श्रीगणेश लेखमाला २०१६ -आवाहन

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in जनातलं, मनातलं
12 Jul 2016 - 3:15 pm

                                                        shri

      श्रीगणेश लेखमाला २०१६ -आवाहन

नमस्कार मिपाकर हो !

आषाढ-श्रावणात पावसाने सूर जमवला की मराठी मनाला वेध लागतात श्रीगणेशोत्सवाचे. दहा अकरा दिवस गणेशाची विविध मनोहारी रूपे बघून डोळे निववुन घेण्याचे. आणि मिपाला वेध लागतो तो नित्य नूतन रंग लेवून मिपाकर रसिकांच्या रंजनाकरिता येऊ घातलेल्या श्रीगणेशलेखमालेचा.

शशक स्पर्धा, मराठी बोली सप्ताह, विडंबन स्पर्धा, पुस्तक दिन लेखमाला  अशा लोकप्रिय उपक्रमांनंतर काही दिवसांचा ब्रेक घेऊन मिसळपाव प्रशासन पुन्हा आपल्यासाठी नवीन उपक्रम घेऊन येत आहे. सालाबादप्रमाणे यंदाही  श्रीगणेश चतुर्थीला आपण श्रीगणेश लेखमाला, चित्रमाला आणि मिपाचा नववा वर्धापनदिन साजरा करत आहोत. गेल्या वर्षी श्रीगणेश लेखमालेत व्यवसाय/करिअर या विषयावरील लेखमालिकेला  उदंड प्रतिसाद मिळाला.

यावर्षी आम्ही, व्यवसाय सांभाळून जोपासलेला छंद या हलक्या फुलक्या विषयावर लेखमालिका गुंफीत आहोत. यशस्वी  व्यवसाय करून, ट्रेकिंग, इतिहास संशोधन, कला-कारागिरी असे आगळे वेगळे छंद जोपासणारे आणि त्यात कर्तृत्वशाली भरारी घेणारे अनेक  गुणी लोक मिपावर आहेत.  अशा मिपाकरांनी आपल्या छंदाविषयी आणि तो कसा विकसित झाला याविषयी माहिती देणारे लेख लिहून या लेखमालेसाठी द्यावेत अशी विनंती आहेत. यात साधारण खालील माहिती अपेक्षित आहे.

  • आपला व्यवसाय कोणता आणि आपण कोणता छंद जोपासला आहे ? छंदाचे स्वरूप काय ?
  • छंदाविषयी थोडक्यात माहिती
  • हा छंद कधीपासून लागला आणि कसा ?
  • व्यवसाय सांभाळून छंद कसा विकसित केला ?
  • छंदाचा व्यवसायात कोणत्या ना कोणत्या प्रकारे उपयोग होतो का ?
  • व्यवसायाचा / व्यावसायिक शिक्षणाचा छंदात उपयोग होतो का ?
  • छंदातून इतरांना कोणत्या प्रकारची मदत झाली आहे का अथवा प्रेरणा मिळाली आहे का ? 
  • छंदातून केलेली कामगिरी किंवा अचिव्हमेंट.
  • छंदातून विकसित झालेला जनसंपर्क.
  • तुमचा छंद छंदच राहिल्याची खंत वाटते का ? कुठे कमी पडल्यासारखं वाटतं का?
  • छंद आणि व्यक्तिगत जीवन यात समन्वय कसा साधता ?
  • छंदाची प्रेरणा मिळालेली असल्यास ती कुणाकडून मिळाली?
  • आदर्श म्हणून कुणाकडे बघता?
  • या तुमच्या छंदाबाबत काही निश्चित ध्येय डोळ्यासमोर आहे का?
  • अनेकदा एखाद्या गोष्टीची सुरुवात खुप अंडर स्टेटेड असते. आपण  आपल्याच इन्स्टिन्क्ट्स कडे दुर्लक्ष करतो.  तुमचे असे कोणते इन्स्टिन्क्टस कदाचित तुमच्याही नकळत अग्रेसिव्ह झाले आणि आज त्याला हे स्वरुप आलं? आज मागे वळुन पाहताना एखादी अशी छोटी सुरुवात आठवते का ज्याने तुमच्या या छंदाला  मूर्तस्वरुप आलं?
  • आपल्या छंदात पालक / शिक्षक  / सहकारी / आजुबाजुची परिस्थिती  यांची काही मदत झाली का ?
  • छंद हा निव्वळ आवड म्हणून जोपासता की  त्यावरून काही मिळकत होणे हा त्यातल्या यशाचा एक मापदंड मानता ? किंवा त्याला दर्दी लोकांची दाद मिळणं हा " स्वान्तसुखाय" आणि महत्वाचा  भाग आहे असं वाटतं का?
  •  छंदाविषयीचे फोटो इ.

             तसेच, असा एखादा जबरदस्त छंद असणारी, पण मिपाकर नसणारी व्यक्ती आपल्या माहितीत असेल, तर त्यांची या विषयावर वरील मुद्द्यावर घेतलेली तपशीलवार मुलाखत लेखमालेसाठी दिली तरी चालेल.

             कृपया आपले लेख दि. १५-८-२०१६ पर्यंत ‘साहित्य संपादक’ या आयडीला व्यनि करून

              अथवा sahityasampadak.mipa@gmail.com या पत्त्यावर ईमेल करून पाठवा.

हाही उपक्रम श्रीगणेश कृपेने आणि मिपाकरांच्या सहकार्याने सुफळ संपूर्ण होवो  अशी श्रीचरणी प्रार्थना !!

धन्यवाद.

साहित्य संपादक,

मिसळपाव प्रशासन.
टीप : श्रीगणेशलेखमालेत निवडक लेख प्रकाशित करून झाल्यानंतर जादाचे लेख काही कालावधीनंतर प्रशासनाकडून प्रकाशित केले जातील अथवा सदस्य स्वत: प्रकाशित करू शकतील.
(छायाचित्र आंतरजालावरून साभार )

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

व्यवसाय सांभाळून जोपासलेला छंद

नोकरी सांभाळून जोपासलेला छंद चालेल काय?

साहित्य संपादक's picture

12 Jul 2016 - 3:19 pm | साहित्य संपादक

नोकरी हाही उपजीविकेचा व्यवसायच आहे.

आदूबाळ's picture

12 Jul 2016 - 4:08 pm | आदूबाळ

अनेकदा एखाद्या गोष्टीची सुरुवात खुप अंडर स्टेटेड असते. आपण आपल्याच इन्स्टिन्क्ट्स कडे दुर्लक्ष करतो. तुमचे असे कोणते इन्स्टिन्क्टस कदाचित तुमच्याही नकळत अग्रेसिव्ह झाले आणि आज त्याला हे स्वरुप आलं? आज मागे वळुन पाहताना एखादी अशी छोटी सुरुवात आठवते का ज्याने तुमच्या या छंदाला मूर्तस्वरुप आलं?

जबरदस्त प्रश्न आहे.

कैलासवासी सोन्याबापु's picture

12 Jul 2016 - 4:38 pm | कैलासवासी सोन्याबापु

मिपा हाच छंद आहे!! इतर छंद नाहीत नोकरी सांभाळून छंद जोपासायाला येळ भेटत नाही, तस्मात वाचकांच्या रांगेत (चपला पिशवीत कोंबून) ! आम्ही पहिले बसणार

हायला बाप्पू भारीच. आमचा छंद हाच व्यवसाय असल्याने आम्ही आपोआप बाजूला. गेल्या साली आम्हाला मिळालेली संधी, आता नवीन काही वल्ली भेटतिल. आमीबी चपला पिशवीत घालून हावोतच वाचायला.

नाखु's picture

12 Jul 2016 - 4:58 pm | नाखु

आहे याची आटवण ठेवा म्हणतो मी!

मुक्त विहारि's picture

12 Jul 2016 - 5:09 pm | मुक्त विहारि

+ १

कैलासवासी सोन्याबापु's picture

12 Jul 2016 - 5:26 pm | कैलासवासी सोन्याबापु

हॅ !!! नाखु काकांस खाली अंगठा करणारी स्मायली, देवा आम्ही लिहितानाच 'वाचकांची पत्रेवाल्या नाखु काकांच्या शेजारी पिशवीत चपला घालून' असं लिहिणार होतो, पण नंतर म्हणले की काकांचा शेतकी व्यासंग भारी, ते छंद म्हणून काहीतरी उत्तम लिहितील शेतीतले, आम्ही काकांना स्टेज वर शोधतोय अन ते हळूच आमच्या शेजारी मक्याची कणसे घेऊन बसले!! इ ना चोलबे!! काका गुमान स्टेज वर जायचं नाही तर उंचावरून बोका लोटतात तसे तुम्हाला स्टेज वर लोटून देऊ आम्ही (अभ्याचा सहभाग आम्ही गृहीत धरतोय हो सोलापूरकर साहेब)

बोका-ए-आझम's picture

12 Jul 2016 - 8:04 pm | बोका-ए-आझम

उंचावरून बोका लोटतात

म्हणजे?

अभ्या..'s picture

12 Jul 2016 - 11:26 pm | अभ्या..

हा मात्र माझा छंद आहे. कंपौंडवर बोका ऊन खात बसला कि मी हळूच मागे जाऊन त्याला ढकलून देतो. तो काय पडला तरी चार पायावर हे म्हाइत असते. त्याच्या मागे पळत जायला पण मज्जा येते. फुल्ल आडवा तिडवा पळतो बिचारा.

बोका-ए-आझम's picture

16 Jul 2016 - 10:42 am | बोका-ए-आझम

कंपाउंडवर बसायची सोय नाही म्हणजे!

अरे, तुम्हाला काय कंपौंडावर थांबवणार का काय आम्ही,
खास सोफा बनऊ. सोफा ए आझम.

सस्नेह's picture

16 Jul 2016 - 11:00 am | सस्नेह

सोफा ए आझम. =))

माह्यासाठी बी रुमाल टाकून जागा शीता बाप्पू...तदलोग आलोच म्या..

कैलासवासी सोन्याबापु's picture

12 Jul 2016 - 6:05 pm | कैलासवासी सोन्याबापु

मिपाचा साक्षात ललित/विनोदी लेखन विभाग आम्हाला हे म्हणाला !! या देवा अंगातल्या सदऱ्यानं शीट पुसून ठुतो!!

बापूसाहेब...तुमच्या शेजारची जागा मिळाली तर ते आमचे भाग्य असेल....बाकी काही नको...

नाखु's picture

13 Jul 2016 - 11:09 am | नाखु

ते माईनमुळ्याच्या लोणाच्याची बरणी दिलीस का टक्याला, त्याला सध्या श्वास सॉस घ्यायला फुरसत नाही. आणि हो माईंना म्हणावं संमेलनाला "यांच्या" सोबतच या उगा नंतर चुकामुक नको.

कसलं काय...लोणच्याची बरणी टक्याला दे म्हणून अभ्याकडे दिली तर त्यानेच चाटून पुसून संपवलं लोणचं...सोलापुरी शेंगदाणा चटणी दिली त्याने बरणीत भरून...आणि आता टाक्या वस्ताद म्हणतो..खाईन तर लोणच्याशी,नाही तर उपाशी..!

आता माईला परत लोणचं घालायला सांगितलं आहे...ती म्हणाली ,"मी लाख करेल रे लोणचं परत पण मुरायला वेळ नको का द्यायला"

मुक्त विहारि's picture

12 Jul 2016 - 4:49 pm | मुक्त विहारि

हे पण छंद होवू शकतात का?

कारण ह्या दोन्ही छंदामुळे "छंदातून केलेली कामगिरी किंवा अचिव्हमेंट." माझ्यासाठी फार मोठी आहे.

अजया's picture

12 Jul 2016 - 5:20 pm | अजया

मिपामिपा खेळणे हा पण छंद होवू शकतो का?

कारण ह्या या छंदामुळे "छंदातून केलेली कामगिरी किंवा अचिव्हमेंट." माझ्यासाठी फार मोठी आहे ;)
मुवि ह.घ्यालच!!

हा छंद नाही, तर ते व्यसन आहे आणि आमच्या सौ.ची लाडकी सवत पण.

जाताजाता : मिपा नामक सवती वर आमच्या ह्यांचे जास्तच प्रेम, असे आमची सौ. म्हणते.

असो,

तुर्तास इतकेच.

नाहीतर धाग्याचे काश्मीर व्हायचे पुण्य, आमच्या प्रतिसादाला लागायचे.

प्रचेतस's picture

12 Jul 2016 - 5:55 pm | प्रचेतस

गणेश लेखमालेस शुभेच्छा.
उत्तमोत्तम लेख वाचावयास मिळतील ह्याची खात्री आहेच.

स्वच्छंदी_मनोज's picture

12 Jul 2016 - 6:01 pm | स्वच्छंदी_मनोज

हेच म्हणतो.

तुझ्याकडून लेख अपेक्षित आहे रे. :)

सस्नेह's picture

13 Jul 2016 - 10:08 am | सस्नेह

हेच्च तुम्हाला म्हणते ! तुम्ही का दुरूनच खडे टाकताय ?

यशोधरा's picture

12 Jul 2016 - 6:04 pm | यशोधरा

शुभेच्छा. लेखांची वाट बघणे आले. :)

ए ए वाघमारे's picture

12 Jul 2016 - 5:55 pm | ए ए वाघमारे

लेखन हा छंद आहे का?

कैलासवासी सोन्याबापु's picture

12 Jul 2016 - 6:07 pm | कैलासवासी सोन्याबापु

माहिती नाही पण व्यंगचित्रकला नक्कीच आहे :)

सध्या दोन छंद जोपासणं चालू आहे, पण अगदी दैदिप्यमान पद्धतीची कामगिरी झालेली नाही अजून!!

साहित्य संपादक's picture

14 Jul 2016 - 11:25 am | साहित्य संपादक

कामगिरी हा घटक आवश्यक आहे असे नाही. छंद मनासारखा जमला असेल तर लेख देण्यास हरकत नाही.

चांदणे संदीप's picture

12 Jul 2016 - 7:55 pm | चांदणे संदीप

जरा वेगळ्या चालीवर...

"सध्याच काय, फार्फार वर्शापासून छत्तीस छंद जोपासणं चालू आहे, पण अगदी ढेकळाएवढी पण कामगिरी झालेली नाही अजून!"

=))

Sandy

व्यवसाय नसला तर चालेल का? फक्त छंदाबद्दल लिहू शकतो का? आणि एकच छंद लिहायचा की दोन-तिन चालतील एकत्र?

साहित्य संपादक's picture

16 Jul 2016 - 10:27 am | साहित्य संपादक

आपण गृहिणी असाल आणि इतर व्यवसाय नसला तरीही लेख द्यायला हरकत नसावी.
एकपेक्षा जास्त छंद असतील तर त्यातला अधिक विकसित झालेला छंद मुख्य समजून लिहावे.
धन्यवाद.

पैसा's picture

29 Jul 2016 - 9:31 am | पैसा

कोणाला या विषयावर लिहायचं आहे का?

अभिजीत अवलिया's picture

29 Jul 2016 - 7:45 pm | अभिजीत अवलिया

पैसा ताई,
आवडेल की लिहायला.

पैसा's picture

29 Jul 2016 - 7:47 pm | पैसा

लेखात दिल्याप्रमाणे लेख लिहून साहित्य संपादकांना पाठवा please!

सस्नेह's picture

30 Jul 2016 - 10:39 am | सस्नेह

मग वाट कसली पाहताय ? घ्या लिहायला :)