Death Gratuity & other benefits for Maharashtra state employee

समी's picture
समी in काथ्याकूट
28 Jun 2016 - 12:15 pm
गाभा: 

माझ्या मैत्रीणीचे पतीचे निधन झाले. ते माध्यमिक शाळेत शिक्षक होते...वय ४३ वर्षे. नविन Pension Scheme प्रमाणे त्यांना Pension लागू होत नाहि कारण त्यांची नियुक्ती २००५ नंतरची आहे. पण Death Gratuity आणी इतर लाभ मिळायला हवेत जे की शाळा म्हणतेयकि Pension नाहि तर इतरहि काहि मिळ्णार नाहि.... नक्की Rules काय आहेत कोणी सांगू शकेल काय? त्यांची सर्व्हिस ७ वर्ष झालेली आहे.

प्रतिक्रिया

कृपया त्यांची पगाराची स्लिप पहा . जर पीएफ कापलेला असेल तर PF +EPS मिळेल .
1)PF = Member Contribution + CO.Contribution.
2) EPS= 50 % of Employee pension Scheme applicable to widow of employee ( in death case) & /Or Children of employee upto age of 25 years.

3) EDLI benefit मिळेल . निधन 1st जुन 2016 नन्तर झाले असल्यास 6 लाख EDLI बेनिफिट . ( 24-05-2016 रोजी प्रसिद्ध झालेल्या राजपत्रानुसार )
4) Gratuity मिळेल .
फॉर्मुला = (बेसिक सॅलरी+ महागाई भत्ता ) *15/26 * नोकरी केलेली वर्षे .
अधिक माहितीसाठी www.epfindia.gov.in येथे पहा .
PF कापला जात असल्यास तुम्ही त्याच site वर तक्रार दाखल करू शकता .

avinash kulkarni's picture

28 Jun 2016 - 1:55 pm | avinash kulkarni

इंगलीश आणि मराठीची मिसळ केल्याबद्दल क्षमा करा .

समी's picture

29 Jun 2016 - 10:17 am | समी

धन्यवाद अविनाशजी.....

त्यांचे निधन एप्रिलमधे झालेय.... Gratuity बद्दल शाळा नाहि म्हणतेय. त्यासंर्दभात नियम कुठे मिळतील का?

avinash kulkarni's picture

29 Jun 2016 - 1:28 pm | avinash kulkarni

TYPE "THE PAYMENT OF GRATUITY ACT, 1972" in google for PDF file .

avinash kulkarni's picture

29 Jun 2016 - 1:46 pm | avinash kulkarni

type "https://mahakamgar.maharashtra.gov.in/.../payment-of-gratuity-act-1972" for PDF file on Gratuity .

Gratuity 5 वर्षे अखंड सेवारत असलेल्या कामगाराला मिळते जर तो काम करत असलेली संस्थेत 10 + कामगार काम करीत असतील आणि ती संस्था PF डिपार्टमेंट मध्ये रजिस्टर असेल तर मिळेल .

त्यांना सॅलरी स्लिप मिळत होती का ? ते कॉन्ट्रॅक्ट वर काम करत होते का ? त्यांच्या अखंड सेवेचा पुरावा आहे का यावर PF +EPS+EDLI + Grauity चे फायदे मिळणार की नाही हे अवलंबून आहे .

वरील पुरावे असल्यास LABOUR PRACTICE करण्याऱ्या वकिलाची एक नोटीस बर्याच गोष्टी साध्य करेल .

हो त्यांना सॅलरी स्लिप मिळत होती. त्यांची शाळा अनुदानित आहे त्यामुळे ती संस्था PF डिपार्टमेंट मध्ये रजिस्टर असेल. PF गेले ३-४ महिनेच कट होत होता....त्याआधी अगदी सुरवातीला ४-५ महिने नंतर काहितरी झाले त्यामूळे बंद होता. म्हणून शाळा म्हणतेय कि PF नाहि तर इतरहि काहि मिळणार नाहि.

avinash kulkarni's picture

30 Jun 2016 - 1:04 pm | avinash kulkarni

एक महिना जरी PF कापला गेला असेल ( मृत्यू वेळी ) तरी EDLI मिळेल .
जितके महिने PF कापला गेला आहे तो व्याजासह मिळेल .

दोन्हीसाठी शाळेकडून काहीही मदतीची गरज नाही .
PF डिपार्टमेंटला अर्ज करावा लागेल .

लोकल PF डिपार्टमेंट ला गेल्यास ( कागदपत्रांसह ) तर योग्य मार्गदर्शन केले जाते .

avinash kulkarni's picture

30 Jun 2016 - 1:14 pm | avinash kulkarni

PF settlement साठी PF डिपार्टमेंट तुमचा अर्ज online approval साठी पाठवते व तो अर्ज online मंजूर करणे ( योग्य असल्यास) शाळेला बंधनकारक आहे . शाळेने डिजिटल authorization ची पूर्तता केली नसल्यास तुम्ही प्रत्यक्ष फॉर्म registered post ने शाळेला पाठवावा . अर्ज मंजूर न केल्यास पुराव्यासह PF डिपार्टमेंटला तक्रार करू शकता किंवा राजपत्रित अधिकाऱ्याकडून authorize करू शकता .

PF डिपार्टमेंट प्रचंड बदललेले आहे ( चांगल्या अर्थाने) .

सामान्यनागरिक's picture

30 Jun 2016 - 6:51 pm | सामान्यनागरिक

पी एफ डिपा. खरोखरंच बदललेले आहे. त्यांची वेबसाईट पहा मग पटेल.

विश्वास बसत नाही ईतका बदल झालेला आहे. कौतुक करायला हवे.

अव्यक्त's picture

1 Jul 2016 - 10:54 am | अव्यक्त

मला जरा P.F. आणि पप्रॉव्हिडंट FUND विषयी सखोल माहिती हवी आहे... जाणकारांनी खुलासा करावा ही नम्र विनंती... कसा CALCULATE होतो ...फ्रॉम A TO Z

avinash kulkarni's picture

24 Aug 2016 - 1:54 pm | avinash kulkarni

प्रोविडेंट फंड :
जर तुमचा मूळ पगार + महागाई भत्ता 100/- रुपये असेल तर त्यातून 12/- रुपये तुमचा प्रोविडेंट फंडचा भाग म्हुणुन पगारातून कापला जातो .तुम्हाला हातात 88/- रुपये मिळतात .

तुमचा मालक मूळ पगार + मागणी भत्ता याच्या 12 % म्हणजेच 12/- त्याचा भाग म्हणून भविष्य निर्वाह निधीत (PF ) मध्ये जमा करतो . त्यापैकी 8.33 रुपये किंवा 1250/- यापैकी जी रक्कम कमी असेल ती EPS मध्ये निवृत्ती वेतनासाठी जमा होते तर उरलेले 3.67 रुपये भविष्य निर्वाह निधीत (PF ) जमा होतात .

उदाहरण 1 :

मूळ पगार = कर्मचारी हिस्सा + + मालक हिस्सा
PF ( पगाराच्या 12%) PF + EPS( पगाराच्या 12%)
10000 = 1200/-- + 833/-PF + 367/- EPS

समी's picture

24 Aug 2016 - 1:59 pm | समी

Death Gratuity बद्द्ल काहि सांगू शकेल का कोणी??

माम्लेदारचा पन्खा's picture

24 Aug 2016 - 2:35 pm | माम्लेदारचा पन्खा

सदर रक्कम नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीला देणे बंधनकारक आहे...तसे नसल्यास कायदेशीर वारसाला देता येईल...

प्रीत-मोहर's picture

24 Aug 2016 - 3:27 pm | प्रीत-मोहर

ह्या NPS चे वांदेच आहेत. गोव्यात NPS लागु झालेली ३ व्यक्तिंच्या केसेस पेंडिंग आहे. त्यात आता आमच्या हापिसातली एक व्यक्तीही अ‍ॅड झाली आहे हल्लीच( वारल्यामुळे). म्हणजे रुल्स क्लियर नाही आहेत म्हणे. ते ज्या कार्यालयांमधे काम करत होते ती कार्यालये पुर्ण सहकार्य देत असुनही, लेखा संचालनालय कात करते, काय होते ते पहायचे.

जर मृत कर्मचाऱ्याचा PF एका दिवसासाठी जरी RPFC कडे जमा झालेला असेल तर त्याच्या मृत्यू नंतर वारसाला gratuity मिळू शकते . त्याकरता किती दिवस /वषे सेवा झाली आहे याचे बंधन नाही .

नाम निर्देशन केले नसल्यास जवळच्या नातेवाईकांना मिळते . ( आई /बाबा /पत्नी / मुले ). लग्नानंतर बायकोला वारस नेमलेले नसल्यास indemnity बॉण्ड घेऊन सर्व वारसदारांना समान वाटण्यात येते .

कर्मचारी सोडून जात असल्यास साधारणपणे 5 वर्र्षे ( continuous) सेवा झाली असल्यास खालील फॉर्मुलयाप्रमाणे
gratuity मिळते .

Formula : (basic + DA + SP Allowance)*15/26* years of service rendered.

5 वर्ष पेक्षा जास्त सर्विस असेल व 6 महिन्यांपेक्षा जास्त सर्विस झाली असेल तर त्या पूर्ण वषयाची gratuity मिळेल .

उदाहरण 1 :
सेवा 6 वर्र्षे 6 महिने 1 दिवस झाली असल्यास 7 years साठी मिळेल .
उदाहरण 2 :
सेवा 6 वर्र्षे 5 महिने 28 दिवस झाली असल्यास 6 years साठी मिळेल.

avinash kulkarni's picture

26 Aug 2016 - 1:45 pm | avinash kulkarni

जर आई /बाबा / पत्नी / मुले नसतील तर दुसऱ्या फळीतील नातेवाईकांना मिळेल .
( भाऊ / बहीण /काका इत्यादी)