विरह.....2

Bhagyashri satish vasane's picture
Bhagyashri sati... in जनातलं, मनातलं
28 Jun 2016 - 4:08 pm

मी बसलो ती खालच्या स्वरात म्हणाली, सॅारी मी म्हटले का? ती म्हणाली,"मी तुझ्याशी त्या दिवशी फार
रागात बोलले, म्हणून मी तीला म्हणालो अंग ते विसरुन जा मी ते कधीच विसरलो ती म्हणाली मी तुला सम्यंक
म्हटंल तर चालेल, मी म्हटंल हो का नाही. बघता बघता आमची चांगली मैत्री झाली मी दहावी बोर्डाची परीक्षा
पास झालो आणि सायन्सला अॅडमिशन घेतलं अवनी आता आठवीत आली होती, पण तीचं गणित काय सुधरत
नव्हंत मला पण आश्चर्य वाटत होतं की अवनीला रोज गणित समजावून पण तीला ते का कळत नाही, हे कळंत
नव्हत, अशीच दोन वर्ष निघुन गेली, कळलच नाही, अवनी दहावीत आली ती एक दिवस जरी घरी नाही आली
तरी करमायच नाही अस का होतय हे कळायला थोडा उशिर लागला, पण मनात जे आहे तीच्या विषयी ते प्रेम
आहे की ओढ? असे असंख्य प्रश्न मनात घोळायचे, एक दिवस ठरवून टाकलं तीला विचारायचं आणि ती संध्याकाळी
नेहमी प्रमाने आली, पण आज तीच्यात काहीतरी विशेष वाटत होत, तीने माझ्या आवडत्या लाल रंगाचा झक्कास असा
टॅाप घातला होता, त्यात ती आनखीनच सुंदर दिसत होती, ती दिसायला सावळी असली तरी रेखिव आणि आकर्षक
होती, घरीही कोणिच नव्हतं मी हिम्मत एकवटून तीला म्हणालो अवनी I love you do you love me? ती थोडी
संकोचली पण लगेच म्हणाली आय लव्ह यु तीचं उत्तर ऐकुन मला पण अतिशय आनंद झाला मी म्हंटलो चल आज
गणिताला सुट्टी आपण एखादा चांगला पिक्चर पाहूयात मी टिव्ही चालु केला सीडी पाहू लागलो, ती म्हणाली आशिकी २
पिक्चर लाव मला आवडतो फार, मी पिक्चर लावला आम्हि पुर्ण पिक्चर पाहिला अवनी जायला निघाली तेव्हा आई आली
आणि म्हणाली काय गं अवनी चालली अवनी म्हणाली नाही काकी केंव्हाचे आले होते मी निघते आता ती गेली
आज कशातच लक्ष लागत नव्हंत, अवनी सारखी डोळ्यासमोर फिरत होती, दुसर्या दिवशी ती आली मी तीच्याकडे मोबाइल नंबर मागीतला तीने आईचा नंबर दिला, तीला जेव्हा वेळ भेटायचा तेंव्हा ती फोन करायची, ते दिवस
छान चालले होते अगदी अविस्मरणिय पण नियतीच्या पोटात काय दडले होते याची चाहूल सुध्दा नव्हती आम्हाला
अवनी चा स्वभाव तसा मन मोकळा होता, ती मनातंल लगेच बोलुन टाकायची, पण मला जास्त बोलायची सवय
नव्हती, ती बोलायची तेंव्हा मी नुसता पाहातच राहायचो, ती अकरावी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली तर एकीकडे
तीच्यासाठी लग्नासाठी चांगली चांगली स्थळ येऊ लागली होती मुलगा माझ्यापेक्षा कितीही चांगला राहिला तरी
ती त्या मुलाला नकार द्यायची, एक दिवस ती घरी आली थोडी रागात वाटली पण येताच गळ्यात पडून रडू
लागली मी तीला विचारलं काय झाल अवनी ती म्हणाली अरे माझ्या घरचे लवकरात लवकर लग्न करायच म्हणताय
माझं मी त्यांना आपल्या नात्याबद्दल सांगु का? मी म्हटंलो अगं अवनी आपण घरी सांगितल तरी घरचे काय आपल
लग्न नाही लावून देणार कारण "आपली जात आणि धर्म दोन्ही वेगवेगळे आहे" तरीहि मी आज आईसोबत बोलतो
तु पण घरी सांग काय होइल ते पाहून घेऊ, आम्ही दोघांनी घरी सांगितल दोघांच्या घरातुन प्रचंड विरोध! अवनीला तर
दोन दिवस अना्पाण्यावाचुन कोंडून ठेवलं होत अस तीची मैत्रिण सांगत होती, पण मलाही जगन कठिन जात होत, आणि
अवनी पण खुप हट्टी, दोन दिवस अना्पाण्यावाचुन ठेऊन सुध्दा म्हणत होती लग्न करेल तर सम्यंक सोबतच नाही तर आयुष्यभर कुवारी राहिन हे ऐकुन तीची आई चांगलीच संतापली होती, आणि एक दिवस अचानक! तीच्या मनाविरुध्द्
तीचं लग्न ठरवुन टाकल, असं मला समजल
क्रमशः

धर्मविचार

प्रतिक्रिया

सूड's picture

28 Jun 2016 - 4:27 pm | सूड

पाचवेळा झाला विरह