचे नाव असलेले संस्थळ पाककृती साठी नसून कथा, कविता लिहिण्यासाठी असू शकेल यावर माझा विश्वास बसत नव्हता. “ठीक आहे आज घरी गेल्यावर वाचतो”. असे बोलून आम्ही आमच्या कामाला लागलो. संध्याकाळी घरी इंटरनेट उघडल्यावर सहकाऱ्याने सांगितलेल्या लेखाची मला आठवण झाली. पण छे माझ्या स्मरणशक्तीने मला दगा दिला होता. सकाळी सांगितलेले नाव मी साफ विसरून गेलो होतो. काय बरे नाव होते? बहुतेक काहीतरी खाण्याच्या पदार्थाचे नाव होते एवढे आठवले. त्यावरून मी गुगलबाबांच्या मदतीने शोध घेऊ लागलो. ‘वडापाव’ असे टंकून मी शोध सुरु केला. त्यावर नेहमीप्रमाणे गुगलबाबांनी असंख्य पाककृती आणि फोटो दाखविले. त्याचवेळी सौ. संगणकाच्या पडद्यावर काय आले आहे हे पाहण्यासाठी डोकावल्या. त्यावरील वडापावचे फोटो पाहून आज इंटरनेट पाककृतीच्या सहाय्याने मी सर्वांसाठी वडापाव तयार करणार असा तिचा गैरसमज झाला. “आज आमचे भाग्यच उजळले म्हणायचे”. नेहमीप्रमाणे संधी साधून सौ. ने टोमणा मारला. झालं, गैरसमज दूर करण्यासाठी मला हॉटेलचा भुर्दंड पडला. अशा प्रकारे मिसळपाव च्या मायाजालात माझा पहिला प्रवेश सशुल्क झाला.

यानंतर मी नियमित वाचनमात्र मिपाकर झालो. तसे इतरही संस्थाळांवरील वाचनही चालू होतेच. त्यामुळे विविध प्रकारचे माहितीपूर्ण लेख, कविता, प्रवास वर्णने इ. चा रतीब चालू होऊन माझी वाचन प्रकृती दिवसेंदिवस सुधारू लागली. असेच एक दिवस मिपावर एका कट्ट्याचा सचित्र वृतांत वाचनात आला. कट्ट्याचे फोटो पहात असताना एक ओळखीचा चेहरा फोटोत दिसला. प्रथम आश्चर्य वाटले कारण तो माझा अत्यंत जवळचा स्नेही होता आणि सार्वजनिक जीवनात तो एवढा पुढे गेला असेल असे वाटले नव्हते. “अग जरा इकडे ये, हा फोटो बघ”. मी सौ. ना हाक मारली. “हा आपला xxx आहे असे वाटते ना?” तिने फोटो बघून “अय्या ! खरच की”. म्हणून म्हणण्याला दुजोरा दिला. मी तत्काळ त्याच्या मोबाईलवर फोन लावला आणि खात्री करून घेतली. सदर गृहस्थ एक अत्यंत लोकप्रिय (?) आणि प्रचंड वाचनीय लेख लिहिणारा मिपाकर असेल असे मला कधी वाटलेही नव्हते. त्याची लिहिण्याची शैली एवढी सुंदर असेल हे एवढे वर्ष त्याच्या सोबत राहून कधी जाणवलेही नाही. तो ज्या क्षेत्रातील लेख लिहित असे त्यातील त्याचे ज्ञान पाहून मी खरोखरच थक्क झालो होतो.

आता माझे मिपावरील वाचन वाढू लागले होते. सर्व लेख मी बऱ्यापैकी बारकाईने वाचत असे. विशेषतः त्यावरील प्रतिसाद वाचून चांगलीच करमणूक हि होत असे. माझा स्नेही कधी लेख लिहितोय आणि मी तो वाचून संपवतोय असे व्हायचे. लेख वाचल्यानंतर त्याला फोन करून मी माझा प्रतिसाद कळवीत असे. प्रत्येक लेखकाची वेगळी लेखनशैली आणि त्यातून मिळणारी नानाविविध माहिती यामुळे मन प्रसन्न होत असे. सर्व लिखाण वाचनीय असे, पण काही लेखकांचा आवर्जून उल्लेख करावा वाटतो. प्रचेतस यांचे लेख अगदी दगडधोंड्यांमध्ये हि सौंदर्य असते हे दाखवून देत. डॉ. खरे यांचे वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवांवरील सोप्या भाषेतील लेख अनेक उपयुक्त माहिती देत असतात. मुक्त विहारी यांचे विविध विषयावरील माहितीपूर्ण लेख, डॉ. म्हात्रे यांचे जगातील विविध देशातील प्रवास वर्णनांवरील सचित्र लेख., बोका-ए-आझम यांच्या गुप्तहेर कथा, इ. अनेक लेखक, सर्वांचा उल्लेख येथे करत नाही, अशी रत्ने मिपा चे ‍‌वांङमयीन सौंदर्य वाढवीत आहेत असे माझे मत होऊ लागले.

हळूहळू आपणही मिपा परिवाराचा एक घटक होऊ शकतो का असा विचार मनात येत असे. पण दुसऱ्या क्षणी वाटे अरे आपली प्रतिभा एवढी कुठली, आपण म्हणजे शामभटाची तट्टाणी, आपला काय टिकाव लागतोय. याला आणखी एक कारण म्हणचे मिपाकरांचे भयानक आयडी. इतर संस्थाळांवरील आयडी कसे सोज्वळ वाटत. पण टवाळ कार्टा, अतृप्त आत्मा, चौकटराजा, इस्पिकचा एक्का, विक्षिप्त आदिती, पैसा अशी नावे वाचून उरात धडकी भरत असे. आपण लेख लिहिला तर अशा नावाचे आयडी आपल्याला कोपऱ्यात घेऊन आपल्या लेखाचे वस्त्रहरण करतील अशी हि एक भीती मनात होती. त्यामुळे मिपा एक टवाळखोरांचा अड्डा असावा असा (गैर)समज बरेच दिवस मनात होता. बोका-ए-आझम सारखे आयडी आपल्याला ताटाखालचे मांजर बनवतील आणि आपल्याला जॅक डॅनियल ला शरण जावे लागेल कि काय असे वाटता राही.

पण हे गैरसमज दूर होण्यास मोठा हातभार लागला तो मिपा कट्ट्यांचे वृतांत वाचून. बरेच आयडी हे एकमेकांना कधी भेटले हि नसत तरी जुने मित्र असल्यासारखे लिखाणाला प्रतिसाद देणे, कितीही वादविवाद झाले तरी कट्ट्यावर एकमेकांच्या गळ्यात गळे घालणे ह्या सारख्या गोष्टी हीच मिपा ची मोठी शक्तीस्थळे आहेत याची खात्री पटू लागली. इतर संस्थळांच्या कट्ट्यामध्ये कंपूबाजी असते असे कानावर येत असे. पण येथे असे नक्की नसेन(?) असे फोटो आणि वृतांत वाचून वाटू लागले. वाशी येथे झालेला कट्टावृतांत वाचून आपणही सामील व्हावे असे आता तीव्रतेने वाटू लागले. चला, काठावरून गम्मत बघण्यापेक्षा आपणही पाण्यात उडी मारू, नाही आले पोहोता तर तुम्ही सर्वजण आहातच हा विचार करून मी मिपासागरात प्रवेश केला आहे. पाहूया आणि तो पर्यंत पोहुया.

-एक नवमिपाकर

मुक्तकलेख

प्रतिक्रिया

वगिश's picture

17 Jul 2016 - 4:47 pm | वगिश

वा वा

टवाळ कार्टा's picture

17 Jul 2016 - 4:49 pm | टवाळ कार्टा

घ्या रे यांना...कंपूत =))

संत घोडेकर's picture

17 Jul 2016 - 5:02 pm | संत घोडेकर

टका साहेब मी संत माणूस आहे. कंपूत घेऊन नक्की काय करणार?

टवाळ कार्टा's picture

17 Jul 2016 - 10:27 pm | टवाळ कार्टा

कंपूबाहेरच्यांना घोडे लावा =))

माझीही शॅम्पेन's picture

17 Jul 2016 - 10:47 pm | माझीही शॅम्पेन

हा हा हा शुद्ध हलकटपणा आहे माने :)

झेन's picture

17 Jul 2016 - 4:56 pm | झेन

कंपूत का कोपऱ्यात ? :-)

झेन's picture

17 Jul 2016 - 4:57 pm | झेन

माझा श्यामभाटाबद्दल चा आदर वाढला

जव्हेरगंज's picture

17 Jul 2016 - 4:59 pm | जव्हेरगंज

संत घोडेकर?

आयडीचा अर्थ काय?

बाकी फर्मास लिवलय!

वेलकम टू मिप्पा!!

संत घोडेकर's picture

17 Jul 2016 - 5:18 pm | संत घोडेकर

धन्यवाद!

चौकटराजा's picture

18 Jul 2016 - 8:34 am | चौकटराजा

परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृतां

एस's picture

17 Jul 2016 - 5:40 pm | एस

वेलकम.

चौथा कोनाडा's picture

17 Jul 2016 - 5:53 pm | चौथा कोनाडा

संघो साहेब, मिपावर हार्दिक स्वागत !

आम्हीही असेच कितीतरी वर्षे वाचनमात्र होतो,
अन आता मिपाकर होवून मिपाखेळाचा आनंद लुटतोय !
खेचाखेची करणारे टवाळ मिपाकर म्हंजे लव्हेबल रास्कल्स आहेत! लव्ह देम!

हा लेख छानच लिहिलाय!
बाहेरील दिवाळी अंकात जरूर छापण्या साठी द्या. !

आणि अर्थातच, पुढिल लेखांची वाट पाहात आहे.

पुलेशु ||

संत महंतांनी पण आता मिपा पावन केले ;)
मिपावर स्वागत!

अत्रुप्त आत्मा's picture

17 Jul 2016 - 6:50 pm | अत्रुप्त आत्मा

@पण टवाळ कार्टा, अतृप्त आत्मा, चौकटराजा, इस्पिकचा एक्का, विक्षिप्त आदिती, पैसा अशी नावे वाचून उरात धडकी भरत असे ››› पुन्हा जुनच नाव घ्यायला पाहिजे मला! http://www.sherv.net/cm/emoticons/horror/best-devil-smiley-emoticon.gif

मुक्त विहारि's picture

17 Jul 2016 - 7:01 pm | मुक्त विहारि

मिपावर स्वागत

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Jul 2016 - 7:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिपावर स्वागत. लिहीत राहा, वाचत राहा, मिपा समजून घ्या आणि मिपा इंजॉय करा. आपण असं वाजत गाजत आल्याने डोळे भरून आले. (हल्ली नवा आयडी आला की वाटतं, कै झोल तर नसेल ना प्रा.डॉ.)

पुलेशु.

-दिलीप बिरुटे

पैसा's picture

17 Jul 2016 - 10:37 pm | पैसा

माई आणि नानांसोबतच्या कट्ट्याचे अपेक्षित मेंबर वाढत चाललेत! =))

स्पा's picture

17 Jul 2016 - 7:25 pm | स्पा

आधी वाचले आहे हे,

चौकटराजा's picture

17 Jul 2016 - 7:34 pm | चौकटराजा

आम्च्या नावात असे उरात धडकी भरण्यासारखे काय आहे. मित्रा, हे नाव आम्ही का घेतले मायताय का? इथे लई थोर
म्हाडा ( कोण ते ओळखा) खडा( कोण ते ओळखा ) बिडा ( कोण ते ओळखा) अशी मंडळी आहेत यांच्या समोर आम्ही मंद
अतः चौकटराजा. उरात धडकी खरेच भरवून घ्यायची असेल तर यादी देतो, व्यनि करा.

संत घोडेकर's picture

17 Jul 2016 - 7:58 pm | संत घोडेकर

नाय वो,
तुमास्नी नाय, फकस्त उदारण दिल. आता मानुस बगीतल्या बिगार कशापाई घाबरायचं म्हनतो मी.

संत घोडेकर's picture

17 Jul 2016 - 7:48 pm | संत घोडेकर

धन्यवाद, वगिश, टका,झेन, एस,चौथा कोनाडा,अजयाताई, मुवि, प्रा.डॉ.बिरुटे.
@आत्मबंध, असे घाबरवू नका हो!
@स्पा साहेब, हे लिखाण आधी कुठे वाचले आहे? मी प्रथमच लिहिले आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

18 Jul 2016 - 11:04 am | अत्रुप्त आत्मा

@@आत्मबंध, असे घाबरवू नका हो!>>> अक्षर ओळखिचं वाटतय...

संत घोडेकर's picture

18 Jul 2016 - 11:58 am | संत घोडेकर

एवढे गचाळ अक्षर कसे काय ओळखलंत?

अत्रुप्त आत्मा's picture

18 Jul 2016 - 12:46 pm | अत्रुप्त आत्मा

वाच लागली बगा वळख!

चंपाबाई's picture

17 Jul 2016 - 8:00 pm | चंपाबाई

छान

बोका-ए-आझम's picture

17 Jul 2016 - 9:21 pm | बोका-ए-आझम

बोका-ए-आझम सारखे आयडी आपल्याला ताटाखालचे मांजर बनवतील आणि आपल्याला जॅक डॅनियल ला शरण जावे लागेल कि काय असे वाटता राही.

बापरे! मी आणि जेडी मिपावरच्या सर्वात सज्जन आयडींपैकी आहोत!

टवाळ कार्टा's picture

17 Jul 2016 - 10:30 pm | टवाळ कार्टा

बोका आणि सज्जन? असेल असेल =))

प्रमोद देर्देकर's picture

18 Jul 2016 - 8:31 am | प्रमोद देर्देकर

बोका आणि सज्जन? नाय ब्वा आम्ही तरी विश्वास ठेवणार नाय. लहानपणी मांजरी / बोक्याच्या लबाडपणाच्या कथा ऐकल्यात.

पम्या कळ(ला)वेकर
(हलके घेवुच नका)

नाखु's picture

19 Jul 2016 - 9:55 am | नाखु

"मिपावरची "सज्जन" या शब्दाच्या व्याखेचे पुनर्लिखाण करावे असे मी सोलापुर कला महर्षी अभ्या यांना विनंती करतो आणि नवी वाख्या त्यांनी गुरुचरणी अर्पण करावी ही विनंती..

धन्य्वाद आप्लाच नेहमीच नम्र नाखु

शि बि आय's picture

17 Jul 2016 - 10:15 pm | शि बि आय

मिपावर स्वागत ...

पैसा's picture

17 Jul 2016 - 10:22 pm | पैसा

मिपावर स्वागत

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Jul 2016 - 11:46 pm | डॉ सुहास म्हात्रे

मिपावर स्वागत !

छान लिहिले आहे. एकदम मोकळ्या मनाने मिपावर वावरा (लिहिणे, कट्टा, इ). नक्की मजा येईल. आम्हीपण असेच मिपावर आलो आणि चिकटलो ;) :)

प्रचेतस's picture

17 Jul 2016 - 11:57 pm | प्रचेतस

मिपावर स्वागत घोडेकरजी.

तुम्ही बराचकाळ वाचनमात्र असल्याने मिपाशी परिचित आहाच.
लिहित रहा.
येत्या वीकेंडला एखाद्या कट्ट्याच्या निमित्ताने भेटूच.

संत मानुस आहात मंग काइ परबोधन वाइच करा.-डुआयडिनच्या वाकड्या वुड्या असंकायतरी

संत घोडेकर's picture

18 Jul 2016 - 9:06 am | संत घोडेकर

धन्यवाद, चंपाबाई,बोका-ए-आझम,शि बि आय,पैसाताई,डॉ.म्हात्रे,प्रचेतसजी
@प्रचेतस,नक्की कट्ट्याला भेटू मला सर्वांना भेटण्याची उत्सुकता आहे

टवाळ कार्टा's picture

18 Jul 2016 - 10:36 am | टवाळ कार्टा

चंपाबाई कट्ट्याला येणार अस्तील तर न भूतो न भविष्याती संख्येने मिपाकर कट्ट्याला येतील =))

चंपाबाई कट्टा करायला काय हरकत आहे? माई पण येतील.

संत घोडेकर's picture

18 Jul 2016 - 11:28 am | संत घोडेकर

तर होऊन जाऊदे कट्टा.

सस्नेह's picture

18 Jul 2016 - 10:44 am | सस्नेह

मिपावर स्वागत !
इथे वाचन करत आहातच, आता लेखन, प्रतिसाद हेही आवर्जून येउदे.
शुभेच्छा !

राजाभाउ's picture

18 Jul 2016 - 10:57 am | राजाभाउ

मिपावर स्वागत !
माझ्या सारख्या अनेक वर्षे मिपाचा सदस्य आसुनही जवळपास वाचनमात्र असणार्यांना हुरुप देणारा लेख.

संत घोडेकर's picture

18 Jul 2016 - 11:27 am | संत घोडेकर

@स्नेहांकिताताई, आंतरजालीय लेखनाचा हा पहिलाच प्रयत्न आहे.आलेले सर्व प्रतिसाद नक्कीच हुरूप वाढविणारे आहेत.
@राजाभाऊ,प्रतिक्रिया वाचून आनंद झाला,आपलेही लिखाण वाचण्यास उत्सुक आहोत.

पहिल्यांदाच लिहून पण इतकं आकार-उकार, टिंबं-टांबं-टेंबे पर्फेक्ट देऊन लिहीलंय राव.
बाकी तुम्ही घोडेकर आहात म्हणून आपला एक प्रश्न, बोटीने प्रवास करणार्‍यांना बोट लाग्ते, बशीने जाणार्‍यांना बस लागते, काहींना विमान पण लागतं, तुम्ही घोड्याने प्रवास करता मग तुम्हाला असा काही त्रास होत नाही का?

इरसाल's picture

18 Jul 2016 - 12:12 pm | इरसाल

कश्याला घोडे लाव्तोस. गप ना जरा !
टिंब-टांब-टुंब कर सुडेश सुडकर

चांदणे संदीप's picture

18 Jul 2016 - 12:33 pm | चांदणे संदीप

झाले समाधान?

नवमिपाकरा डोन्ट घाबर असल्या क्वेश्चनांना.... मे माई बी विथ यू ऑलवेज! ;)

बाकी, वेल्कम ब्याक!
Sandy

किसन शिंदे's picture

18 Jul 2016 - 1:14 pm | किसन शिंदे

बाकी, वेल्कम ब्याक!

??

म्हणजे जुनाच आयडी नव्या स्वरूपात का?

बाकी घोडेकर तुम्ही घोडेगावचे का हो??

संत घोडेकर's picture

18 Jul 2016 - 1:21 pm | संत घोडेकर

तुम्हीच तेव्हडे हुशार दिसता, बाकीच्यांचा नुसता हवेत गोळीबार

सूड काय घ्यायचा राव? मी किती निरागस आहे हे सबंध मिपाला ठाऊक आहे. झालंच तर संत शंकर महादेवन म्हणून गेलेत, "सूड निरागस हो" आता आणि वेगळी पावती ती काय हवी.

त्यांनी विनंती केलीये अरे....सूड निरागस हो !!
सर्टिफिकेट नाही दिलंय तुला..

भिंगरी's picture

18 Jul 2016 - 11:11 pm | भिंगरी

+१

आदूबाळ's picture

18 Jul 2016 - 12:46 pm | आदूबाळ

लोल!

रातराणी's picture

18 Jul 2016 - 11:51 am | रातराणी

छान.

सनईचौघडा's picture

18 Jul 2016 - 3:07 pm | सनईचौघडा

मेरा प्यारा घोडा वापस आया रे.

संजय पाटिल's picture

19 Jul 2016 - 1:02 pm | संजय पाटिल

मेरा प्यारा घोडा वापस आया रे.>>>>
असं आहे होय? बर बर..

मराठी कथालेखक's picture

18 Jul 2016 - 3:34 pm | मराठी कथालेखक

मिपावर स्वागत !!

चिनार's picture

18 Jul 2016 - 3:38 pm | चिनार

छान लिहिलंय ..
मिपावर स्वागत...!

मितभाषी's picture

18 Jul 2016 - 4:22 pm | मितभाषी

मिपावर स्वागत ;)
बाकी ते पिडिएफ वाले आणि कट्टेकर कोण तेही जाहीर करा.

प्रसाद गोडबोले's picture

18 Jul 2016 - 4:32 pm | प्रसाद गोडबोले

खर्‍या अर्थाने ....

मिपा जन्मदिवसाच्या शुभेच्छा , मोठ्ठे व्हा =))))

हाफशेंच्युरी निमीत्त श्री.संत घोडेकर यांचा सत्कार एक 'जुना संत'ची बाटली,एक जिबीचा नेटपॅक आणी एक अरबी तट्टु देऊन सत्कार करण्यात येत आहे.

शुभेच्छुक-जेपी आणी तमाम मिपा कार्यकर्ते

सूड's picture

18 Jul 2016 - 7:25 pm | सूड

supari

अत्रुप्त आत्मा's picture

18 Jul 2016 - 7:35 pm | अत्रुप्त आत्मा

आवळा सुपारी.

अभ्या..'s picture

18 Jul 2016 - 7:38 pm | अभ्या..

असं नाइ अस नाई
विथ यमक पायजे.
.
आवळा सुपारी, भर दुपारी
किंवा
आवळा सुपारी, सकाळच्या पारी
वगैरे वगैरे

तं जल्लं आमच्या बागंतलं आवलं काडलं नाय मांगच्या येलंला? त्याजी बनवली.

संत घोडेकर's picture

18 Jul 2016 - 7:18 pm | संत घोडेकर

आभारी आहे

च्यायला नवीन आयडी. तेबी इतका वाजत गाजत?
कुणाच्या वशिल्याने आलाय?

कंजूस's picture

18 Jul 2016 - 7:50 pm | कंजूस

इतकी वेचून वेचून जुन्या लोकांची नावं घेतलीत की शिआइडी लगोलग कामाला लागलेत.आंबेगावपासून कासारवाडी फाटकापर्यंत बंदोबस्त लावलाय.

नीलमोहर's picture

18 Jul 2016 - 8:04 pm | नीलमोहर

सब घोडे बारा टके,

असं सर्वच ठिकाणी नसतं.

टक्याचा काय संबंध नै हो इथे. बाराचा नक्कीच असू शकेल. ;)

खटपट्या's picture

18 Jul 2016 - 9:23 pm | खटपट्या

घोडेकर, दोनचार लेख पाडा म्हंजे लगेच वळख पटल...तसंबी वळखलं हायच म्हना...उधळा काय घोडे उधळायचे ते...

संत घोडेकर's picture

18 Jul 2016 - 10:21 pm | संत घोडेकर

लेखात लिहिल्याप्रमाणेच विचित्र आयडी घेतल्यामुळे काय होऊ शकते हे आलेल्या प्रतिक्रियांवरून अनुभवता आले

डुआयडीची पण शंका घेत आहेत लोक.. :)

उडन खटोला's picture

19 Jul 2016 - 2:55 pm | उडन खटोला

वेगळंच नाव घेतलं आहे.
पब्लिसिटी साठी काय?
आम आदमी पार्टी शी संबंधित असावेत काय?

इतकं लिहून सुध्दा माझ्या पदरी शेवटी उपेक्षाच आली... हाय रे दैवा... या संताजीला हा घोडा दिसूच नये?

ज्योति अळवणी's picture

23 Jul 2016 - 8:07 pm | ज्योति अळवणी

संत महाराज सुरवातीला इथेले id बघून मी देखील गोंधळले होते. जे काही थोड फार लिहिते ते इथे टाकले आणि त्याला संमिश्र प्रतिसाद मिळाले. इथली कौतुकाची भाषा समजून घ्यायला वेळ लागतो हो. पण हळू हळू जमायला लागले आहे. छान लिहिला आहात लेख.

संदीप डांगे's picture

24 Jul 2016 - 11:02 am | संदीप डांगे

वसंत घोडेकर...?

अभिजीत अवलिया's picture

24 Jul 2016 - 4:21 pm | अभिजीत अवलिया

स्वागत आहे. थोडा जोर लावा घोडेकर. पहिल्याच धाग्यात शतक मारल्यास मिपा परिवारातर्फे विशेष सत्कार करण्यात येतो शनिवारवाड्यावर.