मुलांसाठी मराठी माध्यमाची शाळा, उत्कृष्ट पर्याय.

सुचिकांत's picture
सुचिकांत in काथ्याकूट
28 Jun 2016 - 9:27 pm
गाभा: 

नमस्कार मित्रांनो,

मातृभाषेतून शिक्षणाचं महत्त्व विषद करणारी माहिती एकत्रितपणे, देता यावी म्हणून ppt आणि pdf फाईल्स आम्ही इमेल या साध्या सोप्या आणि प्रत्येकाला वापरता येणाऱ्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. ही माहिती पूर्णपणे मराठीतून दिली जात आहे. आत्तापर्यंत अनेकांना ही माहिती आम्ही पाठवली आहे. समाजामध्ये मराठी शाळांचं रंगवलं जाणारं चित्र खरोखर बरोबर आहे का? की त्यात इतर अनेक तांत्रिक मुद्दे आहेत, या सर्व बाबींवर या इमेलद्वारे प्रकाश टाकण्यात आलेला आहे.

या इमेल मध्ये ३ पीपीटी फाईल आणि प्रा. अनिल गोरे यांच्या भाषणाच्या व्हीडीयोचा दुवा दिलेला आहे. तरी सर्वांनी यात दिलेल्या सर्व मुद्द्यांचा काळजीपूर्वक अभ्यास करून, नवपालकांना अधिकाधिक मराठी माध्यमाकडे वळवण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन. आमचा इमेल आयडी आहे - Majhishala.Majhibhasha@gmail.com
__________________________

१. प्रा. अनिल गोरे - मराठी माध्यमाचे महत्त्व विषद करणाऱ्या भाषणाचा दुवा.

https://www.youtube.com/watch?v=mTwrPye0f1Y

२. डॉ. वसंत काळपांडे - पूर्ण भारतात, इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या मुलांची अधिकृत आकडेवारी. तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील किती मुले इंग्रजी माध्यमात जातात याची देखील आकडेवारी मिळू शकते. यावरून तुम्ही पटसंख्या वाढीची दिशा ठरवू शकता(शिक्षकांसाठी/शाळांसाठी उपयुक्त माहिती). यावरून समजेल केवळ काही शहरांमध्ये तेही आधुनिकीकरण झपाट्याने झाल्याने तसेच मॉल संस्कृतीमुळे मराठी शाळांच्या टक्केवारीमध्ये फरक पडला आहे पण आजही ८० टक्केच्यावर महाराष्ट्र मराठी शाळांमधूनच शिक्षण घेतो. - KalpandeSir.pptx

३. डॉ. श्रुती पानसे - मराठी माध्यमाचे फायदे आणि इंग्रजी माध्यमाचे तोटे - Shruti_Panse.pptx

४. मातृभाषेतून/परिसर भाषेतून शिक्षणाचे महत्त्व विषद करणारी पीपीटी - Education In Mother tongue.pptx

५. आंतरराष्ट्रीय_भाषा_धोरण - केंद्रीय प्रशासकीय सेवांमध्ये इंग्रजीला अवास्तव महत्त्व देणे, या भारत सरकारच्या निर्णयाचा विरोध म्हणून हा १८ पानी निबंध लिहिला गेला. केंद्र सरकारने आपला चुकीचा प्रस्ताव १५ मार्च-२०१३ ला परत घेतला.
हा पूर्ण निबंध वाचल्यानंतर समजेल की, इंग्रजी ही जागतिक भाषा! हा आपला गोड गैरसमज आहे.- Bhasha_Dhoran.pdf

६. रचनावादाचं शास्त्र आत्मसात करायला हवं (रमेश पानसे) - तुम्हाला आज जिल्हा परिषद शाळांमध्ये ज्ञानरचनावादी शिक्षण मिळते आहे तर दुसरीकडे, ५०-६० वर्षे जुन्या पद्धतीने!!!

वाचा - Jilha_Parishad_Shala.pdf

७. 'असर' च्या अहवालाला दिलेले रणजीतसिंह दिसले यांनी दिलेले उत्तर : Asar1 ते Asar16.jpg

आभार,
सुचिकांत वनारसे,
Majhishala.Majhibhasha@gmail.com
ट्वीटर - ||ज्ञानभाषा मराठी|| - @SarvatraMarathi
फेसबुक - https://goo.gl/z3TXWJ
Whatsapp - ७३३७५९२०७५

प्रतिक्रिया

धागा चांगलाय पण विषयाचा चोथा झालाय...

संदीप डांगे's picture

28 Jun 2016 - 11:49 pm | संदीप डांगे

पुणे जिल्ह्यात शेकडो मुले इन्ग्रजी शाळांमधून निघून जिल्हापरिषदेच्या शाळांमधे प्रवेश घेत आहेत. ही एक क्रांतीकारी घटना आहे.

वेल्लाभट's picture

29 Jun 2016 - 12:13 am | वेल्लाभट

विषयाला दू..........रवरून स्पर्श करणारी बातमी डकवतोय
Days after Brexit, the EU is already trying to get rid of English

सुचिकांत's picture

29 Jun 2016 - 10:46 am | सुचिकांत

याचा कीती प्रभाव पडेल येणाऱ्या काळात, याबाबत मनात बरीच उत्सुकता आहे

देवेन भोसले's picture

29 Jun 2016 - 11:09 am | देवेन भोसले

त्या .pptx कश्या मिलवत येतिल

नमस्कार. तुम्ही दिलेल्या इमेल आयडीवर मेल करा. तुम्हाला लवकरात लवकर पाठवीन.

सुचिकांत's picture

29 Jun 2016 - 1:59 pm | सुचिकांत

दिलेल्या आयडीवर इमेल करा. लवकरात लवकर पाठवीन.

कलंत्री's picture

29 Jun 2016 - 12:32 pm | कलंत्री

मनाचा आवडीचा विषय.

आपल्या प्रयत्नांना विनम्र अभिवादन.

देवेन भोसले's picture

29 Jun 2016 - 4:07 pm | देवेन भोसले

इमेल केला आहे धन्यावाद