विरह ........

Bhagyashri satish vasane's picture
Bhagyashri sati... in जनातलं, मनातलं
28 Jun 2016 - 12:47 am

सर्वत्र काळोख पसरलेला होता पाऊल कुठल्या दिशेनं पडत होती याचाही संदर्भ
लागत नव्हता, मी भ्रमिष्टा अवस्थेत चालत होते, मला मन आहे, विचारशक्ती
आहे, याच भानंच नव्हत! गत आयुष्यातील घटनांचा आढावा घेतांना खरंच वाटत
नाही आपण इतकं काही भोगलंय! पण आता त्या आठवणीसुध्दा सोबत सोडतील,
मन पुन्हा त्या आठवणींना उजाळा देऊ लागले!
सात वर्षापुर्वी आमची पहिली भेट! ती शाळेतुन घरी येत होती मी आपला
बाजारात किराना घ्यायला स्कुटरवर जात होतो, रस्तात अचानक 'ती' समोर
आल्यामुळे मी ब्रेक देऊन सुध्दा आमची टक्कर झाली, ती पडली, मी घाई घाई
खाली उतरलो तीला सावरायसाठी पण ती उठली आणि माझीच कानऊघडणी करु
लागली मी तीला सॅारी एवढंच बोलु शकलो, 'ती' मला काही बोलुच देत नव्हती
तीनं रागात सायकल उचलली आणि निघुन पण गेली मी तिच्या पाठमोर्या आकृतीकडे
पाहातच राहिलो मनात म्हंटल "कसली तिखट पोरगी होती" मी बाजारातुन किराना
घेऊन घरी आलो आई घरी नव्हती मी भावाला विचारलं तेंव्हा त्यानं सांगितल की आई
वरती नविन भाडेकरी आले आहेत त्यांना गाजराचा हलवा द्यायला गेली आहे, येईलच
इतक्यात, मी आईला येताच बोललो, काय आई ओळख नाही पाळख नाही आणि ते
त्यांना हलवा द्यायला गेलीस मी टिव्ही चालु करत बोललो, आई म्हणाली अरे खुप छान
कुटुंब आहे ते तु भेटशीलतर तुला पण खुप आवडेल, एवढं बोलुन आई स्वयंपाकखोलीकडे
वळली, संध्याकाळी सहाच्या सुमारास 'ती' आईने दिलेल्या डब्यात लोंच भरुन घेऊन आली,
मी दरवाजा उघडला तशी ती मला बघताचं उद्गारली "तु इथे" आई मागुन येत म्हणाली
"अंग अवनी" ये ना ती माझ्याकंड रागात बघत कोचावर येऊन बसली आईच्या हातात लोंच
देत म्हणाली, आईंनी लोंच दिलंय तुमच्यसाठी, तिनं परत माझ्याकडं पाहात विचारलं हे कोन?
आई उत्तरली हा माझा मोठा मुलगा संम्यक, मी तीला हाय केलं त्यावर तिनं चेहर्यावर उसने
हसु आणून मला हाय केले आणि आईला म्हणाली मी येते हं काकी, म्हणून ती निघुन गोली
असेच काही दिवस गेले, मला कळले की अवनी सातवी या ईयत्तेत होती पण तिच्या उंची वरुन
ती मला मोठीच वाटायची, एक दिवस तीची आई आणि माझ्या आईला भेटायला आली सहज बोलता
बोलता विषय निघाला की अवनीचं गणित खुप कच्चंय, म्हणे माझी आई लगेच बोलली आमचा सम्यंक
गणित विषयात टोपर आहे अवनी ची आई म्हणाली तो अवनी ला गणित शिकवेल का? आईनं माझ्याकडं
पाहिलं मी मानेनंच होकार भरला दुसर्या दिवशी संध्याकाळी सात वाजेला अवनी दप्तर घेऊन आली
मी तीला पाणी आणून दिलं कारण आई घरी नव्हती भाऊ मॅच पाहण्यात गुंग होता मी तीला
विचारलं चहा घेणार की कॅाफी, ती शांतपणे उद्गारली 'नाही नको' तु बस ती त्या दिवसाच्या
मानानं आज शांत वाटत होती
। क्रमशः
क्रमश

धर्मविचार

प्रतिक्रिया

धनावडे's picture

28 Jun 2016 - 6:02 am | धनावडे

हम्म्

वाचून लोंचं, आपलं ते लोच्या झाला आहे जरा. आधी वाटलं कविता आहे. मग खाली लेखनविषय धर्म!!! असो. पुलोप्र.

चांदणे संदीप's picture

28 Jun 2016 - 8:13 am | चांदणे संदीप

=)) =)) =))

नाखु's picture

28 Jun 2016 - 12:18 pm | नाखु

मुरू तरी द्या अत्ताशी कुठं कैर्‍या कापल्यात..

लेखीकेस विनंती : ही पाककृती टाकण्यापुर्वी एकदा किमान व्याकरण आणि परिच्छेद पाडून पहा तुम्हालाही आवडेल.

नवमिपासाक्षर लेखकांचा स्वागतक नाखु

अजया's picture

28 Jun 2016 - 8:17 am | अजया

=))))
लोणच्याला लाॅन्च लिहिणाऱ्या मयतरणीची आठवण झाली ;) वाचते आहेस का गं?

खेडूत's picture

28 Jun 2016 - 12:48 pm | खेडूत

नवमिपाकरांना ..................णिशेध. मो.जा.भरा.
कथा आवडत आहे. पुढचा भाग लोउक्कर येऊद्या.
कांही ठिकाणी गाण्यांच्या जागा दिसताहेत.

स्वगतः कथा लिहिणं म्हण्जे सोप्पं नाय भोउ...!!

किसन शिंदे's picture

28 Jun 2016 - 1:02 pm | किसन शिंदे

हम्म !! अजून थोडं व्यवस्थित लिहायला हवंय.