स्मॉल इज ब्युटीफुल

मारवा's picture
मारवा in काथ्याकूट
27 Jun 2016 - 4:55 pm
गाभा: 

पुर्ण लांबीच्या चित्रपटांची एक आपली मजा आहे. काही कथानक असे असते की त्याला तीन तासही अपुरे पडतात. हिन्दी चित्रपट साधारण २ ते अडिच तास कधी त्याहुन जास्त लांबीचे असतात. इंग्रजी चित्रपट सहसा त्याहुन कमी वेळ घेतात. तर अजुन एक चांगला फ़ॉर्म शॉर्ट फ़िल्म्स चा आहे. या फ़ारच लहान जास्तीत जास्त १५-२० मिनीटांच्याच. एकदम आटोपशीर मामला. म्हणजे २०-२० मॅचेस सारख्या शॉर्ट अ‍ॅन्ड स्वीट. फ़ारच कमी वेळ असल्याने दिग्दर्शका समोरील सर्जनशीलतेचे आव्हान अधिकच तीव्र होऊन जाते. त्याला प्रतिसाद देतांना एखादी कथा घटना इतक्या कमी वेळात बसवतांना शॉर्ट फ़िल्म्स च्या दिग्दर्शकाचा जाहीरातकारांसारखाच कस लागतो. जितका दिग्दर्शक कुशल, सर्जनशील, संवेदनशील तितका तो या शॉर्ट फ़िल्म मध्येही कधी कधी पुर्ण लांबीची तीन तासांची फ़िल्म देणार नाही असा एक झणझणीत अनुभव देतो. या शॉर्ट फ़िल्म पाहायला कंटाळा येत नाही कारण सहसा कमी वेळ असल्याने यांची वेगवान आणि इन्टेन्स हाताळणी असते . शॉर्ट फ़िल्म उलट पुर्ण एकाग्रतेने एका दमात बघितली व अनुभवली जाते. हीच शॉर्ट फ़िल्मस ची मजा असते. सहसा फ़िल्म इन्स्टीट्युट चे ताज्या दमाचे वि्द्यार्थी, , मोठ्या चित्रपटासाठी जे आर्थिक पाठबळ लागते ते उपलब्ध नसणारे, कधी काही अनुराग कश्यप सारखे दिग्गज आवडीने जाणीवपुर्वक , किंवा एखाद्या कॉज साठी कार्यकर्ते इ. सहसा सर्वसाधारणपणे शॉर्ट फ़िल्म्स बनवतात. सध्या इंटरनेटचा प्लॅटफ़ॉर्म सहज उपलब्ध असल्याने व तांत्रिक प्रगतीमुळे हव्या त्या विषयावर वेगाने कमी खर्चात शॉर्ट फ़िल्म बनवली जाते. व प्रसारीतही करता येते.
तर अशा पैकी काही शॉर्ट फ़िल्म्स खरोखर अत्यंत दर्जेदार सुंदर व प्रगल्भ अशा आहेत. या धाग्याचा हेतु इतकाच की अशा शॉर्ट फ़िल्म्स इथे शेअर केल्या जाव्यात त्यावर चर्चा व्हावी लिंका पुरवाव्या जेणेकरुन एक या फ़ॉर्म ची मजा घेण्याची संधी वाढेल. विवीध भन्नाट शॉर्ट फ़िल्म्स एका ठीकाणी सापडायला चर्चायला जागा होइल म्हणून हा धागा प्रपंच.
आपण कृपया आपल्याला आवडलेल्या शॉर्ट फ़िल्म्स विषयी इथे शॉर्ट मध्येच लिहावे ( थोड ही जास्त लिहील तर शॉर्ट फ़िल्मची मजाच संपुन जाइल म्हणुन ) तसेच जमल्यास लिंका द्याव्यात ही नम्र विनंती. सुरुवात मी करतो. खालील एकही फ़िल्म १५ मिनीटांपेक्षा जास्त नाही व सर्व यु ट्युब वर उपलब्ध आहेत. अगोदर बघितल्या नसतील तर एकबार जरुर आजमाईयेगा.

१- Teaspoon -(हिन्दी)

एक गृहीणी घरात ९० वर्षांचा. आजारी, अंथरुणाला खिळलेला सासरा ज्याची दिवसभर ती रोज सक्तीची सेवा करत राहते, व त्याने प्रचंड वैतागलेली असते, घरात मुलबाळ नाही नवरा कामावर गेला की सासरा सतत टक टक टक टक चमचा वाजवुन तिला बोलवत राहतो ( बोलता येत नाही ) व सारखा खायला मागत असतो. एक दिवस एक घटना घडते............ , अत्यंत प्रगल्भ अनेक अर्थ प्रश्न निर्माण करणारी फ़िल्म अनेक अवार्डने सम्मानित. गृहीणीचे काम केलेल्या अभिनेत्रीचा अद्वितीय अभिनय
https://www.youtube.com/watch?v=ZmVPCnxN-1A

२-Ahalya (बंगाली-इंग्रजी सबटायटल्स)

सुजॉय घोषची ही थ्रीलर शॉर्ट फ़िल्म बंगालीत आहे मात्र सबटायटल इंग्रजीत व थोडे लक्षपुर्वक बघितल्याने अगदी सहज कळते भाषेचा काहीच अडथळा येत नाही. यात एक म्हातारा शिल्पकार त्याची तरुण सेक्सी बायको राधिका आपटे, घरी एक दिवस सकाळी एक इन्स्पेक्टर येतो , एक तरुण मॉडेल महीन्यापासुन बेपत्ता आहे त्याचा तपास करण्यासाठी..............
पुढे प्रचंड धक्कादायक कथा........ एक अक्षरही सांगितल तर मजा जाईल. निव्वळ जबर कथा जबर अभिनय.
https://www.youtube.com/watch?v=Ff82XtV78xo

३-बायपास (मुक फ़िल्म)

एक नवाजउद्दीन सिद्दीकी व त्याचा एक डेंजर मुका सहाय्यक, एक वाळवंटी वैराण प्रदेशात, मोठा दगड घेऊन एका कारवर नेम धरुन मारतो................ड्रायव्हर ठार.... हाच धंदा..........एक इन्स्पेक्टर इरफ़ान खान येतो....... पुर्ण फ़िल्म मध्ये संवाद शुन्य ..........हिल्स हॅव आइज सारख भयावह वातावरण..........गतिमान कथा .. पुढे काय होते ? अंगावर येणारी फ़िल्म
https://www.youtube.com/watch?v=NCRBY9ss-58

४-That day after every day (हिन्दी)

अनुराग कश्यप दिग्दर्शीत. फ़िल्म... तिन सामान्य वर्कींग वुमेन... त्यातली एक राधिका आपटे..... कामावर जातांना मोहल्ल्यातल्या गुंडांचा भयंकर त्रास, छेडखानी...........जीना हराम.........नवरा इंटरेस्टींग कॅरेक्टर.... सुरुवातीला केवळ त्याचा आवाज व रटाळ डरपोक उपदेश ऐकु येत राहतो व वैतागलेली राधिका कामावर जाण्यास तयार होतेय....पुढे काही घटना घडते व मग शेवट बघण्यासारखाच..
जबर फ़िल्म महत्वाचा विषय वेगळीच हाताळणी व भारीच कलाटणी..
https://www.youtube.com/watch?v=U6sIlphLMFU

५-सॉल्ट अ‍ॅन्ड पीपर (हिन्दी)

पुन्हा नवाजउद्दीन सिद्दीकी व तेजस्वीनी कोल्हापुरे ( ही पदमिनीची मुलगी असावी एक अंदाज ) तरुण मुलगी प्रेमात ठोकर खाल्लेली आहे व आत्महत्येसाठी फ़ासावर लटकायला निघालीय .......नवाज नेमका तेव्हाच घरात शिरतो......म्हणतो मला फ़ार भुक लागली होती दोन दिवसांचा उपाशी आहे....... मग पुढे थोडी प्रेडीक्टेबल होऊन जाते फ़िल्म तरी एकवार बघण्यासारखी
https://www.youtube.com/watch?v=AQR6cB1DXzY

६- आय लव्ह यु टु (हिन्दी)
एक प्रेमी स्वत:शी बोलतोय....स्वगत अंगावर येत आहे......इरादा नेक नाही....... मर्डर चा प्लॅन डोक्यात घोळतोय...... जबर सायकीक फ़िल्म......देखोगे तो जानोगे....
https://www.youtube.com/watch?v=ohNswbR3Rag

७- सेल्फ़ी (हिन्दी)
या फ़िल्म विषयी खर म्हणजे काहीच सांगावस वाटत नाही तुम्ही बघा फ़क्त.......जबर एकदम
https://www.youtube.com/watch?v=xfM9VubbfJc

तर मित्रांनो आपल्या आवडत्या शॉर्ट फ़िल्स्म्स इथे शेअर कराव्यात ही पुन्हा एकदा विनंती.

प्रतिक्रिया

जेपी's picture

27 Jun 2016 - 5:07 pm | जेपी

वाचनखुण साठवतो..
मस्त धागा..
प्रतिसादांच्या प्रतिक्षेत..

तुमचा अभिषेक's picture

5 Jul 2016 - 9:37 pm | तुमचा अभिषेक

+७८६ वाचनखूण
हा धागा खूप रात्रींची सोय करू शकतो..

टवाळ कार्टा's picture

27 Jun 2016 - 5:11 pm | टवाळ कार्टा

Ahalya बघितली आहे...फिल्म आणि राधिका....दोन्ही जब्राट ;)
बाकी हा धागा फक्त भारतीय फिल्मसाठीच मर्यादित नका ठेउ

अजया's picture

27 Jun 2016 - 5:22 pm | अजया

वाखुसा.
अनाहितात पण शाॅर्ट फिल्मच्या धाग्यावर यातल्या काही फिल्म्सचा उल्लेख झालाय.त्यामुळे बघितल्या गेल्यात.अहल्या विशेष आवडली.

कंजूस's picture

27 Jun 2016 - 5:24 pm | कंजूस

हुँ.

अत्रन्गि पाउस's picture

27 Jun 2016 - 5:41 pm | अत्रन्गि पाउस

शेवट अत्यन्त थरारक ...
बाकीच्या त्याच पंक्तीत बसवल्याने तत्काळ पाहण्यात येतील

पुंबा's picture

27 Jun 2016 - 5:44 pm | पुंबा

मनोज वाजपेयीची 'कृती' ही शॉर्ट फिल्म पाहिली. अवघ्या १८ मिनिटांत जी थरार, रहस्य आणि मनोव्यापारातील गुंतागूंत उभी केलीय त्याला तोड नाही. प्रचंड ताकदीची कथा,गुंतवून ठेवणारे संवाद आणि राधीका आपटे-मनोज वाजपेयी यांचा सटल अभिनय असा त्रिवेणी संगम आहे.. जरूर पहा.. युट्यूब वर आहे.

अनुप ढेरे's picture

27 Jun 2016 - 8:15 pm | अनुप ढेरे

शिरिष कुंद्रूने नेपाळी शॉर्ट्फिल्मवरून चोरली आहे म्हणून.

बोंबला..!!! काही तरी ओरीजिनल सुचतं की नाही या लोकांना? पण भारी आहे..

टवाळ कार्टा's picture

28 Jun 2016 - 12:32 pm | टवाळ कार्टा

कृती बघितली...इतकी काही खास वाटली नाही...हिरवीणीच भारीयेत

महासंग्राम's picture

27 Jun 2016 - 6:02 pm | महासंग्राम

PS

ही सुद्धा एक सुंदर शॉर्ट फिल्म आहे.

मारवा's picture

27 Jun 2016 - 7:31 pm | मारवा

अगदी मोजक्या शब्दांत बोलायच झाल तर काय सांगाल या फिल्म विषयी ?

महासंग्राम's picture

28 Jun 2016 - 9:50 am | महासंग्राम

प्रत्येक नात्यामध्ये काळजी हवीच पण त्याचा अतिरेक नको, नवरा बायकोच्या नात्याच्या पदर उलगडणारी शॉर्ट फिल्म आहे ही.

मारवा's picture

27 Jun 2016 - 7:31 pm | मारवा

अगदी मोजक्या शब्दांत बोलायच झाल तर काय सांगाल या फिल्म विषयी ?

मारवा's picture

27 Jun 2016 - 7:43 pm | मारवा

अगदी मोजक्या शब्दांत बोलायच झाल तर काय सांगाल या फिल्म विषयी ?

उल्का's picture

27 Jun 2016 - 6:05 pm | उल्का

मी शॉर्ट फिल्म बघायला सुरुवात केली ती ह्या फिल्मने.

Afterglow' ह्या फिल्मची सुरुवात होते ती ह्या वाक्याने -

“Let my thoughts come to you, when I am gone, like the afterglow of sunset at the margin of starry silence.” ― Rabindranath Tagore

थोडी गंभीर आहे. पारसी कुटुंब आहे. त्यामुळे बघायला आणि पारसी थाटातील संवाद ऐकायला मस्त वाटतं.

*****************************************************
मला अतिशय आवडली ती ही फिल्म.

Dum Dum Deega Deega ही फिल्म नक्की बघा.

अतिशय सुन्दर अभिनय केलाय ह्या छोट्या अज्जूने.

******************************************************

अजुन बर्याच आहेत. इतर अनाहिता सांगतीलच. :)

नक्की बघतो या फिल्म्स.

मारवा's picture

29 Jun 2016 - 9:57 am | मारवा

फार सुंदर आहे प्रचंड आवडली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Jun 2016 - 8:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विषय तितका टच करणारा वाटला नाही पण अज्जूचा अभिनय मात्र छान.
आइस्क्रीम खाऊन निघतो तेव्हाची स्टाईल लैच आवडली. धन्स.

-दिलीप बिरुटे

पद्मावति's picture

27 Jun 2016 - 6:13 pm | पद्मावति

मस्तं धागा. वाचन खूण केली आहे.

रायगड's picture

29 Nov 2016 - 12:03 am | रायगड

वाचनखुण कशी करायची?

मराठी कथालेखक's picture

27 Jun 2016 - 6:16 pm | मराठी कथालेखक

एकूणातच शॉर्टफिल्म्स मध्ये "राधिका आपटे" बरीच फॉर्मात दिसतेय तर.
मला तिचा अभिनय्, आवाज आणि संवाद बोलण्याची शैली आवडते. निदान तिच्या फिल्म्स तरी नक्की पाहीनच

मारवाजी, 'कृती' नक्की पहा.. भारीये

मारवा's picture

29 Jun 2016 - 6:46 pm | मारवा

एकदम ए वन आहे.
धन्यवाद सुचवणीसाठी.

दुर्दैवाने ही चोरी निघाली. आधी आवडलेली खूप परंतू चोरी आहे हे कळल्यापासून नाही चांगली वाटत आहे.

कुंदरची प्रेस कॉन्फरन्स
https://m.youtube.com/watch?v=P159ywwrIfk
आणि बॉबच्या दिग्दर्शकाची पोस्ट
https://m.facebook.com/aneel.neupane/posts/1211237398900193

सगळ्या फिल्म नाही पाहता आल्या पण पहिल्या दोन आवडल्या.

मारवा's picture

27 Jun 2016 - 7:56 pm | मारवा

१- नयनताराज नेकलेस
कोंकणा सेन आणि तिलोत्तमा शोम अभिनीत जयदीप सरकार दिग्दर्शीत अप्रतिम फिल्म
जयदीप ची कॉमेंट बोलकी आहे
“I wanted to make something about the world we live in, where we see lives on hoardings and the life which is promised to us by the malls and the glamour of the promised life. And it’s about the journey that we’ve made to get there and to be able to afford that lifestyle,” he said.

https://www.youtube.com/watch?v=L1TTNOBbN2k

२-अंबानी द इन्व्हेस्टर
फक्त एक्स्ट्राऑर्डीनरी स्टोरी आहे एक लहान मुलगा काय शिकतो काय करतो त्याची याहुन जास्त सांगु शकत नाही.
https://www.youtube.com/watch?v=DubdqpkKsPA

चौकटराजा's picture

27 Jun 2016 - 8:45 pm | चौकटराजा

एक वेगळाच अनुभव मिपाकराना देण्यासाठी हा धागा जरूर उपयुक्त ठरेल. चित्रपटाचा खरा आत्मा त्याची कथा हीच असते. बाकी पटकथा दिगदर्शन संवाद हे आलेच पंण मूळ कथा महत्वाची त्यामुळे कादंबरी या बरोबरच लघुकथा यानाही वेगळे स्थान साहित्यात आहे. नाटकांइतकेच एकांकिकाना ही आहे. तेच स्थान लघुचित्र पटाला आहे.

नुकताच अमाहितामध्ये हा विषय चालू केल्याने योगायोगाची गंमत वाटली.
आफ्टरग्लो, केवडा चांगल्या आहेत.
कुंडली, टीस्पून बर्‍या आहेत.

तुम्ही लिस्ट केलेल्या सगळ्या पाहिल्यात शेवटच्या ३ सोडुन. टी स्पून नुकतीच पाहिली आणि आवडली. परिणाम साधण्यासाठी थोडा बोल्ड धक्का दिलाय पण तो लाक्षणिक अर्थाने पाहिला तर पटतो. त्या अभिनेत्रीने डि डे मध्ये पण सुरेख काम केलंय. ही अभिनेत्री, राधिका आपटे, निमरत कौर या मला वाटतं अंडरस्टेटेड रत्नं आहेत.

बाकी अनाहितामध्ये पण चांगलं कलेक्शन झालंय. टाकु आम्ही ते इथे ही हळुहळु.

बादवे , त्या अभिनेत्रीचं नाव श्रीस्वरा ( सौजन्यः गुगल)

किसन शिंदे's picture

27 Jun 2016 - 11:25 pm | किसन शिंदे

या सगळ्या शाॅर्टफिल्म पाह्यल्यात. छान आहेत, अगदी काल परवा आलेली कृती ही शाॅर्टफिल्मही जबर आहे.

क्रिती मला मनोज वाजपेयी च्या अभिनयासाठी आवडली. कथाबीज तसं याआधी अनेकदा आलेलं आहे. कौन आठवत असेल उर्मिला चा तर साधारण कल्पना येते काय असेल त्याची.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Jun 2016 - 11:50 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सेल्फी सोडल्या तर बाकीच्या पाहिल्या नव्हत्या. अधिकाधिक उत्तम शॉर्ट फिल्मच्या लिंका या धाग्यात बघायला मिळतील.

-दिलीप बिरुटे

रुपी's picture

28 Jun 2016 - 1:44 am | रुपी

मस्त धागा..

मी यातले कुठलेच पाहिले नाहीत, त्यामुळे आता वेळ मिळाला कि पाहायला बरीच मोठी यादी मिळाली :-)

आणखी एक - "द अदर पेअर"

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Jun 2016 - 11:03 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

क्लास स्टोरी आहे, त्या पोराने भारी अभिनय केलं आहे.
आणि कथेने माणूस अधिक हळवा होऊ शकतो.

-दिलीप बिरुटे

स्मिता_१३'s picture

30 Jun 2016 - 4:21 pm | स्मिता_१३

द अदर पेअर पाहिली आत्ताच. अतिशय सुरेख !

एक ही वाक्य नसलेली पण आशयाने भरपूर अशी ही फिल्म मला भावली खूप.

बोका-ए-आझम's picture

28 Jun 2016 - 7:55 am | बोका-ए-आझम

किंवा वृत्तचित्र हाही एक जबरदस्त प्रकार आहे. उडता पंजाबच्या चलत मुसाफिर यांनी काढलेल्या धाग्यावर पंजाबमधल्या ड्रग्जच्या प्रश्नावर असलेल्या एका documentary ची link रामदासकाकांनी दिलेली आहे. ती छान आणि अंगावर येणारी documentary आहे. बाकी आवडलेल्या documentaries च्या links देतो इथेच.

डॉक्युमेंटरीज पण इंटरेस्टीं असतात कधी कधी सिनेमापेक्षा जास्त रोमांचक असतात.
तुम्ही ही विलक्षण डॉक्युमेंटरी बघितली का ?
https://www.youtube.com/watch?v=jqxENMKaeCU
https://en.wikipedia.org/wiki/Home_(2009_film)

महासंग्राम's picture

28 Jun 2016 - 9:53 am | महासंग्राम

mitid

या लिंक वर उत्तमोत्तम शॉर्ट फिल्म पाहता येतात. मराठी मधल्या आहेत बहुतेक पण सुंदर आहेत .

मित्रहो's picture

28 Jun 2016 - 11:25 am | मित्रहो

भयंकर आहे अंगावर काटा येतो. दिग्दर्शक अनुराग कश्यपचा गुरु असावा असे वाटते. भयंकर.
सेल्फि सुद्धा जबरदस्त.
मराठीतली केवडा पण मस्त.
अहल्या आणि That day after every day या तर नावाजलेल्या दिग्दर्शकांच्या आहेत.

उदय के'सागर's picture

28 Jun 2016 - 11:36 am | उदय के'सागर

पुन्हा नवाजउद्दीन सिद्दीकी व तेजस्वीनी कोल्हापुरे ( ही पदमिनीची मुलगी असावी एक अंदाज )

तेजस्विनी ही पदमिनीची बहिण आहे.

समीरसूर's picture

28 Jun 2016 - 11:40 am | समीरसूर

जबरदस्त लेख आणि धागा! या सगळ्या शॉर्ट फिल्म्स नक्कीच बघणार.

मारवाजी - हा धागा काढल्याबद्दल धन्यवाद! अशी एकत्रित स्वरूपात दर्जेदार शॉर्ट फिल्म्सविषयी माहिती क्वचित मिळते आणि त्यामुळे हे प्रभावी माध्यम थोडे दुर्लक्षितच राहते.

खरं म्हणजे अशा अनवट, प्रयोगात्मक, कल्पक माध्यमांची चर्चा करणारे आणि अशा माध्यमांना प्रसिद्धी मिळवून देणारे काहीतरी असायला हवे.

बरखा's picture

28 Jun 2016 - 12:21 pm | बरखा

व्वा ! छान माहीती दिलित. मी क्र २ आणी ४ पाहील्या आहेत. खुप सुंदर आहेत. आता बाकीच्या पण बघेन.

जव्हेरगंज's picture

28 Jun 2016 - 1:58 pm | जव्हेरगंज
जव्हेरगंज's picture

28 Jun 2016 - 1:59 pm | जव्हेरगंज
टवाळ कार्टा's picture

29 Jun 2016 - 8:52 pm | टवाळ कार्टा

फुटलो
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

जव्हेरगंज's picture

28 Jun 2016 - 2:01 pm | जव्हेरगंज
टवाळ कार्टा's picture

28 Jun 2016 - 2:24 pm | टवाळ कार्टा

माझी शनिवारची सकाळ =))

जव्हेरगंज's picture

28 Jun 2016 - 2:02 pm | जव्हेरगंज
पिलीयन रायडर's picture

1 Jul 2016 - 12:01 am | पिलीयन रायडर

Explain please!

खटपट्या's picture

2 Jul 2016 - 2:52 am | खटपट्या

मलापण नाही समजली !!

जव्हेरगंज's picture

28 Jun 2016 - 2:03 pm | जव्हेरगंज
जव्हेरगंज's picture

28 Jun 2016 - 2:06 pm | जव्हेरगंज
जव्हेरगंज's picture

28 Jun 2016 - 2:21 pm | जव्हेरगंज
टवाळ कार्टा's picture

29 Jun 2016 - 8:44 pm | टवाळ कार्टा

आरारा...लैच म्हन्जे लैच जब्रा =))

पिलीयन रायडर's picture

30 Jun 2016 - 11:20 pm | पिलीयन रायडर

Ek number!

टवाळ कार्टा's picture

30 Jun 2016 - 11:36 pm | टवाळ कार्टा

बाब्बौ =))

बोका-ए-आझम's picture

17 Jul 2016 - 11:19 pm | बोका-ए-आझम

जबराट!

ऑफिसमध्ये व्हिडिओज बॅन आहेत. घरी गेल्यावर पहावे लागेल.

जव्हेरगंज's picture

28 Jun 2016 - 2:28 pm | जव्हेरगंज

1 minute time machine

The Black Hole

SPIN

वटवट's picture

29 Jun 2016 - 10:01 am | वटवट

वाचनखुण साठवतो.. मी पण

मारवा's picture

29 Jun 2016 - 10:04 am | मारवा

जव्हेरगंज धन्यवाद
एकेक साठवुन बघायला पाहीजेत
तुमच्याकडे मोठा स्टॉक दिसतोय.

प्रमोद देर्देकर's picture

29 Jun 2016 - 11:43 am | प्रमोद देर्देकर

मारवा साहेब तुमची सॉल्ट अँड पेपरची लिन्क That day after every day हा लघुपट द्खावते आहे.
आणि जव्हेरगंज भाऊ तुम्हाला वन टाईम मशीन द्वारेच "क्लिक" ही कथा सुचली अगदी २०० % बरोबर ना.

जव्हेरगंज's picture

29 Jun 2016 - 1:29 pm | जव्हेरगंज

वन टाईम मशीन द्वारेच "क्लिक" ही कथा सुचली अगदी २०० % बरोबर ना.

+२००००% बरोबर मालक!

इथे पण कबूल केलेच आहे म्हणा!!

:)

प्रमोद देर्देकर's picture

29 Jun 2016 - 11:44 am | प्रमोद देर्देकर

मारवा साहेब तुमची सॉल्ट अँड पेपरची लिन्क That day after every day हा लघुपट द्खावते आहे.
आणि जव्हेरगंज भाऊ तुम्हाला वन टाईम मशीन द्वारेच "क्लिक" ही कथा सुचली अगदी २०० % बरोबर ना.

गुत्थी, द कॉलर या पण मस्त thriller फिल्म्स आहेत.

Gutthi madhe eka lekhakala navin pustakasathi kathabij milat nahiye.evadyat tyala roj daratla kachara uchalnarya mansacha vagna chamatkarik vatata.aani to tya kacharevalyala ghari bolavto...mag gappanmadhun vegalach kahi samor yeta.

The caller madhe eka mansala achanak dhamki che calls yayla lagtat.tyachyavar konitari २२४७ watch theun aasta....
Hi pan mast aahe short film

लिंक इथे
https://www.youtube.com/watch?v=IuefGFDAChQ

तिथे इन्ट्रॉडक्शन मध्ये खालील माहीती वाचावयास मिळाली.

Gutthi ( The Riddle ) is a story about a night-long conversation between a writer, Anand Rajan, and a garbage collector, Khalil. A night that leads to shocking revelations and the unlocking of several mysteries in their lives. Anand Rajan, who is a noted writer, is suffering from writer's block, when he catches Khalil, the garbage collector going through his dustbin.He then invites Khalil over for a session of weed and what unfolds is something nobody will anticipate. ""

बघायलाच पाहीजे एकदा.

Maharani's picture

29 Jun 2016 - 10:36 pm | Maharani

हो हो.. हीच. छान आहे.

टवाळ कार्टा's picture

29 Jun 2016 - 11:52 pm | टवाळ कार्टा

ट्विस्ट मस्तय

प्रियाजी's picture

29 Jun 2016 - 6:04 pm | प्रियाजी

मारवासाहेब, खूप सुन्दर धागा. पहिल्या चार फिल्म पाहिलया. धन्यवाद.

अत्रुप्त आत्मा's picture

29 Jun 2016 - 8:37 pm | अत्रुप्त आत्मा

वेगळाच धागा. वा.खु.सा.आहे. धन्यवाद.

क्रितीच्या चोरीबद्दलच्या बातम्या वाचताना आणखी वीस शॉर्ट फिल्मची एकत्रित माहिती मिळाली. त्यातल्या काही इथे आलेल्याच आहेत. ही लिंक.

पुंबा's picture

30 Jun 2016 - 3:55 pm | पुंबा

ह्या चोरट्यांना कही तरी शिक्षा व्हायला पाहीजे. असंच मोकळं सोडलं तर असाच दुसर्याच्या कलाक्रुतीवर डल्ला मारुन मलीदा खातील हे पैशेवाले चोर..

अनुप ढेरे's picture

30 Jun 2016 - 4:55 pm | अनुप ढेरे

कुंद्रुची फिल्म युट्युबने काढली आहे असं वाचलं.

यूट्यूबवरून काढली ते ठीकच परंतू कायदेशीर कारवाई व्हावी आणि त्या मूळ सर्जकाला व्यवस्थीत श्रेय मिळेल असा माफीनामा त्या कुन्द्रूकडून घ्यावा.

तसं असेल तर चांगली गोष्ट आहे!

सूड's picture

30 Jun 2016 - 3:19 pm | सूड

That day after every day आणि सेल्फि पाह्यल्या. दोन्ही आवडल्या. सेल्फि फापटपसारा न मांडता बरंच काही बोलून जाते.

टवाळ कार्टा's picture

30 Jun 2016 - 3:49 pm | टवाळ कार्टा

ओळखीत बरेच जण असे आहेत ज्यांना सेल्फि दाखवली पाहिजे

अगदी, मी चेपुवर शेअर केली आहे.

मीपण केली. खरंच खूप छान आहे.

अनिरुद्ध प्रभू's picture

30 Jun 2016 - 4:06 pm | अनिरुद्ध प्रभू

माझिही एक भर, छोटीसी,

काही महिन्यांपूर्वी एक ओरिया शॉर्ट फिल्म पाहिली होती, चांगली कथा, उत्तम अभिनय,

अ रिव्हर फ्लोस, बहुदा झी तॉकिज वर ही दाखवली होती लाइटहाउस मधे,

एकदा तरी पहाच!

अनिरुद्ध....

मारवा's picture

30 Jun 2016 - 6:09 pm | मारवा

लिंक दिलीत तर बर होइल आणि ओरीया आहे म्हणता पण इंग्रजी सबटायटल्स असतील ना ?

अनिरुद्ध प्रभू's picture

2 Jul 2016 - 9:18 am | अनिरुद्ध प्रभू

खरतर हाच प्रोब्लेम झाला आहे कि ही शॉर्ट फिल्म जाला वर सापडतच नाही आहे, अजुन एक त्याला इंग्रजी सबटायटल्स आहेत. झी टॉकिझ च्या साइट वर आहे. पण प्ले होत नाही आहे,

लिन्कः http://www.zeetalkies.com/lighthouse/videos/light-house-episode-no-5-par...

महासंग्राम's picture

30 Jun 2016 - 4:37 pm | महासंग्राम

https://www.youtube.com/channel/UCWnTC8o8AycL6a2eRrKSdBg
पॉकेट फिल्म्स

https://www.youtube.com/channel/UClR_A7xZrwegrToYsmS5dtg

mitid films

या चॅनलवर से एक शॉर्ट फिल्म्स पहायला मिळतील

मारवा's picture

30 Jun 2016 - 5:16 pm | मारवा

गितांजली राव दिग्दर्शीत "चाय" काहीशी वेगळी शॉर्टफिल्म फार आवडली
रीअलीस्टीक सिनेमॅटोग्राफी व मोनोलॉग्ज दोन्ही आवडलीत.

श्रीकांत रेड्डी ची पीके-२ पण भन्नाट मस्तच.

मारवा's picture

30 Jun 2016 - 6:06 pm | मारवा
मंदार कात्रे's picture

30 Jun 2016 - 7:12 pm | मंदार कात्रे

ठँक्यु बर्का

चांगला धागा आहे

मारवा's picture

30 Jun 2016 - 8:19 pm | मारवा

सर्व सहभागी प्रतिसादकांचे मनापासुन धन्यवाद !

आदूबाळ's picture

1 Jul 2016 - 6:10 am | आदूबाळ

काय भारी धागा! आता निवांत एकेक बघतो. मारवाजी, धन्यवाद.

एक सुचवणी: व्हिडीयो एम्बेड करणं टाळलं तर बरं होईल. पान 'जमायला' वेळ लागतोय.

फारएन्ड's picture

1 Jul 2016 - 8:58 am | फारएन्ड

धन्यवाद या धाग्याबद्दल, अहल्या पाहिली होती आणि आवडली होती. इतरही पाहतो आता.

अनिरुद्ध.वैद्य's picture

1 Jul 2016 - 8:54 pm | अनिरुद्ध.वैद्य

जबरदस्त! इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद!!

खूपच छान धागा. शॉर्ट फिल्म हा प्रकार माहित होता पण आवर्जून कधी बघितला नव्हता. या धाग्यामुळे छान शॉर्टफिल्म बघता आल्या.

मुक्त विहारि's picture

2 Jul 2016 - 9:05 am | मुक्त विहारि

धन्यवाद...

वाखूसा

ज्ञानोबाचे पैजार's picture

3 Jul 2016 - 9:38 am | ज्ञानोबाचे पैजार

धागा जरी शॉर्ट फिल्म चा असला तरी इथल्या सगळ्या लिंका बघण्या साठी बराच वेळ काढावा लागणार आहे.

मिपावरच रमताराम यांनी परिचय करुन दिलेली एक शॉर्ट फिल्म अली अ‍ॅन्ड द बॉल जरुर बघा.

ती बघण्या आधी ररांनी केलेले जबरदस्त सुरेख परिक्षण वाचायला इथे क्लीक करा.

आतापर्यंत अहल्या, टि स्पुन आणि बायपास बघितल्या. तीनही जबरदस्त आहेत. बायपास तर अंगावर आली. अहल्या मधे राधिका आपटेला पाहुन सुखद धक्का बसला. ती चांगली अभिनेत्री आहे. टीस्पुन मधल्या अभिनेत्रीने सुध्दा अतिशय सुरेख काम केले आहे.

बाकिच्याही वेळ काढुन बघतोच

पैजारबुवा,

मित्रहो's picture

4 Jul 2016 - 4:22 pm | मित्रहो

आजच बघितली
जी ए च्या कथेवर आधारीत आहे.
यात जुन्या कोकणातले जे वातावरण निर्माण केले ते निव्वळ अप्रतिम आहे.
https://www.youtube.com/watch?v=6HARYeqw5I8

पुंबा's picture

1 Feb 2018 - 1:10 pm | पुंबा

फार सुंदर.
अगदी अंगावर येणारा शेवट.

अनिरुद्ध प्रभू's picture

7 Jul 2016 - 2:45 pm | अनिरुद्ध प्रभू

बोल...

अतिशय उत्तम मांडणी या साठी तर जरूर पहवी...

https://www.youtube.com/watch?v=LzvMUncgvGo

ससन्दीप's picture

8 Jul 2016 - 12:53 am | ससन्दीप

Six short stories that explore the extremities of human behavior involving people in distress.

'वाईल्ड टेल्स' सहा लघुपट असलेला हा डार्क काॅमेडी अर्जेटिंयन चित्रपट आहे. IMDB वर तब्बल ८.1/10 ची रेटिंग आहे.
चित्रपट दोन तास पूर्णपणे खिळवून ठेवतो.
टीप: कुटुंबासोबत पाहता येणार नाही.
Source: torrent

http://m.imdb.com/title/tt3011894/

माझीही शॅम्पेन's picture

17 Jul 2016 - 9:43 pm | माझीही शॅम्पेन

एक जबराट , भुंगाट धागा , बोकोबाच्या कृपेने परत बघता आला , काही शॉर्ट फिल्म्स बघून एकदम हादरलो , अजून काही बघायच्या आहे

वा खु साठी एक पक्का धागा

टवाळ कार्टा's picture

25 Jul 2016 - 4:45 pm | टवाळ कार्टा

१०० झाल्यानिमित्त

निखिल निरगुडे's picture

26 Jul 2016 - 4:11 am | निखिल निरगुडे

शॉर्ट फिल्म्स पाहायला पहिल्यापासून फारच आवडतं.. वरील बऱ्याच फिल्म्स पूर्वी पाहिलेल्यांपैकी अगदी अप्रतिम अश्याच आहेत.. धाग्याच्या निमित्ताने आणखी काही नवीन आणि तितक्याच दर्जेदार शॉर्ट फिल्म्स पाहायला मिळाल्या....

निखिल निरगुडे's picture

26 Jul 2016 - 5:55 am | निखिल निरगुडे

वरील बऱ्याच शॉर्ट फिल्म्स इंग्रजी किंवा हिंदी होत्या, एखादा स्वतंत्र धागा मराठी शॉर्ट फिल्म्स वरती करता आला तर? किंवा इथेच तश्या कुणाला लिंक्स माहित असतील तर देता आल्या तर आनंद होईल.
मला माहित असलेल्या काही मस्त मराठी शॉर्ट फिल्म्स....
१. https://www.youtube.com/watch?v=ZhhGkqjCNsM
२. https://www.youtube.com/watch?v=Sjjuu-Mqd88
३. https://www.youtube.com/watch?v=UxgLoBHuMtI
४. https://www.youtube.com/watch?v=Ddgm8k1CRPQ
५. https://www.youtube.com/watch?v=pdI5LKGSHF8

अनिरुद्ध प्रभू's picture

7 Sep 2016 - 1:54 pm | अनिरुद्ध प्रभू

एक उत्तम नाही पण सुंदर शॉर्ट फिल्म कोंकणी भाषेतली.....

अनस्पोकन....

https://www.youtube.com/watch?v=7Wv8av8DhPU

नक्की पहा आणि कळवा..

'चटणी' टिस्का चोप्रा, आदिल हुसेन
हि शॉर्ट फिल्म बघितली. खूप आवडली. यानिमित्ताने हा धागा वर काढत आहे.

'चटणी' टिस्का चोप्रा, आदिल हुसेन
हि शॉर्ट फिल्म बघितली. खूप आवडली. यानिमित्ताने हा धागा वर काढत आहे.

"चटनी" मस्त आहे. तिचीच "छुरी" ही शॉर्टफिल्म आली आहे एवढ्यात, तीपण छान आहे.

सध्या चित्रपट पाहण्याएवढा वेळ/संयम नसतो त्यामुळे बर्‍याचदा शॉर्टफिल्म्स बघते.. त्यातल्या काही आवडलेल्या इथे देते -

मराठी - फाटा आणि हिंदी बटवा या दोन्हींतून चांगला संदेश दिलाय.

"प्रेशर कूकर"पण मस्त आहे. पल्लवी जोशीने एका मध्यमवर्गीय गृहिणीची भूमिका छान केलीये.

'प्रेशर कुकर' पाहिली. सुंदरच आहे. 'छुरी', 'चटणी'एवढी नाही आवडली. फार सरधोपट वाटली.
मी अश्यात शेफाली शाहची 'ज्युस', जॅकी श्रॉफ, नीना गुप्ताची 'खुजली' राधीका आपटेची 'दॅट डे आफ्टर एव्हरीडे' या तीन शॉर्ट फिल्म्स पाहिल्या. तिन्हीही खुप आवडल्या. 'ज्युस' विशेष आवडली. नक्की पहा.

निओ१'s picture

29 Nov 2016 - 12:46 am | निओ१

सिग्नंल
ही शॉर्ट फिल्म नक्कीच नाही आहे, अगदी १.३०+ मिनिट ची आहे.
आवर्जून पहा जर साय-फाय मध्ये आवड असेल तर.

https://www.youtube.com/watch?v=UHlxQD7zLP0

नवाझुद्दीन सिद्दिकीची 'द बायपास' पण मस्त शॉर्ट फिल्म आहे. नक्की पहा.

हल्लीच मी काही शॉर्ट फिल्म पाहिल्या... त्यातल्या दोन इथे देतो.

Mumbai Varanasi Express :- https://www.youtube.com/watch?v=N1R6Fyf5V6M

Nayantara's Necklace :- https://www.youtube.com/watch?v=L1TTNOBbN2k

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sophia Loren Mambo Italiano