कोण जिंकणार युरोकप 2016 ??????

बंड्याभाय's picture
बंड्याभाय in क्रिडा जगत
28 Jun 2016 - 4:30 am

मिपावर फूटबॉलचा धागा नाही हे बघून आश्चर्य वाटले, म्हणून म्हंतल आपणच सुरूवात करावी.
खेळांचा राजा फूटबॉलची युरोप मधील सर्वोच्च मानाची आणि तुफान प्रसिद्धीची युरोकप 2016 हि स्पर्धा आता तिच्या आंतीम टप्प्यात येत आहे.
सुरुवातीचे साखळी सामने आणि राउंड ऑफ सिक्सटीन संपून आता संघ क्वॉर्टर फाइनल मध्ये दाखल झाले आहे.
येऊ घातलेल्या सामान्यांचे वेळापत्रक पुढील प्रमाणे (कंसात माझ्या मते संभाव्य विजेते) :
- पोलंड वि. पोर्तुगल - ३० जून (पोर्तुगल)
- वेल्स वि. बेल्जियम - १ जुलै ( बेल्जियम चा संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहे)
- जर्मनी वि. इटली - २ जुलै (काट्याची टक्कर, शेरास सव्वाशेर काही सांगता येत नाही बहुदा शिस्तबद्ध खेळ करून जर्मनी बाजी मारेल)
- फ्रांस वि. आइयर्लॅंड - ३ जुलै (फ्रांस, आइयर्लॅंड सुद्धा दणका देऊ शकते हे त्यानी इंग्लेंड ला हरवून दाखवून दिल आहे)

सर्वच संघ जोमात आहेत आणि सामने सुद्धा रंगतदार होत आहेत. एकूणच स्पर्धा बघता माझा कौल जर्मनी ला आहे. ज्यांचा खेळ बघायला आवडतो असे खेळाडू : गोमेज़, ओझील, क्रूअस, श्वैन्स्ताग्गेर्, आणि थॉमस मुल्ल्लर(अजुन खाते उघडले नाही). इतर देशांचे म्हणाल तर रोनाल्डो, नानी, पेले, हज़ार्ड, चिलीनी, ग्रीझमान.
जास जसे सामने होतील तसे तसे अजुन चर्चा करू. तोपर्यंत तुमचे कौल आणि आवडीचे खेळाडू कळवा.

फूटबॉल

प्रतिक्रिया

असंका's picture

28 Jun 2016 - 9:27 am | असंका

फ्रांस वि कोण?

कंजूस's picture

28 Jun 2016 - 9:44 am | कंजूस

आवडता खेळ आहे.

महासंग्राम's picture

28 Jun 2016 - 9:59 am | महासंग्राम

माई मोड ऑन...

अरे मेल्या बंड्या कधी तरी देशी खेळांकडे पण लक्ष द्यावं म्हणते मी. आमचे हुतूतू संघाचे कप्तान होते म्हणे त्यांच्या काळात.

माई मोड ऑफ

मोहनराव's picture

28 Jun 2016 - 8:51 pm | मोहनराव

आमचासुद्धा जर्मनीला कौल!!

मित्रहो's picture

28 Jun 2016 - 10:24 pm | मित्रहो

पोर्तुगाल, बेल्जियम, जर्मनी, फ्रांस.
यांच्यात कोण भिडतो त्यावर अअवलंबून आहे. जर्मनी आणि फ्रांस सामना झाला तर एक दावेदार गेला

लोथार मथायस's picture

30 Jun 2016 - 2:26 am | लोथार मथायस

जर्मनी आणि फ्रान्स एकाच हॉफ मध्ये आहेत

असंका's picture

30 Jun 2016 - 11:58 pm | असंका

पोलंड वि पोर्तुगाल ....

स्वाती दिनेश's picture

1 Jul 2016 - 1:42 pm | स्वाती दिनेश

पोलंड वि पोर्तुगालची मॅच मस्त झाली..करेझ्माने शेवटी पोर्तुगालच्या विजयावर शिक्का मारला. तिसर्‍याच मिनिटाला लेवानडोस्कीने केलेल्या गोलमुळे रंगत आणि उत्कंठा वाढलेली होती.
डॉइशलांड.. डॉइशलांड ! आम्ही वेल्टमाइस्टर जर्मनीला सपोर्ट करणार... उद्या 'बहु'च्या देशाशी 'म्याच' आहे..
स्वाती

स्वाती दिनेश's picture

2 Jul 2016 - 12:33 am | स्वाती दिनेश

बेल्जियम वि वेल्स म्याच आत्ताच सुरू झाली आहे.
स्वाती

मिपावर फुटबालच्या धाग्यांवर इतकी चर्चा होत नाही असं निरीक्षण आहे त्यामुळे युरो १६ चा धागा नसणं अपेक्षित होतं

पोर्तुगाल जोमात आहे - रोनाल्डो, सांचेस, नानी, मारिओ क्लास फ्रंटहाफ आहे टीमचा त्यामुळे प्रबळ दावेदार
जर्मनी - अ‍ॅज युजुअल अ‍ॅग्रेसिव अँड क्लिनिकल. उद्या इटली विरुद्ध काय होतं बघायचं. रॉबेन फेवरिट आपला.
इटली - सांगता येत नाही, दे आर अनप्रेडिक्टेबल.
वेल्स - बेकार (चांगल्या अर्थाने वापरलेला शब्द) खेळले काल... कडकच. बेल द चित्ता....
फ्रान्स - कॅनॉट बी डिसकाउंटेड. बाप टीम आहे आताची. पोगबा, पायेट, कान्टे, मार्शिआल, जिरू, ग्रिझ्मान... अनदर फॉर्मिडेबल फ्रंट हाफ.

बट आय फील इट विल बी आयदर फ्रान्स ऑर पोर्तुगाल.

बंड्याभाय's picture

2 Jul 2016 - 5:48 am | बंड्याभाय

आजच्या उपांत्यपूर्व सामन्यात दमदार खेळ करत वेल्सनी तुलनेन उजव्या बेल्जियमला हरवल आहे. तीनही गोल उत्कृष्ट झाले. आता पोर्तुगालच काही खर नाही. या स्पर्धेतही पोर्तुगलने लौकीकास साजेसा खेळ केलेला नाही. मलातरी पोर्तूगलचा खेळ अजुन तितकासा भावलेला नाही.
आज या स्पर्धेतीली सगळ्यात मोठी लढाई आहे जर्मनी वि. इटली. इटली खरच वेडे लोक आहेत :) totally unpredictable.
सामना चांगलाच चुर्शीचा होईल अशी अपेक्षा. दोन्हीही संघना शुभेच्छा!

स्वाती दिनेश's picture

2 Jul 2016 - 10:33 pm | स्वाती दिनेश

आज जर्मनी वि इटाली!
गाड्यांवर, अंगावर, घरांवर सगळीकडे जर्मन झेंडे फडकत आहेत. सगळे जण तय्यार होऊन ९ वाजायची वाट पाहत आहेत.
स्वाती

बंड्याभाय's picture

5 Jul 2016 - 3:16 am | बंड्याभाय

उपांत्यपूर्व फेरीचे पुढचे दोन सामने सुद्धा संपले.
जर्मनी वि इटली सामना खरोखरच उत्कृष्ठ झाला. दोन्ही संघानी आपल्या लौकिकास साजेसा खेळ केला. अश्या सामान्यचा निकल हा penalty shootout वर ठरू नये. दोन्हीही गोलकीपरनी सर्वोत्तम खेळ केला. नॉयेर आपला आवडता खेळाडू शेवटी कामी आला:)
जर्मनी ने तस बघता बर्‍याच संधी दवडल्या, नशिबाने त्याना सात दिली नाही. मोठ मोठ्या खेळाडूंचे फटाके चुकत होते. सगळ्याना उलटे करून पोकळ बांबूचे दिले पाहिजे. ;) इटली नी मात्र चांगलीच टक्कर दिली. Hard luck for them.

फ्रांस वि. आइस्लॅंड सामना अगदिच एकतरफी झाला. अस वाटत होत की सरव सामना बघतोय की काय? इतक्या आरामात गोल होत होते.

आता ऊपान्त्य फेरीचे सामने पुढिल प्रमाणे :

६ जुलै - वेल्स वि पोर्तुगाल (चमत्कार घड़ू शकतो)
७ जुलै - जर्मनी वि फ़्रांस (पुन्हा एक दमदार लढाई पहायला मिळ्णार)

आमचा कौल अज़ूनसुद्धा जर्मनीलाच !!!

निशाचर's picture

8 Jul 2016 - 2:42 am | निशाचर

फ्रांसची २-० ने जीत. फायनलमध्ये ग्रीझमान आणि रोनाल्डो भिडणार, फेवरिट अर्थातच फ्रांस!

बोका-ए-आझम's picture

8 Jul 2016 - 10:00 am | बोका-ए-आझम

जर फ्रान्सने पोर्तुगालला हरवलं तर १९९८ विश्वचषकाची एक प्रकारे पुनरावृत्ती होईल. तेव्हाही फ्रान्स यजमान देश होता. मजा म्हणजे तेव्हाचा प्रतिस्पर्धी ब्राझील हा पोर्तुगीज भाषिक देश आहे आणि तेव्हा त्यांचा कर्णधार रोनाल्डो होता.

वेल्लाभट's picture

8 Jul 2016 - 11:28 am | वेल्लाभट

फ्रान्स च्या बाजूने आहे ! ग्रिझमान, पायेट, जिरू, पोग्बा, अवर बॉय एव्हरा, गोलकीपर लॉरिस, एन्गोलो कान्टे... फ्रान्स इट विल बी....

रोनाल्डो बाप आहे पण सर्व्हिस मिळाली नाही तर एकटा काहीच नाही करू शकत. म्हणा जो मरिओ आहे, अवर बॉय नानी, रेनेटो सान्चेस हे सगळे खासम खास आहेत.

असंका's picture

11 Jul 2016 - 11:47 am | असंका

रोनाल्डो ची टीम जिंकली.... लीगमध्ये शेवटच्या काही मिनीटांमध्ये क्वालीफाय होऊनही!

वेल्लाभट's picture

11 Jul 2016 - 2:37 pm | वेल्लाभट

अँड पोर्तुगाल इट इज!

रोनाल्डो नसताना पोर्तुगालच्या टिमने चांगली कामगिरी केली आणी विजय खेचुन आणला. फ्रांसचाही खेळ चांगला होता पण नशिबाने साथ दिली नाही.